Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
भाद्रपदी यात्रेस श्रीदेव पुणियावरून मोरगांवास गेले नाहींत. मळीकडवणे याजवरून गेले आले असेत. १
भाद्रपद शुद्ध ४ रविवारी राजश्री कृष्णाजी दाभाडे तळेगांव तारले असेत. १
भाद्रपद शुद्ध १२ सोमवारीं राजश्री चिमाजीअप्पा वसईप्रांत फत्ते करून चिंचवडावरून पुणियास आले. राजश्री राऊ औंधापावेतों सामोरे गेले होते.
संभाजी पाटील शिरवळे यासी मोहपजी पा। शिरवळे वडीलधाकुटपणाचें भांडण भांडतो. त्यांणी राजश्री छत्रपतीचे व पेशव्याचे कागद बापूजीपंतास आणून गोत आठ गांऊ व कांहीं शिरवळदेवाचें गांउ नेमून घेतले. संभाजी वडील होता. परंतु मोहपजीनें हीमायतीनें आपले सोईचें गोत नेमून घेतलें असे. संभाजीचें घर वडील. दुसरा तिसरा मोहपजी, असें असतां, मोहपजी, कांहीं खर्चवेंच आपणांस पडिला असे, कसाला असाला पडिला, याजकरितां संभाजीच्या वडिलीं आपणास वडीलपण दिल्हें आहे, असें भांडतो. १
सुभानजी कदसुळा लोणकर यासी कुंबरपाटी सा रुके, पैकीं ती रुका सुभानजी, ती रुका कृष्णाजी कदमुळा ऐसे वाटतात. त्यास कृष्णाजी ह्मणतो सजणीही आपली ह्मणून सुभानजीशीं भांडतो. तकरीरा, राजीनामे, जामिन कतबे दिवाण घेतले. पांढर आणिली. मग गांवकरियांनी निकाल काहाडिला कीं, आह्मीं यास घेऊन गांवांस जातों, पांढरींत शोध करून विल्हेस जाऊन येऊन सांगों. ऐसें ह्मणून निरोप घेऊन गांवांस गेले. कृष्णाजी कदसुळास तान्हाजीपंत हवलदार याची हिमायत फारशी असे. १
राजश्री चिमाजी अप्पा. वसईहून भाद्रपद शुद्ध १२ सोमवारीं पुणियास आले. त्यास भेटीस सामोरे आउंधापाशीं देशमूख देशपांडिये गेले. समाईक वस्त्र उभयतां देशमूख व देशपांडे मिळोन नेले. गु॥ रामाजी मा। परांडकर पागोटें किंमत रुपये ६, सन ११४९.
भाद्रपद वद्य सप्तमीचा पक्ष पेशवियाचेथील जाला. सकट अर्धा रुपया आगांतुकास दक्षणा दिल्ही असे.
अष्टमीस राणोजी शिंदे व रामचंद्रबाबा आले. द्वादशीस राणबी आवंधास पित्रें घालावयास गेले होते. त्यांची रोख चिमाई, तेथें त्रयोदशीस कोनी निघाली. लेक जाली असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
तह केला. कजिया शिंव भोंसरी व दिघी, गु॥ जगोबा व नाना व बाजीकाटे व नारो रघुनाथ वैद्य नि॥ देशपांडे भोंसरीकर, सुमानजी प्रा। गव्हाणें व शितोजी मडगा चौ। दिघीकर, माणकोजी पा। वळके व महादाजी पा। वळके. सन १ १ ४९ छ २७ जमादिलावल, भोंसरीकर टुकडे दहावीस वरसे वाहून खात होते. त्यास सालगुदस्तां भोंसरीकर अवघे पाटिलकीच्या कजियाकरितां पुणियांत महिना दीडमहिना बसविले होते. खंडोजी पा। गैरहजीर जाला, त्यामुळें दरबारास भोंसरीकरास यावयास दहशत वाटों लागली. त्या संधींत ते टुकडे भोंसरीकराचे वहिताचे दिघीकरांनीं पेशवियाच्या शेरकरांकडून बळेंच पेरविले. ते मागती सालमजकूरीं भोंसरीकरांनीं पाडिले. ते पडलेच आहे. दुसरें, दिघीकरांनी सुतारास ते