Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख वद्य ८ शके १७१६
गुरुवार ता. २२॥५॥१७१४
विनंती विज्ञापना, भिस्तर किरकपात्रीक इंग्रजाकडील वकील भागानगरास गेला होता तो येथे आला ते अंबराईत राहिला. कारण की पहिला वकाल मिस्तर कनवी मंगळवार पेटेंत सेव्याचे वाड्यांत राहात होता. नंतर नबाब मंगळवार पेटेंत राहिले तेही जागा नबाबाचें तसरुकात होती. भिंती वगैरे जागा पाड पाड करून खराब केली तसेच जागेमध्ये इष्टवर होता. सांप्रतचा तरीक आंबईत राहिल्यास इष्टवर जाऊन त्यास मंगळवारांत येऊन राहावयाविसी आग्रह केला. त्यावरून उभयतां मिळोन जागा पाहावयास आले. जागा मरमततलब आहे सबब दुरुस्ती करावयास माणसे लाऊन मागती उभयतां आंबराईत जाऊन राहिले आहेत. जागा तयार जाल्यानंतर मंगळ वारांत रहावयास येणार. राा छ २२ षवाल हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६९ ] श्रीराजाराम. १७४५.
समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री सरकारकुनानी व समस्त सैना हिंदुपत सरदारानी यासी आज्ञा केली ऐसी जे - काळपरत्वें आमचा प्रसग विस्कळित होऊन चिरजीव राजश्री सभाजी राजे व राजसबाई याणीं गिरजोजी यादव व अंताजी त्रिमळ व लोकखासकेल गडकरी व तुळाजी सितोळे यासी पुढें करून किल्ले पनाळा येथे चिरंजीव राजश्री सभाजी राजे यांसि राज्यपदास बैसविले, आह्मास संकटी घातले, बहुत निकड केली ते प्रसगी चिरजीव राजश्री शिवाजी राजे यासि सतान सौभाग्यवती पार्वतीबाई यासि दोघे पुत्र झाले त्यापैकी पहिला पुत्र क्रमला दुसरा पुत्र त्यासी देवी सगर्भ होती. प्रसूत जाली त्याचा फेरमोबदला करून हा मूल देवीच्या स्वाधीन केला पाळग्रहण करविलें सौभाग्यवती भवानीबाई सगर्भ होती. त्यानंतर चिरंजिवास देवी येऊन काळवशें समाप्त झाले. समागमें सौभाग्यवती पार्वतीबाईंनीं सहगमन केलें. त्यांचा पुत्र देवीच्या स्वाधीन केला. तो अद्यापवर तिजपाशीं सुखरूप आहे. सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती. ती प्रसूत झाली. पुत्र जाहला तो चिरंजीव राजश्री संभाजी राजे व राजसबाई यानीं कपटबुद्धि करून मारिला. काय निमित्य ह्मणून पुसिलें त्यास त्याणीं उत्तर दिलें जे- " राजश्री शाहूराजे यांची आज्ञा आपणास आहे, त्यावरून आपण अपाय केला," ऐसें जनांत सांगो लागले कांहीं दिवस तैसेच गेले त्याउपरि उभयतां चिरंजीवांचा विवेक होऊन भेटी जाल्या एक दोन वेळा सप्तऋषीस चिरजीव करवीरवासी यांचें आगमन जालें. उभयपक्षीं सौरष झाला. त्यानंतर चिरंजीव राजश्री शाहूराजे याणीं यासि आग्रह केला जे - समस्तांच्या भेटी घ्याव्या असा हेतू आहे त्यावरून सर्वांस आह्मांस बरोबर घेऊन गेले ते समयी आपले वस्तु