लेखांक ३१
श्री १६१६ आषाढ शुध्द २
सकल-गुणालंकरण-अखंडित
लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य राजश्री
सुंदरपंत गोसावी यासी
सेवक रामचंद्र नीलकंठ नमस्कार येथील कुषल जाणऊन स्वकीय लिहिणे विशेष रा। माहादजी जगदळे देसाई मा। मसूर याचे वतन राजपत्राप्रा। याचे दुमाळा केले असता तुह्मीं यासी कटकट करिता ह्मणून कळो आले तरी तुह्मास याच्या वतनासी कटकट करावया प्रयोजन नाही तुह्माकडील कमावीसदार आहेत त्यासही ताकीद करून सागणे ये गोष्टीस अंतर पडो न देणे छ १ जिल्काद* बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा