Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
येकूण पंधरा गांव इनाम. पे॥ कदीम देशमुखीस गांव आठ उभयतास करार करून दिल्हे. ठरावाप्रणें उभयतांचे वंशपरंपरा अज्ञाणे पदमसिंग पि॥ यास नूतन इनामी व कदीम दिल्हे आहेत. यास्तव याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरे चालवीत जाणें. सदरहू गांव इनाम दिल्हे आहेत, यामध्ये गड किले याकडे चालत होते, ते दूर करून यांस करार करून दिल्हे आहेत. एशी यास त्या गावीं गडकरी याची अर्धलीची शेतें असतील ती त्यांकडे चालविणें. सदरहू गाऊ इनाम यास दिल्हे असेत. ह्मणून याच्या माथा शेरणी पेशजी व नूतन, व र ॥ रामचंद्र पंडित अमात्य यांचे विद्यमान त्या खेरीज हल्ली रुपये १०,००० हजार ठेविली आहे. त्याचा वचन हुजूर होईल हे जाणून सदरहू गांव देविल्याप्रणें सुरळीत चालवीत जाणें. हुजूर न करणें कदीम इनाम गांव आठ पे॥ मौजें बोरगाव तैनात आहे. हल्लीं सूर्याराऊ पि॥ याकडे जातीस दिल्हे आहे ह्मणून राजश्री हाराजी श्यामराव नामनाथ सुभा प्रांत जावली याचे नांवे अलाहिदा सनद सादर केली आहे. या प्र॥ ते दुमाले करून चालवितील. वरकड गांव तुह्मीं चालवीत जाणें. या पत्राची तालिक बाराकडे; अस्सलपत्र भोगवटियास देशमुख म॥ निल्हे जवळ देणें. कसबे वाई पेशजी इनाम करून दिल्हा होता तो दूर केला असे. सदरहू कदीम गांव करार करून दिल्हे असे, याप्रणें चालविणें. जाणिजे. लेखनालंकार. मोर्तब.
सुद. रुजूसूद.
नक्कल.
शिका.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६] श्री. १२ मे १६९८.*
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २४ बहुधान्य संवत्सरे अधिक ज्येष्ठ शु॥ ११ भौम वासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपति यांणी राजश्री अण्णाजी जनार्दन देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी सुभा प्रांत वाई यास आज्ञा केली ऐसीजे. र॥ सूर्याराऊ पि॥ देशमुख प्रांत वाई यांस परगणे म॥चें देशमुखीचें वर्तन निमें पूर्वापार चालत आहे. त्यांस चंदीचे मुक्कामीं याचे पुत्र पदमसिंग पि॥ यावर स्वामी कृपाळू होऊन दत्ताजी केशवजीस निमें चालत होतें, ते दूर करून प्र॥ मजकूरचे देशमुखीचें सारें वतन यांस करार करून दिल्हें होतें, व देशमुखीस हाक लाजिमा व इनाम गाऊ पूर्वापार चालत होते, ते व नूतन गांव इनाम देविलें होते. त्यांस र॥ रामचंद्र पंडित अमात्य व राजश्री शंकराजी पंडित सचिव याहीं मनास आणून निमें वतन दत्ताजी केशवजी पि॥ यास व निमें पदमसिंग पिसाळ यांस करार करून दिल्हें असे, या प्रे॥ चालवीत जाणें. या वतनास पूर्वापार हक लाजिमा व इनाम गांव चालत होते. त्या प्र॥ करार करून दिल्हे असें. बितपशील.