इकडील दु ख न साहवे. यास्तव चिरंजीव राजश्री शाहूराजे याजपाशी आपणास रहावें लागलें देवी व मूल समागमेंच होतीं. परंतु ते समयीं याणी त्यासी पळवून समागमें घेऊन आले. त्यानंतर चिरंजीव राजश्री शाहूराजे याणीं आपणास दोन चार वेळा पृच्छा केली जे - पुढां वंशाचा विचार कैसा आहे. परंतु आपण अंत न देतां उडवाउडवी केली त्यावरी राजश्री शाहूराजे दत्त पुत्र गोत्रजांचा घेत होते, तेव्हांहि मागुती आपणास पुशिलें. त्यावर आह्मीं उत्तर दिले जे - गोत्रजांचा पुत्र तुह्मीं घ्यावासा काय आहे श्री महादेव तुह्मांस पत्र देईल, एव्हाच त्वरा करावीशी नाहीं. त्याउपरि ते गोष्ट तैशीच राहिली. चिरंजीवाचा मनोदय नि:संशय आपणास कळला नाहीं ऐसें पाहोन स्त्रीलोभे, धनलोभे, राज्यलोभें विसर पडोन कालहरण केलें. समयपरत्वें उद्भव होणे ते समयीं होईल, हा भाव चित्तीं आणून हा काळपर्यंत गुप्तच राहिलों पुढें वृद्धापकाळ, देशकालवर्तमान नकळे, मुलास सतरा अठरा वर्षे होत आली, मागें पुढें कोणी खरें लटकें ह्मणतील, याजकरितां कैलासवासी राजश्री रामचद्रपत याणीं आमच्या राज्यात वडिल वडिलां तागायत निष्ठेने सेवा केली, मोडिले राज्य त्याणीं संभाळून यश कीर्ति संपादिली त्यांचे पुत्र राजश्री बाजीराव बरा शहाणा आहे, आपणाजवळ निष्ठेने वर्तत आहेत, ऐसे पाहोन वाडियातील मूल राणोजी माने व शिवाजी खाडेकर याजबरोबर पत्रे व वस्त्रें देऊन राव मशारनिले याजकडेस पाठविले आणि येविशीची आज्ञा करणें ते केली आहे मुलास युक्तिप्रयुक्तीनें हे आपणाजवळी आणवून, तुह्मास लिहून व सांगून पाठवितील, त्याप्रमाणें सर्वत्र गोष्टीस साह्य होऊन कार्य करणे. यासी एकंदर हैगै न करणें. राजबीज खरें हें राजश्री उपाध्यांस व आपा प्रतिनिधी व चिंतो महादेव आदिकरून सर्वास दखल आहे. याचा शोध पुर्ता व्हावा यास्तव राव मशारनिले उमरजेस चिरंजीवाच्या व आमच्या दर्शनास आले. ते समयी आपण राव मशारनिले यासि निश्चयपूर्वक आज्ञा करणें ते केली. त्याउपर चिरंजीव राजश्री शाहुराजे याणीं या गोष्टीची पृच्छा रायांस वेघळे वाटेनें केली. रायांनी इकडील आधारें उत्तर प्रतिउत्तर करणें तें केलेंच. चिरंजीवांनी रायासी आज्ञा केली जे - तुह्मीं याचा शोध जे युक्तीनें होईल ते प्रयुक्तीनें करणें. ऐसियासी तुह्मीं सर्वांही राजश्री राव मशारनिले यांचें सर्वविशीं सारथ्य करून मुलास ठिकाणीं आणवणें. मग जे आज्ञा करणें ते केली जाईल. लग्न मुहूर्ताचा प्रसंग होणें आहे. त्यास राजश्री संताजी मोहिते व नागोजी घाटगे यांच्या समतें पुढें करणें. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
लेखनशुधि.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६
अखबार.
