Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
( शके १७१५ जेष्ठ शु. ७ रविवार. )

राजश्री नाना स्वामीचे सेवेसी:

विनंति ऐसी जे. इकडील वर्तमान पेशजी छ. ३० माहे शवालीं पत्राची रवानगी केली आहे. त्यावरून तपसीलें ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान, अलाहिदा पुरवणीपत्रीं विनंति लिहिली आहे, त्यावरून ध्यानास येईल. उत्तरें रवाना करावयास आज्ञा जाली पाहिजे. ॥ छ. ६ माहे जिल्काद हे विनंति.

लेखांक १७१                                                                  

भीमाचार्य अस्टपुत्रे
वेंकटभट अस्टपुत्रे
लक्षुमीधरभट मांडोगणे
जानभट माभलेस्वर
अग्नहोत्री
रंगभट चित्राउ
सिवरामभट थिटे
रंगोजी पुजारी विठलदेऊ
अंतभट बिन जागदेभट
यमाजी अयाचीत
तिमणभट भीर
बालभट बिन नारायणभट
तुकदेभट पारनेरकर
शंकरभट सेडिये
नारायणभट बिन नरसींहभट
गंगाजीराम
सिउभट सिरदेकर
रामभटट गोदातीर
नरसींहभट गिजरे
नारायणभट्ट चित्राउ
भानभट दिघे
नारायणभट चित्राउ
बालभट ढेकुणे
सरकभट पुजारी नरसीहदेऊ
कृस्णभट पुजारी बीदमाधव
रामेसवरभट सेडे
अंकभट चित्राउ
तिमणभट सातपुते
संकरभट पिटके
रघुनाथभट
तिमणभट कसबे वा कर
तिमणभट तुकदेभट
रुद्रंभट वालिबे कौमे व फर्जदानी
तिमणभट बिन कृस्णंभट

व बाजे हिंदु व मुसलमान इनामदार पा। मजकूर हुजूर येऊनु मालूम केले जे आपणासी इनाम जमीन व ब्याहाडीया रोजीना बा। खुर्दखते वजीरानी कारकीर्दी दर कारकीर्दी महद कदम व इस्तकबील हैबतखान व ई॥ याकुदखान व ई॥ रजेस-माहमद व बा। खुर्दखते साबीका ता। सन सबा चालत आले आहे सन समानामधे नरसीहभट टोल हुजूर येउनु मालूम केले की जे इनाम आहेती ते तजेगिरीन करून घेतले आहेती ज्याच मुकासावर तरफ होय ते वखती खुर्दखते करून घेती ये वजेचे इनाम आहेती ते अमानत करणे ह्मणउनु अर्ज केला त्यावरून माहालासी खुर्दखत सादर जाले की ताजे खुर्दखत घेउनु येईल त्यासी इनाम दुमाले करणे ह्मणउनु एकदर खुर्दखत माहालासी गेलेयावरी माहाली कारकुनानी इस्कील करून इनामतीचा माहासूल व ब्याहाडिया अमानत करून आलाहिदा ठेविले आहेती आपले दुमाले केले नाही यावरी आपण हुजूर येउनु अर्ज करावे तरी साहेबी मोहीमसीर होते तेथे यावीयास फुरसती नवहे चि हाली बदगीस आलो आहो तरी आपणास जे इनाम आहेती ते ताजेगिरी नव्हती जेही दिधले आहेती त्याच्याच कारकीर्दीस भोगवटे जाले आहेती ताजेगिरी अमल बहुत दीस राहात नाही पा। मजकूर साहेबास मुकासा अर्जानी जाहाला ते वखती रदबदल करून तहकीकी मनासी आणौनु इनाम दुमाला केले ते पासू नु चालत आले आहे यास १० साले जाली दरम्याने काही इस्कील जाली नाही बेकुसूर चालत आले आहे नरसीहभटमधे व अपणामध्ये महजदाबदल भांडण आहे त्या बरअकसे साहेबापासी लायणी गैरयत बोलिला तरी साहेबी नजर अनायत फर्माउनु बरहक खातिरेसी आणौनु जैसे सालाबाद चालिले आहे तेणेप्रमाणे चालविले पाहिजे आपण द्वागीर आहो अपळ्याळ्या महजदे खुदाय तालाची बदगी करून साहेबास द्वा हेत असतो दरीबाब सरजाम होय मालूम जाले बराय मालुमाती इनामदार मजकूरु खातिरेसी आणौनु पेसजीचे भोगवटे व तसरुफाती पाहौनु जे इनाम दीधले आहेती ते ताजेगिरी नवहती नरसीहभट मजकूर लाइणी बद गोइै केली ऐसे मालूम होउनु तमाम इनाम व ब्याहाडिया दुमाले केले आहेती ई॥ ता। सन सबा चालिले आहे तेणेप्रमाणे चालवीजे सन समानीचा इनामाचा हक अमानत ठेविला आहे तो व तहासील केला असेल तो व बेहाडिया मना केला आहेती त्या दुमाळे कीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे औलाद व अफवाद चालवीजे तालीक घेउनु असली खुर्दखते फिराउनु दीजे पा। हुजूर खाने अजम अफजलखान पेसजीचे इनाम व हाली आहे आपळ्या खुर्दखत दीधले आहेती ऐसे कुली आपण च दीधले आहेती कोण्हेबाबे एक जरीयाची इस्कील न करणे पेसजीचे भोगवटियाचे कागद फुतरीताकरिता गेले असतील त्याचा उजूर न करणे तसरुफाती पाहौनु देत जाणे पा। मजकूरचा इनामदार हुजूर खुर्दख्ताबदल ये ऐसा अमल होऊ नेदणे ताजी परवानगी हुजूर ह्मणउनु रजा बा। खु॥ प्रमाणे इनाम मुसलमान व हिंदु व जुनारदार व तमाम इनाम दुमाला केले असे दुमाला कीजे बि॥ →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