देशमुखीस कदीम इनाम गाउ चालत होते, त्या प्रे॥ करार केले असे. |
मौजे जांब खु॥ संमत कोरेगांव नागोजी नाइकाकडे आहे, तो दूर करून दिल्हा. |
मौजे जांब हल्ली वर्धनगडाकडे दिल्हा तो दूर करून दिल्हा असे. |
मौजे बोरगांव जारेखोरें पिराजी गोळे याजकडे दिल्हा होता तो. |
मौजे तळपे वाघोली. | पदमसिंग पि॥ बिन सूर्या राऊ पि॥ यांस नूतन गाव दिल्हे आहेत. इनाम हक खेरीज हकवार इनामवार दिल्हा असे. |
इनाम चालत आहेत. | १ मौजे चिधोली संमत निंब हणमंतराव निंबाळकराकडे होता तो दूर करून दिल्हा. |
१ सोळशी, | १ मौजे वेलंग संमत हवेली किले वैराटगडाकडे होता तो दूर करून दिल्हा. |
१ व्याहाळी, | १ मौजे पांडे संमत हवेली किले वर्धनगडाकडे होता तो दूर करून दिल्हा. |
१ पानस. | १ मौजे कवठें संत हवेली दत्ताजी केशवजी याणीं जकाती र॥ जाधवराऊकडे आहे त्यास मोकासा आहे तो दूर करून दिल्हा. |
येणे प्रे॥ उभयतास आठ गाऊ करार करून दिल्हे असेत. याशी तुह्मी सदरहू गांवची कलपटी मनास आणून दस्त निमे पदमसिंग पि॥ यास गांव चालवीत जाणें. |
१ मौजे केंजळ संमत हवेली किले वंदनगडाकडे होता तो दूर करून दिल्हा. |
सदरहू गांववरील हकदार इनामदार खेरीज करून इनाम दिल्हे असेत. |
१ मौजे पाटखळ संमत निंब कण्हेरगावांस मोकासा आहे तो दूर करून दिल्हा असें. |
१ मौजे तडवळें संमत कोरेगांव हा गांव ह्माळोजी भोसले यांजकडे आहे तो दूर करून दिल्हा असे व निमे गडाकडे तो दूर करून दिल्हा असे. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५५] श्रीबालकृष्ण.
राजश्री जगंनाथपंत गोसावी याशी.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ महादजी यादव दि ॥ दरुणी महाल. दंडवत. विनंति. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष. सखोजी परीट याचा वतनसंबंधें कजिया आहे. त्यास खंडोजी परीट तुह्माकडे पाठविला असे. तरी त्याचा याचा इनसाफ श्रीकृष्णेंत बसोन, गांवचा दाखला मनास आणून विल्हे लावणें. कोणी गावकरी नवदीगर करितील, तरी दोनी परीट श्री कृष्णेंत घालून जो पुरातन वतनदार असेल तो हाती धरून बाहेर काढितील. ऐसे जाणून धर्मता इनसाफ करून लेहून पाठवणें.
छ ११ रजब बहुत काय लिहिणें.
रुजू सही. मोर्तब सूद.
श्रीराजा शाहूचरणी तत्पर
महादाजी यादव निरंतर सुरू सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५४] श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेशी.
चरणरज गोविंद बापूजी जनी खोत मौजे गोठणें देवाचें. साष्टांग नमस्कार विनंति. त॥ वैशाख शुध्द तृतीया पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सहकुटुंब कुशलरूप असे. विशेष. खंडोजी साळवी याबराबर आज्ञापत्र सादर जाहलें कीं, पासोडी मागोन आणून पाठवावी, ह्मणून आज्ञा. आज्ञेप्रमाणें राजापुरास र॥ त्रिंबकपंत व कुलकरणी असे त्रिवर्ग गेलों, आणि आपला कागद आह्मास होता तोही त्यास नेऊन दाखविला. परंतु त्या प्रतीची पासोडी व आणखी प्रतीच्या आपणापाशी नाहीं, व राजापुरामध्ये नाहीं. हर कोठें जालनापूर अगर पैठण येथून यत्न करून करवावी. तेव्हां मिळेल. मध्ये आपले संग्रही सोवळेची पासोडी नाहीं. आपणापाशी असोन अंतर करीन तर स्वामीचे पायाची शपत करितों. मिळाली नाहीं विदित होणें. वरकड स्वामीकारणें फणसपोळी वजन ५ पाचशेर व नारळ येक, येणें प्र॥ खंडोजीबराबर पाठविलें आहे. दया करून घेणार स्वामी खावंद आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३] श्री. २६ एप्रिल १७२९
आज्ञापत्र श्रीमत् परमहंस याहीं.