ता. १६।५।१७९४ ।
विज्ञापना यैसीजे-येथील वर्तमान. येथील वर्तमान ताा छ ५ माहे प्रवाल सेमवर पावेतों अखबार पत्र लेखन करून सेवेसी पत्राची रवानगी केली त्यावरून ध्यानास आले असेल. तदनंतर येथील वर्तमान छ मारी च्यार घटिका दिवसा नबाब लालबागामध्ये येऊन जनान्याचा बंदोबस्त करविला. दिवसां दरबार जाला नाही. रात्री दलाची अज व धारणेचा निरखबंद गुजरला. छ ९ रोज मंगळवार तीन घटिका दिवसां लालबागामध्ये जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्रीं येक प्रहर येक घटिका दिवसां चांदणीचे फर्मावर नवाब बरामद जाले, सरबुलंदग व राथेराया व मुनषी यांचा सलाम जाला. कवालाचे गायन यैकुन येक प्रहर च्यार वटिकेस वरखास जाले. छ ७ रोजे बुधवारी दिवसा दरबार जाला नाही. रात्री साही घटिकेस चांदणीचे फर्मावर नबाब बरामद जाले सुरबुलदजंग व अजमखां व रायेराया व मुनशी व अर्जबेगी वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. कवालाचे गायन यैकिलें व रायराया यांच्या फर्दी पाहुन येक प्रहर पांच घटिकेस बरखास जाले. छ. ९ रोज गुरुवारी तीन घटिका दिवसां लालबागामधे नबाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला, दाही हाथी सवदागीर हजह जाले. साहा घटिका दिवसा खिडकी बाहेर नबाब आले. पागःवाले व अर्जबेगी व रायेरायां वगैरे इसमांचा सलाम जाला, हाथी पांच व हातन्या पांच पाहिल्या. सात वटिकेस वरखास जाले. घटिका दिवस शेष असतां जोरावरजंग तालुक्यांत जाण्याकरितां रुखसती विषई दौलाची अजी गुजरली. त्यावरुन पांच घटिका रात्री नबाबांनी रुखसतीचें पानदान दौलाकडे पाठविलें. जोरावरजंग रफादुलमुलुव यांस तालुक्यांत जाण्याची रुवसत जाली. छ ९ रोज शुक्रवारी येक घटिका दिवसां लालबागामधे नबाब येऊन जनान्याचा बंदोबस्त जाला, दिवसा दरबार नाही. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ १० रोज मंदारी तीन घटिका दिवसां लालबागामधे जनान्याचा बंदोबस्त जाला, दिवसां खैरसला. रात्री मामुली लोक हजर होते. त्यांस जबाब जाला. छ ११ रोज रविवारी प्रातःकाली दौलांची अर्जी गुजरली. त्यांस हुकुम जाला जे मालागरेचा सरंजाम दोन वटिका दिवसां राहतां घेऊन येणे. कबुतरखाना व चिनी ची बासने वगैरे सरंजाम हैदराबादेकडे रवाना करण्याचा हुकुम (द ) रोग यास ज.ला, तीन प्रहरास आसदअलीखान यांची अजी नवाबास. व दौलास पत्र बैगनपलीहून आलें तें दौलांनी अर्जीसहीत नबाबाकडे पाठविले. दोन घटका दिवसा शेष असतां दौला सालगिरेचा सरंजाम घेउन हजर जाले. दोन घटिका रात्री नवाब दिवाणखान्यामधे बरामद जाले. दौला व मीर आलम व पागावले व रायेराया वगैरे मामुली इसमांचा सलाम जाला, दौलांनी पोषाक व खरबुजें सोनेरी रुपेरी व मेवाखाने गुजराणिले, चंदा कंचनीचा नाच होता. दौलांस फुजाचा हार दिल्हा. साहा घटिकेस बरखास जाले. छ १२ रोज सोमवारी च्यार घटिका दिवसां नवाब कबुतरखान्यापास आले. सैदमुनवरखान