पत्रांक ४३
श्री. शके १७०४ पौष वा। ३
राजश्री नीलकंठराव गोसावी यांसि अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रो तुकोजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जावें विशेष तुम्हीं पत्र पाठविलें तें पाऊन लेखनार्थ अवगत जाला मौजे पाटेठाण ता। सांडस हा गांव तुम्हांकडील याजवर जकातवैरणीचा वगैरे रोखा जाला आहे त्यास मनाचिटी गांवास पाठवावी म्हणोन लि।। ऐशियास तुमच्या लिहिल्यावरून मौजे मजकुरास मनाचिटी देऊन स्वार बोलाऊन घेतले असत गांवास कोणेविशीं उपसर्ग लागू पावणार नाहीं रा। छ १७ सफर सु।। सलास समानीन मया व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंति