श्री चैत्र शुद्ध २ शके ७१६,
ता. १७।४।१७९४
विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यात आले की आसद अलीखान मुजफ. रुलमुलुक यांजकडे पहिले कडपे टुक्याचे काम होते. अलिकडे सुगुरजटपोळ कृष्णातीरचा तालुकाही त्याजकडे दिला. ताडपत्री ताडकरी, सिंगणमला, येलापुर हे तालुके ईसामियांकडे होते तेही सदअलीखान यांजकडे सांगितले, यवुन तेथन येकहाती बंदोबस्त तालुक्याचा आसद अलीखान यांजकडे जील, संवार पायेदळे जमियत सान मार यांची मजबुत आहे. तालुकि. यांचा बंदोबस्त खातरखा ठेविला आहे ह्मणेन बोलण्यात आले. सहा हजार स्वार व पैदल साहा हजार बारा हजार जमियत माारनिलेची आहे. रा छ, २३ रयजन हे विज्ञापना.