येस सेट डांगिया यासी आज्ञा. सु॥ तिसा इसरीन मिया अलफ. तुजकडेस दिवाणचे बाकी असोन तूं आह्मांस न पुसतां पळोन गेलास हे गोष्ट बरी केलीस नाहींस. हल्ली तुजकडेस बाकी येणें प्र॥ येणें तें घेऊन शिदोजीबरोबर येणें.
रुपये.
४।= प्र॥ सुपारीपैकी ब॥ हिशेब वेंकाजीपंत.
१ गैरसोजा परस माळी.
-॥- घरपट्टी सालम॥
५ हवाला गोविंद मादाजी कतबा बापू डांगिया.
--------
१०lll=
येकूण पावणेअकरा चवल देखत कागद देणें. गई केलिया मुलाहिजा होणार नाहीं. छ ८ सोवल हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५२] श्री. २६ सप्टेंबर १७४०
जाबिता स्वारी४१ श्री स्वामी सु॥ इहिदे अर्बैन मया व अलफ इ॥ छ १८ ज॥ खर शनवार त॥ छ १५ रजब शुक्रवार अहद धावडशी तहद पुणें.
आज रुपये | ऐन रुपये | मोहरा | ऐन रुपये | आगठिया | |
संताजी पाटील | ५ | ५ | ० | ० | ० |
मौजे त्रिपुटी | |||||
संताजी गुजर | १०२ | १०२ | ० | ० | ० |
मु॥ कुमठे | |||||
नागोजी घाटगे | १३० | १३० | ० | ० | ० |
मु॥ बूध | |||||
१२५ दूधपुजा | |||||
५ बायकाने | |||||
---------- | |||||
१३० | |||||
महादाजी घाटगे | ३०० | ३०० | ० | ० | ० |
मु॥ मलवडी | |||||
३०० रोख | |||||
७०० उदक येणें | |||||
-------- | |||||
१००० | |||||
बाबूराव दिवाण | ५ | ५ | ० | ० | ० |
दि॥ घाटगे | |||||
महिपतराव | |||||
मु॥ नातेंपुतें | ३७ | ३७ | ० | ० | ० |
इंदापूर | ३१ | ३१ | ० | ० | ० |
मौजे मोहुरी | २ | २ | ० | ० | ० |
मौजे मिरजगांव | ५ | ५ | ० | ० | ० |
मौजे यवत | ४० | ४० | ० | ० | ० |
मौजे लोणी | ४० | ४० | ० | ० | ० |
मौजे हडपसर | ० | ० | ० | ० | ० |
उदक दत्त येणें | |||||
रुपये २५ | |||||
राणोजी पचकुडा | ० | ० | ० | ० | ० |
मु॥ तेलिंगे | |||||
उदक येणे २५ | |||||
चाह्मारगोंदे | १०३ | ३ | ८ | १०० | ० |
मु॥ जयापा | |||||
मु॥ पुणे | ४३ | ४३ | ० | ० | ० |
५ पंत प्रधान | |||||
पुजेस | |||||
२ बाळाजी महादेव | |||||
४ गंगोबा | |||||
५ किरकोळ | |||||
१० यशवंतराव पवार | |||||
५ शिवाजी शंकर | |||||
१ अपाजीपंत | |||||
१० शिवाजी राऊत | |||||
१ बाळाजीपंत करकरे. | |||||
---------- | |||||
४३ | |||||
रामाजी नाईक | ० | ० | ० | ० | १ |
कानडे पाचेची | |||||
आंगठी | |||||
जिवाजीपंत | ० | ० | ० | ० | १ |
सासनीस | |||||
देवचिंचवड | १२५ | १२५ | ० | ० | १ |
तळेगांव | १०४ | १०४ | ० | ० | १ |
४ किरकोळ | |||||
१०० सोमाजी दाभाडे | |||||
----------- | |||||
१०४ | |||||
आंगठिया | |||||
दादोपंत दिवाण | |||||
रामनामाची. | |||||
मौजे मुंडवें. | २ | २ | ० | ० | ० |
मौजे उरली | २ | २ | ० | ० | ० |
गणपतराव | १२५ | १२५ | ० | ० | ० |
सासवड | |||||
परीचे | ५ | ५ | ० | ० | ० |
५ रोख आले | |||||
२० उदक दत्त | |||||
-------- | |||||
२५ | |||||
मौजे सुरूर | १ | १ | ० | ० | ० |
--------------- | --------------- | --------------- | -------------- | --------------- | |
१२०७ | ११०७ | ८ | १०० | ४ | |
कित्ता मु॥ पुणें | २१४ | २१४ | ० | ० | ० |
५२१४ पैकीं | |||||
वजा कर्ज प्रधान | |||||
पंत ब॥ कदबा | |||||
रुपये ५००० | |||||
बाकी ब॥ आणिले. | |||||
--------------- | --------------- | --------------- | --------------- | --------------- | |
१४२१ | १३२१ | ८ | १०० | ४ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५१] श्री.
