Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३५
श्री १६१६ श्रावण शुध्द ९
दर बंदगी माहाराज राजश्री
साहेबाचे बंदगीस
जाब सूद
-॥ अर्दास अज बंदगी बादे कमीन कमतरीन बादेगान सेरीक निळोजी पटेल व एसजी पटेल व जानोजी पटेल मोकदम मौजे किव ळ ता। मसूर सु॥ खमस तिसैन अलफ
अर्ज मेरसानद बा। ता। छ ७ माहे जिल्हेज साहेबाचे नेक नजर करून सेरीकराची बखेर सलायत असे
बा। साहेब सलामती माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख ता। मजकूर याची देसमुखी साहेबी पूर्व प्रकारे कागद पत्र फर्मान माहाजर मनास आणून याची देसमुखी याचे दुमाला केली ऐसियासि यादवास साहेबी उंबरज तरफ व तारगाव तरफ ह्मणऊन कासगद करून दिल्हा तर उंबरज तरफ व तारगाव तरफ कदीम नव्हेत कदीम मसूर तरफ आहे ऐलेकडे साहेबाचे राज्यामधे धामधुमेच्या प्रसंगाकरिता जेथे ठाणे बैसल ह्मणौन त्या गावाची तरफ जाहाली मसूर उबरज तारगाव हे काही निराळे माहाल नव्हत एक मसूर तरफ जगदळियाची देसमुखी आहे यादवानी कथळा करावयास गरज नाही बदगीस रोशन होय हे अर्दास
(निशाणी नांगराची)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४
श्री १६१६ श्रावण शुध्द ९
दर बंदगी माहाराज राजश्री
साहेबाचे बंदगीस
जाब सूद
-॥ अर्दास अज बंदगी बादे कमीन कमतरीन बादेगान सेरीक निळोजी पटेल व एसजी पटेल व जानोजी पटेल मोकदम मौजे किव ळ ता। मसूर सु॥ खमस तिसैन अलफ
अर्ज मीरसानद बा। ता। छ ७ माहे जिल्हेज साहेबाचे नेक नजर करून सेरीकराची बखेर सलायत असे
बा। साहेब सलामती माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख ता। मजकूर याची देसमुखी साहेबी पूर्व प्रकारे कागद पत्र फर्मान माहाजर मनास आणून याची देसमुखी याचे दुमाला केली ऐसियासि यादवास साहेबी उंबरज तरफ व तारगाव तरफ ह्मणऊन कासगद करून दिल्हा तर उंबरज तरफ व तारगाव तरफ कदीम नव्हेत कदीम मसूर तरफ आहे ऐलेकडे साहेबाचे राज्यामधे धामधुमेच्या प्रसंगाकरिता जेथे ठाणे बैसल ह्मणौन त्या गावाची तरफ जाहाली मसूर उबरज तारगाव हे काही निराळे माहाल नव्हत एक मसूर तरफ जगदळियाची देसमुखी आहे यादवानी कथळा करावयास गरज नाही बदगीस रोशन होय हे अर्दास*
(निशाणी नांगर)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३
श्री १६१६ श्रावण शुध्द ९
माहाजर बतेरीख छ ७ जिल्हेज सुर्कवार शके १६१६ वर्श भावानामसवछरे श्रावण सुद नवमी ते दिनी थळ मौजे किवळ ता। मसूर हाजीरमजालसी
बेहुजूर गा।
निळोजी बिन भोजजी पटेल एसजी बिन बाळोजी पटेल साळोके
साळोके (निशाणी नांगराची) बाबाजी नारायण कुलकर्णी
रामोजी बिन अनाजी पटेल सिवाजी सखदेव कुलकर्णी
खडोजी बिन अबाजी चौगला जोतिषी मो। मा।र व मौजे केलवडे
मौजेमजकूर पा। मरडी मौजे देगाव ता। सा-
बहिरोजी सरकला रया मौजेमजकूर तारा (सदर दोनी गाव बाणजी
तुळाजी बिन बहिरोजी सुतार नारा समध नाही)
(निशाणी तासणी) धनसेटी रया मोजे माार
माहार (निशाणी तागडी)
१ होना बिन तुकनाक निंबा बिन तुकोजी परीट
१ सता बिन सया (निशाण बगणी)
--
२ रुपा बिन वाघा चांभार
(निशाण विळा दोर) (निशाणी रापी)
माणका बिन रवळा धरणा खत्रोजी बिन एमाजी मिरग
(निशाण धुपारीती) कोंडजी बिन हरजी माडिवा
मानाजी बिन चांगोजी काथवठे
खातेवाडी मौजे मजकूर