वगैरेचे सलाम जाला, कबुतरे पाहून हैदराबादकडे रवाना करण्याचे सांगितले. सालगिरेचा बबखाना पाहिला. सांहा घाटस लालबागामधे येरुन जनान्याचा बंदोबस्त जाला चिमणाराजे औरंगाबादेहून बेदरास ये ऊन उतरले. याचा अर्ज जाला. रात्री दौलांची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ १३ रोज मंगळवारी च्यार घटिका दिवसा नवाब लालवीगामधे येऊन जनान्याचा बंदोबस्त जाला. दौलाची अजी प्रहर दिवसा गुजरेली. दिवसा दरबार झाला नाहीं, रायचूराहून चकमकी बंदुखा माहवतजं. गकिडील नवाबांनी आणवल्या त्या कामाठ्या समागमें आया. चिमणाराजे यांस इस्तकबाल आषज्याउलमुलुक गफुरजंगाचे पुत्र यांस पाठविले. चिमणा राजे यांनी त्यास तीन पारचे पोषख व दुषाल किनखाब व येक घोडा याप्रा नियाकत केली, सिरपेंचही दिल्हा. रात्री दौलाची याद केली. ते हजर जाले, च्यार घटिकेस बंगल्यामधे नबाब बंगालमध्ये बरामद जाले. दौला व मारलम व पागावाले व रायेराया व मुनषी वगैरे मामुली लोकांचा सलाम नाला, चिम: णाराजे यांची मुलाजमत होऊन सात इसमांची नजर जाली. बसात अंगाचा चेला मरमतखां याची मुलाजमत नजर जाली. पंना भांडाचा नाच होता. असदअलीखानाचे पुत्रास तीन हजारी मनसबा आलमनगारा जाला. दौला व मीर आलम यांसा खिलवत होऊन प्रहर रात्री बरखास जाले. छ १४ रोज बुधवारी लालबागचा झाडा करऊन च्यार घटिका दिवसां नबाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला । छ १६ माहे षवाल हे विज्ञापना. वैशाख वद्य ८ शके १७१६ गुरुवार ता. २२॥५१७९४ छ २२ रोजी पा रवाना पुण्यास, मामुली हवाल्याचे पत्र रावसाहेब पेशवे यांस. छ २२ माहे शवाल मुकाम बेदर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६,
ता. १६।५।१७९४
विनंती विज्ञापना, बेदरांत छावणी ( पृष्टांक ३२३-३२४ गहाळ )
पृष्ठांक ४२६ चालू.
* * * कवीला,-------------------- | १ हामीदुलाखान रुस्तुम यारजंग याचा की। व्याहा:राम वेगम नवाबाची कन्या,
१ मीरकुददुलाखान इबारतयाबजंग यांस नबाबाची कन्या ज्यानी बेगम यांची लेक तिचे नांव साजिंदा बेगम.
१ मीर षाहाबुदीखान, | १ मीरफतेअलीखान सिपह सालारजंग इबारतयाबजंगांचे बंधु येकमात ह्मणजे येकदर.
३ गोरा बेगम बसालतजंगाचा स्री यांजपास हैदराबादेत आहेत.
१ नसरुलाखान.
१ फतहमखान.
१ षपजंभ
-----
३
---
८
एकुण आठ पुत्र हैदराबादेत आहेत र।। छ १६ माहे षवाल हैं। विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६
ता. १६।५।१७९४
विनंति विज्ञापना. येथे वर्तमान यैकण्यांत आल्याची विनंति.
टिपुचे पुत्र पटणास पोहचल्या नंतर महमद अमाखान आरब सरहा-
टिपुने पटणाहुन कुच करून दुस- देचे तहकीकाती करितां बल्हारी.
कोट्यास आला. तेथुन पिळगुंड्यास कडे गेले होते त छ १९ रम्'
येणार. दहा हजार स्वार व वीस जानी पागटुरास आल्याची खबर.
हजार बार या प्र॥ जमियतगुतीस असद अलीखान बैगनपलीस
टिपुकडील * * वर्तमान. जाऊन पोहचलें.
