लेखांक २९
श्री १६१६ चैत्र शुध्द ९
स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके २० भावसवत्सरे चैत्र शुध नवमी रविवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजारामछत्रपति याणी माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर परगणे कर्हाड यासि आज्ञा केली ऐसी जे विनतिपत्र पाठविले ते पावले स्वामीच्या पत्राप्रमाणे राजश्री रामचद्र पडित अमात्य याणी आपली पत्रे करून दिल्ही आहेती परतु राजश्री सुदर तुकदेऊ देशमुखीचा मामला सुरळित चालो देत नाहीत तरी एविशी त्यास ताकीद पाठविली पाहिजे ह्मणौन लिहिले ते विदित जाले त्यावरून राजश्री रामचद्रपतास व सुदर तुकदेऊ यास पत्रे पाठविली आहेती ती देणे ह्मणजे ते बिलाकुसूर देशमुखीचा मामला चालवितील इस्कील करणार नाही व स्वामीने फर्मानप्रमाणे वीस गाऊ चालवयाची आज्ञा केली ते हि चालत नाही ह्मणोन लिहिले तरी एविशी हि उभयतास लिहिले आहे ते गोतमुखे मनास आणून चालवितील तुह्मी गोताचे मुखे निवडून घेऊन देशमुखीचा मामला अनुभवून सुखरूप असणे व माहामारीचा उपद्रव बहुत जाला आहे ह्मणून लिहिले ते कळो आले पुढे हि वरचेवरी त्या प्रातीचे वर्तमान लिहीत जाणे जाणिजे निदेश समक्ष
संमत संमत
मंत्री सचिव
सुरू सूद