लाविले. त्यापैकी भोंसरकर घोही देत होते. ते जमीन सुतारानें नांगराच्या शेजानें नांगरली. ते भोंसरीकरानीं घोही देऊन पेरूं दिल्ही नाहीं. सुतारानें टाकिलेली जमीन मग दिघीकरांनी अवशेपांहटे बोभाट न होतां पेरलें. भोंसरीकरांनी नेम केला होता कीं, चौघे मिळून मनास आणूं. शेवटीं दिघीकरांनी चौघे मिळवयास चुकाविलें आणि सुतारानें भोंसरीकर घोही देत होते ते टाकिली. दिघीकरांनी पेरली, बळेंच. यामुळे त्या सुमारें भोंसरीकरांनी नांगर धरिले, ह्मणून दिघीकर येथें आले. भोंसरीकरासही बोलावून आणिलें. आतांच मनास आणावें तरी, धर्माजी पा। वळके गांवीं नाहींत. याजकरितां भोंसरीकरांनीं नांगरिलें आहे तें राण तैसेंच असों द्यावें, पेरूं नये. दिघी शिव भोंसरी दिघी करार केला, कराजी सुतारानें टाकिलें होते, तें पेरिलें आहे, तें अमानत असों द्यावें. इतक्यांत धर्मोजी पाटील येऊन विल्हें लागले तरी, ज्याजकडे तें वावर होईल त्याजकडे माल द्यावा. जरी होय न होय न जाली तरी देशमूख देशपांडियाचे माणूस नेऊन दिघीकरांनी तेथील जोंधळा काढून त्याच वावरांत निराळा रचून ठेवावा. पुढें विल्हें लागलें तरी बरें. नाहीं तरी तें बुचाड मळून तिर्हाइत गांवीं ठेवावें. ते जमीन अमानत व भोसरीकरांनी नवे नांगरलें असे ते अमानत. दिघीकरांनीहि सालमजकूरींच जमीन पेरली असे. मागें पेरली नाहीं. वाहिली नाहीं तेहि अमानत देखील माल ऐसे केले असे. यास साक्ष मल्हार विश्वनाथ कुलकर्णी नि॥ मुजेरी का। पुणे व भगवंत शेट मोझ्या शेट का। लोहगाऊं ठेविले असेत. उभयतांच्या गुजारतीनें करार केला असे. दोही गांवींच्या पाटलांनी व जमीदारांनी ( पुढें कोरें ).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
रोज़ मजकुरीं देशमुखें कराडियांच्या गोसावियाकडे गेली असेत. १
श्रावण शुद्ध ६ रविवार नागपंचमीस राजश्री राऊ घटिका रात्री पुणियास आले असेत. १
षष्ठी सप्तमी दोन रोज ब्राह्मणभोजन घातलें, अष्टमीस देकार दिल्हा. अर्धा, रुपया, दोन रु॥, याजवरतें अगत्यास, याप्रमाणे दिल्हा असे. १
श्रावण शुद्ध षष्ठी सोमवारीं घटिका रात्रीस राघो गोविंद याची बायको, मांजरीकर कुलकर्णी यांची लेक जानकी, वारली असे. १
श्रावण शुद्ध नवमी गुरुवारी अपूर्व आढळलें ! पाथरवटाचा लेक विसा पंचविसा वरसांचा होता तो वारला, आणि आपल्या मायबापाच्या सपनास आला कीं, मी मागती तुमचे पोटी जन्म घेतों, अमके दिवशीं उपजेन, त्याजवर पांच महिने जालियावरी मजला राजश्री बाजीराऊ प्रधान यांच्या पायावर नेऊन घाला, ह्मणजे मी वाचेन, नाहीं तरी मरेन, त्याजवरून सदरहूप्रमाणें प्रचीद पाथरवटास आली. त्याणें मूल रायाच्या पायांवर आह्मादेखतां आणून घातलें असे ! १
अचलोजी पाटील कुंभारकर मौजे वणपुरी यांसी जैतजी कुंभारकर निमे पाटीलकीसी भांडतो. याकरितां उभयतांस राजश्री बापूजीपंतीं गोत सासवड़, कर्यात, व कर्हेपठार येथील गांऊ नेमून दिल्हे असेत.
