श्री.
तह केला. कजिया शिंव भोंसरी व दिघी, गु॥ जगोबा व नाना व बाजीकाटे व नारो रघुनाथ वैद्य नि॥ देशपांडे भोंसरीकर, सुमानजी प्रा। गव्हाणें व शितोजी मडगा चौ। दिघीकर, माणकोजी पा। वळके व महादाजी पा। वळके. सन १ १ ४९ छ २७ जमादिलावल, भोंसरीकर टुकडे दहावीस वरसे वाहून खात होते. त्यास सालगुदस्तां भोंसरीकर अवघे पाटिलकीच्या कजियाकरितां पुणियांत महिना दीडमहिना बसविले होते. खंडोजी पा। गैरहजीर जाला, त्यामुळें दरबारास भोंसरीकरास यावयास दहशत वाटों लागली. त्या संधींत ते टुकडे भोंसरीकराचे वहिताचे दिघीकरांनीं पेशवियाच्या शेरकरांकडून बळेंच पेरविले. ते मागती सालमजकूरीं भोंसरीकरांनीं पाडिले. ते पडलेच आहे. दुसरें, दिघीकरांनी सुतारास ते लाविले. त्यापैकी भोंसरकर घोही देत होते. ते जमीन सुतारानें नांगराच्या शेजानें नांगरली. ते भोंसरीकरानीं घोही देऊन पेरूं दिल्ही नाहीं. सुतारानें टाकिलेली जमीन मग दिघीकरांनी अवशेपांहटे बोभाट न होतां पेरलें. भोंसरीकरांनी नेम केला होता कीं, चौघे मिळून मनास आणूं. शेवटीं दिघीकरांनी चौघे मिळवयास चुकाविलें आणि सुतारानें भोंसरीकर घोही देत होते ते टाकिली. दिघीकरांनी पेरली, बळेंच. यामुळे त्या सुमारें भोंसरीकरांनी नांगर धरिले, ह्मणून दिघीकर येथें आले. भोंसरीकरासही बोलावून आणिलें. आतांच मनास आणावें तरी, धर्माजी पा। वळके गांवीं नाहींत. याजकरितां भोंसरीकरांनीं नांगरिलें आहे तें राण तैसेंच असों द्यावें, पेरूं नये. दिघी शिव भोंसरी दिघी करार केला, कराजी सुतारानें टाकिलें होते, तें पेरिलें आहे, तें अमानत असों द्यावें. इतक्यांत धर्मोजी पाटील येऊन विल्हें लागले तरी, ज्याजकडे तें वावर होईल त्याजकडे माल द्यावा. जरी होय न होय न जाली तरी देशमूख देशपांडियाचे माणूस नेऊन दिघीकरांनी तेथील जोंधळा काढून त्याच वावरांत निराळा रचून ठेवावा. पुढें विल्हें लागलें तरी बरें. नाहीं तरी तें बुचाड मळून तिर्हाइत गांवीं ठेवावें. ते जमीन अमानत व भोसरीकरांनी नवे नांगरलें असे ते अमानत. दिघीकरांनीहि सालमजकूरींच जमीन पेरली असे. मागें पेरली नाहीं. वाहिली नाहीं तेहि अमानत देखील माल ऐसे केले असे. यास साक्ष मल्हार विश्वनाथ कुलकर्णी नि॥ मुजेरी का। पुणे व भगवंत शेट मोझ्या शेट का। लोहगाऊं ठेविले असेत. उभयतांच्या गुजारतीनें करार केला असे. दोही गांवींच्या पाटलांनी व जमीदारांनी ( पुढें कोरें ).