Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

बाळ दीक्षित यांचे पत्राचें                                                     लेखांक १२.                                             १७१४ कार्तिक वद्य १३.
उत्तर छ २६ र॥वल,

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळ दीक्षित स्वामीचे सेवेसी-
पोष्य गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय आनंदातिशय लेखनद्वारा चित्त संतोषवावें विशेष आपण पत्र पाठविलें तें सुसमयीं प्रविष्ठ होऊन संतोष जाला प्रस्तुत नेम केला आहे ऐसा कीं येथील सर्वांचा निरोप घेऊन अखर कार्तिकपर्यंत येथून निघोन तुमचे भेटीस येतों कुटुंब-संरक्षण श्रीमध्ये होय ये गोष्टीचा विस्तारें मजकूर लिहिला तो सर्व समजला त्यास यंदाच श्रीस जावयाचें मानस असल्यास तिकडील सर्व गुंता उगवल्यानंतर इकडे येऊन भेट घेऊन जावें श्रीस जावयाचा यंदा अनमान असल्यास मग इकडे यावयाचें करू नये आह्मीच तिकडे आल्यानंतर भेटीचा लाभ घडेल कुटंब-संरक्षणाचा प्रकार विस्तारें लिहिला त्यास ध्यानांत आहे सांप्रत असलियास विस्मरण होणार नाहीं आह्मी पत्र लिहितों त्याचे उत्तर मात्र येते त्यावेगळें पत्र येत नाहीं ह्मणोन तुह्मी लिहिलें त्यास नवल आणि विशेष कांहीं असल्यास पत्र पाठवावें तें कांहीं नाहीं आणि प्रकृतहि प्रस्तुत ठीक नाहीं ज्वर येत होता नुकताच राहिला आहे नागपुरास जाण्याची सोय पुण्याकहून कीं भागानगराकडून हें लिहावें ह्मणोन लिहिलें त्यास वाटा दोहींकडील हि चांगल्याच परंतु इकडील मार्गानें सोबत मिळणें कठिण असें आहे रवाना छ २६ कार्तिक वद्य १३ हे विनंति.

छ २६ र॥वल आबा चिटणीस                                               लेखांक ११.                                             १७१४ कार्तिक वद्य १३.
यांचे पत्राचे उत्तर,

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आबा स्वामीचे सेवेसी- 
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित असावें विशेष आपण पत्र पाठविलें तें पावोन बहुत संतोष जाला मौजे कोंठार-चिंचोली पा कडेवलीत येथें कुलकर्णाचा वाडा बांधावयाकरितां जाग्याविषई व सेताकरितां तेथील कमावीसदार यांस पत्र पाठवावें इत्यादिक मार तपसिले लिहिला व राजश्री अप्पाजी कोंडाजी यांचेहि लिहिल्यावरून समजण्यांत आले त्यास मौजेमजकुरीं वाडा आपल्याकडील असणें यांत इकडील संतोष आहे वाडा व सेताविषयीं राजश्री गोविंदराव यांस येथून लिहिले आहे मारनिल्हे समजोन आपल्यास सांगतील आणि बंदोबस्त करून देतील कुलकर्णाचे प्रकरर्णी पत्र पाठविलें याजवेगळे कधीं पत्र आलें नाहीं हें स्नेहास उचित कीं काय याचे आश्चर्य फार जालें छ २६ रावल बहुत काय लिहिणें लोभ कीजे है विनंति.

