Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

जुन्नर व अहमदनगर या प्रांतांत आपली वडिलोपार्जित वतनजमीन आहे, त्याच प्रांतांतील सरदेशमुखीचें उत्पन्नहि आपणासच मिळावें अशी शिवाजीनें प्रथम इ० स० १६५० त बादशहास विनंति केली. बादशहाची मर्जी असल्यास आपण पांच हजार स्वार घेऊन त्याची नोकरी करूं असेंहि त्यानें कळविलें. परंतु शहाजहान बादशहानें शिवानीच्या विनंतीकडे मुळींच कानाडोळा केला. तेव्हां शिवाजी स्वतः दिल्लीस जाऊन त्यानें आपला अर्ज बादशहापुढें ठेविला. पुनः इ. स. १६५७ त शहाजहान याच्या हाताखालीं औरंगजेब दक्षिणेंत फौन घेऊन आला, तेव्हां शिवानीनें आणखी विनंति केली. त्यावेळेस असें ठरलें कीं, शिवाजीनें सैन्य जमा करून दामोळ व इतर समुद्र किना-यावरील परगणे सर करावे व औरंगजेबास आपल्या. प्रतिस्पर्धी भावांबरोबर लढाई करण्याकरितां जावें लागल्यास, त्या मुदतींत महाराष्ट्रांचें संरक्षण करावें : अशी औरंगजेबानें शहाजहान बादशहापासून परवानगी मिळवावी. कोणी रघुनाथपंत व कृष्णाजीपंत या नांवांच्या गृहस्थांस औरंगजेबाकडे बोलणें चालविण्याकरितां पाठविलें; त्यांनीं जाऊन सरदेशमुखीचें हक्क मिळविण्याबद्दल बादशहाजवळ नेहमीं बोलणें काढावयाचें. कोंकण प्रांत जिंकण्याचा अधिकार शिवाजीस पाहिजे होता तो औरंगजेबानें त्यास दिला. व सरदेशमुखीसंबंधानें त्यानें असें सांगितलें कीं, शिवाजीचा विश्वासूक मंत्री आबाजी सोनदेव हा दिल्लीस आल्यावर त्याच्या बरोबर या प्रश्नाचा ऊहापोह करू.

ह्या हक्कासंबंधीं तिसरा उल्लेख, पुरंदर येथें इ० स० १६१६ मध्यें शिवाजी व राजा जयसिंग यांच्यामध्यें झालेल्या तहाचें बोलणें चाललें असतांना झालेला आहे. या तहांत आपण आपले सर्व किल्ले बादशहाच्या स्वाधीन करितों व दिल्लीस जाऊन रीतीप्रमाणें बादशहास शरण येतों असें शिवाजीनें कबूल केलें. या तहनाम्यांत शिवाजीनें अशी विनंति केली होती कीं, निजामाच्या राज्यांत, आपले वडिलोपार्जित कांहीं हक्क आहेत, निजामापासून कांही प्रांत जिंकून घेऊन बादशहानें ते विजापूर प्रांतास जोडले आहेत, तर त्या प्रांतांतून आपणास आपल्या हक्काबद्दल कांहीं नेमणूक असावी. या तहनाम्यांतच फक्त सरदेशमुखीबद्दलच नव्हे, तर चौथाई म्हणजे कांहीं प्रांतांतील उत्पन्नापैकीं शेंकडा २५ या हक्काबद्दलसुद्धां मागणी केलेली आढळते. ही चौथाई व सरदेशमुखी ( शेंकडा १० ) वसूल करण्याबद्दलचा सर्व खर्च आपण देऊं, असें शिवाजीनें सांगितलें. हे हक्क आपणास मिळाले तर आपण, चाळीसलाख रुपये, सालोसाल तीन लाख हप्त्यानें बादशहास पेषकुश म्हणून देऊं. शिवाय बादशहाचे उपयोगी पडावी म्हणून फौजेची एक तुकडी आपल्या खर्चानेंच ठेऊं असेंही शिवाजीनें कबूल केलें. चौथाई व सरदेशमुखी या हक्कांसंबंधानें केलेल्या मागणीस बादशहाकडून मुक्रर जबाब मिळाला नाहीं. परंतु जयसिंगानें मंजुरीकरितां तहनामा जेव्हां हुजूरकडे पाठविला, तेव्हां शिवाजी स्वत : दिल्लीस येऊन पेषकुश देईल तरच तहनाम्यांत केलेल्या सूचनांचा आपण योग्य विचार करूं असें बादशहानें वचन दिलें. शिवाजी दिल्लीस जाऊनहि कांहीं उपयोग झाला नाहीं ; उलट बादशहानें त्यास तेथें कैद केलें. तेव्हां शिवाजी अगदीं निराश झाला. पुढें शिवाजी कैदेंतून पळून गेला व त्यानें पुन: लढाई चालविली, तेव्हां बादशहास कृतकर्माचा पश्चात्ताप झाला असें दिसतें. कारण कीं, इ० स० १६६७ च्या सुमारास बादशहानें शिवाजीस व-हाडांत एक जहागीर देऊन त्यास ' राजा ' ही पदवी दिली व त्याचा मुलगा संभाजी यास एक मनसब दिली. चौथाई व सरदेशमुखी हे शिवाजीनें फार दिवसांपासून मागितलेले हक्क न दिल्याबद्दल ही इतकी मेहेरबानगी बादशहानें दाखविली हें उघडच आहे. परंतु या मेहेरबानीनें शिवाजीचें समाधान न होऊन आपल्या मागण्या दिल्याचे पाहिजेत, असा त्यानें आग्रह धरिला व विजापूर आणि गोवळकांडेकरांकडून चौथाई व सरदेशमुखी वसूल केली. इ० स० १६६८ त विजापूरच्या अदिलशाही राजानें चौथाई व सरदेशमुखीबद्दल तीन लाख रुपये देणेचें कबूल केलें. त्याच सुमारास, आपण पांच लाख रुपये देऊं, असें गोवळकोंडेकरानेंहि कबूल केलें. इ० स० १६७१ त मोंगलांच्या ताब्यातील खानदेश प्रांतांतून शिवाजीनें चौथाई व सरदेशमुखी जमा केली. इ० स. १६७४ त कोकणांत जीं पोर्तुगीज ठाणीं होतीं त्याबद्दलही वरील कर देण्यास पोर्तुगीज लोकांस भाग पाडलें. विजापूरकर व गोवळकोंडेकर यांजकडून जे कर घेण्यांत आले, त्याचा मोबदला ह्मणून मोंगलांच्या हल्ल्यापासून त्यांचें रक्षण करण्याचें काम शिवाजीनें आपल्या अंगावर घेतलें. व त्या वेळेस चाललेल्या लढायांमध्यें या संरक्षणापासून त्या दोन्ही राजांचा फार फायदा झाला. बेदनूरचा राजा व मुंद येथील संस्थानिक यांनीही शिवाजीस खंडणी देण्याचें कबूल केलें व इ० स० १६७६ मध्यें शिवाजीनें कर्नाटकावर स्वारी करून त्या दूरच्या प्रांतांतसुद्धां चौथाई व सरदेशमुखी वसूल केली. इ० सं० १६८० मध्यें शिवाजी मृत्यु पावला त्यापूर्वीच, दक्षिणेंतील हिंदू व मुसलमान राजांचें संरक्षण करण्याचें काम आपल्याकडे घेऊन, त्यांच्या संमतीनें, त्यांस मदत करण्याचें व त्यांचेकडून खंडणी घेण्याचें तहनामे करण्याची पद्धत शिवाजीनें चांगलीच अमलांत आणिली. व खुद्द मोंगलांच्या ताब्यांतीलही कांहीं प्रांतांवर त्यानें कर बसवून ते वसूल केले. सरदेशमुखीची मागणी म्हणजे मूळ जमाबंदी वसूल करण्याचा खर्च लादलेंलें वडिलोपार्जित वतन मिळण्याविषयीं केलेली विनंति होय. चौथाईचा हक्क सरदेशमुखीस पुढें जोडण्यांत आला. तो, ज्या राजांचें, शत्रूंच्या स्वा-यांपासून रक्षण करण्याचें काम शिवाजीनें आपल्या अंगावर घेतलें, त्यांच्या संमतीनेंच जोडण्यांत आला. या कामीं लागणा-या फौजेच्या खर्चाबद्दल त्या राजांनी शिवाजीस एक नियमित रक्कम द्यावयाची असें ठरलें होतें. शिवाजीनें काढलेली मूळची कल्पना ती हीच व पुढें सव्वाशें वर्षानंतर मार्क्किस ऑफ् वेलस्लीनें हीच कल्पना अमलांत आणून तीपासून बराच फायदा करून घेतला.

