Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो॥ छ १० साबान लेखांक १७४. १७०२ आषाढ व॥ १४.
सन इहिदे समानीन. श्री. ३० जुलई १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं--
पो। बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर कळला. ऐवजास सरंजाम पाठवावा ह्मणोन लिहिलें. त्यास, पागा दि॥ गोविंदराव बारवकर याजकडील कृष्णाजी सोनदेव, व सेखोजी मुळे पागासुद्धां दीडशें स्वार व गाडदी व उंट वीस याप्रों। येथून तुह्मांकडे पाठविले आहेत. हे अथणीस येतील. तुह्मीं तेथें येऊन, उंटावर ऐवज घालून बंदोबस्तानें सांभाळून यावे. कृष्णाजीपंत व सेखोजी मुळे यांस बंदोबस्ताविसीं निक्षून सांगितलें आहे. तुह्मी सांगाल त्याप्रों। चालतील. र॥ छ २७ रजब बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो॥ छ २४ रजब सन लेखांक १७३. पो॥ १७०२ आषाढ व॥ ११.
इहिदे समानीन. श्री. २७ जुलई १७८०.
सेवेसीं येसाजी विठल कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना ता। सोमवार प्रातःकाल प्रहर दिवस क्षेम असे. विशेष. सुतरस्वारासमागमें पत्र पाठविलें तें आतांच पावलें. लिहिल्याअन्वयें पत्रें सहीत पुण्यापैकीं सुतरस्वार एक व खिजमतगार व कासीदजोडी येणेंप्रमाणें रवाना केले आहेत. येऊन पोंहचतील. केरूरकटगिरीचे ठाणेच्या चिठ्या घेऊन रा। भिवराव यासीं रवाना करून तुह्मांस प्यादियाविसीं लिहितों ह्मणोन लिहिलें. उतम आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.
राजश्री गणपतरावजी स्वामीस सां। नमस्कार विनंति. तुह्मीं पत्र प।। तें पावलें. राजश्री पाटीलबावांचीं निभावणीचीं पत्रें सहीत खिजमतगार, कासीद, सुतरस्वार यासमागमें पा।। आहेत. हजरतांस आर्जी लिहिणार ह्मणोन लिहिलें. त्यास, हटलूर संमत कमतीसिरूर परोतीविसीं राजश्री तात्या स्वामींस व रा। नरसिंगरावजीस विनंति करून लिहिलें पाहिजे. हे विनंति.
राजश्री भिवराव स्वामींस सां। नमस्कार विनंति. राजश्री तात्या यांस लाखोटा पुण्याहून सुरतस्वारांनीं आणिला होता तो तुमचे कलमदानांत आहे, तो तात्यांस प्रविष्ट करावा. वरकड सविस्तर लिहावें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो॥ २३ रजब सन लेखांक १७२. पो॥ १७०२ आषाढ व॥ १०.
इहिदे समानीन. श्री. २६ जुलई १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो॥ गोविंद भगवंत सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता॥ छ १८ माहे जमादिलाखर जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री पाटीलबावा यांजकडील निभावणीचें पत्र आलें असेल. सत्वर इकडे रवाना करावें. ह्मणजे आह्मांस रजा होऊन, नवाबसाहेब अति त्वरेनें जाऊन, इंग्रजास नसीयेस चांगली करतील ह्मणोन लिहिलें. ऐसियास, राजश्री पाटीलबावा यांजकडील थैलीपत्र आलें तें पेशजीं रवाना जालें आपणांस पावलें असेल. इंग्रजास नसीयेत नवाबसाहेब गेल्यानंतर बेत-हा करतील. हे श्रीमंताची खातरजमा आहे. दररोज सामानाची वगैरे नवाबसाहेबाची तर्तुदीची तारीफ होत असती. सत्वर गेलें मात्र पाहिजे. असो. जलद न गेल्यास लौकिकांतहि वाईट दिसतें. राजश्री परशरामपंतभाऊ यांजकडून नवाबसाहेब यांचे तालुकियास रतीमात्र उपसर्ग जाला नाहीं. तुमचे पत्रापूर्वीं इकडून भाऊंस पत्रें गेलीं. भाऊंचे जाबहि आले की, त्याची दोस्ती जाणून किमपि उपद्रव नाहीं. कितूरकराचा जाबसाल ठरला, त्याचा फैसला जाला ह्मणजे फौजा माघा-या छावणीस येतील. तुह्मीं नवाबसाहेबाची खातरजमा करावी. हामेश पत्र पाठऊन संतोषवीत जावें. सविस्तर श्रीमंतांचे पत्रावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १७१.