बापू शिवाजी कमावीसदार जाफराबाद यास पत्र                             लेखांक १०.                                             १७१४ कार्तिक वद्य ७.
वानवले याजवळ दिल्हे छ २० र॥वल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बापुजीपंत स्वामीचे शेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें विशेष प॥ जाफराबाद येथील कामावर तुह्मास (नेमिलें ) त्यास राजेश्री हरबाजी नाईक वानवले याजकडील कारकून व तुह्मी एकविचारे माहालाचे कामाची वहिवाट करीत जावी याप्रो तुह्मांस लिहिलें असतां म॥- निल्हेनी पेशजी निळोपंत कारकून तेथें पाठविला होता त्याच्याने लिहिणे वगैरे काम येथास्थित आटोपेना सबब राजेश्री मल्हार रघुनाथ यास पाठविलें त्यास तुह्मीं त्याजला तेथील कामाचा येखादा इतल्ला देत नाहीं व एकविचार कोणतेहि काम न करितां दुई चालता ह्मणून समजले त्यास ही गोष्ट चांगली नाहीं वानवले याजकडून मल्हारपंत आहे ते व तुह्मी एकत्र होऊन कोणतेहि काम करावें यांत इकडील संतोष याउपर या गोष्टीचा बोभाट इकडे न यावा लिहिल्याप्रमाणे करावें दुसाराचा यैवज पो म॥रचा गावगना वसूल केला तो रहिमतखान व गोसावीसिंग वगैरे वरातदार महमद ईभराइमखा याजकडील यास तुह्मी दिल्हा ह्मणून कळ (लें) त्यास इकडील परवानगी नसतां ऐवज वसूल त्यास देण्याचे प्रयोजन काये असी गोष्ट होऊं नये मिश्रीखान पठाण याजवर कायमखान सजावल करून पाठविला अस्तां अद्याप मिश्रीखान जमियत सुधा तेथेंच आहे. त्याची सिबंदी दूर जाली नाहीं महालीं उपद्रव व तुह्मांसी कटकट तनख्याचे ऐवजाची करणार ह्मणून समजले त्यास पेशजी तुमच्या लिहिण्यांत ठाण-दखल जालें अैसें असून अद्याप हा बखेडा मोडला नाहीं अपूर्व आहे बंदोबस्त करून लवकर ल्याहावे वानवले यांचे कारकून मल्हारपंत यास इतल्ला देऊन कामकाज सुरळीत करावें बोभाट येऊ न द्यावा नाइकासी प्रतर्ना नाहीं मग नाईक कोणता हि कारकून ठेवोत काये बाध आहे तुह्मी समंजेस आहां ऐसे आह्मांस कळ (लें) असोन असा बोभाटा ऐकिला याचे आश्चर्य वाटलें र॥ छ २० र॥वल बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

व्यंकटराव सरसुभेदार यांचे                                                   लेखांक ९.                                                    १७१४ कार्तिक वद्य ७.
पत्राचें उत्तर छ २० र॥वल.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री राये व्यंकटराव सरसुभेदार स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें राजश्री गोविंदराव यांची तुमची भेट मुराम येथें होऊन सविस्तर त्यांणीं तुह्मांसी बोलण्यांत आणिलें ये विषयींचा तपसिल लिहिला तो समजला त्यास इकडून राजश्री गोविंदराव यांजला जातेसमई तुह्मांसी बोलावयाचे सांगितले त्याप्रमाणे त्यांचे तुमचे बोलणें जालेयावरून संतोष जाला परंतु गोविंदराव याजकडून येविषयीं अद्याप पत्र येऊन कांहीं समजलें नाहीं राजश्री शिवशंकरपंत यांचे सुटकेविषई लिहिलें त्यास नाईकाकडून येथें ग्रहस्त आले होते त्यासी बोलण्यांत येऊन त्यांजला तेथें पाठविलें अद्याप तिकडून उत्तर कांहीं आलें नाहीं इकडून ल्याहावयाचें तें पेशजी कसें लिहिण्यांत आले हें सर्व तुह्मांस गोविंदराव यांचे सांगितल्यावरून ठाऊकच आहे हालीहि वरचेवर लेहून पाठवण्यास अनमान नाहीं कितेक उपरोधिक प्रकार लिहिला याचे कारण काय पूर्वींपासून तुह्माकडील प्रकार दुसरा नाहीं याचा तपसील लिहिणे नलगे वरचेवर पत्र पाठवून वर्तमान ल्याहावें राजश्री देवराव भास्कर येथे आहेत म॥र-निल्हे लिहितील त्यावरून कळलें पाहिजे जे तुह्मांसी बोलणें जालें आहे ते विसरण्यांत आलें नाहीं त्याचे प्रसंगाचा समय प्रस्तुत आला त्यासमईं तुह्माकडील स्मरण राखोन जो प्रकार घडण्यांत आला याचा तपसील देवराव यांणी तुह्मांस लिहिला आणि गोविंदराव समक्ष तुह्मी बोलिले त्याजवरून समजलेंच आहे त्याअर्थी विस्तार लिहिणें कारण नाहीं जो प्राचीनपासून प्रकार आहे तो खचित आहे येविषई खातरजमा ठेवावी पुढेंहि दिसण्यांत येईल त्याजवरून आणखी समजेल शिवशंकरपंत यांस आणविण्याविषईं इकडून निकड आहे तपसिले देवराव लिहितील त्याजवरून कळेल र॥ छ २० र॥वल बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

अबदुल समदखान कडपेकर क्रांजे                                             लेखांक ८.                                                    १७१४ कार्तिक वद्य ७.
पत्राचा जबाब छ २० र॥वल.