चौथाई व सरदेशमुखी.
प्रकरण ११ वें.

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनीं आपल्या कल्पक बुद्धीनें, धैर्यानें व चातुर्यानें राज्यांतील घोंटाळा मोडून चोंहोकडे कशी व्यवस्था केली, हें दाखविण्याच आह्मीं मागील भागांत प्रयत्न केला. आतां पुढें आह्मी जी हकीकत सांगणार आहोंत, तीपैकीं बराच भाग मागेंच सांगून टाकिला आहे. कारण कीं, तो सांगितला नसता तर, शिवाजीच्या छोटेखानी राज्याचें रूपांतर होऊन त्या ठिकाणीं आतां, जतिं सर्वांचे हेतू एक व सर्वांचे व्यवसाय एक आहेत, अशा त-हेची सर्व लहानमोठ्या संस्थानांची जमात कशी झाली ह्याची कल्पना वाचकांस चांगल्या प्रकारे-- झाली नसती. शाहू राजे सिंहासनारूढ झाल्यानंतर परिस्थितींत जो -- फेरबदल झाला, त्यामुळें मराठावीरांनी जे हक्क मागितले होते त्या सर्वांस-- कायदेशीर मंजुरी मिळाली. हें महद्यश संपादून बाळाजी इ. स.—१७२० त मरण पावला. याप्रमाणें मुसलमान बादशहाच्या हातांतून --पर्व सत्ता नाहींशी होऊन, अखेरीस ती मराठामंडळाच्या हातांत आली. त्यावरील हकीकतीचें साम्य हिंदुस्थानच्या मागील इतिहासांत क्कचित्च आढळून येतें. परंतु १९ व्या शतकाच्या आरंभी आरंभीं मार्क्किस आफ् वेलेस्ली यानें जें मोठें कार्य सिद्धीस नेलें, त्याशीं मात्र ह्या गोष्टीचें चांगलें सादृश्य दिसून येतें. मार्क्किस ऑफ् वेलस्लीनें एतद्देशीय राजाबरोबर पैका घेऊन सैन्य पुरविण्याचे तहनामे करून, त्यांत इंग्लिशांची फौज आपल्या मदतीसाठीं प्रत्येक संस्थानिकानें, आपल्या पदरच्या खर्चानें ठेवावी, असें ठरविलें होतें. या प्रकारच्या तहांच्या योगानें ब्रिटिश कंपनीला सर्व हिंदुस्थानद्वीपकल्पावर स्वामित्व मिळालें. मार्क्किस ऑफ् वेलस्लीच्या अगोदर शंभर वर्षे मराठावीरांनी चौथाई व सरदेशमुखीची कल्पना काढून दिल्लीच्या तक्ताधीशाकडून ते हक्क मिळविले होते; त्या कल्पनेचीच पुनरावृत्ति मार्क्किस ऑफ् वेलस्लीची ही तहाची कल्पना होय. फरक इतकाच कीं, ही पुनरावृत्ति जरा जास्त सुधारलेल्या तत्वांवर सुरू केली होती. आतां मोंगल बादशहाकडून इ. स. १७१९ त मिळविलेले चौथाई व सरदेशमुखी हे हक्क, यांचे वास्तविक स्वरूप काय आहे हें, पन्नास वर्षांपूर्वी मराठा साम्राज्याचा संस्थापक शिवाजी यानें आपल्या कारकीर्दीच्या आरंभींच ज्या मागण्या मागितल्या होत्या, त्यांचें इतिहासदृष्ट्या थोडेंसें विवेचन केल्याशिवाय, नीटसें लक्ष्यांत येणार नाहीं. फार पूर्वी म्हणजे इ. स. १६५० तच या मागणीचा प्रथम उल्लेख आढळून येतो. त्या वेळेस शिवाजीच्या मुलखाची हद्द पुणें व सुपें व आसपासचे कांहीं किल्ले, इतक्यांतील त्याच्या बापाच्या जहागिरीच्या बाहेर कांही गेली नव्हती. महाराष्ट्रामध्यें आपणांस सरदेशमुखीचें वतन मिळावें अशी शिवाजीची इच्छा होती असें दिसतें. शिवाजीचें घराणें दोन पिढ्यांपर्येंत चांगलें प्रतिष्ठित व प्रतापी होतें ; आणि त्या घराण्याचा मालवडीचे घाटगे, फलटणचे निंबाळकर, जतचे डफळे, सावंतवाडीचे भोंसले, इत्यादि फार पुरातन देशमुख घराण्याबरोबर जरी बेटी व्यवहार झाला होता, तरी या देशमुख घराण्यांच्या बरोबरीचा हक्क शिवाजीच्या आजास व बापाससुद्धां कधींच मिळाला नाहीं. अदिलशाही व निजामशाही राज्याची स्थापना झाल्यापासून आपलें वतन चालत आलें आहे असें हे देशमुख म्हणत यांना देशमुख हा हुद्दा होता म्हणून राज्यांत स्वस्थता व शांतता राखण्याचे काम त्यांच्याकडे होतें व त्यांना तोडून दिलेल्या प्रांतांचा वसूल करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असे. या वसुलांतून त्यांना शेंकडा १०पर्येत रकम मिळे. पैकी शेंकडा पांच रोकड किंवा धान्याच्या रूपानें, व बाकी ९ बद्दल शेतकीची जमीन मिळे. तेव्हां हें सरदेशमुखीचें वतन आपणास असावें अशी इच्छा शिवाजीस होणें साहजिकच आहे.

