Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक २. १७१४ कार्तिक वद्य ४.
आबाजी बलाल कारकून नि।। राजश्री हरीपंत तात्या याणी पत्रें व कौल आणविले त्या प्र।। रवाना केले औरा देस छ १६ र।।वल मु॥ भागानगर,
श्रीमंत राजश्री पंतप्रधान -
कौलनामा बमोहर राजश्री गोविंदराव कृष्ण नि॥ त॥ मारवाडियान व बेपारियान मौजे अवराद व पेंठ शाहाज्यानी प॥ उदगीर जागीर इनाम राजश्री हरिपंततात्या सु॥ सलास तिसैन मया व आलफ सांप्रत तुमचे वर्तमान विदित जालें कीं तुह्मी पेठ मजकुरी राहून धंदा उदीम करीत नाहीत व वसवास करून आहांत त्याजवरून हा कौल सादर केला असे कीं तुह्मी आपली खातरजमा राखोन सुदामत प्रो गला वगैरे जिनसाची मौजे मजकूरचे बाजारांत खरेदी फरोख्ती करीत जाणे कोण्हे गोष्टीचा वसवास न करणे तुह्मास उपद्रव होणार नाही एविसी कौल जाणिजे छ १६ र॥ल मोर्तब सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
काळे-वकलाती पत्रव्यवहार
------------------------
लेखांक १. शक १७१४ कार्तिक वद्य ४.
कडबा तीन साला येणे त्याचे फडच्याविषयीं आमीलास ताकीदपत्रें पाठवावीं वे जाधव याजकडील कानकुर्ती येथील दुसाला मोकाशाविषई तपसिलें लिहिलें त्यास चिटगोपे-प्रकरणीं सिदी इमामखान आमील यांसी निक्षून बोलून त्यांची ताकीद पा मारी नायब आहे त्यास घेऊन पाठविलीं आहे येके महिन्यांत फडच्या करावा या प्रो ठरून लिहिलें आहे याउपरी गुंता नाहीं जाधवाकडील पा कानकुर्ती येथील मोकाशाच्या सन १२०० सालचा फडच्या नगदी ऐवजाची चिठी पुण्यावर राजश्री नरसिंगराव महिपत नि।। विठल दादाजी यांचे स्वाधीन केली सन १२०१ सालची तनखा नबाबचे सरकारांतून घेतली फडच्याही लौकरच होईल तनखा ज्याजवर आहे ते येथें नाहींत त्यांजकडे तनखा पाठऊन ऐवजाचा फडच्या करून घेण्यास दिवसगत याचकरितां सत्वर फडच्या होण्याची तजवीज केली आहे कडब्याचा म॥र सिदी इमामखा यांसी बोलण्यांत आला त्यास यांचे ह्मणणे कीं हंगामसीर कडबा पेसजीचे कमाविसदार घेत असतील त्या प्र॥ देवीन त्यास चालत आल्या प्रो हंगामी कडबा माहली खान मजकूर यांजपासोन घ्यावा येथे सांगितले आहे र॥ छ १६ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। शके १७०६ लेखांक २१२. १७०६ ज्येष्ठ शु॥ १३.
ज्येष्ठ शु।। १३ मंगळवार. श्री. १ जून १७८४.
"राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
गणेशपंत दादा व धोंडोपंत नाना स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी दत्तात्रय व गोपाळ गणेश सां। नमस्कार विनंति. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करित जावें. विशेष, आपणांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, तरी ऐसें नसावें. सदैव पत्र पाठवून आपलेकडील सविस्तर वृत्त वरचेवर लिहित जावें. यानंतर इकडील मजकूर तरी, तपशील.