येणेप्रमाणे दुबाला केले असे व बाजे इनामदार हिंदु व मुसलमान व बाजे बा। भोगवटे प्रमाणे दुबाला केले असे दुबाला कीजे तालीक लिहून घेउनु असल परतोनु दीजे मोर्तब सूद

72 1                         

तेरीख ९               माहे रबिलोवल
रबिलोवल


श्री.
(शके १७१५ जेष्ठ शु. २ सोमवार.)

विनंति ऐसी जे. सेनासाहेब सुभा यांजकडून सांवतखान नबाब व मध्यस्तास लग्नप्रकर्णी पोषाग व जवाहीर घेऊन आले. आमचे विद्यमानें मध्यस्ताची भेट व नबावाची मुलाजमत जाल्याची विनंति पेशजी लिहिल्यावरून ध्यानात आले असेल, छ. २७ शवा मध्यस्तांनी सांवतखान यांचे रुखसतीविर्षी नबावासं अर्ज केल्यावरून खान मा यांजपाशीं सेनासाहेब सुभा यांचे पत्रांचे जाबाब देऊन रुखसत दिल्ही. सरपेंच इनायत केला, खानासमागमें राजश्री भवानी काळे यांनीं आपल्याकडील लाला ब्रिजमल यास दिल्हें, त्याचीही रुखसत होऊन विडे दिल्हे. या उपरी मध्यस्ताचा निरोप घेऊन आह्मांकडे येणार. येथून खान मार रवाना जाल्याचें वर्तमान मागाहून विनंति लिहितों. ।। छ. ३० सवाल हे विनंति.

अखबार ई॥ छ. १९ माहे शवाल त।। छ, २९ मिनहूपर्यंत. ( शके १७१५ वै० व० ५ गुरुवार-ज्येष्ठ शु० १ रविवारपर्यंत.

छ. ६. रोज टपा, रवाना.

श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शु. २ सोमवार.)

विनंति ऐसी जे. व्यंकट रामदीक याजकडून चेनापट्टणाहूम सांप्रत दोन अखबारा ६ दोन लाखोटे पत्राचे आपले नांवें आले. एकूण च्यार पत्रांची रवानगी केली आहे. अवलोकनें सविस्तर मजकूर ध्यानांत येईल. उत्तरें रवाना करावयास आज्ञा व्हावी. रा छ, सवाल हे विनंति.

श्री.
(शके १७१५ ज्येष्ट शुद्ध २ सोमवार. )

विनंति ऐसी जे-आजपावेतों पागावाले, सराफा, साहुकार, मुतसदी वगैरे मंडळीस छपरबंदी करण्याविषयीं नवाबाची आज्ञा जाली नव्हती. छ. २७ राजीं सर्वत्रांस ताकीद केली कीं आपलाली छपरबंदी करावी. त्यावरून छपराची तयारी होत आहे. नबाबाचे महालांतील बायका नव दाहा आसामी हैदराबादेंत आहेत. त्यांस आणावयाकरितां समशेरजंग व तेजपा पांडे यांची रवानगी करणार आहेत. छ. ३० सवाल हे विनंति.

