Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[३७] श्री २१ अगस्ट १७५३
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री विष्णुपंत स्वामी गोसावी यांस. पे॥ बाळाजी बाजीराव प्रधान. नमस्कार. विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. श्रीपरमहंसबावा यांचा ऐवज श्रीमत् सौभाग्यादि संपन्न मातुश्री बाईसाहेब कैलासवासी वाडा दुसरा यांचे सरकरांत होता, रुपये १,००,००० एक लक्ष. तो ऐवज बाईसाहेब यांणीं राजश्री रघोजी भोसले यांस कर्ज दिल्हा. रघोजी भोसले यांचे खत परमहंसबावा यांचे नावें करून घेतलें. आणि आपले सरकारांत ठेविलें. त्या उपरी बाईसाहेब कैलासवासी जाहली. यावरी सन तीसांत कोरेगावचे मुक्कामी श्रीमत् महाराज राजश्री कैलासवासी स्वामी याचे सन्निध जगंनाथ चिमणाजी नि॥ परमहंसबाबा याणीं फिर्याद केली, बावाचा ऐवज मातुश्री बाईसाहेबांकडे त्याची विल्हे विष्णुपंतास आज्ञा करून करवावी. त्याजवरून श्री स्वामीनीं तुह्मांस बोलाऊन नेऊन वर्तमान पुशिलें. तुह्मी बजिन्नस रघोजी भोसले यांचे खत परमहंसबावाचें नावाचें होतें ते दाखविलें, आणि वर्तमान सांगितलें की, बाईसाहेबीं रघोजी भोसले यांस कर्ज दिल्हे, तेव्हां बाईसाहेबास विचारूनच दिल्हें, याची वाट बाईसाहेबच करणार आहेत. मजकडे कांही गुंता नाहीं. ह्मणोन विनंति केली. नंतर तुह्मास राजश्री स्वामींनी हातरोखा दिल्हा कीं, तुह्मांकडे कज्या याचा नाहीं. आणि रघोजी भोसले याजकडे पत्र पाठविलें, की ऐवज सरकाराचा पाठऊन देणें. त्याजवरी महाराज स्वामी कैलासवासी जाहाले. रघोजी भोसले याजकडून ऐवज यावा तो आला नाहीं. तेव्हां जगंनाथ चिमणाजी यांणी हें वर्तमान महाराज राजश्री राजारामसाहेब याजपाशीं पुन्हां सांगोन फिर्याद केली ते समयी तुह्मीं राजश्रीपाशी यथास्थित वर्तमान सांगोन निवेदन केलें. हा कज्जा आह्मांकडे नाही. सरकारांतून याचा निकाल जाहला पाहिजे. कैलासवासी स्वामीच्या स्थानीं साहेब आहेत. साहेबीं या गोष्टीचा निर्वाह करावा. तेव्हां ते गोष्टीचा फडशा जाहला नाहीं. या उपरी सन इसने खमसेनांत जगन्नाथ चिमणाजी याणीं पुणियाचे मुक्कामीं सरकारांत वर्तमान विदित केलें कीं, विष्णुपंताकडील गुंता उरकत नाहीं. तेंव्हा तुह्मांस बोलाऊन आणून वर्तमान विचारिलें, तुह्मीं कोरेगांवचे मुक्कामचे हातरोखे दाखविले, व परमहंस बावाचे नांवचें खत होतें तें दाखविलें. आणि सविस्तर हें वृत्त सांगितलें. त्याजवरून मनास आणितां येविश्शीचा कजिया तुह्मांकडे नाहीं. रघोजी भोसले याजकडील ऐवज येईल तेंव्हा त्यांणीं घ्यावा. याप्रणें जगंनाथ चिमणाजी यास आज्ञा केली. असें असतां सनसलासांत भालकीचे मुक्कामीं मोगलाचा तह रद्द जाहला. ते समयीं रघोजी भोसले याणीं निरोप घेतला. तेंव्हा परमहंसबावाचा ऐवज उगवावा हें जरूर जाणोन मशारनिल्हेस निरोप दिल्हा. त्यावर तुह्मीं त्यास मागलो जाऊन श्रमसकस करून खर्चवेच करून आज्ञेप्रणें मुद्दल ऐवजाचा निकाल करून घेऊन खतें फाडविलीं. ऐवज आणिला. त्याणीं जगन्नाथ चिमणाजी यास धावडशीहून बोलावून आणून आज्ञा केली कीं, लाख रुपयांस तुह्मांस आदेसूद जाहले असेल ते वजा करून बाकी ऐवज पे॥ खर्चवेच मजरा घेऊन परमहंसबावा याचा ऐवज घेणें आणि आपले फारीखत विष्णुपंतास लिहून देणें. त्याप्रमाणें हिशेब रुजूं करून बावाचा ऐवज तुह्मांकडून सरकारांत घेतला. आणि फारीकत जगंनाथ चिमणाजी जवळून तुह्मांस देविलें. या उपरी परमहंस बावा बाबत कांही याचा गुंता राहिला नाहीं. तुह्मांशीं व तुमचे पुत्रपौत्रीयांशीं संबंध नाहीं. तुह्मीं परमहंसबावाचे शिष्य तुह्मांशीं कजिया करावयास संबंध नाहीं. जाणिजे. छ २१ सवाल सु अर्बा खमसेन मया व आलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति. मोर्तब सूद.