शाहूनें प्रस्थापित केलेल्या संयुक्त राज्यव्यवस्थेच्या या पद्धतींत जे दोष होते ते होईल तितके काढून टाकण्याचा प्रयत्न बाळाजीनें वर सांगितलेल्या निरनिराळ्या उपायांनीं केला. बाळाजीची व्यवस्था पूर्वीप्रमाणेंच पुढेंही तशीच चालू राहिली व सर्व राज्यव्यवस्थेवर देखरेख व दाब ठेवण्यास मुख्य सरकार समर्थ झालें. या व्यवस्थेमध्यें फाटाफूट व -हास उत्पन्नं करणारीं बीजें होतीं, नव्हतीं असें नाहीं. पण जवळ जवळ एक शतकभर या बीजांची वाढ खुंटविली होती. माउंट स्टयूअर्ट एल्फिन्स्टन् आणि त्याचे मंदतनीस यांनीसुद्धां असें कबूल केलें आहे कीं या राज्यपद्धतींत जरी काल्पनिकदृष्टया फार दोष होते तरी वास्तविकपणें राज्यांत शांतता व भरभराट या पद्धतीनेंच झाली व मराठासाम्राज्याचा आसपासच्या राजेलोकांवर जो वचक बसला होता व त्यास त्यांचेकडून नो मानमरातब मिळे तोही या पद्धतीचाच परिणाम. हे जे प्रति--धक उपाय योजिले होते, त्यास हुजूरची परवानगी लागे व त्याशि-- त्यांचा अम्मल होत नसे, व म्हणून एकंदर बादशाही मुलखांत स्वर-- चौथाई व सरदेशमुखी हे हक्क मराठामंडळास आहेत अशी बादशा-- कबुली घेणें हाच बाळाजीचा मुख्य हेतु वे तो सफल करण्याकडे शेवटचें सर्व आयुष्य खर्च झालें. या बादशहाच्या कबुलीनें मर-- सत्तेस कायदेशीरपणा आला. ही कबुली मिळाली नसती तर कायदेशीर सत्ता व नुसतें सामर्थ्य यामध्यें भेद करणें शक्य झालें नसतें. बाळाजी विश्वनाथाच्या व्यवस्थापटु बुद्धीचें महत्कार्य तें हेंच व यामध्यें यश येण्यास जरी इतर पुष्कळ लोकांची मदत झाली तरी, हें कार्य मुख्यत्वेंकरून बाळाजीनें सिद्धीस नेलें, म्हणून मराठा साम्राज्याचा मुख्य संस्थापक शिवानी, याच्यानंतर गणना करितांना दुसन्या नंबरचा मान मिळविण्याचा हक्क बाळाजीसच चांगला प्राप्त होतो.

२) या मराठेमंडळास जखडून टाकणारें दुसरें बंधन म्हटलें म्हणजे, सरदारांपैकी कोणाचाही पक्ष शाहूनें न घेतां, जें न्याय्य दिसेल तेंच शहूराजा करी; या योगानें या मराठामंडळांत, सर्व जगाची सत्ता समतोल आहे, कोणी वरचढ नाहीं, असा जो समज झाला होता तो होय. बाळाजी विश्वनाथाचे वेळेस पेशवा जरी सर्व कायदेकानूच्या बाबतींत शाहूचा मुख्य मसलतगार असे, तरी त्याचा अधिकार म्हणजे एका लहानशा लष्करी अधिका-याचाच असे. पुढील दोन पेशवे जेव्हां बाकीच्या सरदारांपेक्षां आपणास जास्त लष्करी अधिकार मिळण्याविषयीं प्रयत्न करूं लागले, तेव्हां शाहूराजे मध्यें होऊन, एका बाजूस पेशवे व विरुद्धपक्षास पश्चिम किना-यांवर दाभाडे व गायकवाड व नागपूरकर भोसले यांच्यामध्यें बंगाल्यांत व गंगानदीच्या द-याखो-यांत ज्या लढाया झाल्या, त्यांमध्यें चाललेले या दोन पक्षांचे तंटे शाहूनेंच मोडले. पुढें जेव्हां शिंदे व होळकर यांचे आपसांत तंटे लागले व पेशवे, गायकवाड व भोंसले यांशीं कलह उत्पन्न झाले, तेव्हां ही समतोल सत्ता नष्ट होते कीं काय अशी भीति पडली; परंतु त्यावेळेस ही सत्ता राखण्याविषयी असेच प्रयत्न झाले. दाभाडे, त्याच्या मागून गायकवाड, खुद्द पेशवे व त्यांच्या हाताखालील लष्करी अधिकारी, तसेंच शिंदे व होळकर, पुढें पुढें, बुंदेले, विंचुरकर व पटवर्धन इत्यादि मंडळींनी शंभर वर्षे पर्यंत एका जुटीनें काम केलें. मनाची पक्की खात्री ही कीं, निरनिराळे सरदार एकमेकांच्या हक्कास मान देतील; त्यांच्यापैकीं एखादाच जास्त बलाढ्य झाला ह्मणने सर्वांचाच नाश होईल, तो या रीतीनें होणार नाहीं; ही त्यांची खातरजमेची गोष्ट कधींही खोटी ठरली नाहीं. परस्परांस मदत करण्याकडे व एकमेकांच्या हक्काविषयीं आदर बाळगण्याकडे झालेली प्रवृत्ति हीच या शंभर वर्षांच्या मराठासंघाच्या इतिहासांतील मुख्य मनोरंजक बाब होय. सर्व सरदार बरोबरीच्या नात्याचे आहेत, हें सनदा देऊन व तहनामें करून ठरवून टाकलें होतें, व बाळाजी बाजीरावाच्या वेळेस दिल्लीच्या बादशहाशीं जो प्रसिद्ध तह झाला, त्यावेळेस पेशवे यां दोन मुतालिक, आपले धन्यांनीं जर आपले तहाप्रमाणें वचन पाः । नाहीं, तर आपण पेशव्यांची नोकरी सोडूं. अशा अटीवर जामीन राहि-- होते. यावरून समतोल सत्ता होती हें सिद्ध होतेंच. तेव्हां सर्व-- हिताकरितां मराठा मंडळांतील प्रत्येक सरदारानें हें सत्तेचें तराजूं सम---- राखण्याविषयीं झटावें हाच या संघाचा हेतू होय. व पुष्कळ पिढ्यानपिढ्या हा नो मराठासंघ कायम राहिला तो या उमेदीवरच राहिला ( ३ ) याप्रमाणें मराठासंघास, वर सांगिल्याप्रमाणें पूर्वजांविषयीं पूज्यभाव व स्वदेशाभिमान या दोन ऐक्यंबधनाखेरीज निरनिराळ्या सरदारांनीं आपआपलीं कर्तव्यें योग्य रीतीनें बजाविलीं तरच त्यांत त्यांचा विशेष फायदा आहे असें त्यांना समजाऊन देऊन, त्यांचीं परस्पर बंधनें यांहीपेक्षां जास्त घट्ट करण्याची खबरदारी बाळाजी विश्वनाथानें घेतली. दिल्ली येथें त्यांच्या वकिलातीस यश येऊन महाराष्ट्रांत चौथाई व सरदेशमुखी। वसूल करण्याची बादशहाकडून परवानगी मिळाली, तेव्हां त्यानें या बाबी वसूल करण्याचें काम आपण स्वतः व शाहूच्या मंत्रिमंडळांपैकीं दोन बड़े सरदार यांमध्यें वांटून घेतलें–कीं अंतःकलहास लेशमात्र जागा मिळूं नये, म्हणून प्रतिनिधि, पेशवे व पंत सचिव यांचेकडे, त्यांच्या मुख्य ठाण्यांपासून फार दूर अशा निरनिराळ्या मुलखांत ह्या राजकीय बाबी गोळा करण्याचें काम सोंपविलें व हेंच तत्व ध्यानांत ठेऊन दक्षिणेंतील सुम्यांच्या हद्दीबाहेरच्या मुलुखांत चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यांत