श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शु. २ सोमवार.)

विनंति ऐसी जे. मनसुकराये कायत पेशजी जोरावरजगं मरहुम यांजकडोन प॥ आंबेजोगाई व पा सेलगांव पा परळी येथील अमीलीचे कामावर होता. त्याजवर माहासबा काढोन कैदेंत ठेविलें. तेथेंच मृत्यु पावला. त्याचा पुत्र व्रजलाल भोंसल्यांचे येथें नोकर होऊन सांप्रत सांवतखान आले यांचे बराबर भोंसले यांनीं पाठविल्यावरून आला. सर्वांच्या भेटी गोष्टी जाल्या. दोनच्यार दिवस जाल्यानंतर जोरावर जंग मरहूम यांचे मामा व विश्वनाथपंत वकील यांनीं नबाबास अर्ज करून मध्यस्तांस सांगितलें की, याचा बाप-जोरावरजंग याचा माहासवेदार-कैदेंत मेला ते समंई सर्व जिनस आज नास (?) जरजवाहेर ब्रिजलाल नागपुरास घेऊन जाऊन तेथें आश्रय करून राहिला. हल्लीं आला आहे. आमचा फडच्या करून देवावा. त्यावरून लाला म।।र यांस आणून बसविलें, सांवतखान यांस नबाबाचा निरोप जाला. मध्यस्ताचा होणें तों लालाची हे दशा याजकरितां छ. २७ रोजीं मध्यस्तीकडे येऊन फार रदबदल केली कीं, मजसमागमें आला आहे. याजकरितां यास बसवूं नये, मध्यस्तांचे ह्म ( ण ) णें कीं, तुह्मी आपला जिमा करून लिहून द्यावें कीं नागपुरास गेल्यानंतर यास पोंहचाऊन देऊं; नाहीं तर याचे जिम्याचा जाब करूं. त्यास सावंतखान लिहून देण्यास अनमान करितात. यांजमुळें च्यार दिवस खानाचे जाण्यास तामुल जाला आहे. हे रदबदल जाल्यानंतर खान मा यांनीं मध्यस्तांस सांगितलें कीं, पांचा हजारांचे कापड गदवालचे भोंसले यांचे येथें जाणार त्याचे महसूल माफीचें दस्तक देवावें व दाहा बाहेरी परीद्याचे सिकारी सिकाकोल राजबंदरीहून येणार त्याचें एक दस्तक एकून दोन दस्तकें देवावीं. त्यावरून मध्यस्तांनीं दोन दस्तकें आपले मोहरेचीं करून देवावीं. रा छ, ३० सवाल हे विनंति.

श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शु. २ सोमवार. )

विनंति ऐसीजे. सांवतखान राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांजकडोन वस्त्रें षादीचे रस्मीयातीचीं घेऊन आले तीं नबाबास पावतीं केलीं, मध्यस्तास षादीचीं व गमीचीं वस्त्रें होतीं तीं द्यावीं याचा विच्यार पडला कीं यांचे पुत्रास मरून फार दिवस जाले. नबाबांनी आपला पुत्र यांस देऊन मनोधारण केले तेव्हां गमी राहिली नाही. आतां गर्मीचीं वस्त्रें दिल्यास कसें पडेल नकळे ह्मणोन याचा विचार कोणास पुसावयाचा आहे ? यांचे यांसच पुसोन द्यावें; यांस पुसल्यास हेही नका असें ह्मणतील. याजकरितां मध्यस्तांस पुसलें कीं, सेनासाहेब सुभा यांचे येथील दोन प्रतीचीं वस्त्रें आपले नांवे आहेत. यांचे देण्याचा विचार कसा? याचें उत्तर मध्यस्तांनीं केलें कीं गर्मीची वस्त्रें आहेत तीं आमचे समक्ष न आणितां तोषेखान्यांत देवावीं, व षादीचे रस्मयितीची वस्त्रें आहेत तें (तीं) मात्र आणवावीं. त्यास त्याप्रमाणें केलें. सारांश लोभ दोन वस्त्रांपावेतों सुटला नाहीं.
रा। छ ३० सवाल हे विनंति.

महाराष्ट्र इतिहास.

खर्ड्याच्या लढाईचा पत्रव्यवहार.
( गोविंदराव काळे यांचें दफ्तर.)

सरकारी-नानास.

श्री.

