Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५४
श्री १६११
तालिक
॥ सौजन्य समस्त मोकदमानी व शेटे महाजन देहाय समतानिहाय
सा। हवेली सा। निंब
सा। वाघोली सा। कोरेगाउ
सा। मुरे दो।जोरखोरे व
जाबुळ खोरे
प्रती दताजी केशजी नाईक देशमुख व देशपांडीये प्रा। वाई ल्याहावया कारणे सु॥ सन १०९९ तिसैन अलफ बदल भडारा व नदादीप मठ श्री सदानद गोसावी मुकाम मौजे निंब बा। सालाबाद रुजूपत्र तीर्थरूप राजश्री नरसोजी नाइक पुत्र बहुत जीर्ण जाले नूतन पत्र करून देणे ह्मणोन राजश्री आनदगीर गोसावी येही येऊन रदबदली केली त्यावरून तमाम मोकदम बैसून पूर्वील सनद मनास आणोन हाली त्याप्रा। सनद करून दिल्ही तर मुकाम लष्कर हजरती जिलसुभानी मोकाम मौजे तुळापूर प्रा। पुणा गाव कुडो वृत्ती करून दिल्ही ती पिढी दर पिढी चालवणे हिदू अगर मुसलमान हरकती करील त्यासी आण असे मोइन दर गावास बितपसील
→ बितपसील पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
यादी, करीना, स्मरणार्थ, शके १६६१ सिद्धार्थिनाम संवछरे, वैशाख वद्य १४, शुक्रवार, म्रुग निघाला, नवे साल, सुहूरसन अर्बैन मया अलफ, सन हजार ११४९, छ २७, सफर.
जेष्ठमास बोलबोजी बरेकर, अंबोडीचा पा।, नानापासीं पाटिलकीच्या कज़ियानिमित्य उभा राहिला. त्याजवरून जाकोजी बरेकरास तलब करून आणिलें. जामीन तकरीरा घेतल्या, तों राजश्री बाळाजी बाजीराऊ यांचे पत्र मिरजेकडून आलें कीं, तूर्त लावणीचे दिवस आहेत, त्यास निरोप देणें, पेस्तर राजश्री अप्पा आलियावर मनास आणणें तें मनास आणतील. त्याजवरून निरोप नानानीं दिल्हा असे. १
श्रीचिंतामणी थेऊर याची खोळ अवघी सुटली.
बहिरजी बरेकर, चौगला, मौजे पिंपळे, ता। कर्हेपठार, यासि मल्हारजी बरेकर चौगुलकीबद्दल भांडतो. बहिरजीनें आपलें घर शेकारिलें. त्यास, मल्हारजीनें द्वाही दिल्ही. नानापासीं भांडत आले, नानानीं मनास आणावें. जामिन घेतले. तकरिराही घेतल्याच होत्या. त्याजवर राजश्री बाळाजी बाजीराऊ यांचें पत्र आलें कीं, त्यास येथेंच पाठवून देणें. त्याजवरून पाठवून दिल्हे असेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शके १६६० अधिक आश्विन मास.
अधिक वद्य १ निळो विठ्ठल देशपांडे याणीं ब्राह्मणभोजन केलें. नडगेमोडीस वोंकाराच्या देवळापाशीं आगांतुकाचा स्वयंपाक केला. ग्रामस्थांचा घरीं केला. ग्रहस्थही भोजनास अवघे गेले. चवलाप्रों। दक्षणा दिल्ही. बाबूजीनाईक जोशी याणीं निळोबाचे साहित्य ब्राह्मणभोजनाविशीं केलें असे. वरकडही केलें असे. निळोबास पैका भाऊबंद देईनात. त्यानेंच अवघें मान्य केलें आणि देशमुखाकडे आले. उभयतां देशमुखांनीं रामाजी मल्हार यांजपासून हजार रुपये दुहोत्राच्या व्याजें जातखत देऊन काढून दिल्हे. निळोपंत व बाजी मोरेश्वर याणीं आपलें जातखत देशमुखास दिल्हें असे.
अधिक वद्य ७ स राजश्री चिमाजीअप्पा नांदेडियास दत्ताजी जाधव याचा बाग पाहावयास गेले. पालखीच्या दांडियाचें कलबूत कळंकीस घालीत असतात तेंहि पाहावयास गेले असेत. रोज मजकुरीं राणोजी शिंदियानीं पासणाच्या शिवारांत जबरदस्तीने नांगर घातले ह्मणून बजाजी कोकाटे व सूर्याजी ठाणगा व धरा महार सांगावयास आले असेत.
