[३४] श्री तालिक २२ जुलै १७०४
श्री सकल गुण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी प्रांत राजापुर यांस.
शिक्का आहे.
श्रीकराचार्य पंडितराय
आशीर्वाद राज्याभिषेक शके ३१ तारण नाम संवत्सरे श्रावण शु॥ प्रतिपदा मंदवासरे वेदमूर्ती बाळंभट बिन पांडुरंगभट साठे वास्तव्य देवाचें गोठणें प्रांत मजकूर यांनीं समीप येऊन विदित केलें कीं आपण कुटुंबवत्सल आहों, आपला योगक्षे चाले असा धर्मादाय देविला पाहिजे ह्मणोन विदित केलें. त्याजवरून मनास आणितां वेदमूर्ती अनुत्पन्न असें जाणून यास धर्मादाय तांदूळ कैली कोटी पें .॥. दहामण यांस देविले असेत. याची पड जमीन राजश्री अनाजीपंताचे२९ वेळेच्या शिरस्त्याप्रणे जमीनधारा आहे, त्या धा-याप्रे॥ पड जमीन वेदमूर्तीस नेमून देऊन प्रतिवर्षी सुरक्षित चालवणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें प्रति लेहून घेऊन मुख्य पत्र वेदमूर्ती यांसी परतून देणें. छ ३० र॥ वल सुहुरसन खमस मया अलफ. हे आशीर्वाद. मोर्तब आहे.