( शके १७१५ ज्येष्ट शु. २ सोमवार.)

विनंति ऐसि जे. छ. २६ (वै० य. १३ गुरुवार ) रोजीं बाबाराव मध्यस्ताचे सांगितल्यावरून आमचे घरास चार घटका दिवस शेष राहतां आले. परस्परें आगतस्वागत बोलणें आलें. राव म।।र यांनीं तिकडील म॥र व आपले कर्ण्याचा व मजबुतीचा भाव सर्व सांगितला कीं, “ मी पांचच्यार वेळा राजश्री नानांकडे गेलों होतों. त्यांचेही बोलण्यांत सर्व प्रकारें स्वच्छता आहे. कोणेही प्रकारें तर्फेनचे जाबसालाचा उलगडा व्हावा, येविषयीं मजलाही आज्ञा केली होती, त्याप्रमाणें सर्व दरजे मी मध्यस्तांसी बोलोन यांची मर्जी हमवार केली आहे, त्यास प्रस्तुत मदारुलमहाम यांचीं पत्रें व यादी आपल्याकडे आल्या असतील त्या काढाव्या, त्याची भवनि न भवति करून कलमें नेमांत आणावीं, याचें उत्तर मीं यांसी केलें कीं, * पत्रें अथवा यादी अद्याप आल्या नाहींत, येतील. त्यास, येथून यानीं दसखतें ठरावून गोविंदराव व रघोत्तमराव यांजपाशीं दिल्या आहेत; त्या दसखतांची तेथें भवति न भवति होऊन त्याजवर मदारुलमहाम जवाव लिहितील ते आल्यानंतर यांनीं मंजूर करून नेमांत आणावें, ह्मणजे फडच्या. त्या यादींच्या नकला आह्मांपाशी आहेत, परंतु तेथून करार होऊन आल्या नाहींत. मग भवति न भवति केल्यांत फल काय ? १) याप्र॥ यांसीं बोलणें जालें. बाबाराव यांचें ह्म(ण)णें कीं, “प्रस्तुत यादी आणि पत्रें मदारुलमहाम यांजकडून आपल्याकडें आल्या ऐसें कल्याणराव यांनी लिहिलें आहे.'' मी बोललों की “यादी आल्यास त्या तर तुह्मांसी छपावून ठेवितों? येणार आहेत. पहिल्या यादी पहावयाच्या असल्यास आहेत. पाहाव्या. त्याजवर दसखतें कसीं करावीं त्याचे मसोदे ठराविले त्याचा निश्चयही अद्याप पका नाहीं. गोविंदराव तेथें बोलून सरकारची आज्ञा येईल त्याप्रमाणें बोलण्यांत येईल." ऐसें सांगितले. त्याजवरून ते कल्याणराव यांजकडे ऐसेंच लिहुन पाठवितील–ध्यानांत असावें. र॥ छ. ३० सवाल हे विनंति.

छ ५ जिलकाद अखबार
ज्येष्ठ शु।। ६ शके १७१६ बुधवार ता. ४।६।१७९४
रवाना छ ६ आवाल.
श्री.

