[३६] श्री ३ अगस्ट १७१४
श्री सकलगुणमंडित अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री देशाधिकारी व देशलेखक, वर्तमान व भावी, प्रांत राजापूर गे॥ याशी.
हरी राजाचार्य पंडितराय आशीर्वाद. राज्याभिषेक शके ४१ जयनाम संवत्सरे भाद्रपद शु॥ पंचमी भोमवासरे वेदमूर्ती गोविंदभट बिन कृष्णंभट उपनाम गोडबोले वास्तव्य मौजे गोठणें देवाचें प्रांत म॥ यांणीं पन्हाळचे मुक्कामी समीप येऊन विदित केलें कीं, आपणांस धर्मादाय तांदूळ खंडी १ एक पूर्वी दिल्हा आहे. त्याची सनद स्वामीची होती. ती शामलाचे धामधुमींत गेली. त्याउपरी आपण राजश्री छत्रपति शिवाजीराजे या समीप जाऊन वर्तमान निवेदन केलें. त्यावरून राजश्रीनीं ताकीदपत्र दिले. ऐशास आपले पूर्वील सनदे प्रे॥ सनद दिल्ही पाहिजे, ह्मणोन विदित केलें. त्याजवरून मनास आणितां वेदमूर्तीस पूर्वी धर्मादाय तांदूळ एक खंडी दिल्हा होता. सनद हरपली. राजश्रींनी ताकीदपत्र दिल्हे आहे. ऐशास ब्राह्मण थोर सत्पात्र. यास्तव पूर्वील सनदेचा मुबदला हल्लीं ही सनद दिल्ही आहे. पूर्वी दिल्हा धर्मादाय एक खंडी तांदूळ साल गु॥ पावेतो चालिलेप्रमाणें इतका खपावत आहे. व उरले ऐवजी शेत करीत असतील अगर करितीं तें शिरस्त्याप्रणें चालणें. प्रतिवर्षी नूतनपत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रति लिहून घेऊन मुख्य पत्र वेदमूर्तीपाशी परतून देणें. छ ३ हे रमजान सु॥ खमस अशर मया व अलफ प॥ हुजूर हे आशीर्वाद.
मोर्तब आहे.