कलमें सुमार तीन याप्रेा वर्तमान दाट आहे. टिपु पीलगुंड्यास आल्याचे व गुतविर फौज पाठविली या वर्तमानाची तहकीकात करून मागाहून लिहिण्यांत यईल. आलफखान करनुळकर यांचे पत्र शडमल ह्मणोन नबाबाचे येथील दप्तरचे मुत्सदी आहेत त्यांस आले. त्यांत सदरहु टिपूकडील मजकुर लिहिला होता. ते पत्र मारिनिलेनी दौलास दाखविलें. दौलांनी उत्तर त्यास केले की “आपल्या तालुक्यांत फिरण्यास ज्याचा तो भुखतियार आहे.' याप्रमाणे वर्तमान ऐकिलें तें लिहिले असे, रा॥ छ १६ माहे षवाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६८
वेदमूर्ति राजश्री नरसींभट गोसावी यासि
दो। बो। रायाजी पाटील व कृस्णाजी पाटील मौजे वरखलवाडी साहेबास कतबा लेहोन दिधला ऐसा जे आत्मकार्या कारणे तुह्मापासून गालियाचा पैका घेतला
३ मोठे भात टके ६
१ बारीक टके २।०
एकूण टके ८। घेतले याचे भात रासमाथा देउन व जोंधले १ घेतले त्याचे दीड मण देऊन हा कतबा सही (नि. नांगर)
गोही
राघोपंत मजमदार खलोजी सालोखी
जु॥ बारगीर १
बहीरजी धुमाल १
तेरीख २९ माहे साबानु
साबान
कतबा वलखलवाडी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६
ता. १६।५।१७१४ |
विनंती विज्ञापना. घाबेखान बीडवाला नवाबाचे सरकारांत सरदार आहे त्याजपासीं येक जमातदार म-हाटा ग्रहस्त हमेषा आह्मांकडे येणे जाणें घरोबा अशा रितीचा आहे, त्याने येक वर्तमान सांगितले की इंग्रजी दोनं पलटणे नवाबाकडे नौकर आहेत. ते कडप्याकडून हैदराबादेस आली, ती दोन पलटणे व गुंटुराकडील पांच येक सात पलटणे इंग्रजी लोक जगत्याळापर्यत गेली ते पाहुन येक दोघे स्वार आले. इंग्रजी पलटणे जगत्याळाहून झाडीचे मार्गे देवगड चांद्याचे रुखे ज्या जागी विठलपंत सुभेदार भोंसल्याकडील फौजसमवेत आहे त्याजवर अचानक रात्री जाऊन छापा घालावा यैसी बातनी आहे. भारामल विंठलपंत सुभेदारापासोन तीन कोसाचे फासल्यावर सोळा हजार फौज सुद्धा आहे. त्यास नबाबाकडील पत्रे सांडणी स्त्रारा बराबर गुप्तरुपें गेली की • पलटणे देवगड चांद्याचे मार्गे येतात त्याची बातमी ठेऊन तिकडुन पलटणे व येके बाजुने तुह्मीं येकसमई भोसल्याकडील फौजेवर हंगामाकरून फौज तार बतार करावी. याप्रा बातनी समजली ह्मणोन जमातदाराचे सांगणे ते यैकुन मात्र घेतले. परंतु याचा विध्यार करतां मनसब्यास अती गोष्ट येत नाहीं. कारण की गुटुरची पांच पलटणे इंग्रजी इंग्रज या कामास सहसा देणार नाहींत. इंग्रजांची दूरदेशी व मनसव्याचा पाला लांब, तह सोडून भलतीच गोष्ट आपण होऊन येकाकी कसी करतील? त्यांत इंग्रजांस फरासीसाचे मसलतीचा पायेबंद असा नाहीं को तुर्त काली त्यांनी डोई उचलुन दुसरी कोणती येक मसलत करावी. तेव्हा गुटुराकडील पलटणे हे गोष्ट कांहींच मिळत नाही. कदाचित मुसारेहमाचे लोक नवी पलटणे यांनी सजविली त्या पैकी असतील तर असेत. परंतु परभारी जगत्याळाकटून पलटणे पाठवुन भोंसले यांचे फौजेवर दगा करावा हेही धोरण दिसत नाहीं. जे