Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८८] श्री. १९ डिसेंबर १७२०
महाराजश्री तपोनिधी वास्तव्य श्रीपरशराम स्वामीचे सेवेशी
विनंति सेवेशी. माणकोजी चायशे व जगजीवन त्रिंबक स॥ नमस्कार. विनंति. उपरी स्वामी दहिवलीच्या तळावर आले. ते समयीं आपण कबूल रुपये ५०० पांचशे केले. त्यापैकीं तूर्त महाराजास रुपये १०० अंभर दिल्हे. बाकी रुपये ४०० चारशे राहिले ते आपण महाराजाचे पुढें देऊन. सु॥ इसन्ने अशरैन मबाव अलफ. छ २८ सफर यास मुदती वर्षें दोनीमध्यें झाडा करून. हे विनंति.
[८९] श्री. १७ दिसेंबर १७३६
श्रीमत् महाराजश्री परमहंस बावा स्वामीचे सेवेशी.
चरणरज बापूजी गणेश चरणावर मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार. विनंति. येथील वर्तमान त॥ छ १३ शाबान परियंत यथास्थित असे. विशेष. स्वामीचे रुपये दोन हजार कर्ज देणें आहेत. त्याचें व्याज देणें साल गुदस्ताचे कार्तिक शु॥ प्रतिपदेस शके १६५७ राक्षस नाम संवत्सरेस द्यावें. ते खंडोजी साळवी याजबराबर पाठविले असेत.
२०० खंडोजी साळवी याजबराबर.
५७ गोविंद केशव नेने याजबराबर.
------------
२५७
एकूण दोनशे सत्तावन रुपये दोन हजार रुपयांचें व्याज जाहलें. तें स्वामीचें पाठविलें असे. पावलियाचें उत्तर स्वामींनी पाठविलें पाहिजे. शके १६५७ राक्षस नाम संवत्सरे पोष शु॥ चतुर्दशी. सेवेशी श्रुत होणें. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८७] श्रीभार्गवराम. २४ मे १७३४
श्रीमत् तीर्थस्वरूप श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य स्वामीचे सेवेशी.
अपत्यें त्रिंबक कृष्ण मु॥ इमारत गोठणें. कृतानेक साष्टांग दंडवत प्राय नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल ज्येष्ठ शुध्द तृतीया भृगुवासरपर्यंत स्वामीचे आशीर्वादेकरून कुशल असें.
विशेष. स्वामीकडेस जिन्नस व पत्र कोंडजी कदम याजबराबर पाठविली ते प्रविष्ट झालेच असतील. वरकड राजश्री संभाजी आंगरे यांणीं स्वामीस पत्रलखोटा पाठविला. तो लखमोजी याजबराबर रवाना केला आहे. उत्तर पाठविलें पाहिजे. वरकड राजश्री संभाजी आंगरे यांणीं बाइकांस पत्र लिहिलें कीं, आह्माजवळ कोणी शाहाणी माणूस जेवण खाण करी ऐशी नाहीं. याजकरितां मोबदला बटीक पाठविली आहे. हें घेऊन राहीस पाठवणें ह्मणोन लि॥ व बटीक पाठविली. त्याजवरी आह्मी व बाई कांहीं त्यास पत्र लिहिलें आहे कीं, तुह्मी बाइका श्रीचे सेवेसी दिल्या. त्यामधील राहीस न्यावी आणि मोबदला तुमची ठेवावी. येणें करून स्वामी काय ह्मणतील? हे गोष्टीस स्वामींची आज्ञा नाहीं. स्वामीची आज्ञा राहीस जाहली पाहिजे. गोवेंयास माणसें रवाना केलीं आहेत. सत्वरच येतील. तदुत्तर स्वामीकडे रवाना करितों. वरकड रु॥ पांच घणास द्यावयास आज्ञा केली. आज्ञेप्रमाणे रुपये दिल्हे. त्याणीं धावडकडेस दिल्हे. घण करावयास सांगितला. परंतु लौकर करून त्याणीं तुह्माकडेस रवाना करावा. तरी ते प्रस्तुत रानामध्यें पाठविले आहेत. याजकरितां स्वामीची आज्ञा होईल तर घण धावडाकडून आणवून आपल्या माणसाहातीं पाठवून. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८६] श्रीभार्गवराम.
