पत्रांक ४०
पो छ २२ माहे जोवल श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबकराव सदाशिव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ ५ जमादिलोवल मु।। धारवाड येथें सुस्वरूप असों विशेष इकडील वर्तमान तर धारवाडास मोर्चे लाविले आहेत गांव बोलूं हि लागला आहे लवकर च आठा-चौ दिवशीं येईल हैदरनाईक जडेहनवटीवर आहे कांही फौज मीरफैजुल्ला बराबर मुर्डगोडावर आला आहे त्याजवर श्रीमंतांनी हि गोपाळराव व रास्ते वगैरे आणिखीं दोनचार पथकें पाठविलीं आहेत कुरणाचा मजकूर तर मागे च एकादोन पत्रीं लिहिला आहे त्याजवरून कळेल दादासाहेबानी यावें हें रावसाहेबांचे मनांत फार आहे लवकर यावें हें उत्तम आहे तिकडील वर्तमान मोंगलाकडील व सिंद्याकडील भोसले गाइकवाड यांकडील व फौज किती जमा होईल किती दिवसा येणें होईल होळकाराकडील अधिकोत्तर सर्व लिहून पाठवावें वरकड भेटीनंतर कळेल एकदोन पत्रें बारीक मजकुराचीं आपले पत्राचीं उत्तरे पाठविली आहेत तीं पावलीं च असतील त्यावरून सर्व कळेल भेट होईल तो अपूर्व दिवस आहे लोभ असा दीजे हे विनंति
अपत्यें अप्पाचे साष्टांग नमस्कार विनंति वडिलीं कृपा करून तीर्थरूप यांचे पत्राबरोबर पत्रें पाठविलीं पावोन परम समाधान जालें ऐसें च सदैव पत्रे पाठऊन संतोषवीत जावें हे विज्ञापना