पो॥ २३ रजब सन लेखांक १७२. पो॥ १७०२ आषाढ व॥ १०.
इहिदे समानीन. श्री. २६ जुलई १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो॥ गोविंद भगवंत सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता॥ छ १८ माहे जमादिलाखर जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री पाटीलबावा यांजकडील निभावणीचें पत्र आलें असेल. सत्वर इकडे रवाना करावें. ह्मणजे आह्मांस रजा होऊन, नवाबसाहेब अति त्वरेनें जाऊन, इंग्रजास नसीयेस चांगली करतील ह्मणोन लिहिलें. ऐसियास, राजश्री पाटीलबावा यांजकडील थैलीपत्र आलें तें पेशजीं रवाना जालें आपणांस पावलें असेल. इंग्रजास नसीयेत नवाबसाहेब गेल्यानंतर बेत-हा करतील. हे श्रीमंताची खातरजमा आहे. दररोज सामानाची वगैरे नवाबसाहेबाची तर्तुदीची तारीफ होत असती. सत्वर गेलें मात्र पाहिजे. असो. जलद न गेल्यास लौकिकांतहि वाईट दिसतें. राजश्री परशरामपंतभाऊ यांजकडून नवाबसाहेब यांचे तालुकियास रतीमात्र उपसर्ग जाला नाहीं. तुमचे पत्रापूर्वीं इकडून भाऊंस पत्रें गेलीं. भाऊंचे जाबहि आले की, त्याची दोस्ती जाणून किमपि उपद्रव नाहीं. कितूरकराचा जाबसाल ठरला, त्याचा फैसला जाला ह्मणजे फौजा माघा-या छावणीस येतील. तुह्मीं नवाबसाहेबाची खातरजमा करावी. हामेश पत्र पाठऊन संतोषवीत जावें. सविस्तर श्रीमंतांचे पत्रावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.