Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

वैशाख शुद्ध ३ शके १७१६.
ता. २।५।१७९४

विनंती विज्ञापना, दौलाचे बोलण्यात आले की “ रुकमारडी व दमारडी जमीदार बाळकोंडकर शंकरराव भोंग यांची मालियेत घेऊन कबीले सुद्धा फरारी होऊन देवगडचांद्यास गेले. त्यांचा पत्ता तेथे लाऊन रायेल पुरुषोत्तम येथे आला. तेजवंत यांची पत्रे या मजकुराची रधी भोंसले सेनासाहेब सुभा यांस गेली होती. त्याचा जबाब त्याजडून आला की ' जमीदार चांद येथे आहेत. परंतु यकायेकी पाटीस आल्यास हात कसे द्यावें? कांहीं येक त-हेनें जमीदारास तेथून काढून देऊ, तुमचे हस्तगत होतील या अन्वये लिहिले आले ह्मणोन बोलले,' र।। छ २ माहे शवाल हे विज्ञापना.

लेखांक १६५                                                                   श्री                                                         १६२१ आश्विन वद्य ५


                                                                                  165                                      

                                                                             
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २६ प्रमाथी नाम संवत्सरे आस्वीन बहुल पंचमी भोमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपति याणी राजश्री देशाधिकारी प्रा। मावले ताराजगड यासि आज्ञा केली ऐसी जे सदानंद गोसावी याणी हुजूर येऊन विदित केले की ता। सिरवलपैकी इनाम जमीन अपला मठ मोजे नीब प्रा। वाई येथे आहे त्यास पूर्वापार चालत आहे बितपसील 

मौजे अणपुरीपैकी बिघे ..                         मौजे खेडपैकी बिघे305१०

येणेप्रमाणे चालीस बिघे जमीन पूर्वापार अदलशाहाचे कारकीर्दीपासून इनाम चालत आहे आलीकडे धामधुमीच्या प्रसंगाकरिता बिलाकुसूर इनाम चालत नाही तरी स्वामीने आज्ञा करून सदरहू इनाम चाले ऐसी गोष्ट केली पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मीं हे जाणून सदरहू इनाम गोसावीयाच्या मठास अदलशाहाचे कारकीर्दीस चालत आला असेल त्याप्रमाणे हाली पडी जमीन याचे स्वाधीन करून इनाम बिलाकुसूर सुरलीत चालवणे या पत्राची प्रती लिहून घेऊन असल पत्र गोसावी मा।राजवली परतोन देणे जाणिजे लेखनालंकार

                                                                                         161 3

                                                                                              रुजु सुरु-
                                                                            निवीस
                                                                            सुरु सूद बार

 

श्री वैशाख शुद्ध ३ शके १७१६,
ता. २।५।१७९४

विनंती विज्ञापना. मीर पोकद अली सिकंदरज्याहा बहादुर साहेब जादे यांचा निका दौलाचे नातास लागावयाची साअत छ २६ रमजानी ठरुन रात्री दौलाचे हवेलीस नवाब जनान्यासहित साहेबजादे मंडळीस घेऊन आले. नवाबाचे हुकमाप्रा दौलांनी आम्हांकडे षादीचा रुका सुर्ख रंगीन कागदावर लेहुन पाठविला की तुम्ही यावे. त्यावरून च्यार घटिका रात्रि आम्ही गेलो मोर पोकद अली, व सुभान अली व जुल फिकर अली व तैमूर अली च्यार साहेबजादे दौलाचे दिवाणखान्यामध्ये मजलस करून बसले होते, मीर आलम व इंग्रजाकडील वकील मिस्तर इष्टवारट व बेहतषामजंग आदि करून दरबारची इसमें तमाम अमीर मनसबदार सरदार मुतसदी हजर होते, मी जातांच मीर पकद अली यांनी आपले जवळ बसऊन पटणचे मोहिमे च्या वगैरे गोष्टी सुरु केल्या. मीर आलम व इष्टवारट सहित बेलणें एक वटिका होत. नाव जनान्यांत व दौला खटपटीस होते. साहेबजादे मज्यालस करून कंचन्याचा नाच होता. इतक्यांत निक्याचा साअत समय होतांच मिर पकद अली यांस असाल बोलाऊ आला. चौघे साहेबजादे महालांत जाऊन मीर कदअली यासी दौलाचे नातीचा निका लागला. त्यानंतर नबाब दिवानखान्यामध्ये वरामद जाले. मजला बाजुस जवळ बैसउन घेतले. सर्वांच्या नजरा जाल्या. कंचन्याचा नाच होता. दौलांनीं शरबताचा प्याला आपले हातीं घेऊन नबाबापुढे येऊन प्याला धरला. प्रथम प्याला नबाबांनी प्राशन केला. दुसरा प्याला दौलांनी पुढे केला तो नबाब प्राशन करावयास गेले तो प्याला माघारा सरकाउन घेतला. याप्रमाणे दोनतीन वेळां व्याहीपणाचे नात्याने मषकरीचा अनुकार दाखविला. हा संप्रदाय करून दौलाचे हातचा प्याला घेतला. दौलास बसावयाचा हुकुम जाल्याप्रमाणे बाजूस बसले. नबाब मजकडे पाहुन बोलले की * तुह्मीं षादीकरितां त्याची खेष कोणें प्रकारची ? याचा बयान थोडा सांगण्यांत संयुक्त तत्र्हेचा केल्यावरून नबाब कांहीं हास्यमुख होऊन संतोष जाले. मिस्तर इष्टवारट इंग्रजाकडील याने कलकतेकर जनरलाचे पत्र गुजराणिलें. तें दौलांनी वांचून दाखविलें. कंचनाचा नाच समाप्त करुन खुषालखान वे कल्याणखान यांचे लेक येथे प्रस्तुत आले आहेत, त्यांचे गायन दोन घटिका जालें मिश्री रुपेरी वर्खाची पानदान भरून आह्मांपुढे ठेविली, अभार उमरा येवन लोक यांस शरबताचे प्याले दिल्हे. याप्रमाणे समारंभ होऊन दहा घटिकां रात्री बरखास जाली. राछ २ पाबान हे विनंती विज्ञापना.