मातुश्रीचे शरीरभावनेचें वर्तमान अलीकडे कसें आहे, औषध कोणाचें चालतें, आजपर्यंत कांहीं उतार पडला किंवा नाहीं हें कचें लिहावें. कलम १
नवाबबहादुराचे तालुकियांत होळकराकडील पेंढारी व राजश्री परशरामभाऊ कितुराकडून आले, त्यांणीं उपद्रव दिल्हा, याजकरतां नूरमहमदखांन याचे चित्तांत संदेह येऊन बहुत आजुर्दा होता. हें सर्व जमानाची सरकारांत निवेदन करून बंदोबस्त करिवला. प्रस्तुत त्याचे प्रांतांत कांहीं उपद्रव नाहीं. आपणांस कळावें. कलम १
रावरास्ते यांजकडील स्नेहाविषयींचे संधान आपले यजमानाकडे लागलें आहे, आणि बोलतात कीं, श्रीमंतांचे आमचें वांकडे आंतून आहे, तें नीट करून द्यावें. आमची आंतून वकिली आपण करावी. तुह्मीं जितकें पाणी प्यावयास सांगाल तितकें पिऊं. तुह्मांखेरीज आमचीं कामें सुधरत नाहीं, हें आह्मांस पुरतेपणीं समजलें. याउपर आमचा आतां अंत पाहूं नका. ह्मणोन बहुत गळां पडले आहेत. याउपर होईल तें लिहीन. कलम १
नवाब बहादर यांजकडील वर्तमान तरी, नवाबाचा मानस खातरजमेचीं पत्रें, शपतपूर्वक पूर्वींल करार मदार व सौगंध शपत उघरून पत्रें पाठवावीं. ह्मणजे ऐवज सावकाराचे पदरीं घातला आहे तो रवाना करून देतों ऐसें होतें. त्यावरून पंढरपुरचे मुकामींहून आपले यजमानाचेच विद्यमानें सरकारच्या व खासगत व रावरास्त यांच्या थैल्यासहित पत्रें रवाना करून एक मास होत आला. येथून रवाना थैल्या जालेल्याचे जाबही पांच सात दिवसांत येतील, ऐसें वाटतें. नंतर होईल ते आपणांस लिहून पाठवूं. कलम १
नबाब निजामअल्लीखान याच्या व सरकारच्या भेटी सुरापुरानजीक बारा कोसांवर यादगिरच्या किल्ल्याजवळ नवाबाच्या डे-यासच वैशाख वद्य १२ रविवारीं भेटी सर्वत्रांच्या जाल्या. नवाबाच्या लस्करानजीक चार कोसांवर आपले लस्करचा मुकाम भीमातीरानें आहे. येथेंच आठ पंधरा मुकाम होतील असें वाटतें. अद्याप सरकारी कामकाजाचें बोलणें लागलें नाहीं. पुढें होईल तें लिहून पाठवूं." कलम १
कलमें पांच लिहिलीं आहेत, यावरून कळेल. बहुत काय लिहिणें, कृपालोभ करावा हे विनंति.
****** समाप्त******
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १६ लेखांक २११. १७०३ फाल्गुन शु।। ७.
इसन्ने समानीन. श्री. १९ फेब्रुवारी १७८२.
"राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भुजंगराव आणाजी स्वामी यांसीः-
सेवक आनंदराव भिकाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करित जाणें. विशेष, तुह्मीं माघ शु॥ ११ एकादशीचें पत्र पाठविलें तें पावलें. नवाबबहादुर यांनीं रा. आनंदरावजी बाजी व गणपत केशव यांस बोलावून नेऊन विस्तारेंकरून बोललियाचा मो। मा।र निल्हेनीं तपशीलें लिहिला आहे त्यावरून श्रुत होईल, ह्मणोन लिहिलें. ऐसियास येविषयीचा मा।र रा. कृष्णराव तात्या यांसी व राजश्री आनंदरावजी बाजी व गणपतराव केशव यांसी लिहिला आहे, त्यावरून कळेल. जाणिजे छ ६ रबिलावल बहुत काय लिहिणें हे विनंति.''
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १६ लेखांक २१०. १७०३ फाल्गुन शुद्ध ७.
सन इसन्ने समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १९ फेब्रुवारी १७८२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आपण छ चें पत्र पाठविलें तें पावलें. इकडील वर्तमान तरी वरचेवर होतो, तो मजकूर आपणांस राजश्री आनंदरावजी बाजी व गणपतराव केशव लिहितच आहेत. व नवाबबहादुर यांजकडे बातम्या येतात, त्यावरून आशंका घेऊन बोलल्याचा वगैरे मजकूर लिहिला तो सविस्तर कळला. ऐसियास येविसींचा मजकूर विस्तारें राजश्री नाना यांनीं आपणांस लिहिला आहे, व येथून राजश्री आनंदरावजी बाजी व गणपतराव केशव यांस आह्मीं लिहिला आहे. त्यावरून सविस्तर कळों येईल. नवाब बहादरासीं बोलोन इंग्रजांची तंबी होऊन होय तें करावें. निरंतर पत्रीं संतोषवित जावें. रवाना छ ६ रविलोवल बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.
पोष्य लक्ष्मणराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति. लिहिलें परिसोन निरंतर पत्र पाठवून संतोषवित जावें. बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १६ लेखांक २०९. १७०३ फाल्गुन शु।। २.
इसन्ने समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १४ फेब्रुवारी १७८२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करित जावें. विशेष, आपण पत्र पो। तें पावलें. मकरसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले ते पावोन अत्यादरें स्वीकार केला. निरंतर पत्रीं संतोषवित जावें. रा। छ १ रोवल बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.
पो। लक्ष्मणराव भिकाजी व गंगाधरराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरि आपण मकरसंक्रांतीचे तीळ शर्करायुक्त पाठविले ते स्वीकार केला. बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १६ लेखांक २०८. १७०३ फाल्गुन शु।। २.
सन इसन्ने समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १४ फेब्रुवारी १७८२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
भुजंगराव अण्णाजी स्वामी यांसीः-
सेवक अनंदराव भिकाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मी पत्र व मकरसंक्रमणाचे तील शर्करायुक्त पाठविले ते पावले जाणिजे. छ १ रो।।वल बहुत काय लिहिणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १६ लेखांक २०७. १७०३ माघ व।। १.