गोष्ट दग्याने करणे ते जाहिराणा बोलण्यात येणार नाहीं. दौला सहजी येक दिवस आमास बोलले की ‘यलगंदल वरंगळ तालुक्याकडे दोन पलटणे इंग्रजी कडप्याकडुन आणविली. ईसामियानी तालुक्याचा बंदोबस्त केला. त्याजपासीही जभियत स्वार आहेत. पलटणे वरंगळ प्रांती राहिली असतांच जुरुर वगैरे बंदोबस्त ही बोलणी. भोंसले यांजकडील फौज जवळ आहे. आपलीही जमियत नजीक. हा दाब दाखऊन बोलले. याची विनी १३ : लिक्ष्यिांत अठ। ध आहे. यावरून वाटते की दगा करण्याचा मनसबा असतो तर पलटणे व स्वाराचा दाब बोलण्यात न येता. हा विच्यार पाहता बातनी सांगितली ते अशीच कांही दिसते. यौकले वतमात तें ध्यानांत यावे यास्तव विनंती लिहिली असे. राा छ १६ पवाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६
ता. १६।५।१७९४
श्रीमंत रावसाहेब मामुली हवाल्याचे पत्र. ( ता. १६ शवालचे )
श्री वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६,
ता. २।५।१७९४
विनंती विज्ञापना. नवाबाची सालगीरे छ ११ माहे शवाल रविवारी सबब दौलांनीं नजर करावयाचा सरंजाम सोन्या रुप्याची खरबुजें तयार करविलीं. नवाबास अर्जी पाठविली. दोन घटका दिवस असतां येणें ह्मणोन हुकुम जाला. त्या प्रा दौला सरंजामसुद्रां हजर जाले. रात्री दोन घटिकेस नवाब बरामद जाले. दौलांनी सोन्याची खरबुजें पांच हजारांची व रुप्याची दोन हजारांची खरबुजें बादाम, पिस्ते आक्रोड भिश्री चिरोंजे याचे खाने पनास व पानेसुपारी लवंगा इलायची फुले अत्तर गुलाब याप्रा सरंजाम व गुल अनारी रंगाचा पोषाख गुजरावुन नजर केली. मीर आलम व पागावाले आदिकरून सर्वांनीं नजरा सालगिरेच्या केल्या. नाच राग रंग होऊन साहा घटिकेस बरखास जालें. रा छ १६ माहे पवाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. ७/५।१७९४ |
विज्ञापना यैसीजे. येथील वर्तमान ता छ २९ माहे रमजान बुधवार पावतों अखबार पत्र लेखन करून सेवेसी पत्राची रवानगी केली त्यावरून ध्यानास आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान. छाामारी मगरबाचे समई तरकष महालामधे नबाब बरामद होऊन चांदरातीच्या तोफा सुरु करण्यास हुकुम जाला. चार घटिका रात्री नबाब जनान्यासहित दौलाचे हवेलीस आले. आसद अलीखान यांचे पुत्राकडील चढावा मिठाईचे खाने व फुलें पार्ने वगैर सरंजाम जवाहिर वस्त्रेसुद्धां गुजरली. भोजन होऊन सात घटिका रात्री दिवाणसान्यामध्ये नबाब मरामद जाले. दौला व मीर आलम व पागापाले वगैरे इसमाचा सलाम जाला, दौला व मीर आलम यांसी खिलवत जाली. त्यांस मोतिया फुलाचे हार दिल्हे. एक प्रहर यक घटिका रात्री बरखास होऊन धिकारी म्यान्यामध्ये नबाव सवार जाल. रोशनीने हवेली दाखल जाले. छ १ मा शवाल गुरुवारी ईदीचा समारंभ सब मीरपोकदअली वगैरे साहेबजादे व दौलाची याद केली. ईदगास किलेदार व का। घ मुला तिघांस पाठविले, ते कुदवा पढुन आले. तेफाचे वार दहा घटिका दिवसां करऊन नबाब लालबागामध्ये वरामद जाले.
