पो॥ छ १० साबान लेखांक १७४. १७०२ आषाढ व॥ १४.
सन इहिदे समानीन. श्री. ३० जुलई १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं--
पो। बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर कळला. ऐवजास सरंजाम पाठवावा ह्मणोन लिहिलें. त्यास, पागा दि॥ गोविंदराव बारवकर याजकडील कृष्णाजी सोनदेव, व सेखोजी मुळे पागासुद्धां दीडशें स्वार व गाडदी व उंट वीस याप्रों। येथून तुह्मांकडे पाठविले आहेत. हे अथणीस येतील. तुह्मीं तेथें येऊन, उंटावर ऐवज घालून बंदोबस्तानें सांभाळून यावे. कृष्णाजीपंत व सेखोजी मुळे यांस बंदोबस्ताविसीं निक्षून सांगितलें आहे. तुह्मी सांगाल त्याप्रों। चालतील. र॥ छ २७ रजब बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.