सहस्त्रायु चिरंजीव विजयीभव. महाराज छत्रपती यां प्रती.
आज्ञा वीरडकर पाटील यांणी आश्रा करून कितेक आपले मुद्दे लिहोन दिल्हे, तितके आह्मी मान्य केलें. परंतु पाटील गांवांत येऊन, त्यांणी गांवावर आलियावर अंताजी कारकून ठेविला होता, त्यास गांवातून बाहेर घातलें, त्याचे बायको, प्रसूत समय, आठ दिवस राहोद्या ह्मटलें. ते राहों न दिलें. शेजारी आनेवाडीस मेंगोजीचे शेजारी राहिला. तेथून ही जा ह्मणतात. गांवात शेरीवर चाकर होते ते बाहेर घातले. हल्ली बावाईचे शेतावर रखवाली नाहींत. आंब्यास पाणी घालावयास निंबाजी चाकर होता त्यास दबविले. जे आंबे गें खांदले ते चूक झाली. तू बावापाशी सांगोन मसाले रयतेपासून घेतले ते तूं आमचे देणें. गांव आह्मांकडे जाहलियापासून गावांत अन्यायानें चिटी मसाले घेतले. ते रुपये ३५० बेरीज करून आह्मांजवळ चाकरास द्या ह्मणतात. आंबे त्याचे शिवारांत x x x जातात त्यास दबावतात. रेडे बांधाळेचे इकडील तिकडे तोंड घातले ह्मणजे तुह्मांस मारून ह्मणतात. या धास्तीनें चाकर पळाले. आंबे लाविले ते पाण्याविणा मरतील, याजकरितां तुह्मांस लिहिलें होतें जे :- विरडें गांव आपला घ्यावा. आपण लिहिलें जें :- पाटील गांवावर आणून नशेद पोंहचऊन नांदवावें. त्यास ह्मटले तें आइकोन कौल देऊन गांवावर आणिलें. हल्ली नानाप्रकारें आह्मांस छडितात. याजकरितां विरडें आपला घ्यावा. आह्मांस मु॥ नलगे. वरकड ही गाव घेऊ ह्मणाल. तर हेही नलगत. परंतु आमचेणें याचें सोसवत नाहीं. तुमचें पुण्य आमचे पदरी आहे. तो रामेश्वराकडे हरकोठें जाऊन तुमचें कल्याण इच्छून. खाले३९ आंबे फणस लाऊन सर्व टाकिले. तैसें येथें आंबेझाडें लाविली आहेत. ते आटोप करवावा.४०आह्मांस याजउपरी येथें राहवत नाही. तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५०] श्री. १५ नोव्हेंबर १७३२.