विज्ञापन ऐसीने येथील वर्तमान ता छ १९ माहे, शवाल सोमवार पावे. तो अखबार पत्रीं लेखन करून सेवेसी पत्राची रवानगी कली त्यावरून ध्यानास आले असेल. तदनंतर येथील वर्तमान रात्रीं दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. घांसीमिया यांनीं नवाबास मलाजमत केली होती. त्यांचा सरंजाम मिठाई दीडमण वजन व फुलें गुलाब पानें सुपारी व पंचवीस मोहरा नजर गुजरली. छ २० रोज मंगळवारी लालबागामधें तीन घटिका दिवसां नबाब आले कुहीरचे आबे जनान्यांत बटवडा करून दिल्हा. रात्री दौलाची याद केली, ते हजर जाले, पांच घटिका रात्रीं नबाब नवे बंगल्यामध्यें बरामद जाले. मीरआलम व पागावाले वगैरे मामुली इसमाचा सलाम जाला. मिस्तर किरकपात्रीक वकील इंग्रजाकडील अला. त्यानें कल' कल्पाचे जनरल चें पत्र गुजराणिले. रोशनराव यानीं शादीची नजर केली. लखनउचें कंचनीचा नाच होता. दौला व मीर आलम व किरकपात्रीक यांसी खिलात जाली. येकप्रहर येक घटिकेस बरखास जाले. छ २१ रोज बुधवारी दिवसा दरबार जाला नाही. व्यंकटराव सुरापुरकर आल्याचा अर्ज जाला. त्यास इस्तकबाल राज्याजीचे भाऊ आपाराव व राज्याजीचे पुत्रास पाठविलें. दौलाची याद केली. व्यंकटराव यांनीं राज्याजीचें बंधुसह पुत्रास पोषाग व सरपेच दोन दिल्हे. पांच घटिका रात्रीं बंगाल्यामध्यें नवाब बरामद जाले. दौला व पागावाले व रायेरायां वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. व्यंकटराव सुरापुरकर यांची मुलाजमत पांच इसमाची होऊन नजर जाली. दौला व व्यैकटराव यांसी दोन घटका बोलणें जालें, लखनउचे कंचनीचा नाच होऊन यक प्रहर तीन घटिकेंस बरखास जाले. छ २२ रोज गुरुवारीं दिवसां दरबार नाहीं. रात्री दौलाची अर्जी वे धारणेचा निरखबंद गुजरला, छ २३ रोज शुक्रवारी दिवसां लालबागेमधें जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ २४ रोज मंदवारीं लालबागेमध्यें तीन घटिका दिवस नबाब आले, जनान्याचा बंदोबस्त जाला, बहलोल खानाकडील अर्जी गुजरली. रात्री कंचन्याचें ताफे बोलाऊन नाच रागरंग अतषबाजी रोषनाई जाली छ २५ रोज रविवारीं दिवसा दरबाराची खैर सला. रात्रीं पाच घटिकेस नबाब दिवानखान्यामधी बरामद जाले. दौला व पागवाले भुनसी व रायेरा। वगैरे इसमाचा सलाम जाला. दौलासी खिलवत जाली. भोसल्याकडील पत्र माधवराव. रामचंद्र यांनी गुजराणिलें. येक प्रहर येक घटिकेस बरामद जाले. छ २६ सोमवारी दिवसा लालबागेमधें जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्रीं साहा घटिकेस दिवानखान्यामध्यें नबाब बरामद जाले. दौला व पागावाले व रायेराया वगैरे मामुली इसमांचा सलाम जाला. कादरखान अमील खममेठ, याची मुलाजमत नजर जाली. रावजीकडे, येण्याविसी सांगोन पाठविल्यावरून आले. सलाम जाला. दौला व रावजीसुधा खिलवत जाली, व्यंकटराव सुरापुरकर यास आदवनी रायेचुर वगैरे माहालाचे काम सांगितले, खिलक्त इनायत जाली. रुखसतीचें पानदान दिल्हें. महमद अमीखान आरब याची अर्जी दौलानी गुजराणिली. यक प्रहर च्यार घटिकेस बरखास जाले. छ २७ रोज मंगळवारी प्रात:काळी दौलाचे हवेली परियंत खांच देण्यास हुकुम जाला. दौला व गफुरजंगाकडील व असदअलीखानाचा जनाना लालबागेंत येऊन बंदोबस्त जाला, गोपाळ पेठेचे जमीदारानें चोबी बंगला दोनखणी तयार करऊन नबाबास पाठविला तो गुजरला, दिवसां दरबार नाहीं. रात्री दौलाची अर्जी गुजरती छ २८ रोज बुधवारी दिवसा लालबागमधे जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. नाचरागरंग आतषबाजी रोशनाई जाली. भवानी मीर्धा यांचे घरास आग लागुन दग्ध जाले. अर्ज जाला. छ २९ रोज गुरुवारी प्रहर दिवसा ख्वाबागामधे नवाब बरामद जाले सेखउमरखान वगैरेचा सलाम जाला. लालनहजामाची याद केली. हजामत होऊन येक प्रहर तीन घटिकेस बरखास जाले. रात्री बहलोलखानाकडील अर्जी गुजरली छ. ६० रोज शुक्रवारी दिवसा खैरसला, रात्री मीरपोकद अली याचे कबील्याकरिता मिठाई पंतास खाने व फुले चंगे-या व पाने सुपारी इलाची लवगा बदाम मिश्री खारीक खोबरे वगैरे सरंजाम हीसा मुदौला अर्जबेगी व यकरामुदौला खानसामा याजसमागमे नवाबानी दौलाचे हवेलीस पाठविले. पोषाग यक व जवाहीर आदद पांच या प्रो। सरंजाम दौलाचे हवेलीस आणिला. दौलानी अर्जी पाठविली, चंदाकंचनीचा नाच होता. छ १ माहे जिलकाद मंदवारी यक घटिका दिवसां लालबागामधे नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ २ रोज रविवारी दिवसां दरबार जाला नाहीं. रात्री च्यार घटिकेस फुलाचे हार दान दौलाकडे पाठविले. दौलाची अर्जी गुजरली. छ ३ रोज सोमवारी दिवसा खैरसला. रात्री दौलाची सिदी अबदुल याची गंजीकोटयाहुन अर्जी आली त्यासुधा गुजरली. छ ४ रोज मंगळवारी दोन घटिका दिवसां लालबागामधे जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्री पांच घटिकेस दिवानखान्यामधें नवाब बरामदजाले. दौला व पागावाले व राथेराया व मुनसी वगैरे इसमाचा सलाम जाला, व्यंकटराव मजेवार जमीदार हातनुरकर यास रुखसत जाली. कंचनीचा नाच पाहुन यक प्रहर यक घटिकेस बरखास जाले. छ ५ रोज बुधवारीं हुमणाबादेहुन तोफ लांबी दाहा गज दोन गिरे आली. जिनसीत दाखल जाली. दिवसां दरबार नाहीं. रात्री दौलाची अर्जी गुजरली. या छ ५ माहे जिलका हे विज्ञापना.