मोर्तब आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३६] श्री ३ अगस्ट १७१४
श्री सकलगुणमंडित अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री देशाधिकारी व देशलेखक, वर्तमान व भावी, प्रांत राजापूर गे॥ याशी.
हरी राजाचार्य पंडितराय आशीर्वाद. राज्याभिषेक शके ४१ जयनाम संवत्सरे भाद्रपद शु॥ पंचमी भोमवासरे वेदमूर्ती गोविंदभट बिन कृष्णंभट उपनाम गोडबोले वास्तव्य मौजे गोठणें देवाचें प्रांत म॥ यांणीं पन्हाळचे मुक्कामी समीप येऊन विदित केलें कीं, आपणांस धर्मादाय तांदूळ खंडी १ एक पूर्वी दिल्हा आहे. त्याची सनद स्वामीची होती. ती शामलाचे धामधुमींत गेली. त्याउपरी आपण राजश्री छत्रपति शिवाजीराजे या समीप जाऊन वर्तमान निवेदन केलें. त्यावरून राजश्रीनीं ताकीदपत्र दिले. ऐशास आपले पूर्वील सनदे प्रे॥ सनद दिल्ही पाहिजे, ह्मणोन विदित केलें. त्याजवरून मनास आणितां वेदमूर्तीस पूर्वी धर्मादाय तांदूळ एक खंडी दिल्हा होता. सनद हरपली. राजश्रींनी ताकीदपत्र दिल्हे आहे. ऐशास ब्राह्मण थोर सत्पात्र. यास्तव पूर्वील सनदेचा मुबदला हल्लीं ही सनद दिल्ही आहे. पूर्वी दिल्हा धर्मादाय एक खंडी तांदूळ साल गु॥ पावेतो चालिलेप्रमाणें इतका खपावत आहे. व उरले ऐवजी शेत करीत असतील अगर करितीं तें शिरस्त्याप्रणें चालणें. प्रतिवर्षी नूतनपत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रति लिहून घेऊन मुख्य पत्र वेदमूर्तीपाशी परतून देणें. छ ३ हे रमजान सु॥ खमस अशर मया व अलफ प॥ हुजूर हे आशीर्वाद.
मोर्तब आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३५] श्री तालिक ९ अक्टोबर १७३४
राजश्री त्र्यंबक कृष्ण यांस
स्ने॥ संभाजी आंग्रे सरखेल रामराम. सु॥ खमस सलासीन मया अलफ. बद्दल देणें धर्मादाय रघुनाथ भट याशीं देणें. भात घाटी देणें दरसाल.
.।. पेशजी आहे.
.।. हल्ली देवविले.
.॥.
येकूण दहामण गल्ला पावता करणें. न दिल्हा तरी कामास येणार नाहीं. श्रीमत् परमहंसबाबास लेहून पाठविणें. जाणिजे छ २२ जमादिलावल. मोर्तब आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४] श्री तालिक २२ जुलै १७०४
श्री सकल गुण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी प्रांत राजापुर यांस.
शिक्का आहे.
