नक्कल
[३२] श्री २ जानेवारी १७५९
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ८५ बुधान्य नाम संवत्सरे घ शु॥ पंचमी भृगुवासरे (शिक्का शिक्का) क्षत्रियकुलवंत श्रीराजा शंभु छत्रपती स्वामी यांनी राजश्री देशाधिकारी व लेखक सुभा प्रांत राजापूर यांसी आज्ञा केली ऐसीजे :- वेदमूर्ती बाळंभट बिन गोविंदभट उपनाम गोडबोले गोत्र कौशिक सूत्र हिरण्यकेशी वे॥ मौजे गोठणें देवाचें त॥ राजापूर सुभा प्रांत मजकूर यांणी हुजूर करवीरचे मुक्कामी येऊन विदित केलें की, पूर्वी कैलासवासी महाराज राजश्री स्वामीनीं आपणाकडेस धर्मादाय तांदूळ खंडी १ एक खंडी दिल्हे. त्याप्रणें चालत आहे. परंतु स्वामींनीं कृपाळू होऊन सुभास आज्ञापत्र सादर करावें. त्याजवरून स्वामींनी दाखला मनास आणून पंडित रायाचें पत्र पाहून हल्ली हें पत्र सादर केलें असे. तर वे॥ भटजीस मौजें मजकुरी तांदूळ खंडी एक चालत आहेत त्याप्रणें चालवीत जाणें. यास व याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें चालवणें. तुह्मी आपणाकडून ताकीद मुकादस देऊन धर्मादाय सुरलीतपणे चालतें करणें. साल दरसाल नवीन पत्राचा हुजूर न धरणें. या पत्राचा तालिक घेऊन हें पत्र भोगवटीयासी देणें. जाणिजे. मोर्तब असे. तेरीख छ ३ रोज हे जदिलाखर सुरसन तिसा. रुजू स॥
मंत्री.