अश्विन वद्य.
सिंहगडाहून राजश्री पंतसचींव यांच्या मुतालकीच्या शिकियानें, वकिलीच्या शिकियानें, ऐसे दोठा रोखे कैलियास चालले आहेत कीं, मौजे मजकूरचें कुलकर्ण कोण्हाचें असे, ते हकीकत करणें. आहे तोंपर्यंत कुळकर्ण अमानत केलें असे. दिवाणांतून कुलकर्णाचें लिहिणें लिहावयास ( पुढे कोरें.)
अधिक आश्विन वद्य ३० सोमवार.- निळो विठ्ठल देशपांडे याची मातुश्री मथुराबाई यांस देवआज्ञा जाली. रात्री पहिले प्रहरीं जाली.
आंश्विन शुद्ध १० बुधवारीं दसरा.- रा॥ तुळाजी बिन संभाजी शितोळे न्हावकर यासी सरनोबती दिल्ही. - पालखी दिल्ही असे. कसबे सुपें सुभेदार बाजी हरी यांजकडून काढून आवजी कवडे यास दिल्हें असे. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५३
१६११
॥ सौजन्ये समस्त मोकदमानी व शेटे महाजन देहाय समतानिहाय
सा। हवेली समत निंब
सा। वाघोली सा। कोरेगाव
सा। मुरे जोरखोरे व
जाबुळ खोरे
प्रती दताजी केशवजी नाइक देशमुख व देशपांडीये प्रा। वाई ल्याहावया कारणे सु॥ सन १०९९ तिसैन अलफ बदल भडारा व नदादीप मठ श्री सदानद गोसावी मु॥ मौजे निंब बा। सालाबाद रुजूपत्र तीर्थरूप रो। नरसोजी नाइक पत्र बहुत जीर्ण जाले नूतन पत्र करून देणे ह्मणोन राजश्री आनंदगीर गोसावी येही येऊन रदबदली केली त्यावरून तमाम मोकदम बैसोन पूर्वील सनद मनास सआणोन हाली त्याप्रा। सनद करून दिल्ही दर मुकाम लष्कर हजरती जिलसुभानी मोकाम मौजे तुलापूर प्रा। पुणा गाव कुडो वृत्ती करून दिल्ही ती पिढी दरपिढी चालवणे हिंदू अगर मुसलमान हरकती करील त्यासी आण असे मोइन दर गावास बि॥
सा। कोरेगाऊ गला कुडो ४॥।२
→ तपसील वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
यादी करीना स्मरणार्थ. शके १६६० कालयुक्तनाम संवछरे, जेष्ठ वद्य २, मृग निघाला. नवें साल. सन्न ११४८ छ० १५ माहे सफर, सुहुर सन तिसा सलासीन मया अलफ, सन हजार ११४८ आटेतालीस.
जेष्ठमासीं वद्यपक्षीं हवेली, सांडस, कर्हेपटार, नीरथडी या तरफांच्या खंडणिया केल्या. पाटिलास शिरपाव राजश्री बाळाजी बाजीराऊ यांनी हुजूर दिल्हे असेत.
१. फुरसंगीचें पागोटें पाटिलकीचें वाल्होजी कामथा याणें घेतलें होतें, तें माघारें घेतलें. फुरसंगीचे वस्त्र अमानत जालें. राजश्री स्वामीनीं होळीची पोळी अमानत केली. त्याजवरून तश्रीफहि अमानत केली असे.
१. हिवरें कर्हेपटार येथील माळी तश्रीफ घेत होते. हिवरेकर गायकवाड वगैरे हजीर होते ते गांवांस येऊन, माळियाच्या होळीस द्वाही देऊन, होळी लावूं दिल्हीं नाहीं. तश्रफेसही द्वाही दिल्ही. यामुळें अमानत तश्रीफ केली. माळियास दिल्ही नाहीं. गायकवाड तो घेतच नाहीं.
१. लोहगांवचे वस्त्र गुमास्ता ह्मणून दिल्हें. एरव्ही पाटिलास न द्यावेसें केलें असे. जानोजी भिमराव याजला वस्त्र गु।। दिल्हें असे.