आली. सर्वांचें जें हित आहे, त्यांतच प्रत्येकाचें हित आहे, अशा तत्वांवर अधिकाराची वांटणी केली होती. ( ४ ) मोठमोठ्या लष्करी अंमलदारांच्या इनाम व वतन जमिनी खुद्द महाराष्ट्रांतच होत्या. सबब त्यांच्या छावणीपासून दूर अंतरावर असणा-या पिढीजाद जंगम जिनगीवर त्यांची आसक्ति होती, यायोगानें ते स्वामित्वास जागे राहतील असें खचितच झालें होतें. (५) या शिवाय, सर्व लष्करी अधिका-यांनीं सरकारी खजिन्यांत आपआपले पक्के हिशेब द्यावेत असा त्यांना हुकूम झाला होता. याकरितां एक मोठें फडणीसखातें नवीन केलें व त्या खात्याकडे सर्व हिशेब तपासणीस जाउन तेथें ते --डून पाहिले जात असत. ( ६ ) मुख्य तिजोरी व हिशेबखातें --रीन करून फौजेंतील व किल्ल्यांतील प्रत्येक लहान मोठ्या अधिका-याचे हाताखालीं कांहीं कामगार नेमले होते त्यांनीं, या अधिका-या- -- डून आलेले हिशेब तपासून वार करावयाचे व शेवटीं हिशेब पक्के करण्यास वरिष्ठाकडे पाठवित तेव्हां कोठें चूक निघाल्यास मुख्य सरकारास त्यांना जबाबदार धरतां येई. याप्रमाणें प्रत्येक अंमलदाराकहे मुख्य सरकारचे प्रतिनिधि असून कोठें अव्यवस्था झाल्यास किंवा तक्रार झाल्यास त्यांनीं ताबडतोब सरकारास वर्दी द्यावयाची. या अधिकरिवर्गास दरकदार म्हणत. बड्या सरदाराकडे असलेल्या दरकदारास दिवाण, मुजुमदार, फडणीस इत्यादि किताब होते व इतर किल्ल्यांतील छोटेखानी अंमलदाराकडे जे असत त्यांना सबनीस, चिटणीस, जमीदार व कारखाननीस असें ह्मणत. यांचें काम म्हटलें म्हणने फक्त हिशेब तपासून वार करणेचें. स्थानिक लष्करी अधिका-यांचे हिशेब तयार करण्याचें काम फक्त यांच्याकडेच असून त्यांना कामावरून दूर करायचें झालें तर मुख्य अधिकारी यांची मंजूरी लागत असे.

ही बाळाजीची कल्पना चांगली फलद्रूप झाली हें, तिचा मुख्य हेतु सिद्धीस गेला एवढेंच नव्हे तर अति कठीण स्थिति प्राप्त झाली असतांही शंभराहून अधिक वर्षे ती कल्पना सुरळीतपणें अमलांत आली यावरून सिद्ध होतें. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड, ओरिसा, गोंडवण, नेमाड व खालीं तुंगभद्रपर्यत कर्नाटक प्रांत हे जिंकण्यास मराठे समर्थ झाले, तें ह्या कल्पनेमुळेंच. राजपुतान्यांतील सर्व संस्थानांवर तसेंच दिल्लीदरबारावर देखील दाब ठेवण्यास त्यांना मदत होऊन, राष्ट्राच्या हितास साधेल तेव्हां बादशहास ते गादीवर बसवीत किंवा पदच्युत करीत. इकडे सिंधुनदाच्या तीरापर्यंत मराठ्यांनी आपला मार्ग काढिला, तर पूर्वेच्या बाजूस अयोध्या, बंगाल व ओरिसा येथील नवाबांस आपल्या कह्यांत ठेऊन, हैदराबाद येथील निजाम, सावनूरचा व कर्नाटकचा नवाब, पुढें हैदर व टिप्पु यांच्या देखील मुलखाची सरहद्द पुष्कळ मागें ढकलली. पोर्तुगीन लोकांस वसईतून हांकलून देऊन इंग्लिशांबरोबर दोन जोराच्या लढाया केल्या. पानिपत येथील सर्व महाराष्ट्रास जमीनदोस्त करणा-या पराभवास न जुमानतां दिल्ली व उत्तर हिंदुस्थान यावर पुनः त्यांनीं आपला झेंडा रोंवला व एक शतकभर टिकाव धरून नंतर मराठ्यांचें राज्य लयास गेलें. याचें मुख्य कारण असें कीं, मराठ्यांचें साम्राज्य अगदीं भरभराटींत असतांना सर्व मराठामंडळ ज्या तत्त्वां -- वागत असे ती सर्व तत्वें पार नाहींशीं होऊन प्रत्येकजणानें फक्त अ --- लेंच हित साधावें, दुस-याचें कसें का होईना इत्यादि क्षुद्र क --- लोकांच्या डोक्यांत शिरल्या. या शंभर वर्षात मराठ्यांनीं ज्या ल--- मारल्या व जे नवीन मुलूख काबीज केले, त्यावरूनच ही मरा --- जूट कायम होती असें दिसतें. पूर्वीप्रमाणें अष्टप्रधान असं --- मराठा साम्राज्याचा हा विलक्षण विस्तार कधींच होताना.

एवढें खरें कीं, असल्या प्रचंड शक्तीच्या ठिकाणीं देखील दौर्बल्य आणणारें एक उत्पत्तिस्थान होतें. व तें बाळाजी विश्वनाथ, त्याचे उपदेशक, व त्यांचे वंशज यांना पूर्णपणें माहीत होते. मराठ्यांची जुट होती खरी, पण जर या जुटीस स्वदेशाभिमान व स्वपूर्वजाभिमान यांचें बंधन नाही, तर ती जूट ह्मणने एक वालुकामय रज्जूच होय. अशी स्थिति असतांना बाळाजीनें जरी राज्यकारभार अंगावर घेतला होता, तरी अंतर्दोषाकडे त्याचें दुर्लक्ष नव्हतें. हा बाळाजीच्या अंगचा विशेष गुण होता. अष्टप्रधानमंडळ पुनः अस्तित्वांत आणणें शक्य नव्हतें, तेव्हां राज्यव्यवस्थेमध्यें अवश्य फेरफार करावा लागल्या कारणानें जे दोष होतील ते जितके कमी होतील तितकें करणारें एक नवीन ऐक्यबंधन. उत्पन्न करण्याचा त्यानें प्रयत्न केला. या त्याच्या नवीन व्यवस्थेचें ठोकळ स्वरूप येणेंप्रमाणें होतें :-( १ ) हे मराठा मंडळ जें एके ठिकाणीं बद्ध झालें होतें, तें शिवाजीचे पराक्रम व त्याचा नातू शाहू याच्याविषयीं.असलेला लोकांचा पूज्यभाव या योगानें शाहू राजा चाळीस वर्षेपर्यंत सत्ताधीश होता. या काळांत सर्व प्रजेची त्याच्यावर प्रीति असे व त्याची सर्वाला काळजी असे. या जुटींतील लोकांना खच्चून आवळून टाकणारें हेंच बंधन व तें जास्त घट्ट करण्याचा बाळाजीनें पुष्कळ प्रयत्न केला. प्रत्येक मुलकी व लष्करी अधिका-यास जी सनद देत, ती शाहू राजाचे नांवें देण्याचा त्यानें परिपाठ घातला. व जे मान मरातब, व पदव्या लोकांना मिळत तें सर्व शाहूच्या हुकूमानेंच. नाणें पाडलें ते शाहूच्या नांवाचेंच. व तह करा--याचा झाल्यास, त्याच्या सहीनेंच व्हावयाचा व कोठें स्वारी करणें झाल्यास -- शाहूस वर्दी द्यावी लागे. याप्रमाणें शाहूस श्रेष्ठस्थान दिलें होतें.

