Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १६४. १७०२ ज्येष्ठ व॥ १०.
इहिदे समानीन. श्री. २७ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाब आमीरुलउमराव यांणीं कराराप्रमाणें सावकारी निशा करून दिल्ही; तेव्हां बशर्तीप्रमाणें त्यांचा तालुका ठाणीं जातसुधां त्यांचे हवालीं करावा. सोडचिठ्या नवाबबहादूर याणीं दिल्ह्या. अदयनी हावेलीचीं ठाणीं सुटलीं. शाहाडोंगर व कपटराळ वगैरे दोन चार ठाणीं व तालुका सुटणें त्यास, तो तालुका जमेदाराकडे आहे. तुह्मीं घेणें, ऐसें नवाबबहादूर ह्मणतात. जमेदारावर सख्ती करावी तरी बलहरीकर व गुतीकर कुमक करितात. ऐसे नानाप्रकारें नवाब निजामअलीखांबहादूर यांजकडून बोभाट येतात. त्यास, तालुका घेतला ते समयीं नवाबआमीरुलउमराव यांजपासोन घेतला, हालीं जमेदार दाखवणें हें काय ? येविशीं तुह्मीं नवाबबहादूर यांसी बोलून राहिलीं ठाणीं त्यांचीं सत्वर सुटेत तो अर्थ करावा ह्मणजे नवाब निजामअली यांचें इकडे लिहिणें राहील. त्यांस इतकेंच निमित्य आहे. यास्तव करारप्रमाणें ठाणीं जात सुटावीं. र॥ छ २३ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २१ रजब सन इहिदे लेखांक १६३. १७०२ ज्येष्ठ व॥ १०.
समानीन आषाढ मास. पत्रें पुरवण्या ५. श्री. २७ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं--
पो॥ बाळाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मी छ ४ माहे जमादिलाखरचीं पटणचे मुकामचीं पत्रें पाठविलीं ते पावलीं. राव सिंदे यांजकडील निभावणीचें पत्रसहीत सांडणीस्वार जोडी आली. हें वर्तमान अगाव कळतांच नवाबबहादूर यांणीं आमचे रवानगीची तर्तुद करविली. राव सिंदे यांचें पत्र घेऊन येणें. तीं पाहून सर्व मंडळीस रुकसत देऊन आह्मी गुरुवारीं रात्रौ कूच करून बेंगरुळास जात असों, ऐसें सांगून पाठविलें. आह्मीं थैलीपत्र घेऊन दरबारास गेलों. थैलीपत्र फोडून पाहिलें, तों निभावणीचें पत्र आंत नाहीं; यांचे पत्राचा जाब मात्र होता. त्यावरून विस्मय जाला. गफलतीनें पत्र राहिलें ऐसें ठरलें. आह्मीं उत्तर केलें कीं, आपण मसलतीस खातरजमेनें चलावें, आह्मी बराबर येतों. निभावणीचें पत्र आलियानंतर आह्मीं रुकसत घेऊं. तेव्हां उतम आहे ह्मणोन बोलिले. त्यास, आपण राजश्री नारो सिवदेव यांची किंवा आणखीं कोणाची पाटीलबावांकडे रवानगी करून निभावणीचें पत्र सत्वर येऊन पावें ऐसें करावें. या उपरी इंग्रजांवर जाऊन त्यांस सजा करण्यास नवाबसाहेबाकडील गुंता नाहीं ह्मणोन विस्तारें लिहिलें. ऐसियास, निभावणीपत्र थैलींत नव्हतें, हे गोष्ट ठीक न पडली. यास्तव तुमचीं पत्रें पावतांच पुढें शुतरस्वार जोडी सिंदे यांजकडे पाठवावी. मागाहून नारो