पुणेकर कुंभार यांचा कजिया राजश्री केसोपंत मोकाशी याजपाशीं पडिला होता. राजश्री राऊ आलियावरी सुर्या कुंभार हुजूर जाऊन फिर्याद ज़ाला, मजवर जुलूम होतो, सायबी रुबरु मनसुबी करावी. त्याजवरून रायानीं अंताजीपंत फडणीस याजला मनास आणावयास सांगितलें असे.
गोरोजी गुरव चिंचवड़कर बावा याचा पुतण्या चिमा व त्याची बायको ऐसीं राजश्री स्वामीपाशीं मिरजेचे मुक्कामी फिर्यादीस गेलीं कीं, विठू व हर गुरव माळशिरसकर हे आपले गांवीं राहून उत्पन्न खातात. त्यावरून राजश्री स्वामीनीं बाळाजी बाजीराऊ यांजला सांगितले. त्याणीं
विठू गुरवास दाहा रुपये मसाला करून जासूद पाठविले. त्याजबरोबर गोरा गुरवही चिंचवाडास गेला. श्रीनीं रागें रागें गोरियास मारिलें, जामुदास मसाला न देतां जा ह्मटलें. ते जासूद रायापाशीं आले. रायानीं गिरमाजीपंत श्रीचे कारकून जासूदाबरोबर आले होते, त्यांजला सांगोन विठूस आणविले. त्याजला पुसिलें कीं, तू याचें काय खातोस ? त्याने सांगितलें कीं, आपण याचें कांहीं खात नाहीं. देवाची चाकरी करून आहे. त्यावरून दोघांही गुरवाचे कतबे घेतले, विठूपासून दाहा रुपये मसाला घेतला तो विठूनें दिल्हा. विठूस निरोप दिल्हा. गोरोजीस सवादोनशें रु॥ हरक़ी पडली. त्याजला पेशवियांनी पत्र करून दिल्हें कीं, तुझें गांवगतीचें काम तुझें तूं कर, श्रीनीं नवीन देवळें बांधलीं आहेत तेथील पूजा श्रीचे श्री घेतात, त्या देवाच्या शेवेस श्री ब्राह्मण ठेवतील, गुरवच ठेवणें जालें तरी तुह्मांस ठेवतील, माळशिरकरांस ठेवावयास गरज नाहीं. ऐसें पत्र दिल्हें असे,
श्रावण वद्य १३। १४ भाद्रपद शुद्ध १।२ ये संधींत श्रीची यात्रेची जावयाची घालमेली, तेसमयीं सदरहूप्रा। जालें असे. श्रीच्या चित्तास येत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५६
श्री १६११
तालिक
॥ सौजन्य समस्त मोकदमानि व सेटे माहाजन देहाय समतानिहाय
सा। हवेली सा। नीब
सा। मुरे बो। जोरखोर सा। कोरेगाव
व जाबुलखोर
प्रती दत्ताजी केशवजी नाईक देशमूख व देशपांडिये पा। वाई ल्याहाक्या कारणे सु॥ सन हजार १०९९ तिसैन अलफ बा। भडारा व नदादीप मठ श्री सदानद गोसावी मु॥ मौजे नीब बा। सालाबाद रुजूपत्र तीर्थरूप राजश्री नरसोजी नाईक पत्र बहुत जीर्ण जाले नूतन पत्र करून देणे ह्मणोन राजश्री आनदगीर गोसावी येही येऊन रदबदली केली त्यावरून तमाम मोकदम बैसोन पूर्वील सनद मनास आणोन हाली त्या प्रा। सनद करून दिल्ही दर मुकाम लस्कर हजरती जिल सुभानी मो। मौजे तुलापूर प्रा। पुणा गाव कुडो वृत्ती करून दिल्ही ते पिढी दर पिढी चालवणे हिदु अगर मुलमान हरकती करील त्यास आण असे मोईन दर गावास बितपसील
सा। नीब प्रा। वाई गावगना तपसील
गला कैली खडी २॥ तपसील
→ बितपसील पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