डांकरााछ २ डॉकवरून
श्री
वैशाख शुद्ध ३ शके १७१६,

ता. २।५।११७९

मामुली पत्र डांकेबरोबरचे श्रीमंतांस,

श्री
वैशाख शुद्ध ३ शके १७१६,
ता. २।५।१७९४

विनती विज्ञापना. मीर पोकद अली सिकंदरज्या बाहादुर साहेबजादे यांस दलाची नात नवाबांना केली. त्याचे शादीचे निक्याचा साअत छ २९ रमजाम रविवारी ठरून नवाबानीं सुभान अली वगैरे साहेबजादे यांजकडुन सांगेन पाठविलें की तुह्मी षादीचे सुर्ख रंगी पोषाग जवाहीर घालुन सि. कंदर ज्याहा यांचे हवालेस हजर असणें त्या प्राो ते पोकद अली यांचे मकानास तयार होऊन गेले. तीन प्रहर दिवसां पोकदअली आदिकरून साहेबजादे यांची याद केली. हजर जाले. दौलांनी सिकंदर ज्याहा यांस पोषाक जरी कारचोबी व जवाहीर सिरपेंच जिगा तुरा दस्तबंद भुजबंद कंठी पोहत्या जोड याप्रों पाठविले. नवाबास व माहालांतही वस्खें जवाहीरखाने किम्ती पाठविघ्या. मगरबाचे समई जनाने देवढीपासोन दौलाचे हवेली पर्यंत कनाता पडदे देऊन बंदोबस्त करउन नवाव जनान्यासाहत साहबजादे समवेत दौलाचे हवेलीस आले. समारंभाचा तपशील अलाहिदा पुखणांवरून ध्यानांत येईल. छ. २ माहे षवाल हे विज्ञापना.

लेखांक १६४                                                                                                                            १६२१ वैशाख वद्य ८


                                                                                63                                      

                                                                             

देसमुखानि व देसपांडियानि व मोकदमानि पा। वाई सरकार शादुर्ग उरुफ पनाला सुभेदारुलजफर बिजापूर सन ११०८ मालूम नुमायद की चितामणभट वलद नरसीभट जुनारदार सेकीन पा। वाई यास इनाम मौजे पसर्णी सा। हवेली पा। मा।रपैकी नीम चावर बरहुकुम फर्मान आदलखान व ताजा परवाना नाहारखान गौरी फौजदार पा। मजकूर हरहुकुम सनद जमीन .॥. बनजर अफता बतेरीख जमा जमीन देविले आहे आहद माहदूद घालून देणे ताजा परवानाचे हुजूर न करणे दरीबाब ताकीद दानाद

