पो॥ छ २४ रजब सन लेखांक १७३. पो॥ १७०२ आषाढ व॥ ११.
इहिदे समानीन. श्री. २७ जुलई १७८०.
सेवेसीं येसाजी विठल कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना ता। सोमवार प्रातःकाल प्रहर दिवस क्षेम असे. विशेष. सुतरस्वारासमागमें पत्र पाठविलें तें आतांच पावलें. लिहिल्याअन्वयें पत्रें सहीत पुण्यापैकीं सुतरस्वार एक व खिजमतगार व कासीदजोडी येणेंप्रमाणें रवाना केले आहेत. येऊन पोंहचतील. केरूरकटगिरीचे ठाणेच्या चिठ्या घेऊन रा। भिवराव यासीं रवाना करून तुह्मांस प्यादियाविसीं लिहितों ह्मणोन लिहिलें. उतम आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.
राजश्री गणपतरावजी स्वामीस सां। नमस्कार विनंति. तुह्मीं पत्र प।। तें पावलें. राजश्री पाटीलबावांचीं निभावणीचीं पत्रें सहीत खिजमतगार, कासीद, सुतरस्वार यासमागमें पा।। आहेत. हजरतांस आर्जी लिहिणार ह्मणोन लिहिलें. त्यास, हटलूर संमत कमतीसिरूर परोतीविसीं राजश्री तात्या स्वामींस व रा। नरसिंगरावजीस विनंति करून लिहिलें पाहिजे. हे विनंति.
राजश्री भिवराव स्वामींस सां। नमस्कार विनंति. राजश्री तात्या यांस लाखोटा पुण्याहून सुरतस्वारांनीं आणिला होता तो तुमचे कलमदानांत आहे, तो तात्यांस प्रविष्ट करावा. वरकड सविस्तर लिहावें हे विनंति.