येणेंप्रमाणें जाऊन वाटेचा नजर योजना पाहून सदरहू गोतानें विचार केला कीं, दोघांच्या दरमियानें वाट. त्यास, वाकोजी पाटिलानीं पर्वतीच्या शेताच्या पडेवळियानें आपले सत्ते चालावें ; सिदोजी पा। पुण्याच्या शेताच्या पडेवळियानें आपले सत्ते चालावें. दोहीच्या दरमियानें राहील ते वाट. ऐसें करून चालिले. दक्षणेस ओढियापलीकडे तो घालमेल नाहीं. परंतु वाटेचा सुमार यथास्थित होता, तेथून चालिले. खटाका पावेतो तों कांहींच घालमेल नाहीं, पुढेंही थोडीशी दळवळणीच्या वाटा पडिल्या. त्यामुळें आपल्याल्या बोलीप्रों। चालिले. ओढ्याच्या उत्तरेनें घालमेल आली होती. ते उभयतां चालिले त्याप्रमाणें करार केली. दोहीच्या मधें वाट राहिलीशी जाली. हडकीच्या पडेवळियापावेतों चालली. ओढियापाशीं पूर्वपछम दगड टाकिले. मधें एकूणीस हात वाट राहिली. मधें पुणाच्या शेतांत विहिरीची रिकामी खांच असे. तिजवरते चोवीस हातावर दगड टाकिले. त्याजवर एकूणिसा हातांवर पर्वतीच्या पडवळियाचे दगड टाकिले. हडकीपाशीं पूर्वपछम दगड टाकिले. मधें एकूणीस हात वाट राहिली. असें जालें आहे. याचा हिशेब देशपांडियापाशीं लिहिली असेत. परंतु बाकोजी पाटिलांनी अमळसा स्वार्थ केलासा दिसतो. परंतु त्याजवर मदार दिल्हा. तेव्हां जें जालें तें करार जालें असे. पुढें घोडियाची घालमेल केली तरी उपाय नाहीं. नवलोजी पाटील ( पुढें कोरें )
आषाढ वद्य ११ शुक्रवारीं नानगांवकरियांस राजश्री बापूजीपंती पत्र दिल्हें कीं, तुह्मीं कानगांवच्या हतवळण्याच्या शेतास कटकट केली आहे. तें शेत सखो महादेव उदंड दिवस वाहतात, व त्याची स्त्री गोदूबाई वाहतात. कधीं तुह्मीं कजिया केला नाहीं. हल्लीं काय निमित्य केला ? याउपरी कजिया न करणे. शेत गोदूबाई पेरतील. नानगांवकरियांनीं पहिले कानगांवकरियांसी भांडण काढिलें होतें. तेसमईं राजश्री हरी माधव यांणीं मनास आणून विल्हेस लाविलें. वोहळ हातवलण्याकडील जाले होते. ऐसें वतर्मान असे. राजश्री मोरोपंत अप्पानींहि असेंच सांगितलें. हाली नानगांवकरियांनीं नाहक कुजिया केला. ह्मणून राजश्री बापूजीपंती पत्र ताकिदीचें दिल्हें असें. १
आषाढ वद्य १४, गंगाधर धर्माधिकारी दादंभटाचा पुत्र माळवियांत गेला होता, तो भिल्लांच्या हातें मारला गेला, ह्मणून त्याची खबर आली असे. १
श्रावण शुद्ध १ बुधवारी खंडू जगथाप याजला लटकी बलाय आणून अंताजीपंत फडणीस यांणीं बोलावून नेलें होतें, मग निरोप घेऊन आणिला असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५५
श्री १६११
तालिक
॥ सौजन्ये समस्त मोकदमानी व शेटे महाजन देहाय समतानिहाय
सा। हवेली सा निंब
सा। वाघोली सा। कोरेगाऊ
सा। मुरे दो। जोरखोरे
व जाबुळखोरे
प्रती दताजी केशवजी नाइक देशमुख व देशपांडीये पा। वाई ल्याहावया कारणे सु। सन हजार १०९९ तिसैन अलफ बदल भडारा व नदादीप मठ श्री सदानद गोसावी मुकाम मौजे निंब ब॥ सालाबाद रुजुपत्र तीर्थरुप राजश्री नरसोजी नाईक पत्र बहुत जीर्ण जाले नूतन पत्र करून देणे ह्मणोन राजश्री आनदगीर गोसावी येही येऊन रदबदली केली त्यावरून तमाम मोकदम बैसोन पूर्वील सनद मनास आणौन हाली त्याप्रो सनद करून दिल्ही दर मुकाम लष्कर हरजती जिलसुभानी मो। मौजे तुलापूर प्रा। पुणा गाव कुडोवृत्ती करून दिल्ही ते पिढी दरपिढी चालवणे हिदु अगर मुसलमान हरकती करील त्यास आण असे मोईन दर गावास बितपसील
