पत्रांक ३९
पेशा छ ९ जिल्काद श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पोष्य सर्वोत्तम शंकर साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। चैत्र वद्य नवमी पर्यंत मु।। हावनूर तुंगभद्रा दक्षणतीर येथें सुखरूप आहों विशेष आपणाकडून बहुत दिवस पत्र येऊन वृत्त कळत नाहीं व येथून एकदोन पत्रें पाठविलीं त्यांचें हि उत्तर न आलें तरी ऐसें पूर्ण कृपेचे ठाई नसावें यास्तव सदेदित पत्रे प्रेषण करून परामर्ष करावा यानंतर इकडील वर्तमान तरी मनोळीहून निघोन धारवाड उजवें घालून सावनुरास आलों तेथें पठाण सावनूरकर येऊन भेटला व हैदरनाईक मायनहळी येथें झाडीचे तोंडी व मीरफैजल्ला बंकापुराजवळून साहा कोशावर होता पुढें नये यामुळे हरपनळी व चित्रदुर्ग यांची खंडळी उरकावी या अर्थे तेथून कूच करून मु।। मजकुरीं आले तों हैदरनाईक तेथून निघोन सावनूरास जाऊन शह द्यावा या अर्थे आले बलारी फिरोन माघारे वाला नदीवर मुक्काम केला एथून सडी स्वारी करून गांठ घालणार व हिंदुस्थानाकडील यथास्थित वृत्त कळत नाहीं कृपा करून करून लिहिलें पाहिजे बहुत काय लिहिणें कृपालोभ असो दिल्हा पाहिजे हे विनंति