सांबाचा अवतार या कलयुगीं धर्मासि संस्थापक ॥
शंकर हे अभिधान दिव्यमिरवे झाला जना तारक ॥
चारी आश्रम त्यांत श्रेष्ठ ह्मणती संन्याससर्वोपरी ॥
ऐसावे धरूनि तारित द्विजा पापास जो उध्दरी ॥१॥
तैसा हा अवतार घे भृगुपती क्षेत्रासि जो अंतक ॥
भार्गवरामचिनाम शोभतबहू दावावया कौतुक ॥
रंभापर्ण नदीत टाकुनिस्वयें त्या आसनातें करी ॥
नित्यानी दिवसी परपार जाऊनि पुन्हा येणें तसें यापरी ॥२॥
ऐसें हें कळतांचि येवनपती पायांवरी लोटला ।
ईश्वर हाचि मनांत भाव धरुनी प्रीती भजो लागला ॥
गांवें ज्यागिर देउनी निशिदिनीं आज्ञेंत दासापरी ।
तेथेंही उपकार आर्तिकदिना केलें अनंतापरी ॥३॥
बालाजी अभिधान ब्राह्मण असे त्याचाचि भाग्योदय ।
त्यानें स्वामिस सेविलें निशिदिनीं भावार्थं ज्या निश्चय ॥
स्वामीची परिपूर्ण त्यावरि दया दे पेशवाई तया ।
राजा शाहूस सांगतां त्वरित दे संपूर्ण जाली दया ॥४॥
रामाची परिपूर्ण ज्यावरि दया भक्ती जया नि:सिमा ।
राजाराम स्वयेंच येउनि वसे घेऊनि संगें रमा ॥
बंधुप्राणसखाच लक्ष्मणसवे भक्ताग्रणी मारुती ॥
हे रंभागरुडासहीत ये रघुपती येथेंचि केलें स्थिती ॥५॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८४] श्री. तालिक ६ आगष्ट १७४०
राजाश्रियाविराजित राजन्य राजश्री बापूजी श्रीपत स्वामी गोसावी याशी.
पोष्य बाळाजी बाजीराऊ प्रधान. नमस्कार. विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष राजश्री जगंनाथ चिमणाजी यांची नेमणुक तुह्माकडे दोनशे रुपये वर्षास करार केली आहे. हल्लीं जाजती रुपये १०० एकशे करार केले असेत. एकूण तीनशे रुपये वर्षास पावतें करीत जाणें. जाणिजे. त॥ छ २३ जमादिलबल सु॥ इहिदे अर्बैन मयाव अलफ. हे विनंति.
[८५] श्री. १९ सप्टेंबर १७५३.
अज४६ सुभा राजश्री दमाजी पिसाळ ताहामोकदमानीं मौजे धावडशी प्रांत सातारा सुहुर सन अर्बाखमसेन मयाव अलफ. मौजे मजकुरीं सरकारचे पागेचा तटु बाहेर गेला आहे. त्याचा थांग लाऊन माणसें आलीं आहेत. दरी देखत पत्र घोडा पागेस घेऊन येणें. हैगई केलिया पागेचा तटु गांवीं राहिल्यावरि पैका भरावा लागेल. जाणिजे छ २१ जिल्काद. मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८३] श्री. १९ फेब्रुवारी १७२५
तीर्थरूप तपोनिधि महाराज राजश्री परशराम स्वामीचे सेवेशी.
सेवक राऊ रंभाजी निंबाळकर. चरणावरी मस्तक ठेऊन सं॥ दंडवत. विनंति. उपरी येथील क्षेम त॥ छ ७ हे रजब मु॥ पुणें स्वामीचें आशीर्वादेंकरून यथास्थित जाणोन स्वकीय लेखन करणें. यानंतर बहुता दिवसा स्वामीनीं कृपा संपादून आशीर्वादपत्र पाठविलें तें उत्तम समईं पावोन सनाथ जालों. लिहिला अभिप्राय अवगत जाला. मौजे पिंपरीच्या लोकांविषयीं लिहिलें. तरी आज्ञेप्रमाणें आपला कौल पाठविला आहे. आमचे तरफेनें स्वामीच्या गांवास कांहीं उजूर लागणार नाहीं. समाधान असो दीजे. सेवकास आपला प्रसाद पाठविला तो पावला. निरंतर आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. विशेष काय लिहिणें. दया असो द्यावी हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८२] श्री.
तीर्थस्वरूप दादा वडिलाचे सेवेशी.
अपत्यवत रामाजी व सुलतानभाई स॥ नमस्कार व अ॥ रामराम विनंति. उपरी आह्मीं हिशेबास धावडीस येत होतों. त्यास श्रीस्वामी या प्रांतीं येणार ह्मणून आइकिलें त्याजवरून राहिलों. वरकड वाघा मालुसरा याजकडील रु॥ घेऊन निरोप देणें ह्मणून तुमचें पत्र आलें, त्यावरून निरोप दिल्हा. हल्लीं काना आगरियाची आई आली, तिजबरोबर तुमचें पत्र आलें जें :- आगरियाबाबत रु॥ वाघाजवळून घेणें. त्यास वाघा गेला. हल्लीं श्रीस्वामी येथें येणार तेव्हां आह्मावर कोपास येऊन ह्मणतील जे ......... वाघा आणून हजीर करणें. त्यास वाघास तुमचे हुकुमावरून निरोप दिल्हा. बावाजवळ ऐसें सांगितलें ह्मणजे आह्मावर कोपतात. याजकरितां श्रीस्वामीस हें वर्तमान विदित जाहले असले तरी त्याची निशा करून आह्मावर शब्द न ये ते गोष्ट केली पाहिजे. नाहीं तरी श्रीस्वामी येथें येऊन अंतोजी शिबा याची गत करून आमची इजत दाहा लोकांत घेतील. ऐसें न कीजे. आह्मींच चुकलो असिलों तरी तुह्मीं धावडशीस नेऊन काय नशद करावयाची असेल ते केली पाहिजे. हुकुमाखेरीज वर्तणूक केली होईल तरी आह्मास काय शब्द लावाल तोखराच आहे. वाछा याणें आपले रु ॥ दिल्हे ते काना आगरियाची आई रुपये देईल. वरकड श्री स्वामी मनसुबी न आइकतां आह्मावर रागास येतील तरी त्यास अगोदर सांगोन आमचा अन्याय नाहीं कळलें पाहिजे. हिशेबास आह्मी यावें कीं न यावें, तें लिहोन पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें हें विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८१] श्री. ११ आगस्ट १७२९
श्रीमत् परमहंस स्वामीचे सेवेशी.