१. खडकीच्या कुलकर्णासी कानडे व टुल्लु भांडतात. त्याचे अमानत / केलें असे.
जेष्ठ वद्य ५, मल्हारी नाहवी मगर यासी देवआज्ञा जाली असे. त्याचा दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदेस अकरावा दिवस जाला असे.
आषाढ सुध २ बुधवारीं राजश्री चिमाजीपंतअप्पा साष्टीहून पुणियास आले. काल अवंधांत होते. आजि येथें आले असेत. १.
आषाढ वद्य ६ सोमवारीं यादवशेटीस देवाआज्ञा जाली असे. १
दादाजी रघुनाथ खळदकर याच्या बापाचें कर्ज भगवंत उद्धवमल किकवीकर याच्या बापाकडे पंधराशें रुपये पंचोत्र्याच्या व्याजाचे होते. किकवी मजरे वायदेरोखियांत गहाण लेहून दिल्हीं होतीं. त्यास, फुरसंगीच्या पाटिलाच्या कजियाबद्दल सातारियास गेले होते. तेथें दाजीपंतास वर्तमान सांगितलें. त्याजवरून भगवंतास बोलावून सांगितले की, याचें लिगाड वार. त्याजपाशीं तो ऐवज नव्हता. दाजीपंतास संतानाकरितां दुसरें लग्न करणें होतें. त्यास खर्चवेंच पाहिजे. याजकारितां त्याणीं निकड लाविली होती. मग दाजीपंतानी निकाल काढिला की, भगवंताची बहीण वधू असे, ही याणें आपणास द्यावी, व नगावजास पांच सातशें रु।। द्यावे. तेव्हां आह्मीं सांगितलें कीं, शेरभर सोनें याणें बहिणीवर घालून द्यावी. त्याजवर भगवंतानें व त्याचे आईनें व त्याचा मामा मोरोपंत करजवडकर याणें कबूल केलें. किकवीस दादाजीपंतास बोलाविलें. तेथें सातारा ग्रा। करार ह्मणून सोयरिक दिल्ही. दाजीपंतापासून फारखती लेहून घेतली. परंतु सोनें मुलीवर घातलें नाहीं. भगवंतानें फारखती दाजी ( पुढें गहाळ. )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
शके १६५५ प्रमादीनाम संवछरे आश्विन शुद्ध ११ सोमवारी प्रहरां दिवसा राजश्री बाबूराऊ देशमुख यांस रोटी ता। पाटस येथें प्रहरां दिवसां देवआज्ञा जाली. छ० १० जमादिलावल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५२
१६१०
सदानंद
.॥ स्वती श्री सखे १५ विजय सवछरे राजश्री तुबाजी नाईक वा रतनोजी नाईक + + + नाईक देसमुख ववा माहाभलो अनत देसकुलकरणी पा। कुडाल
(शिक्का) (शिक्का) (शिक्का)
ताहा मोकदमानि वा खोतानि वा सेटे महाजन वा बाजे खुमानी तालुक देहाय पा। मजकूर सु॥ आर्बा खमसैन अलफ करणे देहाय मजकुरी आमचे वडिलानी व्रीतीपत्र राजश्री स्वामीचे मठ मो। नीब पा। वाई येथे आनछत्रासी व्रीतीपत्र करून दिल्हे पाहिजे पत्र सके १४६३ पळवग सवळरेस एक पत्र दिल्हे होते त्यावरी भोगोटा चालत आला ते जीर्णपत्र जाहाले ह्मणउनु आमचे वडिलानी दुसरे व्रीतीपत्र करून दिल्हे सके १५२६ सवछरे क्रोधी नाम सवछरी पहिलेप्रमाणे करून दिल्हे की लेकराचे लेकरी हे अनछत्र मठी चाले ऐसे करणे ह्मणऊन सौसस्कृत घालून पत्र दिल्हे त्यावरी हाली आमचे कारकीर्दीस लिहिलेप्रमाणे चालवावेयाचे व्रीतीपत्र त्यानेप्रमाणे जैसे पाहिजे ह्मणऊनु मठीचे गोसावी येऊन त्यानी दोनी पत्र दाखऊन सदर साहेबाचे मिसेली करून घेतले मग आह्मी पत्र करून दिल्हे असे सदरहूप्रमाणे गावगना कैली खंडी बितपसील
