पत्रांक ४६
श्री.
राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पो बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति श्रीमंत रावसाहेबांचे पत्र आलें कीं पुरंधरास दागिने होते त्या पैकीं पुण्यास आले हे वजा करून बाकीचे सोने रुप्याचे दागिन्यांची याद तीर्थरूपास समजावणे त्यास आपल्या जवळ याद आहे च व बाकी दागिन्यांचा मजकूर कसकसा जाहाला लिहून पाठवावें व याद समजावावयाची असली तर श्रीमंतास समजवावी आणि कोठें म्हणता तें लिहून पाठवावें कनडफुलमरीपैटणबीडचे गांव वराडचे गांव व सुतांडा मिळोन साडेतीन लक्ष रुपये चिंतोपंताचे मारफतीनें बोलतात चेहलदू निराळा काढावा म्हणोन आम्ही म्हणतों मागाहून लिहून पाठऊं चिंतोपंतानीं आम्ही आल्यापूर्वी खानदेशचे तेरीज धरून फडशा करीत होते ते आम्ही आल्यावर फिरऊन जाजती साठ सत्तर हजार साधून विल्हेस लावले तुम्हांस कळावें याजकरितां लिहिलें असे बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति
राजश्री नारो बाबाजीनीं सांगितले त्याजवरून कळलें असो जें होईल तें पाहावें हे विनंति