मीरपोकदअली व सुभानअली व जुलफकार अली व तैमुरअली व दौला व पागवाले व येहत घामजंग व मीरआलम वगैरे मामुली इसमांचा सलाम जाला. ईदीच्या नजरा केल्या. बरखास होऊन साहेबजादे यांस समागमें जनान्यांत नबाब घेऊन गेले. त्यांसहित भाजन होऊन पानदान हार होऊन साहेब. जादे यांस निरोप दिल्हा, ते आपले मकानास गेले. रात्री च्यार घटिका नव्या बंगल्यामध्ये नवाब बरामद जाले. सरबुलदजंग व आजमखान व अर्ज बेगी वगैरेचा सलाम जाला. पंना भांडाचा नाच होता. समशेरजंगास हैदराबादेतील हवेली खाली करणे ह्मणेन हुकुम जाला. येक प्रहर येक घटिकेसे बरखास जाले. छ २ रोज शुक्रवारीं येक प्रहर दोन घटिकां दिवसा लालबागेमधे दिबाणखान्यांत नवाब बरामद जाले. दौला व पागेवाले वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. वजीरखानास इस्तकबाल आषज्याउलमुलुख याजला पाठविले. त्यास च्यार पारचे चारचोबी व सिरपेंच वजीरखानानी दिल्हा. वजीरखानाची मुलाखत होऊन चाळीस इसमांची नजर जाली. कमठाणे येथील आंबईचे बंदोबस्ताकरितां मामाबढन असलेस हुकुम जाला. दौलासी बोलणें जालें. घांसीमियांकडील लोकांच्या नजरा जाल्या. येक प्रहर साहा घटिकेस बरखास जाले. हैदराबादेस समशेरजंग गेले. सजावरुदौला रुकसत होऊन उदगीरीस गेला. अर्ज जाला. रात्री च्यार घटिकेस बंगल्यामधे नबाब बरामद जाले. सरबुलंदजंग व आजमखान वगैरे लोकांचा सलाम जाला. प.गेकडील बारगिराच्या नजरा जाल्या. सरबुलंदजंग व अजमवान व गुलाम इमाम यांस मोतिया फुलाचे हार इनायत जाले, लखनउचे कंचनीचा नाच होता. प्रहराचे अमलांत बरखास जाले. छ ३ रोज मंदवारी तीन घटिकां दिवसां (+ + + + येक पान नाहीं पृष्ठांक ४१८ ) लालबागामधे जनान्याचा बंदोबस्त करविला. नांदडाहून खरबुजाचे बैल आले ते जोरावरजंगाकडून गुजरले. दोन प्रहरी दिवसां दौलाची अर्जी गुजरली.
॥ छ ७ घवाल हे विज्ञापना,
छ १६ रोज टपारवाना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. १५।१७९४
विनंती विज्ञापना, दौलाचे बोलण्यात आले की 'चेनापट्टण येथील गैरनर इंग्रजांकडुन होता तो तगीर जाला. दुसरा गौरनर विलायतेहुन लाट आंबट ह्मणोन रवाना जाला तो येत आहे. अद्याप चेनापटणास दाखल जाला नाहा, लौकरच येईल., ह्मगन बोलण्यात आले. भिस्तर इष्टवारट जवळ बसले त्यांनी आपले मुखें हैं सागितलें. र॥ छ ७ पाहेषवाल हे विज्ञापना.