१७०२ आषाढ व.९. श्री. २५ जुलई १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं गजिंद्रगडचे मुकामचीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. मजकूर समजला. खजान्याचे वोझ्यास नवाबाकडील बैल आहेत, ते बागडकोटास पोंहचाऊन माघारे जाणार, त्याजकरितां सरकारांतून वोझ्यास बैल व उंट व गाडदीस्वार पाठवावे, ह्मणोन लिहिलें. त्यास, तुमचे लिहिल्याप्रमाणें वोझ्यास सरंजाम उंटें व स्वार व गाडदी ऐसे रवाना केले. ते आथणीस राहून तुह्मांस पत्र लिहितील. तुह्मीं बागडकोटाहून नपीन्या घांटास उतरणार, तेथें उंट वगैरे सरंजाम बोलावून घ्यावा. बागडकोटाहून नदीपर्यंत पोंहचावून देण्याविशीं राजश्री यशवंतराव दि॥ रास्ते यांस लिहिलें आहे; व रास्ते यांचेंही पत्र मशारनिलेस अलाहिदा पाठविलें आहे. तेथील सरंजाम घेऊन नदीपावेतों यावें. अलीकडे इकडील सरंजाम आहे. उंटें इकडील अलीकडील तीरींच असों द्यावीं; पाण्यांत न घालावीं. र॥* छ २२ रजब. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति. तुह्मीं नवाबबहादर यांपासून निघाल्यावर दोन तीन रवानग्या पत्रांच्या पाठविल्या त्या पावल्या. लिहिले अर्थ सविस्तर कळले. हे विनंति.
पो। छ ४ साबान, इहिदे सबैन (?) श्रावण. पुरवणी सुद्धां बंद २.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १७०.
१७०२ आषाढ व॥९. श्री. २५ जुलई १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. राजश्री माहादजी सिंदे यांजकडील निभावणीचें पत्र बागडकोटास हुजरे याजबराबर पाठविलें. तें वर्तमान नूरमहमदखां यांस कळतांच संतोष होऊन, नवाबास लिहीत होते. परंतु आमची खातरजमा न पटली. पत्रांत काय मजकूर आहे न कळे. सबब, मोठे युक्तीनें नवाबास पत्र ल्याहवयाचें रहाविलें. ह्मणोन तपसिलें लिहिलें. ऐसियास, सिंदे यांचें पत्र येथें पाहून बागडकोटास रवाना केलें. त्यांत रतीमात्र दिकत नाहीं. मसोद्याबरहुकूम आहे. तुह्मीं नूरमहमदखां यांस सांगून खातरजमेनें ल्याहावें. बागडकोटास तुह्मी पोहंचून पत्र पाहिलेंही असेल. पत्राविशींची दिकत राहिली नाहीं. लांब लांब मजली करून सत्वर यावें. र॥ छ २२ रजब. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ४ साबान लेखांक १६९. १७०२ ज्येष्ठ व॥१२.
मु॥ तंगलबगी. श्री. २९ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. राजश्री महादजी सिंदे यांचें पत्र निभावणीचें आलें तें सरकारचे खिजमतगार व कासीदजोडी बराबर तुह्मांकडे र॥ केलें. तों तुमची रवानगी नवाबहैदरअलीखान बहादर यांणीं केली ह्मणोन नवाब मशारनिलेचें पत्र येथें आलें. त्याजवरून खिजमतगार व कासीदजोडीनीं बागलकोटास रहावें ह्मणोन सरकारचें पत्र पाठविलें आहे. त्याप्रमाणें ते तेथें राहतील. तुह्मी तेथें आल्यानंतर लाखोटा फोडून व निभावणीचें पत्र थैलींत आहे. त्यास, थैलीचा सिका लाखोट्याचा जाया न होतां थैली फोडून त्यांतील मजकूर निभावणीचें पत्रांतील पाहून, फिरोन थैली करून तुह्मीं येतेसमयीं नवाबबहादूर यांचें काय बोलणें जालें असेल त्या अन्वयें पत्र तिकडें पाठवावें. राजश्री पाटीलबोवांचें निभावणीपत्र आह्मीं पाहून नवाबबहादरास आह्मी थैलीपत्र पाठविलें आहे. त्याच थैलींत घालून पाठविलें आहे. बाजूस थैली उसवून पत्र निभावणीचें तुह्मीं चौघांनीं पाहून थैलींत घालून थैली शिवावी. ह्मणजे मोहरही चांगली राहील. तुह्मी पाहाल. पुढें नवाबबहादराकडे रवाना करणें तें तुमचे बोलण्यांत करारांत असेल त्यान्वयें करावें. र॥ छ २५ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २३ रजब सन लेखांक १६८. १७०२ ज्येष्ठ व. १०.