नवाबसाहेब मेहेरबान दोस्तान सलमहूता आला-
बादज षौक मुलाकात मषहुद आंकी येथील खैर जाणून आपली शादमानी कलमी केली पाहिजे दिगर मजमून आपल्याकडून नारायेणराव आले त्यांणी ईजहार केल्यावरून व बाद व्यंकटराव यांचे हमराहा खत पाठविले ते नेक वख्तीं पोहचवून कैफियेत मुफसल जाहीर जाली येण्याचा मजमून कलमी केला चुनाचे नवाब अजमुल-उमरा-बाहादूर यांचे फर्जद मुषीरुदौला सेफुलमुलीक यांची तबियेत कसलमंद होती सबब दरबारची आमद रफ्त कमी आणि आमचीहि तबियेत दुरुस्त नाहीं या सबबाकरितां आं मेहेरबानास येथें येण्याची तसदी देण्यांत आली नाहीं बिल फैल येथून फार नजीक आं मेहेरबानाचे येणे होऊन मुलाकात नाहीं हेंही नामुनास बयान करितां येथे आं मेहेरबानाचे येण्याचा इत्यफाक व्हावा येविषयीं मुफसल नारायेणराव यांसी बोलण्यांत आले म॥र निल्हे लिहितील त्यावरून रोशन होईल आं मेहेरबानाची मुलाकात जाल्या बाद कैफियत जाहीर होऊन नवाब मेवसुफ यांसी बोलण्यांत येईल आपल्याकडील कामाची सही व कोसीस करण्यास इकडून कसूर व्हावयाचा नाहीं बयान लिहिणे कशास रा छ २० रावल.

बळवंतराव लक्ष्मण शेळूकर यास.                                           लेखांक ७.                                                    १७१४ कार्तिक वद्य ५.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बलवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष महमद दौलतखान बहादूर याणी आपले तालुकियाचे मामलतीचें काम राजश्री विठल चंडी राजश्री राजे राये-राया-बाहादुर यांचे आप्त यांजकडे सांगितलें आहे त्यास दौलतखान बहादूर यांजकडील तालुक्यांत तुह्मांकडील मामलतीचा जो ठराव जाला असेल त्याचाहि निकाल जाला पाहिजे याजकरितां अजमुल-उमरा–बहादूर व राज्याजी यांचे सांगण्यात आलें की माहालांत ज्यास्ती उपद्रव न करितां वाजवी निकाल ठरावा प्रो करून घेत तें करवावे व पंतमजकुर यांचे हरयेकविसी साहित्य होत असावें त्याजवरून हे पत्र लिहिलें असे राजश्री विठल चंडी यांचा आगत्यवाद राज्याजीस त्यापक्षी तुह्मीहि अगत्य धरून यांचे हरयेकविसी साहित्य करीत जावे व मामलतीचा निकाल उपद्रव न होतां करून घ्यावा यांत राज्याजीचा संतोष आहे र॥ छ १८ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

                                                                                  लेखांक ६.                                                    १७१४ कार्तिक वद्य ५.

राजश्री हैबतराव आटोळे समशेरबहादूर गोसावी यांसि--
5 अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्य स्त्रे॥ गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहिणे विशेष पीरणशाह वलद सैद अमल फकीर जालनापूरकर यास नवाब बंदगानअली याणी कसबे जालनापूर प॥ म॥र येथील आमदनिदराम व बरामद याजवर चुंगी मुठी सरकारचे महसूल सिवाय खैरात बतरीक फकीर लोकास येणार जाणार व बुजर्गाचे उरसाकरितां वगैरे पंधरा बिघे जमीन व वीस झाडे आंबे सुधां व दोन विहिरी पेशजी अबदु गफार व वजहुदीन यांस इनाम होता तो जप्त करून यास बफरजंदान इनाम करून देऊन भोगविटीयास सनद करून दिल्ही आहे त्यास स्वराज्याकडील मोकासदार वगैरे अडथळा करतात सनदे प्रो चालू देत नाहींत ह्मणोन फकीर म॥र यांणी नवाब बंदगानअली यांस अर्ज केला त्याजवरून नवाबाचे फर्मावण्यांत आले कीं चुंगी वगैरे सरकारचे महसुलासिवाय बुतरीक खैरात आहे व मलाही मामूल दुस-याकडे होता तो हाली यास दिल्हा असता अटकाव करण्याचे प्रयोजन नाही त्यास येविसी तुह्मी पत्र ल्याहावें याजकरितां हे पत्र लिहिलें असे की सदरहू चुंगी वगैरे व पंधरा बिघे इनाम पीरणशाह फकीर याजकडे चालवावा कोणी नवाबाकडील अडथळा करील त्यास ताकीद करावी खैरातीचे काम आहे र॥ छ १८ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

सदरहू मजकुराचे पत्र ज्यानकूबाई आटोळे यांचे नावे पीरणशाहविसी.