दसकतदोस्ती नरस माळी व सोनजी तांबेडकर व रामजी दोलार वस्ती मौजे असगणी त॥ खेड सुहुरसन सलास सलासीन मया व अलफ. कारणें साहेबांचे सेवेशीं लिहून दिल्हा कबूल कदबा ऐसाजे : हरजी न्हावी वस्ती मौजे पेढें याचे घरीं आमचे हस्तकें भूतें येऊन नास करितात. व याचा बेटा मयत जाहला. त्यास हल्लीं आह्मी येऊन हरजी मजकूर याचे घरीची भूतें वोवाळून नेतों, आजिलग भूतें येऊं देणार नाहीं. जरी आली तरी दर असामीस गुन्हेगारी रुपये येकशे येकशे देऊन. हा करार. सही छ ७ जदिलावल.
गोही
बिदस्तूर गणेश बल्लाळ आप्पा जोशी चिपळोणकर
कारकून श्रीभार्गव. महादेवभट गणपुले
दाद३८ गुरव वस्ती पेढें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९] श्री. १७४१
नांवनिशी दि॥ श्री.
हुजूरचे | कमाविसदार गावगन्ना | |
१ जगनाथपंत३७ ३ | ---------------------------- | १ गोठणें |
१ धोंडोपंत ३ | ---------------------------- | १ डोरलें |
१ बाबूजीपंत ३ | ---------------------------- | १ महाळुंगे |
१ नारोपंत ३ | ---------------------------- | १ मौजे रिळें |
१ शिवरामपंत ३ | ---------------------------- | १ धावडशी |
१ संभाजीपंत ३ | ---------------------------- | १ आनेवाडी |
१ बाळाजी त्रिंबक | ---------------------------- | १ विरमाडें |
१ केसोपंत ३ | १ मौजे पिंपरी | |
१ अंताजीपंत. | १ माळशिरस | |
१ गोपाळ अनंत. | १ मौजे रावडी. | |
१ कृष्णाजी जगंनाथ | --------- | |
१ राजी गणेश | १० | |
१ लक्ष्मण गणेश | १ रामचंद्र महादेव | |
१ गणेश बल्लाळ | दि ॥ देवडी येक. | |
१ सोमाजी घाणेकर | १ तिवट | |
१ खंडोजी साळवी | १ पासोडी | |
१ नारोजी घाणेकर | --------- | |
---------- | २ | |
१७ | ||
१ निबाजी तोरसकर | ||
१ लखजी हवालदार | ||
१ भावोजी हवालदार | ||
१ सुलतानभाई | ||
१ लखजी कोठीवाला. | ||
---------- | ||
२२ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४७] श्री. १९ मार्च १७११
(शेख मीरा याजकडील).
स्वतिश्री राज्याभिषेक३५ शके ३७ खरनाम संवत्सरे चैत्र शुध्द एकादशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणीं ईजतमहा शेख मीरा यांसी आज्ञा केली ऐसी जे स्वामीनीं वाईच्या ठाण्यास तुह्मांस पाठविले आहे. ऐशास, शेख अजमतुला यांणीं हुजूर लेहोन पाठविलें जे आपण साहेबाचे हुकुखेरीज नाहीं, परंतु आपली अब्रू रहावी. ह्मणून त्यावरून हें आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुह्मी राजश्री जोत्याजी केशरकर मिळोन त्यास कौल देऊन ठाणें आपले स्वाधीन करून घेऊन xxxxx आपली अब्रू राखोन हुजूर xxxxx वणें. पोहोंचल्याची रसीद मागितली तर लिहोन देणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें. मर्यादेयं विराजते.
[४८] श्री. ७ मे १७४०
सेवेशी विज्ञापना३६. तीर्थ रूप राजश्री राऊस्वामीचे वर्तमान छं. २१ सफरी बुधवारी प्रात:काली तीर्थरूप राजश्री आपास्वामीस व श्रीमत् राजश्री नानास्वामीस वर्तमान श्रुत जाहलें. त्याचें पत्र येथें आलेलें, त्यावर तिकडून वर्तमान लेहून पाठविलें. त्याची नकल सेवेशी पाठविली आहे, विदित होईल. कृपा करून श्रीचा प्रसाद अनानसे २ दोन पाठविली ती पावली. सेवेशी श्रुत होय. विज्ञापना.