इहिदे समानीन. श्री. २७ जून १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां।। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मीं ज्येष्ट शुध शष्टीचीं पत्रें राजश्री नाना यांचे नांवें पाठविलीं. त्यावरून सर्व मजकूर समजला. राव सिंदे यांजकडील थैलीपत्र आलें. त्यांत निभावणीचें पत्र नाहीं. ऐसे लिहिलें येतांच विस्मयेंकरून तेच समयीं शुतरस्वार जोडी राव सिंदे यांजकडे पाठवण्यास तयार केली. तों सिंदे यांजकडून छ २५ माहे जमादिलावलचे निभावणीचें पत्र आलें. तें हालीं तुह्माकडे रवाना केलें; पावेल. याउपरी इकडील दिकत तुह्मीं ल्याहावी ऐसी किमपि राहिली नाहीं. नवाबबहादर यांणीं बेंगरुळावर मुकाम न करितां जलद इंग्रजास जाऊन तंबी करावी. तुह्मी कराराप्रमाणें सर्व कामें मिरजकर वगैरे उगवून जलद यावें. इकडील सविस्तर राजश्री नाना यांणीं लिहिलें त्यावरून कळेल. र॥ छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामीचे सेवेसीं सां॥ नमस्कार विनंति. आतां इकडील गुंता नाहीं. तुह्मी करारप्रमाणें कामें उगवून सत्वर यावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १६७.
१७०२ ज्येष्ठ वद्य १०. श्री. २७ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. इकडून करारप्रमाणें सर्व कागदपत्र पहिलेच उगवले. एक राव सिंदे यांचे निभावणीचे पत्राची वारंवार दिकत होती; तेंही हालीं पाठविलें. इकडील गुंता किमपि राहिला नाहीं. याउपरी, तुह्मी सरकारचीं कामें, ऐवज व कागदपत्र, नवाबबहादर यांजकडील तहनामा निभावणीचीं पत्रें अहदशर्तीनसीं घ्यावीं व मिरजकर वगैरे किरकोळी कामें सर्व उगवून मंडळीसह सत्वर यावें. नवाबबहादूर यांणीं बेंगरूळावर मुकामांत न करितां जलद टोपीकराचे तालुकियांत शिरून, ताख्त व ताराज करून, इंग्रज आयास आणावे. पेशजीं तुह्मीं नवाबबहादूर यांणीं सरंजाम केला, त्याचा तपसील लिहिला होता. तशा सरंजामानसीं नवाबबहादूर जलद गेल्यावर, इंग्रजांस पक्की शिक्षा करतील, याची खातरजमा इकडील आहे. बेंगरूळावर न गुंता करितां लौकर जावें. आतां कमती करून दिवस व्यर्थ न घालवावे. निभावणीचें पत्र आलें नाहीं, आह्मी तों, तोफखाना वगैरे खर्च किती सोसतों, ऐसें तुह्मांसी उत्तर जालें. त्यापक्षीं आतां इतका खर्च घेऊन मुकामांत होईल ऐसें नाहींच. तथापि सूचना लिहिली असे. *आह्मीं नवाबबहादर यांस थैलीपत्र पाठविलें आहे. त्याच थैलींत राव सिंदे यांचें निभावणीपत्र व बेलभंडाराची पुडी आली तें घालून पाठविलें. हें प्रविष्ट करावें. मिरजकर मंडळीसुद्धां जरूर सोडवून घेऊन यावें. पेशजीं येविशीं विस्तारें बहुत वेळ लिहिलें गेलेंच आहे. नरसिंगराव व गणपतराव यांस घेऊन हें काम जरूर करावें.
र॥ छ २३ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १६६. १७०२ ज्येष्ठ व॥ १०.
इहिदे समानीन. श्री. २७ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाबबहादर यांची थैलीपत्र आह्मास होते. त्याचा दरजबाब त्यांस लिहिला आहे. थैली पावती करावी. त्यांतील मजकूर तुह्मांस समजावा ह्मणोन मसोदा पाठविला आहे. यावरून मजकूर कळेल. *याच थैलींत राव सिंदे यांचे निभावणीपत्र घातलें आहे. र॥ छ २३ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २४ रजब सन लेखांक १६५. १७०२ ज्येष्ठ व॥ १०.
इहिदे समानीन. श्री. २७ जून १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत जावें. विशेष. सिंदे यांकडील निभावणीचें पत्र विस्मृतीनें ठिकाणींच राहिलें. ते परवां रात्रीं आलें. हें वर्तमान नवाबबहादर यांस व आपणांस कळावें ह्मणून रा. गणपतराव केशव यांस पत्रें लि॥ अंचीवरून काल रवाना केलीं आहेत. तीं पावून वर्तमान कळेल. हालीं तें पत्र व नवाबबहादुर यांसी थैली व आपणांस सर्वांस पत्रें राजश्री नानांनीं सरकारचे हुजरे व कासदजोडी याजबरोबर सविस्तर रवाना केलीं आहेत. पोहंचून इकडील सर्वार्थ कळों येईल. निरंतर पत्रीं संतोषवीत जावें. रवाना छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा हे विनंति.