सिवदेव यांचीही रवानगी करावी. ऐसा निश्चय केला. तों इतकियांत सिंदे यांजकडून छ २५ माहे जमादिलावलचें निभावणीपत्र मसुद्याप्रमाणें येऊन पोहचलें. आह्मीं लिहिण्याचे पूर्वीं त्यांणींच समजोन पत्र रवाना केलें. हालीं तें निभावणीपत्र आह्मी व राव रास्ते व राजश्री आनंदराव नरसी[ग] यांणीं वाचून पाहून तुह्मांकडे रवाना केलें आहे, तें नवाबबहादूर यांस द्यावें. आह्मी व सिंदे कांहीं दोन नाहीं. सरकारचा कारभार, त्यांचें आमचें करणें एक, इकडून निभावणीपत्रें सौगंध शपथेनसीं पाठविलीं, तेव्हां याप्रमाणें सिंदे यांचे पत्र येईलच व गुंता पडणार नाहीं, ऐसें समजोन माघेंच नवाबबहादूर यांणीं कूच करून जावयाचें होतें, त्यांत फार कामें होतीं. त्यास, सिंदे यांचे पत्राविशीं गुंता जाला. इकडून जे गोष्टी करारांत व बोलण्यांत आली त्यांत बालाग्र कमी यावयाची नाहीं, येविशीं नवाबबहादूर यांची खातरजमा असावी. आमची दोस्ती कसी आहे हें सर्व आईंदे जहुरांत येईल. आतां तपसील लिहिणें दरकार नाहीं. राव सिंदे यांचे निभावणीचें पत्र येण्यास एक वाटेच्या खलशानें दिवसगत लागली. हालीं रवाना केलें, पावेल. इकडे या उपरी कोणेविशीं गुंता व जाबसाल राहिला नाहीं. नवाबबहादूर यांणीं दरकूच जाऊन इंग्रजास सिक्ष्या करावी. तुह्मीं सर्व कामें उगवून मंडळीसहीत सत्वर यावें. येथील प्रकार राव सिंदे व आह्मी दोन नाहीं. वाटेचे वगैरे खलषामुळें चार दिवस लागले. मागेंच जाणे जालें असतें तर फार काम होतें; व पत्रही येऊन पोंहचतें जहालें ते गुदस्त. याउपर लौकर जाणें व्हावें आणि तुह्मीं मंडळीसुधां सर्व कामें उलगडून घेऊन यावें. आपलेकडील तहनामा व निभावणीपत्रें सर्व तुह्मांजवळ आहेत. त्यास अगोदर नवाबबहादूर यांचा तहनामा सरकारचे तहनाम्याबमोजीब व नानकुराण व इकडील खातरजमेचीं निभावणीचीं पत्रें, ज्याचीं आहेत त्याप्रों। नवाबबहादरांचीं पत्रें त्यांस. याप्रों। आपणां जवळ घेऊन मग आपलीं पत्रें व तहनामा द्यावा. पूर्वींही येविशीं लिहिलेंच होतें. र॥ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १६२.
१७०२ ज्येष्ठ व॥ १०. श्री. २७ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. मिर रजाअलीखान सरंजामसमेत पिलरीवर गेले. त्यांणीं तमाम इंग्रजाचा तालुका व्यंकटगिरी व कालहास्ती वगैरे ताराज केला. मागाहून नवाबबहादूरही दरकूच चालीले. त्यास, करारप्रमाणें इकडूनही रावरास्ते यांजकडील फौज व मातबर पाठवावा. त्यास, तुह्मी येतेसमयीं नवाबबहादूर यांचे कानावर घालून यावें. ह्मणजे येथून फौजेची रवानगी केली जाईल.
र॥ छ २३ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १६१.
१७०२ ज्येष्ठ व॥ ६. श्री. २३ जून १७८०.
