लेखांक ३०
श्री १६१६ आषाढ शुध्द २
आज्ञापत्र समस्त-राजकार्य-धुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्र पडित अमात्य ता। कमावीसदार दि॥ सुदर तुकदेव सु॥ खमस तिसैन अलफ माहादजी जगदळे देसाई ता। मसूर याचे वतन राजपत्राप्रमाणे याचे दुमाला हुजरून केले असता तुह्मी याकडील खेड्यास अजार देता याच्या वतनाचा मामला चालू देत नाही ह्मणून कळो आले तरी या लबाडीहून तुह्मास गरज नाही फिरोन बोभाट आला ह्मणजे आपले केले पावाल हे नेमस्त समजणे छ १ जिलकाद निदेश समक्ष
सुरू सूद