                                                                                  लेखांक ५.                                                    १७१४ कार्तिक वद्य ५.

बहेरी बाहादूर याचे व वीरभद्र आप्पा याचे नावे पत्रें
येकाच मजकुराची दोन्ही देवदुर्गाचे स्वराज्याविसी.

राजश्री राजे व्यंकटपा नाइक बलवंतबहेरीबाहादूर मुतहवरुद्दौला राबेजंग गोसावी यांसि-
5 सकल गुणालंकरण अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्य स्त्रे॥ गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असले पाहिजे विशेष संवस्थान देवदुर्ग येथील स्वराज्याचा अमल राजश्री सिद्धेश्वरराव नि॥ राजश्री रामचंद्रराव जगन्नाथ याजकडे आहे त्यास सन १२०० व सन १२०१ सालचा फडच्या करून देण्याविसी आपल्याकडील अमीलास ताकीद व्हावी दिकत पडू नये र॥ छ १८ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

सदरहु आशयेंच वीरभद्र आपा याचे नांवे पत्र येक एकूण २ दोन पत्रें पीरणशाहा फकीर जालनापूरकर याजविसी दोन पत्रे.

                                                                                  लेखांक ४.                                                    १७१४ कार्तिक वद्य ४.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिमलराव स्वामीचे सेवेसी--
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावें विशेष राजश्री हरिपंत तात्या यांचे पागेकडील कोठीचे बैल कसबे घाट नांदूर येथून मौजे उमरगे प॥ गुंजोटी येथील बाजारांत गल्याचे भरतीकरिता आले होते तेथे रात्रीं चोरांनीं बारा बैल नेले त्याचा शोध लागावा ह्मणून कोठवले पुण्यास फिर्याद गेले त्याजवरून पत्रे आलींत कीं बैलाचा शोध लाऊन देवावे त्यास हाली सरबुलंदजंग यांचे पत्र तुमचे नांवे आहे त्याप्रो । बैलाचा शोध लाऊन बारा बैल राजश्री आबाजी बल्लाल कारकून राजश्री तात्याकडील मौजे आवराद प॥ उदगीर येथे आहेत त्याजपासी पावते करून त्याची रसीद घेऊन आह्मांकडे पाठऊन द्यावी येविसी टाळा देऊ नये रा छ १६ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

                                                                                  लेखांक ३.                                                    १७१४ कार्तिक वद्य ४.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आबाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय ल्याहावे विशेष तुह्मी राजश्री कोन्हेर बाबूराव यांचे पत्रीं मजकूर लि॥ की एथील मारवाडियांचे नावें आमचा कौल घेऊन पाठवावा व मौजे उमरगे प्र॥ गुंजोटी एथील बाजारात गेल्याचे खरेदीकरितां कसबे नांदूर एथील पागेतून कोठीचे बैल गेले होते तेथे रात्रीं चोरानीं बारा बैल नेले आहेत त्यास एविसी आह्मी राजश्री त्रिमलराव यास पत्र लि॥ असतां अद्याप बैलाचे ठिकाण लाऊन दिल्हे नाही कोठवले पुण्यास तात्याकडे फिर्याद गेले होते मागती माझे नावे पत्र घेऊन आले आहेत कोन्हेरपंत याणी तुमचे पत्रच बजिनस दाखविले त्याजवरून सरबुलंदजंग यांचे व आमचें पत्र राजश्री त्रिमलराव यांचे नांवे एकूण दोन पत्रे पाठविलीं आहेत त्याजकडे रवाना करावी व मारवाडियांचे नावे आह्मी आपला कौल लिहून पाठविला आहे येथील सरकारचे कौलास दिकती आणि लौकर होणार नाही आणि तुमचेहि लिहिण्यांत की आपले नांवानें एक कौल प॥ त्याजवरून पाठविला आहे हा मारवाडियास देऊन दिलासा द्यावा र॥ छ १६ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.