लेखांक २८
श्री १६१६ चैत्र शुध्द ३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके २० भावसंवत्सरे चैत्र शुध्द तृतीया रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपति याणी समस्तराजकायधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्रपडित अमात्य हुकमतपन्हा यासि आज्ञा केली ऐसी जे माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर परगणे कर्हाड याचे देशमुखीचे वतनाचा पूर्वी कथळा जाला होता त्यास स्वामीने याचे कागदपत्र फर्मान पूर्वीले होते ते मनास आणून माहादजी जगदळे देशमुख स्वामीचे पायासी एकनिष्ट व स्वामिकार्याचा ह्मणून याजवरी कृपाळू होऊनु मसूरतरफेची देशमुखी याची यास मोकरर करून दिल्ही ते विशी पूर्वी तुह्मास पत्रे व सुभियास सनद व रा। सुदर तुकदेऊ दि॥ चिरजीव राजा कर्ण यास आज्ञापत्रे सादर केली ऐशास स्वामीचे पत्राप्रमाणे तुह्मी पत्रे करून दिल्ही तेणेप्रमाणे व सुभाचे कागदप्रमाणे देशमुखमजकुराचे वतनाचा मामला चालत आहे रा। सुदर तुकदेऊ याणी वतनास इस्कील करून कथळा केला असे ह्मणौन विदित जाले व ता। मसूर माहालचे गाव ५७ सत्तावन फर्मानी लिहिले आहेती त्यापैकी गाव ३७ सततीस त्या माहालाखाले चालताती बाकी २० वीस गाव यादव हे आपले ता। उबरज व ता। तारगाव व ता। आउद याच्या कथळ्यामुळे चालत नाहीं ह्मणून विदित जाले तरी माहादजी जगदळे देसमुख ता। मसूर याचे देसमुखीचे वतन स्वामीने करार करोन दिल्हे असता रा। सुदर तुकदेऊ यास कथळा करावया गरज काय हाली स्वामीने त्यास ताकीद लेहून आज्ञापत्र पाठविले असे तरी तुह्मी हि बरे दटाऊन ठासोन माहादजी जगदळे याची देसमुखी ता। मसूर वतन बिलाकुसूर चाले ते करणे हक्कलाजिमा पूर्वी देसमुखीस चालत आला असेल तो स्वामीने सनदा सादर केल्या तेणेप्रमाणे चालवणे व सत्तावन गाव पैकी सततीस गाव मसुरे खाले चालताती वीस गाव चालत नाही त्यास हमशाही गोत देसमुख व मेकदम व मोख्तसर कुणबी चौगुले असतील ते एके जागा गोताईस मेळऊनु त्यास करीना पुसऊनु त्याचे साक्षीने वीस गाव यादव मसुरेखालील नव्हेत ह्मणताती ते मसुरेखाली न जाले तरी मसुरेखाले देऊनु माहादजी जगदळे याचे देसमुखीचे वतन चालवणे गोतमुखे ते वीस गाव मसुरेखालील नव्हेत ऐसे जाले तरी माहादजीस सततीस कराने देणे ज्या माहालचे गाव पूर्वीपासूनु चालिले असतील त्या माहालाखाले चालवणे यादवास व माहादजी जगदळे यास कथळा होऊ न देणे स्वामीचे आज्ञेप्रमाणे ज्याचे वतन त्यास चालवीत जाणे जाणिजे बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा
बार माा