बिाा विसाजी नरहरी कुळकर्णी निाा रुद्राजी चंदो
या विदमानें लेहून दिल्हा माहाजर ऐसा जे माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख ता। मजकूर याची देसमुखी अवलादी बुनादी होती ऐसे आपणास ठावके आहे व आपले वडिलानी सागितले आहे आता काही एक दिवस अमानत पडोन भोगवटा उठला होता त्यास राजश्री छत्रपतीसाहेबानी कागदपत्र फर्मान व माहाजर मनास आणला याची देसमुखी याचे दुमाला केली ऐसियासी यादवानी आपली देसमुखी ह्मणौन कथळा करितात तर यादवानी जगदळियासी कथळा करावया गरज नाही आपले वडिलानी हि कुल बुनादी सागितली होती जे जगदळियाची देसमुखी खरी आहे व आह्मास हि ठावके आहे की पिडी दर पिडी जगदळियाची देसमुखी आहे यादवानी अगर कोणी कथळा करावया गरज नाही हा माहाजर सही वळी सुमार १८ अठरा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२
श्री १६१६ आषाढ वद्य १२
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्रपडित अमात्य ता। मोकदमानी मौजे मुदरुल ता। मसूर सु॥ खमस तिसैन अलफ राजश्री माहादजी जगदळे देसमुख याचा देसमुखीचा मामला मौजेमजकुरीचा द्यावया तुह्मी इस्कील करिता बिलाकुसूर मिळो देत नाही ह्मणौन विदित जाले तरी लबाडी कराल ह्मणजे तुमचा मुलाहिजा होणार नाही आपले केले पावाल हे नेमस्त समजोन त्याचा देसमुखीचा मामला बिलाकुसूर चालवणे छ २५ जिलकाद निदेश समक्ष
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३१
श्री १६१६ आषाढ शुध्द २
सकल-गुणालंकरण-अखंडित
लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य राजश्री
सुंदरपंत गोसावी यासी
सेवक रामचंद्र नीलकंठ नमस्कार येथील कुषल जाणऊन स्वकीय लिहिणे विशेष रा। माहादजी जगदळे देसाई मा। मसूर याचे वतन राजपत्राप्रा। याचे दुमाळा केले असता तुह्मीं यासी कटकट करिता ह्मणून कळो आले तरी तुह्मास याच्या वतनासी कटकट करावया प्रयोजन नाही तुह्माकडील कमावीसदार आहेत त्यासही ताकीद करून सागणे ये गोष्टीस अंतर पडो न देणे छ १ जिल्काद* बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३०
श्री १६१६ आषाढ शुध्द २
आज्ञापत्र समस्त-राजकार्य-धुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्र पडित अमात्य ता। कमावीसदार दि॥ सुदर तुकदेव सु॥ खमस तिसैन अलफ माहादजी जगदळे देसाई ता। मसूर याचे वतन राजपत्राप्रमाणे याचे दुमाला हुजरून केले असता तुह्मी याकडील खेड्यास अजार देता याच्या वतनाचा मामला चालू देत नाही ह्मणून कळो आले तरी या लबाडीहून तुह्मास गरज नाही फिरोन बोभाट आला ह्मणजे आपले केले पावाल हे नेमस्त समजणे छ १ जिलकाद निदेश समक्ष
सुरू सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९
श्री १६१६ चैत्र शुध्द ९
स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके २० भावसवत्सरे चैत्र शुध नवमी रविवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजारामछत्रपति याणी माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर परगणे कर्हाड यासि आज्ञा केली ऐसी जे विनतिपत्र पाठविले ते पावले स्वामीच्या पत्राप्रमाणे राजश्री रामचद्र पडित अमात्य याणी आपली पत्रे करून दिल्ही आहेती परतु राजश्री सुदर तुकदेऊ देशमुखीचा मामला सुरळित चालो देत नाहीत