श्रीकराचार्य पंडितराय
आशीर्वाद राज्याभिषेक शके ३१ तारण नाम संवत्सरे श्रावण शु॥ प्रतिपदा मंदवासरे वेदमूर्ती बाळंभट बिन पांडुरंगभट साठे वास्तव्य देवाचें गोठणें प्रांत मजकूर यांनीं समीप येऊन विदित केलें कीं आपण कुटुंबवत्सल आहों, आपला योगक्षे चाले असा धर्मादाय देविला पाहिजे ह्मणोन विदित केलें. त्याजवरून मनास आणितां वेदमूर्ती अनुत्पन्न असें जाणून यास धर्मादाय तांदूळ कैली कोटी पें .॥. दहामण यांस देविले असेत. याची पड जमीन राजश्री अनाजीपंताचे२९ वेळेच्या शिरस्त्याप्रणे जमीनधारा आहे, त्या धा-याप्रे॥ पड जमीन वेदमूर्तीस नेमून देऊन प्रतिवर्षी सुरक्षित चालवणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें प्रति लेहून घेऊन मुख्य पत्र वेदमूर्ती यांसी परतून देणें. छ ३० र॥ वल सुहुरसन खमस मया अलफ. हे आशीर्वाद. मोर्तब आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[३३] श्री २५ अक्टोबर १७५९
श्री.
मार्तंडचरणीं तत्पर शामराव
अंबाजी निरंतर
दस्तक२८ सरकार राजश्री शामराव अंबाजी त॥ कमाविसदारांनी व चौकीदारांनी व रहदारांनी बाजेलोकांनी जकायती महालनिहाय सु॥ सितेन मयातेन मयाव आलफ. राजश्री रामचंद्र महादेव कारकून निसबत सरकार यांणी क॥ कोरेगावाहून मौजे धावडशीस गल्ला भरून बैल सुमार चार रवाना केले आहेत. तर यांस मार्गी जकायतीचा तगादा न करणें. सुखरूप जाऊ देणें. जाणिजे छ॥ ३ र॥ वल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[३२] श्री २ जानेवारी १७५९
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ८५ बुधान्य नाम संवत्सरे घ शु॥ पंचमी भृगुवासरे (शिक्का शिक्का) क्षत्रियकुलवंत श्रीराजा शंभु छत्रपती स्वामी यांनी राजश्री देशाधिकारी व लेखक सुभा प्रांत राजापूर यांसी आज्ञा केली ऐसीजे :- वेदमूर्ती बाळंभट बिन गोविंदभट उपनाम गोडबोले गोत्र कौशिक सूत्र हिरण्यकेशी वे॥ मौजे गोठणें देवाचें त॥ राजापूर सुभा प्रांत मजकूर यांणी हुजूर करवीरचे मुक्कामी येऊन विदित केलें की, पूर्वी कैलासवासी महाराज राजश्री स्वामीनीं आपणाकडेस धर्मादाय तांदूळ खंडी १ एक खंडी दिल्हे. त्याप्रणें चालत आहे. परंतु स्वामींनीं कृपाळू होऊन सुभास आज्ञापत्र सादर करावें. त्याजवरून स्वामींनी दाखला मनास आणून पंडित रायाचें पत्र पाहून हल्ली हें पत्र सादर केलें असे. तर वे॥ भटजीस मौजें मजकुरी तांदूळ खंडी एक चालत आहेत त्याप्रणें चालवीत जाणें. यास व याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें चालवणें. तुह्मी आपणाकडून ताकीद मुकादस देऊन धर्मादाय सुरलीतपणे चालतें करणें. साल दरसाल नवीन पत्राचा हुजूर न धरणें. या पत्राचा तालिक घेऊन हें पत्र भोगवटीयासी देणें. जाणिजे. मोर्तब असे. तेरीख छ ३ रोज हे जदिलाखर सुरसन तिसा. रुजू स॥
मंत्री.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[३१] श्री ४ आगस्ट १७३१
तीर्थस्वरूप राजश्री परमहंस स्वामीचे सेवेशी.