सा। वाघोली गला खडी २।१॥
→ बितपसील पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
मरेतोंवर सावध होती. सर्वांस निरविलें. सर्वांचा निरोप घेतला. योग्यासारिखें सर्वांस पुसोन बसतां बोलतां वारिली. रामस्मरण करीतसे. तुळसीची माळ आपणहून गळां घालविली. तिचें सार्थक जालें असे. १
तेच दिवशीं सौभाग्यवती सोयरीबाई, रा। भाऊची लेक, धोंडभट धर्माधिकारियाची बायको, उभयतां महायात्रेस गेलीं होतीं. भागीरथीतीरीं माघमासीं सोयरीबाई वारली, ह्मणून चिंचवडाहून वारलियाचें वर्तमान आलें असे. १
आषाढ सुध नवमी सह दशमी बुधवारीं राजश्री मोरो विश्वनाथ धडफळे याणीं धार्य घेतलें. अग्न सिध केला असे. दोनएकसे रुपये खर्च केले असेत. १
आषाढ सुध १० बुधवारीं दादो नरहर रेडे, तळेगांऊइंदुरी येथील कुलकर्णी, यांणी अतुरसंन्यास घेतला. आषाढ शुध १५, सोमवारीं, सकाळच्या सा घटका दिवसां मृत्य पावले असेत.
आषाढ सुध १५ सोमवारी चंद्रग्रहण पडिलें. मोठें पर्व होतें. अवघाच चंद्राचा खगरास जाला होता. आवशींचेंच होतें. राणाई मुरकुटी बाणेरकर इचा पुत्र धोंडजी वारला.
राजश्री स्वामी मिरजेचे मुकामीहून श्रीपंढरीचे यात्रेस गेले. राणोजी शिंदेही चांभारगोंदियाहून गेले. तेथून तुळजापुरास गेले.
आषाढ वद्य सप्तमी रविवासर
श्री चिंतामणदेव चिंचवड रात्रौ मल्हारभट बिन जिव-
याची जेष्ठ स्त्री सौ। निरुबाई यांस भट वेव्हारे, जोशी, पुणेकर,
प्रात: काळीं देवआज्ञा जाली याची माता वारली असे.
असे.
पंढरीचे यात्रेस गेलीं त्यांस तेथें वारलीं :-
कुसाबा नाईक गोडसे पुणेकर, मोत्याजी पा। उपाह हडपसर-
ठिकाणींच वारला असे. १ कर याचा पुत्र मल्हारजी. १
रुपाजी लांडगी भोंसरीकरही बापलेक यांचें बरें नव्हतें.
वारला असे. येतांना वरवंडापाशी मल्हारजी
मेला असे. १
भिकाजी बेलवाडीकर याची
बायको आपले घरीच वारली.
दोन तीन रोज अधिक उणें. १
राणोजी जगदळे यास पुत्र
जाला असे. १
आषाढ वद्य ८ मंगळवारी मनाई पुणेकरीण इची भिंत पडिली. त्रिंबकराऊ विश्वनाथ याजकडील जासूद व त्याची बायको व त्याचीं दोघें मुलें व एक माळियाची मूल अशीं भिंतीसमोरल्या छपरांत होतीं तीं दडपून वारलीं असेत.
आषाढ वद्य १० दशमी गुरुवारीं पर्वती व पुणें याच्या शिवेस वाट आहे. पुण्याहून कात्रजेस जावयाची असे. तिची कटकट पडिली. ती मनास आणून टाकली. हजीर मजालसः--
कित्ता पा। कित्ता पा।
१ केसे। सखदेव कमावीसदार, २ अंबळेकर पाटील
का। पुणें. १ सुलबाजी दरेकर
३ देशमूख १ हिरोजी जगथाप
१ जगोबा ----------
१ कल्याणराऊ २
१ यादेपंत माळी. २ कोंढवे खुर्द
------ १ कष्णाजी पाटील लोणकर
३ १ बहिरजी गावडी.