तरी एविशी त्यास ताकीद पाठविली पाहिजे ह्मणौन लिहिले ते विदित जाले त्यावरून राजश्री रामचद्रपतास व सुदर तुकदेऊ यास पत्रे पाठविली आहेती ती देणे ह्मणजे ते बिलाकुसूर देशमुखीचा मामला चालवितील इस्कील करणार नाही व स्वामीने फर्मानप्रमाणे वीस गाऊ चालवयाची आज्ञा केली ते हि चालत नाही ह्मणोन लिहिले तरी एविशी हि उभयतास लिहिले आहे ते गोतमुखे मनास आणून चालवितील तुह्मी गोताचे मुखे निवडून घेऊन देशमुखीचा मामला अनुभवून सुखरूप असणे व माहामारीचा उपद्रव बहुत जाला आहे ह्मणून लिहिले ते कळो आले पुढे हि वरचेवरी त्या प्रातीचे वर्तमान लिहीत जाणे जाणिजे निदेश समक्ष
संमत संमत
मंत्री सचिव
सुरू सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८
श्री १६१६ चैत्र शुध्द ३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके २० भावसंवत्सरे चैत्र शुध्द तृतीया रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपति याणी समस्तराजकायधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्रपडित अमात्य हुकमतपन्हा यासि आज्ञा केली ऐसी जे माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर परगणे कर्हाड याचे देशमुखीचे वतनाचा पूर्वी कथळा जाला होता त्यास स्वामीने याचे कागदपत्र फर्मान पूर्वीले होते ते मनास आणून माहादजी जगदळे देशमुख स्वामीचे पायासी एकनिष्ट व स्वामिकार्याचा ह्मणून याजवरी कृपाळू होऊनु मसूरतरफेची देशमुखी याची यास मोकरर करून दिल्ही ते विशी पूर्वी तुह्मास पत्रे व सुभियास सनद व रा। सुदर तुकदेऊ दि॥ चिरजीव राजा कर्ण यास आज्ञापत्रे सादर केली ऐशास स्वामीचे पत्राप्रमाणे तुह्मी पत्रे करून दिल्ही तेणेप्रमाणे व सुभाचे कागदप्रमाणे देशमुखमजकुराचे वतनाचा मामला चालत आहे रा। सुदर तुकदेऊ याणी वतनास इस्कील करून कथळा केला असे ह्मणौन विदित जाले व ता। मसूर माहालचे गाव ५७ सत्तावन फर्मानी लिहिले आहेती त्यापैकी गाव ३७ सततीस त्या माहालाखाले चालताती बाकी २० वीस गाव यादव हे आपले ता। उबरज व ता। तारगाव व ता। आउद याच्या कथळ्यामुळे चालत नाहीं ह्मणून विदित जाले तरी माहादजी जगदळे देसमुख ता। मसूर याचे देसमुखीचे वतन स्वामीने करार करोन दिल्हे असता रा। सुदर तुकदेऊ यास कथळा करावया गरज काय हाली स्वामीने त्यास ताकीद लेहून आज्ञापत्र पाठविले असे तरी तुह्मी हि बरे दटाऊन ठासोन माहादजी जगदळे याची देसमुखी ता। मसूर वतन बिलाकुसूर चाले ते करणे हक्कलाजिमा पूर्वी देसमुखीस चालत आला असेल तो स्वामीने सनदा सादर केल्या तेणेप्रमाणे चालवणे व सत्तावन गाव पैकी सततीस गाव मसुरे खाले चालताती वीस गाव चालत नाही त्यास हमशाही गोत देसमुख व मेकदम व मोख्तसर कुणबी चौगुले असतील ते एके जागा गोताईस मेळऊनु त्यास करीना पुसऊनु त्याचे साक्षीने वीस गाव यादव मसुरेखालील नव्हेत ह्मणताती ते मसुरेखाली न जाले तरी मसुरेखाले देऊनु माहादजी जगदळे याचे देसमुखीचे वतन चालवणे गोतमुखे ते वीस गाव मसुरेखालील नव्हेत ऐसे जाले तरी माहादजीस सततीस कराने देणे ज्या माहालचे गाव पूर्वीपासूनु चालिले असतील त्या माहालाखाले चालवणे यादवास व माहादजी जगदळे यास कथळा होऊ न देणे स्वामीचे आज्ञेप्रमाणे ज्याचे वतन त्यास चालवीत जाणे जाणिजे बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा
