लेखांक ३२
श्री १६१६ आषाढ वद्य १२
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचद्रपडित अमात्य ता। मोकदमानी मौजे मुदरुल ता। मसूर सु॥ खमस तिसैन अलफ राजश्री माहादजी जगदळे देसमुख याचा देसमुखीचा मामला मौजेमजकुरीचा द्यावया तुह्मी इस्कील करिता बिलाकुसूर मिळो देत नाही ह्मणौन विदित जाले तरी लबाडी कराल ह्मणजे तुमचा मुलाहिजा होणार नाही आपले केले पावाल हे नेमस्त समजोन त्याचा देसमुखीचा मामला बिलाकुसूर चालवणे छ २५ जिलकाद निदेश समक्ष