४ देशपांडे २
१ गोपाळराव २ कोंढवे बु॥
१ खंडो विसाजी १ माणकोजी पा। कामथा.
१ त्र्यंबक बापोजी १ --------
१ नारोबा वैद्य -----
----- २
४ २ घोरपडी पाटील
---- १ तुकोजी कवडा
८ १ सोनजी कवडा.
पुणेकर पाटील वगैरे. ----
१ वाकोजी, सखोजी, ह्मकोजी २
झांबरे पा।. ----
८
१ च्यांदजी व त्याचा लेक पर्वतीकर पाटील वगैरे
१ खंडोजी बिन रायाजीपा। १ येसोजी पा। व शिदोजी व
१ येसू व बाबजी शेळका चौ। त्याचा लेक
१ बिवा व येसू व संभाजी वगैरे १ नवलोजी पा। व त्याचा लेक
चौगुली रुपाजी पा।
१ मल्हार विश्वनाथ कुळकर्णी १ ---------------
----- -----
आणीख एक दोधे होते.
याखेरीज किरकोळ होते. व धारा के समंदा माहार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
जेष्ठ वद्य १२ गुरुवार पुणाची पांढर व सागांवचे थळें कुंभारपिराच्या दरगियांत कुंभाराच्या साक्षी : पुणेकर कुंभार ह्माळोजी व बरवाजी एकघरें मायाजी कुंभाराशीं भांडतात कीं, तूं आमचा नव्हेस, अकुर्डीचा. याजबद्दल साक्ष पुसीली. तेथें साक्षीदारांनी सांगितलें की, मायाजीचे वडील येथें बहुत दिवस आहेत, ते दोघे, हा तिसरा, ऐसे ती टाईं कसाला करून खात आले आहेत, कोण्ही कोण्हाचा सरीक ऐसे ऐकिलें नाहीं, मायाजीचें गांव आकुर्डी चोंवाडियाचें आहे, यामुळें आकुर्डे ऐसें ह्माळोजीच्या बरवाजीच्या तोंडें ऐकतों. कोण्ही गोही दिल्ही कीं, ह्माळोजी बरवाजी हे ठावके आपणास आहेत, त्यांच्या तकरीर केशो संबदेऊ मोकाशी याजपाशीं आहेत, त्यांच्या नकला देशपांडियापाशीं आहेत, कुंभार एक नदीजवळ नाहींत. दशरथ पंचरथ साक्षीदारांस नेमिले असेत.
आषाढ सुध ४ शुक्रवारीं देवजी दांगट वडगांव नेहरज येथील दिव्यामुळें नवा पाटील जाला होता तो वारला असे.
आषाढ सुध १ सोमवार छ २९ रावल रा। नारो अनंत अजहत देशमुख व राघोराम देशपांडे हिंगण्यास मंगळवार बुधवारीं गेले. माहरांची हडकी गांवाखालीं पडली होती ते त्यांची खरी करून त्यांच्या हवाली केली. चावर अनमाने बिधे.
मायाजी पा। बर्हाटा याचा व तुकोजी बर्हाटा याचा घराच्या जागियाचा शेजाराचा काजिया होता तो विल्हेस लाविला असे.
आषाढ शुध ४ शुक्रवार वितिपात होता. ते दिवशीं आउंधकरांनी गतवरसीं नांगरत होते त्यांत ओहळ्याखालें कुळव धरिले होते. दुसरे दिवशीं पासणेकर कल्याण निळकंठ जाऊन द्वाही दिल्ही. आऊतें सोडविलीं. आऊतें धरिलीं त्याचे आधले दिवशीं आउंधकरांनीं आऊतें धरावयाचा विचार केला होता. आऊतें न्यावीं तो त्याच रानांत शिंगरूं लांडग्यांनी मारिलें. आधले दिवशीं आऊतें धरणार होते. ते दिवशीं शिंदियाच्या ह्मशी भांडल्या, पडोन मेल्या, दोन. बैलही एक मेला. पाऊस लागला. त्यामुळें दोन दिवस गुंता जाला. तिसरे रोजीं वितिपातावर आऊतें धरिलीं. आउंधकर हिमायेतीने आऊतें धरितात. परंतु ईश्वर त्यास नतिजा देतो. परंतु भाग्यामुळे चित्तांत आणीत नाहींत.