आंसाहेबाकडून खत फरहतनमत आलें तें बवख्त नेक पोंहचून खुशी हासल जहाली. तमाम मरातबाहून आपला येखलास मंजूर आहे. याजकरितां छ २४ जमादिलावलीं नेकसात पाहून डेरेदाखल जालों. एका दों रोजांत कृष्णराव नारायण यांची रवानगी करून दरकूच आह्मी जात असों. खुदाचे फजलेनें इतकियावर इंग्रजांची तंबी होईल. ती जहुरांत येईल. कडप्याहून मिरजा अली रजाखां याणीं इकडील लिहिल्याप्रों। इंग्रजांचे तालुकियांत जाऊन मुलुक तख्त व ताराज केला. यासिवाय तालचरीसही महसरा करविला आहे. बिलफैल परशरामपंत कोल्हापूर जिल्ह्यास येऊन चिलर कामावर अटकून राहिले आहेत. यांस फौजसह सिंदे यांचे कुमकेस रवाना करावे. हें ऐन सलाह ह्मणोन कलमीं केले. त्याजवरून हार्फषहार्फ दिलनिशीन जाले. चुनाचे आंमेहरबांस दोस्तीची एहतीमात मंजूर रोजबरोज तरकी व्हावी. हें दिलापासोन खाहेष. याचा तपसिल आजी जुलकद्र कृष्णराव नारायण हामेश कलमी करितात. त्यास दोस्तीचे अलमात हेच लाजम आहे. इकडीलही हेच खाहेष कीं, तरफैन येखलास व येक सुईची तरकी ज्यादा होत असावी. आंसाहेब नेकसातेस खेमेदाखल जाले. हे ज्याहायेतबंज्या व मसलतीस मुनासब. आईंदे कूचदरकूच कुल्हापोशाचे तालुकियांत नमूद होऊन तंबीवालाई अमलांत यावी. आंमेहरबाही आजम जलद केल्यास इंग्रजांची तंबी खातरखा होईल, हा दोस्तदारास नक्ष आहे. मिरअली रजाखान याणीं हंगामा त्याचे तालुकियांत केला हे गोष्ट बहुत नेक आहे. गुजराथचे जिल्ह्यांत मातबर फौजेनसीं सरदार यांणीं जाऊन इंग्रजांस अजीज व बतंग केले. कोंकणप्रांतांत हालीं ममईकर यांणीं शेखी केली त्याचे गोषमालिस सरकारांतून हुजूरचे फौज के गाडद रवाना जाली व होत आहे. परशरामपंत यांस बिलफैल इंग्रजांचे तंबी करतां आणवावें ऐसी हाजत नाहीं. मशारनिले याजकडून आंसाहेबाचे तालुकियास सेरमो इजा जाली नाहीं, व आईंदे व्हावयाची नाहीं. कितूरकर व कोल्हापूरकर याणीं बेअदबी केली. त्यांचे तंबीस रवाना जाले. त्यास, कितूरकर याचे खंडणीचा व तालुकियाचा जाबसाल होत आहे. बाद फौजा छावणीस येतील. येविशीं कितेक मरातब कृष्णराव नारायण यांस कलमीं केले आहेत. ते बयान करतील. हमेशा खत पाठवून आपले खैरीयतची इतला होत असावी. ह्मणोन हैदरअलीखाबहादूर यांस पत्र.
नाना फडणीस यांचे नांवें सदरहूप्रों। उत्तर र॥ केलें छ १७.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १६०. १७०२ ज्येष्ठ व॥ ५.
इहिदे समानीन. श्री. २२ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावतात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो॥ कृष्णराव बलाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावून वर्तमान कळलें. नवाबसाहेब खेमेदाखल जाले. हे सलाह ऐन पडली. आतां दरकूच जाण्यांत काम मुकामत कोठें न व्हावी. राव सिंदे यांचें थैलीपत्र आलें तें पेशजीं रवाना जालें. पावलें असेल. वरकड इकडील व राजश्री परशरामपंतभाऊंकडील सविस्तर राजश्री नाना याणीं लिहिलें, त्यावरून कळेल. सारांश, नवाबसाहेब यांचे जाणें लौकर होऊन कार्यभाग उगवून तुह्मीं यावें. र॥ छ १८ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
राजश्री गणपतराव स्वामींचे सेवेसीं सां। नमस्कार. सविस्तर राजश्री नाना व रावेरास्ते यांणीं लिहिल्यावरून कळेल. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १५९. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: --