अपत्ये सन सौभाग्यादि संपन्न सकवारबाई२७ व सौ॥ सगुणाबाई दंडवत. विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेलें पाहिजे. यानंतर स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिलें कीं, चिरंजीव राजश्री फत्तेसिंगदादा यांचे भेटीस गेलों होतों. भेटी जाहली. बहुत सन्मानेंकरून पुजा केली होती. घोडे पालखीत बैसवून आज्ञा दिल्ही. सोवारीं धावडशीस आलों. व चिमणाजीपंत दादा यांस देवाज्ञा जाहली. त्याच्या चिरंजीवाचा परामर्ष करावा, ह्मणून लिहिलें. ऐशियास चिरंजीवाचे भेटीस गेला, उत्तम केलें. यांनीं स्वामीची पुजा सन्मानेंकरून केली यावरून चित्तास बहुत आनंद जाहला. तुह्मा महापुरषाची पूजा न करते तर कोणाची करतील? चिमणाजीपंताचें वर्तमान तर दैवगतीस इलाज आहे असें नाहीं. त्यांच्या चिरंजीवाचे परामर्षास अंतर देणार नाहीं. वरकड संतान वृध्दीचा म॥ लिहिला तर आपली निष्ठा स्वामीच्या पायाशीं दृढतर आणि आपली कृपा आमचे ठाईं अन्यथा होईल असें नाहीं. आपले आशीर्वादेंकरून फलत्कारही होईल. प्रसाद श्रीफळें २ दोन व साखरपुडा १ पाठविला तो पावला. अत्यादरेंकरून मस्तकीं ठेवून स्वीकार केला. निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा निरंतर असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०] श्री २ एप्रिल १७३१
महाराज परमहंस श्री स्वामीचे सेवेशी.
चरणरज बाजीराऊ बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील क्षेम श्रीकृपें त॥ छ ५ सवाल नजीक डभाई यथास्थित असे. येथील वर्तमान तरी :- त्रिंबकराऊ दाभाडे व उदाजी आनंदराऊ पवार व कंठाजी रघूजी कदम व पिलाजी गाइकवाड व चिमणाजीपंतदादा ऐसे तीस पसतीस हजार फौजेनशी आह्माशीं युध्दास आले. छ ४ सवालीं युध्द जाहलें. त्रिंबकराऊ दाभाडे, व जावजी दाभाडे व मलोजी पवार, व पिलाजी गाइकवाडाचा पुत्र असें चौघे ठार जाहले. उदाजी पवार व चिमणाजीपंत पाडाव जाहले. आनंदराऊ पवार व पिलाजी गाइकवाड व कुवर बहादूर जखमी होऊन पळून गेले, व बांडे पळाले. फौज लुटली. हत्ती पाडाव केले. सारांश स्वामीचे आशीर्वादें फत्ते जाहली. आपणांस कळावें, यास्तव लिहिलें आहे. निरंतर स्वामीचें चिंतन करीत असों. सदैव पत्रीं समाचार घेतला पाहिजे. आपणाकडील नारायणजी ढमढेरे ठार पडले; व आणखीही कितेक लोक पडले, व जखमी जाहले. परंतु कार्य जाहलें. कळलें पाहिजे. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२९] श्री २८ एप्रिल १७१५
श्रीमंत परमहंस भृगुनंदनस्वरूपेभ्यो स्वामीचे सेवेशी.