आषाढ सुध ७ सप्तमीसह अष्टमी सोमवारी अवसीच्या पहिल्या प्रहर रात्री जालियावर नवे घटकेस राणूबाई आंगरीं, देशमुखाची कन्या, वारिली. संगमीं दहन केलें.
लक्ष्मण शेलार देलवडकर याजकडून पाणी पाजविलें. मधर्याची व ज्वराची वेथा जाली. खंग लागली. चैत्र वद्य ३०, कुलाबियांत वेथा जाली होती. मूळ पाठवून आणिली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
मौजे हिवरें, ता। कर्हेपटार, येथील पाटिलकी गायकवाड करीत असतां, त्यासी कुदळमाळी पाटीलकीबद्दल भांडो लागले. भगवंतपंत कुलकर्णी माळियास मिळाला. बापूजीपंतानीं नानास आणिलें. शेवटीं राजश्रीपावेतों गेले. तेथें माळियांनी शेखमिरी वशिला करून माळियाची पाटिलकी पहिली, गायकवाडचा भोगवटा, ऐसा करून दोठायीं पाटिलकी केली. माळियास निमेचीं राजपत्रें करून दिल्हीं. जोगोजी गायकवाड राजी होईना ह्मणून पुरंधरावर घातला. तेथून पळोन गेला. गायकवाड गांवांतून गेले. माळी पाटिलकी करूं लागले. माळियांत माळी भांडों लागले. तेव्हां चिमाजीअप्पापाशीं प्रसंग पडला. त्याणीं साठाईं पाटिलकी केली. साजणांनी सामुठी पीठ आणून देविलीं. भाकर करून पोळी होळीस बांधावी, साजणांनी सामुठी माती आणून शिराळशेट देवळीं करावा, सिरपाव साठाईं वांटून घ्यावा, ऐसें करून दिल्हें. माळी साजागाचे मिळून पाटिलकी साधिली, ह्मणून साठायीं केली असे. कागद दिवाणचा करून दिल्हा असे. याजवर अलीकडे राजश्री पेशव्यांनी गायकवाडास कौल देऊन गांवावर यावयास सांगितले. ते आले. घरांत राहून शेतें वाहू लागले. गतवरसीं माळियांची पोळी गायकवाडांनीं लागूं दिल्ही नाहीं. सिरपाव खंडणीचा घेऊं दिल्हा नाहीं. त्याजवर बायाजी माळी लष्करांतून आलियावर मिरजेच्या मुक्कामी वैशाख व जेष्ठमासीं जाऊन, जोगोजी गायकवाड यास, दीडसे रुपये मसाला आणिला. नानास व जमीदारांस पत्र बाळाजी बाजीरायांपासून आणिलें कीं, गाळियाचे मानपान सुरळीत चालों देणें, गायकवाड मानपान सुरळीत घेतला तर घेऊं देणें, नाहीं तर निमे पाटिलकी त्यांची अमानत राखणें. ऐसीं आलीं. जोगोजी गायकवाड यास घेऊन, हुजुर येऊन, गडाहून पळालियाची व पाटिलकीसमंधें गुन्हेगारी हजार रुपये खंडून, राजश्रीकडून पागोटें बांधून, बापूजीपंताकडे पाठविला. हजारांत दीडसे रुपये मसाला अजुरा दिल्हा. साडेआठशें बापूजीपंतास वसूल घ्यावयाविशयीं लिहिलें. निमे ऐवज राजश्रीचा, निमे ऐवज जिल्हेचा. माळियाची व गायकवाडाची येवळेस दरबारी रुबरु जाली नाही. मागून माळी दरबारीहून आले. त्यांनी बाळाजी बाजीरायांपासून जमीदाराच्या नांवें पत्र आणिलें कीं, माळियाचा गा।चा इनसाफ पेशजी हुजूर जाला. गा। खोटें झाले. माळी खरे. परंतु गा।