मराठ्यांच्या साम्राज्याची जसजशी वाढ होत गेली, तसतसा शिवाजी गादीवर बसला तेव्हां त्यानें जी राज्यव्यवस्था केली होती तींत बराच फेरफार करावा लागला. प्राचीन अष्टप्रधान किंवा मंत्रिमंडळ व त्याची व्यवस्था काय असे त्याबद्दल ठळक ठळक गोष्टी मागील एका भागांत सांगितल्याच आहेत. संभाजीच्या अव्यवस्थेमुळें व औरंगजेबानें पुढें । दक्षिण जिंकिल्यामुळें ही शिवाजाची राज्यव्यवस्था बहुतेक नष्टप्रायच होती. जिंजी येथील दरबारांत ती व्यवस्था सुरू करण्याचा राजारामानें प्रयत्न केला; परंतु लढाईमुळें उत्पन्न झालेल्या कष्टमय स्थितींत ही व्यवस्था पूर्वीच्या पद्धतीवर चालणें शक्य नव्हतें. सध्याच्या प्रसंगीं मुलकी किंवा लष्करी सामर्थ्यवान् पुरुषाच्या हातांत सर्व सत्ता देणें भाग होतें व कांहीं झालें तरी असें करणेंच जरूर होतें. जिंजीस वेढा पडला होता, तेव्हां बहुतेक सर्व कामांत प्रल्हाद निराजीच मसलत देत असे व त्याच्या मरणानंतर राजाराम दक्षिणेंत आल्यावर युद्धाच्या घोर काळजीनें त्याला इतकें घेरलें होतें कीं, युद्ध संपले तेव्हां अष्टप्रधान प्रायः अस्तित्वांतून गेले होते. सातारा मुक्कामीं शाहू राजे सिंहासनावर बसल्यानंतर, हें अष्टप्रधानमंडळ पुन: प्रस्थापित करण्याविषयीं प्रयत्न झाला होता; परंतु बदललेल्या परिस्थितीस योग्य अशी ही अष्टप्रधानाची व्यवस्था नव्हती. शिवाजीनें अष्टप्रधान नेमिले ते मोठ्या दूरदर्शीपणानेंच नेमिले होते यांत कांहीं संशय नाहीं ; परंतु ते नेमण्याच्या आधीं राज्य चांगलें सुव्यवस्थित होतें. परंतु राज्य जर असें सुरळीतपणें चालत नसलें, तर ही प्रधानमंडळाची व्यवस्था पूर्वी घालून दिलेल्या तत्वांवर चालू राहणें शक्य नव्हतें व शाहूच्या अंगीं तर शिवाजीच्या अंगचे गुण नसून शिवाजीनें केलेल्या हरएक व्यवस्थेमध्यें असा सर्व वर्गातील लोकांचा विश्वास बसे, तसा विश्वास उत्पन्न करणेंही शाहूच्या हातून होईना. शिवाय मर्यादित सीमेच्या लहानशा राज्यांत हें प्रधानमंडळ चांगलें काम करूं शकते; परंतु लढाई होऊन मराठे जेव्हा नर्मदेपासून कावेरीपर्यंत सर्व देशभर पसरले व मराठे सरदार, मोंगलां --- सत्तेनें वेष्टित अशा निरनिराळ्या ठिकाणीं आपलीं ठाणीं ठेऊन रा --- तेव्हां त्यांना अनुकूल अशी स्थिति जाऊन अष्टप्रधानाची व्य --- सहजच नष्ट झाली. बाळाजी विश्वनाथाच्या हें चटकर ध्यानांत ---- व प्राप्त झालेल्या परिस्थितीस योग्य असें तो वागूं लागला. साता-या शाहूच्या दरबारांत प्रधानमंडळास अजून मान मिळत असे; परंतु वास्तविक सत्ता व अधिकार त्यांच्या हातांत फक्त नांवाला मात्र राहिले होते. दाभाड्यांचे सैन्यानें खानदेशांत काय काय करावें याची व्यवस्था या प्रधानांनी करावयाची ; व-हाडांत भोंसल्यानें जिंकिलेल्या मुलुखाची कशी व्यवस्था लावायची हें त्यांनीं ठरवायचें व खुद्द महाराष्ट्राचे बाहेर पूर्वेस व दक्षिणेस मोंगलांशीं युद्ध यांनीच चालवायचें; तरी पण खरोखर पाहिलें तर ते केवळ नामधारी मंत्री होते. महाराष्ट्रांत एकमेकांपासून अलग राहण्याची प्रवृत्ति नेहमीं जोरांत होतीच. तशांत लढाई व लढाईचे परिणाम यांनीं त्या प्रवृत्तीस विशेष बळकटी आणिली, व ज्या गुणांनी यश नक्की यायचेंच असें ठरलेलें, त्या गुणांचा -हास होऊं लागला. बाळाजी विश्वनाथाचे लवकरच घ्यानांत आलें कीं, एक जुट करून परराष्ट्रांशी टक्कर देण्यास, शिवाजीनें मिळविलेल्या कीर्तीमुळें, एके ठिकाणीं जमलेल्या सर्व सरदार मंडळीचा एकोपा केला तरच कांहीं उपयोग होईल; परंतु खुद्द देशामध्यें अंतर्व्यवस्था व अधिकार या बाबतींत एक दर्जाचे व समान अधिकाराचें मंडळ असावें. असें केलें तरच नैसर्गिक व प्रांतिक सीमा ओलांडून निरनिराळ्या भागांत आपआपल्या हिमतीवर ठाणीं देऊन राहिलेल्या सरदार मंडळीची एकी करितां येणे शक्य होतें. खुद्द महाराष्ट्र देश चोहों बाजूंनीं सावनूर, हैदराबाद, गुजराथ व माळवा इत्यादि ठिकाणीं असलेल्या मोंगल सुभेदारांनीं वेष्टित झाला होता व पश्चिम किना-याकडे सिद्दी, पोर्तुगीज व इंग्लिश यांचा सारखा सुळसुळाट सुरू होता. ठिकठिकाणीं पसरलेल्या मराठे लोकांच्या छावण्या एके ठिकाणीं करून सर्व अधिकार लायख मनुष्याच्या हातांत दिला तरच शत्रूला दूर राखितां --णें शक्य होतें. आपआपल्या मुलखांतील सर्व अंतर्व्यवस्थेचे अधि--र जर आपणाकडे दिले, तरच आपण राष्ट्राच्या हिताकरितां एके --- मणी नमूं, व एकाचें हित तेंच सर्वांचें हित असें मानून एक जुटीनें --- व उढूं, असें ते म्हणत व तसेंच त्यांनी केलें, व जोंपर्यंत पूर्वी मिळविलेल्या कीर्तीमुळें त्यांच्यामध्यें उत्साह होता तोंपर्यंत ही एकी कायम राहील अशी खात्री होती. बाळाजी विश्वनाथ व त्याचे मदतनीस यांना हीच स्थिति बरी वाटली व आतां अष्टप्रधानव्यवस्था मोडून मराठामंडळ स्थापन झालें व पुढें शंभर वर्षेपर्यंत सर्व हिंदुस्थानभर हें मराठामंडळ करील ती पूर्व दिशा अशी स्थिति झाली होती.