विनंति उपरी. नवाबसाहेब वैशाख व॥ येकादसीस इंदुवारीं सहा घटका दिवसा खेमे- दाखल जाले. संध्याकाळी आह्मांस बोलावून श्रीमंतांच्या स्नेहाच्या गोष्टी जाल्या. रोजबरोज दोस्तीची तरकी होत असावी. हेच इच्छा X यांची. तोफखाना वगैरे सरंजाम बेंगरुळास अगोधरच रवाना जाला. तमाम फौजा व पाळेगार यांस ताकीद गेल्या कीं:- लौकर बेंगरुळास दाखल होणें. बेंगरुळावरही बहुत मुकाम होवयाचे नाहींत. मिर रजाखां याणीं नेलूर, सर्वापली, भंगारकाल, हास्ती वगैरे तालुके मारून ताराज केले ह्मणोन लिहिलें. त्यास, नवाबबहादर खेमेदाखल जाले. हे गोष्टी फार चांगली व मसलतीस योग्य केली. याउपरी जलदींत फायदा बहुत. दरकूच टोपीकरांसीं नमूद होऊन त्यांस सजा व्हावी. जलदी केल्यानें त्यास पकी तंबी नवाबबहादुरांकडून अमलांत येईल येविशींची खातरजमा आहे. जलदी मात्र व्हावी. मिर रजाखां याणींही चांगली केली. इंग्रज कोठें जमा जाले, पलटणें कोठें आली किंवा नाहींत याचा त॥ ल्याहावा. सारांष, आतां जाण्यास दिवसगत न लागावी. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन इहिदे लेखांक १५८. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
समानीन आषाढ मास. श्री. २० जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
पो॥ बाळाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं छ २६ व छ २७ माहे जमादिलावलचीं पत्रें पाठविलीं ते पावलीं. पुरवणीपत्रावरून मजकूर समजला. त्याचीं उत्तरें व इकडील मजकूर अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिला आहे त्यावरून कळेल. सारांष, नवाबबहादर यांचें जाणें दरमजल व्हावें. र॥ छ १६ जमादिलाखर, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
राजश्री गणपतराव स्वामींस सां॥ नमस्कार विनंति उपरी. सविस्तर राजश्री कृष्णराव यांस लिहिलें आहे. त्यावरून कळेल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब लेखांक १५७. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
सन इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री राव सिंदे यांचें पत्र येत नाहीं. ऐसें नवाबसाहेब विचारूं लागले त्यास, वाटेच्या खलशामुळें दिरंग लागला ऐसें उत्तर केलें. उगेच राहिले. आमचा पत्राविशीं मात्र गुंता. बहुधा बेंगरुळापावेतों जावें लागेल ह्मणोन लिहिलें. ऐसियास, शिंदे यांचें थैलीपत्र आलें तें पेशजीं तुह्मांकडे रवाना केलें, पावलें असेल. आतां तुमचा गुंता होणार नाहीं. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १५६. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. येथोन नवाबबहादर यांजपासीं रहाण्यास रवळो भिकाजी रवाना जाले आहेत ह्मणोन, नवाबबहादूर यांस आनंदराव यांणीं लिहिलें व राजश्री गणपतराव यांणींही सांगितले त्यावरून नवाबसाहेब याणीं जाबसाल केला कीं:- येथें कोण्ही उमदा असावा. तुह्मीं जाऊन मदारुलमाहाम यांस भेटून तुह्मीं अगर गणपतराव यांणीं यावें. रवळोपंत यांस पाठवूं नये, ऐसें ल्याहावें ह्मणोन सांगितलें. रवळोपंतास पाठवूं नये ऐसी येथील मर्जी ह्मणोन लिहिलें. ऐसियास, तुमचे लिहिल्या अगोधर रवळोपंत रवाना जाले ते तुह्मांपासीं येतील. नवाबबहादूर यांचे विचारें त्यांस ठेवावें. ऐसें जालिया ठेवून यावें, न जाल्यास त्यांज बराबर घेऊन यावें. येथें आलियानंतर मग रवाना करणें त्यास केलें जाईल. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १५५.
१७०२ ज्येष्ठ वद्य ३ वृद्धि. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. पिलरी घांटावर घांटाखालीं नागापट्टण, श्रीव्यंकटेश, नेळूर, सर्वापली. पल्ला लांब. कालहस्ती व्यंकटेशापलीकडे. तेव्हां, मीर रजा यांची दौड तालुका मारावयास कोणत्या मार्गें गेले, घांट कोणता उतरले. खासा मीर कोठें आहेत, इंग्रजाची जमी-येत किती, कोणे ठिकाणीं आली किंवा नाहीं याचा अर्थ माहितगिरीनें पक्कें समजोन, नवाबबहादर यांस पुसोन तपसीलवार ल्याइवें. कोडियाळ बंदरास इंग्रजांचीं दोन जहाजें धरलीं. पुढें गल्ला वगैरे भरून देणें एविशीं ताकीद निक्षूण जाली आहे, ह्मणोन नवाबबहादर यांणीं सांगितलें. फार उत्तम. त्यांचें माणूस व जहाज कोठें खुसकीस उतरूं न पावे ऐसें केलेंच आहे. ताकीदही वरचेवर असावीच. एविशीं नवाबबहादर यांस ल्याहवें ऐसें नाहीं. सर्व मनसबे व दरजे त्यांचे चित्तांत आहेत. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.