लेखांक २७
श्री १६१५ आश्विन वद्य ९
(शिक्का फारसी)
कौलनामा माहादजी जगदळे देसमुख पा। मसूर सरकार राबयग बा। सुभे दारुलजफर विजयापूर सन ११०५ कारणे दादे कौलनामा ऐसा जे तुझे देसमुखीवरी यादव उभे राहिले ते दूर करून तुझी देसमुखी पहिलेपासून चालत आली आहे तेणेप्रमाणे तुझे दुमाला केली आहे देह ५७ सत्तावन गावीची देसमुखीचा कारभार करून रुजू राहाणे याउपरि तुझ्या वतनास कोणी खलेल करणार नाही कौल असे
गनीमासी सनद न पोहचावणे पोहोचवाल तर गुनेगार व्हाल मा। सु॥ तेरीख २२ माहे सफर