याप्रमाणें राज्यांतील लहान सहान बखेडे मोडल्यावर आपले धनी शाहूराजे व बडे मराठे संस्थानिक या दोघांमधील परस्पर संबंध सुधारण्याकडे बाळाजीनें सर्व लक्ष घातलें. युक्तिप्रयुक्तीनें, किंवा युद्धानें ते शाहूच्या ताब्यांत येणारे नव्हते, इतके ते बलाढ्य होते. तेव्हां त्यांना थैल्या पाठवून “चांगला विचार करा" असा त्यांत त्यानें बुद्धि--द केला. त्यांच्या स्वभावाची उदात्त बाजू घेऊन तिचा गौरव --रून विज्ञप्ति केली होती. त्यांचे सर्वाचे जे हितसंबंध ते सर्व मराठा--- ळाचे हितसंबंध असें त्यांना दाखऊन दिलें. जूट करून राहिल्यास --च्यासारखें बलाढ्य व सत्ताधीश दुसरे कोणी नाहींत, पण जर कां --नी आपल्या बांधवापासून तुटून राहण्याचा हट्ट धरिला, तर त्यांपासून केवढा धोका आहे, हेंही त्यांना समजाऊन दिलें. बुद्धिवादापासून इच्छित हेतु सफल झाला. याचें सर्व श्रेय या पुढारी मंडळासच दिलें पाहिजे. चंद्रसेन जाधवराव व निंबाळकर यांनी मोगलाचा आश्रय धरून ते या कटापासून अलग राहिले, हें खरें, परंतु खंडेराव दाभाडे, उदाजीराव पवार, परसोजी भोसले तसेंच शाहू राजाचे सत्तेस पाठबळ देण्याचें धैर्य करणारी इतर सरदार मंडळी यांच्यावर त्या बुद्धिवादाचा चांगला परिणाम झाला. बाळाजीनें कांहीं युक्ति लढवून या सरदारमंडळींचीच नव्हे, तर पूर्वीच्या अष्टप्रधान मंडळांतील मुख्य पंतसचिव व पंतप्रतिनिधि यांचीही अशी खात्री करून सोडली कीं, सर्वांचे हेतू एकच आहेत व सर्वांनीं जूट करून राहिलें, तरच फायद्याचें आहे. शाहूरानाच्या कारकीर्दीच्या प्रारंभीं तसेंच युद्धामध्येंही खंडेराव दाभाडे यांनीं जी महत्वाची कामगिरी बजाविली, तीबद्दल ‘सेनापति' हा हुद्दा त्यांना मिळाला. त्याचप्रमाणें परसोजी भोंसले यांचाही मान होऊन त्यांना 'सेनासाहेब सुभा' अशी पदवी मिळाली. या सरदारांनी खानदेशांत व व-हाडांत जीं ठाणीं मिळविलीं होतीं ती त्यांच्याकडेच स्वतंत्रपणें ठेवण्यांत आली. व त्यांना आतां पश्चिमेस गुजराथ व पूर्वेस गोंडवण ह्या प्रांतांत स्वा-या करून यश संपादन करण्यास सररास परवानगी झाली. त्याच प्रमाणें उदाजी पवारांच्या महत्वाकांक्षारूपी पाण्याच्या ओघास माळव्यामध्यें मार्ग मिळाला. या तीन बड्या सरदारांना असेंही वचन मिळालें होतें कीं, जर ते मुख्य सरकारांशीं सलोख्यानें वागून आपली सर्व फौज एके ठिकाणीं करतील, तर त्यांनीं मिळावलेले हक्क कायदेशीर आहेत अशाबद्दलची कबुली दिल्लीचे बादशहापा-- सुद्धां मिळवितां येईल. अक्कलकोट येथील फत्तेसिंग भोंसले यां --दक्षिणेंत कर्नाटकांत प्रांत जिंकायाकरितां जें शाहूचें सैन्य तयार होतें, त्या सैन्याच्या नायकत्वाच्या जागी नेमणूक झाली. दोघे -- निधि, बापलेक यांपैकी एकानें लढाईत नांव गाजविले होतें व -- -यानें कोल्हापूरकराबरोबर जे तटे चालले होते त्यामध्यें कीर्ति .. विली होती, खटाव महाराज व कोंकणांतील सिद्दी, या चौघांचे ताब्यांत वारणा व नीरा या नद्यांमधील मुलूख देऊन त्यांचाही सन्मान केला होता. कान्होजी आंग्यांना मराठी साम्राज्याचे नौकानायकत्व देण्यांत येऊन, कोंकणांतील किल्ले पूर्वीप्रमाणेंच त्यांच्या ताब्यांत रहावेत, असें ठरलें. गोविंदराव चिटणिसांनींही युद्धांत कर्तव्य बजाविलें होतें, तेव्हां त्यांनाही लष्करी अधिकार देण्यांत आला. याप्रमाणें मोठमोठ्या सरदारांमध्यें सर्व सत्ता व अधिकार वांटले गेले व बाळाजी विश्वनाथ मात्र शाहूचा मुख्य मुलकी मसलतगारच राहिला. यांतच त्याला समाधान वाटे. नाहीं म्हणावयाला, खानदेश व बालघाट या दूरदरच्या प्रांतांत जे शाहूचे हक्क होते, त्यांवर मात्र बाळाजीचा लष्करी अंमल चाले. परंतु यापासून अधिकारप्राप्ति किंवा द्रव्यप्राप्ति कांहींच होत नसे. हा सुप्रसिद्ध स्वार्थत्याग बाळाजीच्या अंगचा विशेष गुण होय व राष्ट्राचें संरक्षण व उन्नती करण्याकरितां सर्व सरदार लोकांची एकी करण्याचा जो घाट त्यानें घातला होता, त्यांत यश येण्यास या त्याच्या अंगच्या गुणाचा फारच उपयोग झाला. या स्वदेशाभिमानानें केलेल्या प्रयत्नांचा असा परिणाम झाला कीं, शाहूची नोकरी . धरल्यापासून दहा वर्षांच्या आंतच राष्ट्रामध्यें ऐक्य उत्पन्न करण्याचें, व मराठी साम्राज्याचे तुकडे तुकडे होतात की काय, अशी भीति उत्पन्न करणारीं परस्परांमधील फुटीची कारणें नाहींशीं करण्याचें श्रेय बाळाजीनेच घेतलें. तेव्हां स्वार्थांकरितां लढणारे मोंगल सुभेदार व दिल्ली येथील बडेबडे, वजीर, पूर्वी शिवाजी व त्याचे सरदार यांना जो मान . देत, तोच मान आतां शाहू राजासही देऊं लागले, यांत कांहीं नवल नाहीं. व लवकरच दिल्ली येथील नाखूष झालेल्या लोकांचे तट आपभापलें हित साधण्याकरितां शाहूचीच मदत मागू लागले.

