लेखांक ३४
श्री १६१६ श्रावण शुध्द ९
दर बंदगी माहाराज राजश्री
साहेबाचे बंदगीस
जाब सूद
-॥ अर्दास अज बंदगी बादे कमीन कमतरीन बादेगान सेरीक निळोजी पटेल व एसजी पटेल व जानोजी पटेल मोकदम मौजे किव ळ ता। मसूर सु॥ खमस तिसैन अलफ
अर्ज मीरसानद बा। ता। छ ७ माहे जिल्हेज साहेबाचे नेक नजर करून सेरीकराची बखेर सलायत असे
बा। साहेब सलामती माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख ता। मजकूर याची देसमुखी साहेबी पूर्व प्रकारे कागद पत्र फर्मान माहाजर मनास आणून याची देसमुखी याचे दुमाला केली ऐसियासि यादवास साहेबी उंबरज तरफ व तारगाव तरफ ह्मणऊन कासगद करून दिल्हा तर उंबरज तरफ व तारगाव तरफ कदीम नव्हेत कदीम मसूर तरफ आहे ऐलेकडे साहेबाचे राज्यामधे धामधुमेच्या प्रसंगाकरिता जेथे ठाणे बैसल ह्मणौन त्या गावाची तरफ जाहाली मसूर उबरज तारगाव हे काही निराळे माहाल नव्हत एक मसूर तरफ जगदळियाची देसमुखी आहे यादवानी कथळा करावयास गरज नाही बदगीस रोशन होय हे अर्दास*
(निशाणी नांगर)