चा भोगवटा बहुतां दिवसांचा. याजकरितां निमेनीम करून माळियास पत्रें करून दिल्हीं. गुन्हेगारीबद्दल जोगोजी गा। पुरंधरीं ठेविला होता, तो पळाला. त्याची वतनामुळें गुन्हेगारी खंडून पाठविला असे. माळी निमे मोकदमीचे मानपान घेऊन पाटिलकी करितील त्यास करूं देणें. गा। निमे करितील तर करूं देणें. गा। न करीत तर त्याचें निमें वतन अमानत असे. ऐसें पत्र आणिलें असे. त्याची नकल देशपांडियांनी घेतली असे. याचप्रों। रा। बापूजीपंतास पत्र असे. इतकें केलें सखाराम भगवंत बोकील हिवरेंकर यानें. राजश्री बाळाजी बाजीराऊ याजपाशीं आहेत. राजश्री महादाजी अंबाजी पुरंदरे यांस अगत्य बोकलाचें. बोकलास अगत्य माळियाचें. याजबद्दल गा।स हैराण केलें. गा। मालजामीन आणीत तोंपर्यंत हजीरजामीन सिदोजी पा। जा। वानवडकर आठा दिवसांचा हजीरजामीन बापूजीपंती घेतला असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
जेष्ठ शु॥ ७ शनिवार महादाजी दादो व खंडो त्रिंबक टुलु याणीं राजश्री बापूजीपंताचे दरबारी कानडियास येजितखत खडकीच्या कुळकर्णाचें लेहून दिल्हें असे. दोघांनी अर्धे अर्धे लेहून दिल्हें असे. पांढरीनेंही साक्ष पहिले नागेशाचे देवळीं व कचेरीस सांगितलें की, मूळ वृत्ति जोशी कुळकर्णी कानड्यांची, कानड्यांनीं टुल्लु गुमास्ता ठेविला होता, तो बळकावून आपलेंच कुळकर्ण ह्मणून खाऊं लागला, परंतु जोतीश कुळकर्ण कानड्याचें खरें. त्याजवरून येजितखत दिल्हें असे.
कानडियास वर्तणुकेस व टुल्लूस जामीन वर्तणुकेस व
उगवणीस जमान गोपाळ उगवणीस जगन्नाथ खंडेराऊ
मोरदेऊ माळी हरकी रु॥ ३५०; खांबणेरकर, गुन्हेगारी रु॥ १००;
येणेंप्रमाणें केलें असे. कानडियास खरेपणपत्रें करून दिल्हीं असेत. वस्त्र आषाढ सुध ७ रविवारीं खरेपणाचें दिल्हे, व पत्रेंही करून दिल्हीं असेत. येजितखताचे वेळेस महादेव टुल्लु कांहीं लेहून दिल्हें, मधें रडों लागला, लिहिनासा झाला, त्याजवरून दटाविला, असें असे. टुल्लूनें लिहून दिल्हें कीं, पहिले बंडा कुळकर्णी होता, त्यानें कुळकर्ण आपल्या वडिलास दिल्हें, व जोतीष कानड्यास दिल्हें, ते गोष्ट त्यांच्यानें खरी करून देविली नाहीं, त्यामुळें व पांढरीच्या साक्षीनें लटका जाला असे. माचीस गोह्या दिल्या कीं, जोसपण कानडे खातात व कुळकर्ण टुल्लू खातात, ऐसें कां लेहून दिल्हें ह्मणून पुसिलें. त्यास पाटील बोलले की, आमच्या वतनाचा महजर टुल्लूपाशीं होता, तो हातास आला पाहिजे ह्मणून त्याजसारिखें बोलिलों, चाल सांगितली. ऐसें जालें असे. १
टुल्लू कुळकर्ण करीत होता त्यास द्वाही कानड्यानें दिल्ही. त्यामुळें कुलकर्ण अमानत होतें. त्यास, अमानताबा। गांवकरियांपासून कुळकर्णियाच्या हक्काबाबत दाहा बरसांचे रुपये ३०० तीनशें राजश्री बापूजीपंतीं घेतले असेत.
जेष्ठ शुद्ध ८ सोमवार खंडो विसाजी देशपांडे यांचा लेक धाकटा महादेव यांचे लग्न तळेगाऊइंदुरींत जालें. जिवाजी गेविंद याची नात, बाळकृष्णाची लेक, केली असे.