शाहूराजे सिंहासनारूढ झाले त्यावेळीं महाराष्ट्राची वर लिहिल्याप्रमाणें स्थिति असल्यामुळें त्यांच्या मंत्रिमंडळास या स्थितीशींच टक्कर द्यावी लागली. बाह्यात्कारी यश येऊन जरी लढाई संपली होती, तरी लढाई संपल्यानंतरही जी अव्यवस्था व अस्वस्थता गाजून राहिली तींत लढाईच्या खुणा सुरेख रीतीनें स्पष्ट दिसत होत्या. पूर्वीसारखी सता व पूर्वीसारखें सामर्थ्य आतांही होतेंच; पण पूर्वी लढाईचा दाव अंगावर पडला तेव्हां सर्वांचे हेतु एक अशी प्रोत्साहक बुद्धि उत्पन्न झाली व सर्व लोक एकवट होऊन ज्याप्रमाणें लढाईचा भार सोसण्यास तयार झाले, तशी प्रोत्साहक बुद्धि मात्र यावेळीं अस्तित्वांत नव्हती. शाहूच्या आयुष्यांतील उत्तम दिवस कैदेंतच गेले व अलीकडे अलीकडे ही कैद जरी त्यास त्रासदायक नव्हती, तरी लहानपणापासून मुसलमान सरदारांत वाढल्यामुळें, त्यांच्या चैनीच्या संवयी शाहूस लागल्या होत्या. त्याच्या बापाच्या व आजाच्या अंगांत खिळून गेलेला मोंगलांविषयींचा द्वेषभाव शाहूच्या अंगीं नव्हता. व “ मोंगल बादशाहींतील आपण एक बडे उमराव आहोंत " इतका मान जर मोंगलांनी आपणासही दिला, तर आपण तह करण्यास राजी आहोंत असें ते म्हणे. शाहूच्या अंगीं मोठें शौर्य असून त्याचें डोकें तरतरीत व अंतःकरणही मायाळू होतें. परंतु अव्यवस्था झाली असतां ती मोडून जिकडे तिकडे शांतता व स्वस्थता करण्यास समर्थ अशी जी व्यवस्थापक बुद्धि व असामान्य कर्तृत्वशक्ति त्याच्या आजाच्या ठिकाणीं होती, ती मात्र "शाहूच्या अंगीं। मुळींच नव्हती. महाराष्ट्रांतील थोडे डोंगरी किल्ले खेरीजकरून बाकी सर्व किल्ले मोंगल सुभेदारांच्या ताब्यांत अजूनपर्यंत होतेच. व त्यांची फौज, एकदां पराभव झाला होता तरी अजून समरांगणांत उभी राहण्यास सज्ज होती. अशी परिस्थिति असल्यामुळें एखादे नवीन कारस् -- रचून आपल्या स्वतःच्या हिंमतीवर यश संपादन करूं, इतका -- पणा त्याच्या प्रकृतींत किंवा स्वभावांतही नव्हता. अशा वेळेस --- अत्यवश्यक असणारी दूरदृष्टि शाहूच्या सैन्यावरील इतक्या--- का-यांपैकीं एकाच्याही अंगांत नव्हती. प्रथम प्रथम तर कांह--- असें वाटूं लागलें की, झुलफिकारखानाचे सर्व बेत खास सिद्धीस जाणार. परस्पर मत्सर व गैरसमज यायोगें फाटाफूट झाल्यामुळें, मराठ्यांची जुट मोडली व त्यांचे कांहींच वजन बसेनासें झालें. अशा वेळेस कांहीं धुरंधर व कल्पक डोकीं पुढें सरून शाहूच्या सुदैवानें, ते राज्यारुढ झाल्यावर थोडक्याच वर्षीत, त्यांनीं त्यांचें लक्ष्य जर वेधून घेतलें नसतें, तर जो मोठा सुप्रसंग आला होता, तो जशाचा तसाच व्यर्थ गेला असता. नुसतें सामर्थ्य व धाडस यांची त्यावेळेस मुळींच उणीव नव्हती. उलट पाहिजे त्यापेक्षां तीं जास्तच होतीं. अगदीं अवश्यक म्हटले म्हणने राज्या मध्यें व्यवस्था, दूरदृष्टि, स्वदेशाभिमान, प्रसंग पडेल तसें वागण्याचें चातुर्य, विरोध उत्पन्न करणारीं पण परस्पर विघातक अशा कारणांमध्यें समता उत्पन्न करून आत्मोत्कर्षासारखें आपगतलबाचें कृत्य करण्याकडे त्यांचा उपयोग न करितां, पन्नास वर्षांपूर्वी महात्म्या शिवाजीनें आपल्या देशबांधवांस दिलेला दायभाग, जीं हातीं धरलेलीं गहत्कृत्यें ती शेवटास नेण्याच्या कामीं त्या कारणांचा उपयोग करण्याचा दृढनिश्चय-या गोष्टींचीच फार जरूर होती. या समयास पुढें आलेल्या लोकांपैकीं बाळाजी विश्वनाथ होता; महाराष्ट्रांत ज्या गुणांची उणीव होती ते गुण त्याच्या अंगी असल्यामुळें लवकरच सर्व लोक त्यास मान देऊं लागले. व त्या मानास ते योग्य होताही. बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधवाच्या पदरीं कारकून होता. पुरंदरे घराण्याचा मूळ पुरूष आबाजी पुरंदरे या नांवाच्या कारकुनानेंच बाळाजी विश्वनाथास तेथें जोडून दिलें होते. हेच दोघे कारकून एक देशस्थ व एक कोंकणस्थ-धनाजी जाधवास सर्व बाबतींत सल्ला देत असत. शिवाजीचा मुलूख व त्याची सत्ता यांची योग्य व्यवस्था _लावण्यांत दक्षिणी ब्राह्मणांनीं पहिल्यापासूनच मोठा महत्वाचा भाग आपल्या -- शेरावर घेतला होता, व हणमंते, पिंगळे, आबाजी सोनदेव, प्रल्हाद ---राजी इत्यादि पुष्कळ लोकांनी आपलें युद्धकौशल्य व रणशूरत्व --- खविलें होतें. कोंकणांतील ब्राह्मण लोक मात्र मराठी साम्राज्य--द्वीच्या पहिल्या साठ वर्षांत अगदींच पुढें आले नाहींत. परंतु आतां ---ची बुद्धिमत्ता व महत्वाकांक्षा दाखविण्याचे जे सुयोग जुळून आले, त्या योगानें त्यापैकीं श्रेष्ठ लोकांचीं मनें आकर्षिलीं जाऊन देशसेवा करून नशीबाची परीक्षा पहावी ह्मणून पुष्कळ लोक आपलीं कोकणांतील घरें सोडून देशावर आले. त्यापैकींच बाळाजी विश्वनाथ व त्याचा स्नेही भानूघराण्याचा मूळपुरूष--जंजि-याच्या शिद्दीच्या जुलमास त्रासून जो कोंकण सोडून गेला होता, तो-- हे होते. शाहूची सुटका होऊन तो दक्षिणेंत आला त्या वेळेस त्याला प्रतिबंध करावा म्हणून ताराबाईनें धनाजी जाधवास पाठविलें, तेव्हां त्याचे बरोबर बाळाजी विश्वनाथ व आबाजी पुरंदरे हे दोन कारकून होते. धनाजीनें मरणापूर्वी नवीन राजे शाहू छत्रपति यांचे जवळ आपल्या विश्वासु कारकुनाची शिफारस केली होती. बाळाजी विश्वनाथ शाहूस चांगली मसलत देत असे, ह्मणून तो