सदरहु पत्रें श्रीमंतांस अखेर साला परियंत मामुल,

ज्येष्ठ शु। ४ शके १७१६
रविवार ता. १।१६।१७९४

श्री ५

विनंति विज्ञापना ऐसीजे. आदवनी प्रकर्णी स्वराज्याचा फडच्या होणें या विशई नवाबांनीं राजश्री नानास पत्र लिहिलें होतें त्याचे जबाब आला कीं आदवनीकर यांचे येथील सर्व वडीलपणें नवाबानीं पाहावें, सरकारचे स्वराज्याचा फडच्या करावा अथवा आमचे सरकारातुन कोणी पाठऊन बंदोबस्त त्याचे घरचा पाहुन स्वराज्याचा फडच्या करुन घ्यावा. असी मर्जी असन्यास * * * (पृष्ठांक ४४१) गहा * * च उधार आहे. यास्तव तहनामे भोसले काढीत नाहींत. घरांतील भावाच्या घालमेली यांत तहनामे गहाटले असे ह्मणतात, नवाबाचे ह्मणणे आमचे जवळ नकला आहेत ह्या पाहाव्या भोसल्याचे ह्मणे असल काढाव्या, त्या मंज़ुर हे बालतात, असल तहनामे विठलसुंदर यांचे गारतीचे वेळेस अफरातफरीक जालें परंतु त्याच्या नकला नानाजीपंत यांचे हातच्या पहिल्या आहेत. आज आह्मीं नव्या लिहिल्या नाहींत. या प्रमाणें वाद प्रतिवाद. बादमीचे स्वारींत खास मुधोजीबावा होते, ते वेळेस जाला. मला माहित आहे. तहनामा धरुन बोलु लागल्यास भोसले काइम होतील. बादामीवर असेंच जालें. याजकरितां घराव रितीनें भोसलें याजकडील तहनाम्पाच्या नकला आणुन स्वामीनी पाहाव्या. नंतर यांसी बोलावयाचा निश्चय पका होऊन आज्ञा- यावी, यांस उत्तर समर्पक द्यावें लागतें. तहनामा धरुन हे बालुं लागल्यास त्यास उत्तर तहनामा पाहुनच द्यावे जर तहनामा कायम करून उत्तर देणे ठीक नाही असें असल्यास तहनामे हरवले आणि मागल्या तहनाम्या प्रा। अमलांत काये आले तेव्हां तो तहनामा केबुल नाहीं असे ह्मणोन नवाच तहनामा करावयास जवरदस्ती पाहिजे असे ह्मणावे तर हाली सरकारचे पत्र नबाबास आलें यांत मुधोजी भोसले यांचे तहनाम्याचा दाखला आहे त्यांत पहिले तहनाम्याचा उधार आहे इकडुनही अडचण. इतका तपसील लिहावयाचा कारण जे स्वामी पुढें प्रसगी ह्मणतील की तुझीं नीट बोलत नाहीं. बोलण्याचे प्रकार सर्व ध्यानांत यावे. याचा निश्चये खचित करून आज्ञा यावी. त्या धोरणावर चालत जाईन. रा। छा २ जलकाद हे विज्ञापना.