चरणरज बाळाजी विश्वनाथ नमस्कार. विनंति. अत्रत्य कुशल स्वामीचे आशिर्वादें त॥ वैशाख शु॥ सप्तमी रविवासर पावेतों मुक्काम किल्ले लोहगड यथास्थित जाणोन स्वकीय स्वानंद लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष श्रीचा एवज चिरंजीव राजश्री बाजीरायाकडून देवून हवाला घातला आहे. सांप्रत राजकीय लग्न प्रसंगामुळें वोढीचा अर्थ जाहला आहे, तो पत्री ल्याहावासा नाहीं. ऐशियास सांप्रत चिरंजिवाकडून ऐवज मोहरा २५ पंचीवस भानजी दळवी बराबरी रवाना करविला तो रवाना करतील तो घेऊन पावलियाचें आशीर्वादपत्र पाठविलें पाहिजे. बाकी ऐवजही सत्वरींच रवाना केला जाईल. श्रीचे कार्यास आह्मापासून अंतराई होणार नाही. विदित जाले पाहिजे. आह्मी स्वामीचे पदरीचे आहों. सर्व प्रकारें दया करून आशीर्वादपत्री परामर्ष घेत गेले पाहिजे. कृपा केली पाहिजे. सेवेशी विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८] श्री १७३९
श्रीमत्परमहंसबाबास्वामी यांहीं
सौ. संपन्न मातुश्री वीरूबाई यांसी आज्ञा केली ऐसीजे :- परशरामीं होतो तेथें त्रिकाळ श्रीचेंदर्शन होत होतें. पुढे समाधहि तेथेंच व्हावी ऐसें होतें. तेतून रुणानुबंध तुटला. तेथून वरते आलों. राज्यांस व तुह्मास दर्शन दिल्हें. तुमचे निष्ठा आमचे ठायीं बैसली. तुह्मी उदकदत्त, धारादत्त सनदा करून वीरमाडे दिल्हें. थोरलें भादल उसाचें खळें देखील दिलें. तेथें आह्मी नवी बांध बांधोन वोढा मोडून बाग केली. रयतेचे चालवीत असतां संभाजी पाटील यानें आमचें कुरण चारिलें. व येसाजी भागेलीचें पांच वर्षे शेत कापून खातात. ये बाब आह्मास कळली. आह्माजवळ आ बें जा बें बोलों लागले. ह्मणून आह्मी तुमचे भेटीस आलों. सर्व निवेदन केलें. त्याचे अन्याय देखोन हरदूजणास दोनशे रुपया मामला करून मुद्रेनिशी कागद दिल्हे. आमचें समाधान करून निरोप दिल्हा. आह्मी ह्मटलें तुमचें रहिमतपूर व वाडा पाहों. ह्मणून तुमचे वाडयांत रहावयास आलों. त्यास एसाजी सानवणी वाडियांत होता, ह्मणून तुमचे शिपाई आह्मास वाडियांत न घेत. आ बें जा बें बोलिलें. आह्मी त्यांस चार शिव्या देऊन बराबरील माणसें गावांत ब्राह्मणाचें घरी राहिले, व आह्मी जाऊन रानांत दादरावर राहिलों. तेथून सकाळी उठोन धावडशीस गेलों. तेथून माणसे वीरमाडे यास त्याजकडे मसाला घ्यावयास पाठविले तों ते रात्रीसच गुरें माणसें घेऊन पळाले. तुमचे हात लांब. पूर्व समुद्रापासून पश्चम समुद्रापावेतों व आभाळाखालें सत्ता. ऐसें असोन त्याजपासून मसाला घेऊन त्यास गावीं या आणिलें नव्हते. आणि आह्मांस उफराठा कागद लिहिलाजे ते गुन्हेगार असोन तुमचे मुद्रेनिशी कागद असोन आह्मास लि॥ जे संभाजीचे वस्त, भाव, शेत, ऊस, मळा, घर कांहीं तसनस झालें ह्मणजे तुह्मास जाब करावा लागेल. असे कसे रयत करितो. लिहिले यावरून तुमचे ममता आमचे जागाहून उठली ऐसे आह्मास पुरतें कळलें. तरी आतां आह्मास इतका जाब पाठवावा जे वीरमाडे, धावडशी, अनेवाडी मोडून देणें. तुमचें पत्र आलें ह्मणजे गाव सर्व मोडून तुमची सत्ता नसेल तेथें जाऊ. तुह्मी आपले गाव घेऊन राज्य राम करा. ऐसा सानवणी मोठा हरामजादा गडावर घातला होतात तो राजास आह्मी पदर पसरून गडावरून सोडून आणिला. छत्रपतीचा आह्मावर दुसरा एवढा उपकार नाही. व याचें भुताचे यत्न केला असेल तो ईश्वर जाणें. तेथून आह्मीं माळशिरसास गेलों. तेथें तुमचे पत्र संभाजी पाटील याणें घेऊन आलाजे यास माणसांत घालणें. त्यावरून आह्मीं वीरमाडे यास येऊन संभाजीचें घरी दोणाभर ताक घेऊन दाहा जातीस जेवण घालून शोभिवंत केला. त्याणें आमचा उपकार फेडिला.