तेरीख २१ माहे जिलकाद

चत्रै वद्य ९ शके १७१६,
ता. २४।४।१७९४

विज्ञापना यैसीजे. येथील ताछि १५वर्तमान रमजान बुधवार पावेतों अखबार पत्र दाखल करून सेवेसी पत्राची रवानगी केली त्याजवरून ध्यानास आलें असेल, तदनंतर येथलि वर्तमान, छमार तीन प्रहर दिवसां नवाब जनान्यासहित दौलाचे हवेलीस आले, भोजन जनान्यांत होऊन नवाव दिवाणखान्यामध्ये बरामद जाले. दैाला व मीरआलम व आसदअलीखान वगैरे इस मांचा सलाम जाला. असद अलीखानास केडप्याकडे जाण्याची रुकसत देऊन पानदान इनायत जालें. दैला व मीरअलम यांसी खिलवत होऊन प्रहर रात्रीस आपले हवेलीस आले. छ १६ रोज गुरुवारी च्यार घटिका दिवसां लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला, मगरबाचे समई चांदणीचे फर्मावर नवाब बरामद जालें. सरबुलदंजगं व अर्जबेगी वगैरे इसमाचा सलाम जाली, लखनउचे कंचनीचा नाच होता. मना कंचनीस पुत्र जाला. तिने मान केली होती. नजर दिल्ही. मुलास नवाबान हसळी व बिंदिली इनायत केली, येक प्रहर दोन घटिकेस बरखास जालें. छ १७ रोज शुक्रवारी लाग. ( ल ? ) बागाचा झाडा करऊन तीन घटिकेस नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला, घासीमियाचे तबियतीची खबर आणिवली. तीन प्रहर दिघसा औरंगाबादेची अखबार गुजरली, मगरबाईचे समई चबुत्र्यावर चांदणीचा फरष करऊन नवाब बरामद जाले. सरबुलदंजग व खानसामाचा सलाम जाला. खानसामाच्या फर्दा पाहुन च्यार घटिका रात्री बरखास जाले. दौलाची अ गुजरली. छ १८ रोज मंदवारी तीन घटिका दिवसा लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला. (म)गरबाचे समई सरेबुलदजंग व अजमखान व दिल दारखान व अर्जबेगी व खानसामा वगैरे मामुली लोक हजर जाले. नवाब कुर्सवर बरामद जाले. सर्वांचा सलाम जाला. खानाखाने भरुन सर्वांपुढे ठेविले. सर्व इसमांनी रोज्याचे भोजन केलें. पानदान देऊन तीन घटिका रात्री बरखास जालें. हैदराबादेहुन अलीज्याबाहादुर साहेबजादे यांची अर्जी ब नजरमे वा गुजरला. प्रहर रात्री दौलाची अर्जी गुजरली. छ १९ रोज रविवारीं तीन घटिका दिवसा लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला, तीन प्रहर दिवसां दौलाची अर्जी गुजरली. मरि पाकेद अली सिकंदरजाहा साहेब जादे यांस हरमचे स्त्री पासोन पुत्र झाला, नवाबास अर्ज जाला, दौलांना नजर देण्यास येतो असी अर्जी पाठविली. रात्रीं येणें ह्मणोन हु ( कु? ) म जाला. येक घटिका रात्री नवाब चांदणींचे फर्षावर बरामद जाले. दौला व पागावाले व गफुरजंगाचे पुत्र वगैरे इसमाचा सलाम होऊन पोकद अली साहब. जाद्यास पुत्र जाला. याच्या नजरा केल्या. रााछ २३ रमजान हे विज्ञापना.

चैत्र वद्य ९ शके १७१६,
ती. २४।४।१७९४

विनंती विज्ञापना. निस्तर किरकपात्रिक इंग्रजाकडील वकील बाहेर डेर देऊन राहिला होता. त्यास इंग्रजी दोन पलटणे नवाबाकडे नोकरीत आहेत. ती कडयेप्रांत होती. तेथुन येलंगदलाकडे आणविली. हैदराबादेस पलटण सरदार सुधां आल्याचे वर्तमान आल्यावरून पलटणांतील लोक व सरदार याची देखरेख करण्याकरितां किरकपात्रिक येथुन छ २२ रमजानी निरोप घेऊन हैदराबादेस गेला. पलटणे पाहुन मागती बेदरास येणार. वरकड इष्टवारट वगैरे त्याचे सोबती मंगळवार पेटेंत पूर्वजाग येऊन राहिले. राछ २३ रमजान हे विज्ञापना.

श्री. चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४ एप्रील १७९४ ईसवी.

विनती विज्ञापना. व्यंकटरामदीक याजकडुन चेनापटणाहुन अखबार आली ते रवाना केली आहे. लौकर मजकुर ध्यांनांत येईल. उत्तरे रवाना व्हावयास आज्ञा जाली पाहिजे. राछ २३ रमजान हे विज्ञापना.

[ १६७ ]                                    श्रीरामचंद्र.                                    १२ सप्टेंबर १७४२.                                                             

राजश्री अमृतराऊ पडवळ नामजाद व कारकून किल्ले गगनगड गोसावी यांसीः -
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री भगवतराव रामचंद्र अमात्य हुकुमतपन्हा आशिर्वाद व नमस्कार सु।। सलास आर्बैन मया अलफ राजश्री कानो काशी हे कारखानिसीकडेस किलेमारीं लिहिणार होते त्यास कामाचे मर्दाने देखोन किल्ल्यांचे कारखानिसीचा फडनिसीचा धदा घेत जाणे यास वेतन पेशजीचे फडणीसाप्रों करार केले असे इ ।। सनद पैवस्ता वजावाटाऊ करून उरलें वेतन शिरस्त्याप्रों। देत जाणे छ १० साबान बहुत काय लिहिणें.

       °     ˜                                                                       लेखनावधि
   श्रीसीतारामच-                                                                  मुद्रा.
   रण रामचद्र
   नीळकठ शरण।

                                        पै वस्ती छ १२ साबान.

श्री. चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४।४।१७९४ 

विनंती विज्ञापना. असद अलीखान यांस नवाबांनी रुकसत कडप्याकडे जाण्याची छ १५ माहे रमजानी दिल्ही. छ १६ रोजी दौलाचा निरोप घेऊन खान मार बेदराहुन कुचकरून छ १७ रोजें। गेले. राछ २३ रमः जान हे विज्ञापना.