बार माा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७
श्री १६१५ आश्विन वद्य ९
(शिक्का फारसी)
कौलनामा माहादजी जगदळे देसमुख पा। मसूर सरकार राबयग बा। सुभे दारुलजफर विजयापूर सन ११०५ कारणे दादे कौलनामा ऐसा जे तुझे देसमुखीवरी यादव उभे राहिले ते दूर करून तुझी देसमुखी पहिलेपासून चालत आली आहे तेणेप्रमाणे तुझे दुमाला केली आहे देह ५७ सत्तावन गावीची देसमुखीचा कारभार करून रुजू राहाणे याउपरि तुझ्या वतनास कोणी खलेल करणार नाही कौल असे
गनीमासी सनद न पोहचावणे पोहोचवाल तर गुनेगार व्हाल मा। सु॥ तेरीख २२ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६
श्री १६१५ आश्विन शुध्द ११
स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके २० श्रीमुखनामसवत्सरे आश्विनशुध एकादशी भृगुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजारामछत्रपति याणी समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्रपडित अमात्य हुकमतपन्हा यासि आज्ञा केली ऐसी जे माहादजी जगदळे देशमुख तपे मसूर प्रा। कर्हाड याणे स्वामीचे सेवेसी विनति केली कीं, ता। मजकूरची देशमुखी आपले पुरातन वतन ते स्वामीने आपले आपणास मोकरर करून दिल्हे पत्रे दिल्हीं त्यास रा। सुदर तुकदेऊ याणी कथळा केला होता ते हि वर्तमान स्वामीचे सेवेसी विदित केलियावरी स्वामी कृपाळू होऊन ताकीदपत्रे हि देविली आपण आपले वतन अनभऊन असेन ऐशास मसूरतपाचे गाव पुरातन ५७ सत्तावन त्यास आदलशाचे कारकीर्दीस वीस गाव फूट गाव करून मोकासे दिधले होते मधे वतनाचे बाबे आदलशाहाचा फमान जाला तो वीस गाव देखील जाला नाही सततीस ३७ गावाचा च फर्मान जाला परतु आपणास सत्तावन गावीचा वतनाचा भोगवटा आहे पहिले इभराईम आदलशाचा फर्मान सत्तावन गावाचा आहे परतु स्वामीचे सेवेसी एउनु वर्तमान विदित केले तेव्हा पहिला फर्मान हाजीर नव्हता अलीकडलचा फर्मान होता त्याप्रो। आज्ञापत्र घेतलें पूर्वापार सत्तावन गाव आपले वतनाचे आहेती कैलासवासी स्वामीस देश हस्तगत जाला तेव्हा सदर्हू वीस गाव उबरजेखालें व तारगावखालें वोढिले त्या गावास यादवास स्वामीने उबरज-तारगाव-आउद या माहालाची देशमुखी दिल्ही आहे ह्मणून ते दखलगिरी करिताती तरी आपले तपियाखाली वीस गाव मोकाशास निराळे करून दिधले होते ते आपले आपणाकडे देविले पाहिजेती म्हणौन बहुता प्रकारे विनति केली ते ऐकोन तुम्हास हे आज्ञापत्र सादर केले असे वृत्तिवतनाचा मामला बरहक्क करून जिकडील तिकडे देउनु सुरक्षित चालवावे ऐसे आहे याकारणे माहादजी जगदळे व यादव यास गोतात पाठऊनु हमशाही गोत मेळउनु पूर्वापार वृत्त मनास आणून वीस गाव मसूरतपियाचे ऐसे खरे होईल तरी मसूरतपियाखाले देवउनु तेथील देशमुखीचे वतन माहादजी जगदळे यास चालवणे जरी मसूर तपाचे गाव नव्हेत ऐसे असेल तरी ज्या माहालाखाले चालताती तैसे चालो देणे वृत्तीचा मामला आहे मनसुफी बरहक्क करवणे आणि जिकडील गाव तिकडे देणे लाइनी नसता कथळा करील त्यास ताकीद करून कथळा नव्हे ते करणे जो काय निवाडा होईल तेणेप्रमाणे माहजर करउनु वर्तमान हुजूर लिहिणे तेणेप्रमाणे स्वामीची पत्रे सादर होतील जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
बार