येणेंप्रमाणें जाऊन वाटेचा नजर योजना पाहून सदरहू गोतानें विचार केला कीं, दोघांच्या दरमियानें वाट. त्यास, वाकोजी पाटिलानीं पर्वतीच्या शेताच्या पडेवळियानें आपले सत्ते चालावें ; सिदोजी पा। पुण्याच्या शेताच्या पडेवळियानें आपले सत्ते चालावें. दोहीच्या दरमियानें राहील ते वाट. ऐसें करून चालिले. दक्षणेस ओढियापलीकडे तो घालमेल नाहीं. परंतु वाटेचा सुमार यथास्थित होता, तेथून चालिले. खटाका पावेतो तों कांहींच घालमेल नाहीं, पुढेंही थोडीशी दळवळणीच्या वाटा पडिल्या. त्यामुळें आपल्याल्या बोलीप्रों। चालिले. ओढ्याच्या उत्तरेनें घालमेल आली होती. ते उभयतां चालिले त्याप्रमाणें करार केली. दोहीच्या मधें वाट राहिलीशी जाली. हडकीच्या पडेवळियापावेतों चालली. ओढियापाशीं पूर्वपछम दगड टाकिले. मधें एकूणीस हात वाट राहिली. मधें पुणाच्या शेतांत विहिरीची रिकामी खांच असे. तिजवरते चोवीस हातावर दगड टाकिले. त्याजवर एकूणिसा हातांवर पर्वतीच्या पडवळियाचे दगड टाकिले. हडकीपाशीं पूर्वपछम दगड टाकिले. मधें एकूणीस हात वाट राहिली. असें जालें आहे. याचा हिशेब देशपांडियापाशीं लिहिली असेत. परंतु बाकोजी पाटिलांनी अमळसा स्वार्थ केलासा दिसतो. परंतु त्याजवर मदार दिल्हा. तेव्हां जें जालें तें करार जालें असे. पुढें घोडियाची घालमेल केली तरी उपाय नाहीं. नवलोजी पाटील ( पुढें कोरें )
आषाढ वद्य ११ शुक्रवारीं नानगांवकरियांस राजश्री बापूजीपंती पत्र दिल्हें कीं, तुह्मीं कानगांवच्या हतवळण्याच्या शेतास कटकट केली आहे. तें शेत सखो महादेव उदंड दिवस वाहतात, व त्याची स्त्री गोदूबाई वाहतात. कधीं तुह्मीं कजिया केला नाहीं. हल्लीं काय निमित्य केला ? याउपरी कजिया न करणे. शेत गोदूबाई पेरतील. नानगांवकरियांनीं पहिले कानगांवकरियांसी भांडण काढिलें होतें. तेसमईं राजश्री हरी माधव यांणीं मनास आणून विल्हेस लाविलें. वोहळ हातवलण्याकडील जाले होते. ऐसें वतर्मान असे. राजश्री मोरोपंत अप्पानींहि असेंच सांगितलें. हाली नानगांवकरियांनीं नाहक कुजिया केला. ह्मणून राजश्री बापूजीपंती पत्र ताकिदीचें दिल्हें असें. १
आषाढ वद्य १४, गंगाधर धर्माधिकारी दादंभटाचा पुत्र माळवियांत गेला होता, तो भिल्लांच्या हातें मारला गेला, ह्मणून त्याची खबर आली असे. १
श्रावण शुद्ध १ बुधवारी खंडू जगथाप याजला लटकी बलाय आणून अंताजीपंत फडणीस यांणीं बोलावून नेलें होतें, मग निरोप घेऊन आणिला असे. १