→ खंडी बितपसील वाचण्यासाठी इथे क्लीक करा
येणेप्रमाणे करून वडीलानी दिल्हे हे चालवावे जो इस्कील करील त्यास देवाची आण असे वा आपले वडी(ल)ची आण असे हे व्रीतीपत्र सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
यादी. सोनो बहिरव, राजश्री यादो गोपाळ याच्या बायकोचे भाचे, हे येथें राजश्री गोविंद हरी यांजकडे आपली समजावीस मागावयास आले होते. ते येथें राजश्री निळो केशव यांचे वळखीनें राहावयास आले. ते आश्विन वद्य ११ शनवारीं प्रहर दिवसां आले. आंगीं ज्वराची वेथा होती. तीन दिवस निजेले होते. सोमवारीं तिसरे दिवशीं मध्येरात्रीं देवआज्ञा जाली. मंगळवारीं प्रातःकाळीं आश्विन वद्य अमवाशेस रा। गोविंद हरीस वर्तमान सांगितले. अगोधरहि वेथेचें वर्तमान सांगितलेंच होतें. त्यांनी खर्चास रु॥ २ दिल्हे होते. ते, त्यांचे माणूस लिंगोजी साळोंखी याजपाशीं दिल्हे होते. मुत्य १
पत्रें यादी वगैरे.
पावल्याचें वर्तमान सांगितल्यावर दहा रुपये व एक शेला दिल्ही. त्याचा तपशील.
२ सोमवारीं रात्रीं दिल्हे रु॥ ता। लिंगोजी साळोंखी.
१० मंगळवारीं प्रातःकाळीं त्याच्या साहित्यास दिल्हे रु॥ व शेला १.
----
१२
खर्च
३॥। सा। फांटी सोनोपंताच्या दहनास खंडी १। दर खंडीस रुपये ३ प्रा।.
२ नईस न्यावयास ब्राह्मण तेलंग केले २. त्यांस मजुरी दिल्ही रु॥.
३ वेंकटभट तेलंग अस्ति घेऊन बतीसशिरोळेयास गेला. त्यांच्या घरास, त्यास मजुरी शिवाय पोट.
३। ता। लिंगोजी साळोंखी सोनोपंताचें माणूस.
२ पेसजी.
१। दाहापैकींबाकी.
-----
३।
------
१२
शेला १ पैकीं निमे सोनोपंतावर घातला. बाकी निमे ता। लिंगोजी मा।र.
येणेप्रमाणें रुपयांचा खर्च व शेल्याचा. याशिवाय त्यांचीं पांघुरणें जुनीं ता। लिंगोजी मा।र जबानीनें सांगितलें.
१ पागोटें.
२ आंगडी.
१ शेला.
१ किनखाबी विजार.
१ लेपछिटी.
१ सतरंजी.
---------
७
१ तरवार.
३ भांडीं.
१ तपेलें.
१ पंचपात्री.
१ वाटी पितळी.
------
३
याखेरीज आसन, व सोंवळे, व संधेची पळी, तबकडी, साहाण, खोड, गंधाच्या गोळ्या, तुळशीची माळ, येणेप्रमाणें लिंगोजी मा।र घेऊन त्यांच्या गांवास घेऊन गेला. समेत घोडे तटाणी. कार्तिक शुद्ध १ बुधवार, शके १६६०, कालयुक्तनाम संवछरे, सन ११४८, छ० २९ रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
यादीः बापोजी शितोळे देशमुख यांसी मार्गेस्वर शुद्ध १० शनवारी देवआज्ञा जाली, शके १६६०, कालयुक्तनाम संवछरे, सन ११४८.
---------
१ यांचे + एथील = यांचेथील.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
निळो गणेश, सन हजार विनाजी नारायण, सन हजार
११३१, भाद्रपद वद्य ४, शके ११३६, जेष्ट शुद्ध ३, शके
१६४३, प्लव संवछर. १६४८, पराभव संवछर.
गणेश नारायण, सन हजार चिंतो गणेश, सन हजार
११३७, आश्विन शुद्ध २, शके ११३८, आश्विन शुद्ध २,
१६४८, पराभव संवछरे. शके १६५० सोमवार कीलक.
अंताजी गणेश, सन ११४०
श्रवण वद्य ९ रविवार, शके १६५२