सन इसन्ने समानीन. श्रीशंकर प्रसन्न. ३० जानेवारी १७८२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करित असावें. विशेष जालिहाल तालुका व पर्वत गिर्दनवाई सुद्धां व फौजेचे बेगमीस आठ लक्षांत सरंजाम वसुली देशीलगता नवाब बहादरासीं बोलून लावून घेणें, ह्मणोन राजश्री आनंदरावजी बाजी व गणपतराव केशव यांस लिहिलें आहे. तरी आपण व उभयतां मिळोन नवाबबहादरियासी बोलून जालिहाल तालुका पर्वत गिर्दनवाई सुद्धां व फौजेचे सरंजामास आठ लक्षांचा मुलुक वसुली देशीलगता लाऊन देत तो अर्थ करावा. आठ लक्षांचा तालुका देशी लगता वसुली लावून घ्यावा. येविसीं राजश्री नाना यांनीं आपणास पत्र व नवाबबहादर यांस थैलीपत्र लिहिलें आहे. त्यास त्यांची मर्जी ठीक राहून कार्य करून घ्यावें. निरंतर पत्रीं संतोषवित जावें. रवाना छ १५ सफर बहुत काय लिहिणें लोभ करित जावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ९ मोहरम सन. लेखांक २०६. १७०३ पौष शु.१०.
इसन्ने समानीन. श्री. २५ डिसेंबर १७८१.
विनंति ऐसीजे. आपण आह्मांस रुइदार आंगरखा सिवऊन देतों ऐसें ह्मणाला होता. त्यास बहुत दिवस जाले, विस्मृती जाली असेल. सांप्रत झगा सिवणे करितां गुजराथी शाहणा सिंपी सावनूरचा आणविला आहे. आपण आंगरखा सिववणें जाहल्यास आपल्याकडे घेऊन येतों. याचें उत्तर पाठवावें. हे विनंति.
माझे शरीरीं समाधान नाहीं, याजमुळें गोष्ट राहिलीः छीट सिद्ध आहे. आंगरखा आपले आंगचा बेतून तयार करावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पौ। छ ९ मोहरम सन. लेखांक २०५. पो। १७०३ पौष्य शु॥ १०.
इसन्ने समानीन. अलीफ. २५ डिसेंबर १७८१.
राव अजम कृष्णराव साहेब सलाम लाहुतालाः-
रावसाहेब मुषफक मेहरबां करमफर्माय मोखलिसां अजीं दिल ऐखलास नूर महमदखां लोहाणी सलाम बादज सलाम खैर्यत अंज्याम मोहवल मकसूद आं कीं येथील खैर सला जाणून साहेबीं आपली खैरखुषी कलमीं करीत आलें पाहिजे. दिगर मेहरबानगी करून साहेबीं च्यार पांच खत राव रास्ते यांच्या विद्यमानें पाठविलें तें व हुजरेबराबर एक पत्र पाठविलें तें पाऊन फार खुषी हासल जाहली. आह्मींहि दोनी तिनी खत साहेबांचे खिदमतेमध्यें पाठविलें तें पोंहचले असतील. साहेबीं आपणावर हजरत नवाबसाहेब फार मेहरबानी करितात ह्मणोन लिहिलें होतें. तर खोदाके फजलसे साहेबांस उमदे खानदानी वजेनें हजुरचे मर्जीदान जाणोन दया करीत जातात. आह्मीं साहेबाचे सबवजेनें मोखलिस एकदिल असों व फजल इलाही नवाब साहेबांची मेहरबानी साहेबांवर रोज बरोज ज्यादा होत जाईल. येथील हकीकत व कामकाजाचा मनसुबा सब आपले कडील लिहित असतील. हमेषा षफकत नानाकडून दिलषाद करीत आलें पाहिजे. जैसें हजरत नवाब साहेबाकडून दुषमनाची तंबी दिनप्रति होत जाते त्या प्रकारें इकडेहि दुषमनावरी ताण बसवणेंत मनसुबेस इतके दिन लागते. या मजकुरास आपण पदोपदीं मदारुलमहाम यांस लिहित असाल. कसल मेहरबानगी ठेविली पाहिजे. दराज काय लिहिणें ? हे किताबती.
बरखुनदार अल्लिमियाकडून फार फार सलाम महसूल केलें पाहिजे.
निजसेवक कोनेरी नरसिंह कृतानेक साष्टांग नमस्कार. पूर्ण वात्सल्य ठेवून कृपापत्रीं सनाथ करावें. हे विनंति.
महाराज राजेश्री कृष्णराऊ स्वामींचे सेवेसीं. सेवानुसेवक आंचे व्येंकटरमणैय्या सं॥ नमस्कार. पूर्ण कृपावात्सल्यपुरःसर ममता करावें. सर्वज्ञास विशष लिहणेस शक्त न हो.