चरणरज निंबाजी लोणारी वस्ती इमारत ताथवडा सु॥ सन सलासीन मीया अलफ. साहेबाचे सेवेशी लिहून दिल्हा कबूल कतबा जे :- साहेबापासून चुना कोळसेबाबत रु॥ ४० चाळीस घेतले आहेत. याचा चुना जे इमारतीवर मागाल तेथें देईन. नाहीं तरी जे रुपये राहतील ते रु॥ व्याजानिशीं वारून देईन हें लिहिलें सही याशी उगवणीस खावंद सुलतानभाई आहेत छ २६ मोहरम.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[७९] श्री. १७२० । १७२१
फेरीस्त कागद लिखिते दि॥ बाजीराऊ प्रधान व अंबाजी त्रिंबक सु॥ इहिदे मिया अलफ.४५
[८०] श्री.
पु॥ राजश्री बाबा यांसी स॥ नमस्कार. पूर्वपत्रीं आपण आज्ञा केली कीं, श्रवणाची सोय येथेंही घडेल. त्यास रामायणांतील ओव्या
कष्टेंविण विरक्तता होय प्राप्त॥ तरी दीर्घ प्रयत्नाचा कायसा अर्थ ? ॥१॥
दुग्धींच सांपडे नवनीत ॥ तरी दधि कां मंथावें ?॥२॥
वाडाचेनितृणें हरे व्याधि ॥ तरी कां मेळवाव्या वौषधि ? ॥३॥
गृहींच सांपडे सर्व सिध्दि ॥ तरी कां तपासीं रिघावें ?
कळावें, लोभ कीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[७८] श्री. २६ डिसेंबर १७४४
श्रीमत् परमहंस भार्गवस्वरूप बावा स्वामीचे सेवेशी.
अपत्यसमान सौभाग्यवती संतूबाईनें४४ दोनी कर जोडून साष्टांग दंडवत विनंति. उपरी येथील कुशल जाणून त॥ पौष वदि सप्तमी इंदुवारपावेतों आपले आशीर्वादेंकरून सुखरूप असो विशेष. पूर्वीं आपलें आशीर्वादपत्र आलें, तेथें आज्ञा कीं :- राजश्री आवजी बल्लाळ याजवळ ठेवऐवज दिला आहे. तो आणितील त्याप्रमाणें मोजदाद करून ठेवणें ह्मणून आज्ञा. आज्ञेप्रमाणें र॥ आवजी बल्लाळ आले. त्याही येणेंप्रमाणें ऐवज नाणेवार दिला असे.
ऐवज नाणेवार
एकूण सदरहूप्रणें नाणें जमा करून ठेविलें असे. स्वामीस कळावें ह्मणून लिहिलें असे. कृपा अहर्निशी करून दया संपादित असले पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[७७] श्री. १ जुलै १७५०
अजम शेखमिरा दाममहबतहू.
मोहीबान मुखलीसान दस्तागाही अजी बाळाजी बाजीराव प्रधान दुवा येथील खैर अफीयत जाणोन आपली खैर अफीयत कलमीं करीत जाणें विशेष. किताबत पाठविली ती पोहोंचली. महारो फलदरजे साहेबाचा फर्मान खास दस्तकाचा दर्शनास यावयाचा सादर जाहला. त्यास साहेबाचे काय सला ते फर्माविली पाहिजे, ह्मणोन तरकीम केले. ते आया होऊन शादमानी जाहली. मोहीम येथील इतल्याशिवाय कांहीं अमलांत आणणार नाहीं हे निशा आहे. त्यास खावंदाचे जनाबांत सेवकलोकांनीं हजर असावें, हें तो लाजीम आहे. लेकीन किल्लेबंद असतां या उमदे उमदे राज्यभार चालविणार ईज्यानेवासारिखे हजर नसतां इतरानें जाणें हा विचार सल्लाह नाहीं. वाईंत असावें. साहेब मेहेरबान महाराजे फलकरजे खालीं उतरलियावरी ईज्यानबास इतला द्यावा. उपरातीक जैशी आज्ञा होईल तैसें करावें. सारांश. हुकुमाशिवाय तेथें न जावें. र॥ छ ७ शाबान. ज्यादा काय लिहिणें.
लेखनसीमा.