लवकरच मुख्य प्रधान होऊन बसला. त्याला मुख्य प्रधान असा हुद्दा दिला नव्हता, तरी मुख्य प्रधानाची सत्ता त्याकडे होती. व जेव्हां पूर्वीचे पेशवे बहिरोपंत पिंगळे यांची मसलत शाहूस पसंत न पडून ते मर्जीतून उतरले तेव्हां शाहूनें बाळाजी विश्वनाथास पेशव्याची जागा दिली. आपली बुद्धि व स्वदेशभक्ति या योगानें, एरव्हीं अगदी साध्य होण्यास अशक्य म्हणून जें कृत्य वाटत होतें, ते कृत्य जर कोणी सिद्धीस नेण्याचें पुण्य पदरीं जोडलें असेल, तर तें बाळाजी विश्वनाथानेंच. पहिल्या प्रथम बाळाजीनें पूर्वीसारखी देशांत व्यवस्था करण्याकडे आपले सर्व लक्ष दिलें. लुटारू पेंढारी लोक अत्यंत बेकायदेशीर वर्तन करीत व त्या वर्तनानें त्यांनी देशांत अगदीं भीति उप्तन्न केली होती, त्या बेकायदेशीर वर्तनास बाळाजीनें कायमचा आळा घातला. परशुराम त्रिंबकांचे चिरंजीव शाहू राजाचे नवे प्रतिनिधी यांनीं ब्राह्मण लुटारु, खटाव, याचा मोड केला. ताराबाईच्या पक्षाचा पूर्वीचा सचिव याच वेळेस मयत झाला. त्याचा मुलगा अज्ञान असून त्याची आई सर्व व्यवस्था पाहत असे. महाराष्ट्राच्या संरक्षणाकरितां बाळाजी विश्वना-- जें सैन्य जगवीत होता, त्यास येऊन मिळण्यास बाळाजीनें तिचें म-- वळविलें. थोरात नांवाच्या पुंड लुटारूवर बाळाजी विश्वनाथानें हा-- केला; परंतु बाळाजीच्या कमनशीबानें कांहीं विश्वासघात होऊन -- पकडला गेला. तेव्हां खंडणी देऊन शाहूस त्याची सुटका करावी लागली. सचिवाची फौज थोरातावर पाठविली, परंतु तिनें माघार खाल्ली. तरीपण शेवटीं बाळाजीनें पराभव करून त्याचा किल्ला जमीनदोस्त केला. चव्हाण सरदारास कांहीं सवलती देऊन त्यास गप्प बसवावें लागलें. पुरातन पेशवे बहिरोपंत यांनीं कान्होजी आंग्र्याशीं बोलणें चालविलें होतें, त्याचा कांहीं एक उपयोग झाला नाहीं. तेव्हां बाळाजीस तें काम फत्ते करण्याकरितां पाठवून दिलें. स्वदेशाभिमान राखिला पाहिजे असें बाळाजीनें कळकळीनें बोलणें ऐकून आंग्याचें मन वळलें व त्यानें ताराबाईचा पक्ष सोडला. याच सुमारास कोल्हापूरचे राजे मृत्यू पावले व राजाराम महाराजाच्या धाकट्या पत्नीचे अज्ञान चिरंजीवास गादीवर बसविलें. ही उलाढाल घडून येण्यास राज्य क्रांति व्हावी लागून, तीमध्यें ताराबाई अधिकार प्रष्ट होऊन पूर्वीचे पंतसचिव रामचंद्रपंत यांनी तिला अटकेंत ठेविलें. बाळाजी विश्वनाथ व त्याचे मदतनीस यांनीं शाहू राजाच्या नोकरींत राहून त्यांनीं त्याला वेळोवेळीं जो सल्ला दिला, त्या सल्ल्यापासून राष्ट्रांतील सर्व अव्यवस्था मोडली जाऊन सुधारणा होत गेली, असें हरएक गोष्टींत शाहूस दिसून आलें.

घोंटाळा मोडून व्यवस्था कशी केली ?
प्रकरण १० वें.

मागील भागांत सांगितल्याप्रमाणें, राष्ट्रीय स्वातंत्र्यार्थ वीस वर्षे चाललेल्या या युद्धाच्या शेवटीं, शाहू राजाची मोंगलांच्या छावणींतून सुटका झाली, व तो दक्षिणेंत आला. सर्व मराठे लोकांनीं त्यास आपला राजा असें कबूल केलें. ‘ महाराष्ट्रांतील सर्व लोकांची एकी करावयाची ' याबद्दल शिवाजीनें सुरू केलेला प्रयत्न सिद्धीस नेण्याचा शाहूनेंही बेत केला. मोंगल बादशहाच्या त्या प्रचंड सैन्याबरोबर लढाई जुंपण्यांत जे मुख्य हेतू होते, ते आतां सिद्धीस गेले असें जरी म्हणतां येईल, तरी या लढाईपासून मराठ्यांच्या प्रमुख सरदारांच्या डोक्यांत मयंकर वेडगळ कल्पना शिरल्या. प्रत्येकास असें वाटे कीं, आपण लढलों तें फक्त सापल्या हिताकरितांच. आपण मिळविलेलें स्वातंत्र्य घालवून आपण --णाचेंही चाकर होणार नाहीं. यायोगानें लढाई संपली, तरी मागें ---ळा व बेबंदशाई चालू राहून पुढें कांहीं वर्षेपर्यंत देशांत व्यवस्था ताब्य--- शांतता होणें अगदींच अशक्य असें दिसून आलें. एकाचें कार्य --- सर्व लोकांचें कार्य, अशा बुद्धीनें सर्व प्रमुख सरदारांनीं एक जुटीनें लढाई चालविली; परंतु बादशहाच्या सैन्याचा पराभव होऊन शेवटीं औरंगजेबही मरण पावला. तेव्हां आधींच एकमेकांशी तुटकपणानें वागंणारे हे स्वदेशभक्त पुढारी यांच्या मनावरचा दाब नाहींसा होऊन एकजुटीनें काम करण्याची त्यांची इच्छाही नाहीशी झाली. शाहूस कैदेंतून सोडून दिलें तें सर्व मराठे लोकांना बरें वाटावें म्हणून, असें वाह्यात्कारी दर्शवून, आंतून तर शाहू महाराष्ट्रांत आला ह्मणने लोकांत विरोध व कलह आपोआपच उत्पन्न होतील, असा हेतू मनांत धरूनच औरंगजेबाच्या सल्लामसलत गारांनीं शाहूची सुटका करण्याविषयीं बादशहास कानमंत्र दिला असावा असें दिसतें. शाहू परत आला तेव्हां राजारामाच्या हाताखाली नोकरी केलेल्या व नंतर ताराबाई व तिचा मुलगा यांचा पक्ष उचललेल्या पुष्कळ लोकांनीं शाहूचें नुसतें स्वागतही केलें नाही. पंत सचिव व पंत अमात्य शाहूपासून अगदीं अलग राहिले. जुन्या पुढारी मंडळापैकीं ताराबाईचा पक्ष सोडून देणारे प्रसिद्ध सरदार म्हटले म्हणजे धनाजी जाधव हे होत. धनाजी जाधवाला शाहूच्या आगमनास प्रतिबंध करण्याकरितां पाठविलें होतें; परंतु शाहूराजाचा गादीवर हक्क जात अशी खात्री झाल्यावरून त्यानें शाहूबरोबर समेट केला. धनाजी जाधवाचा कट्टा प्रतिस्पर्धी संताजी घोरपडे याच्यावर म्हसवडचे माने देशमुख यांनी क्रूरपणानें हल्ला करून त्याचा खून केला होता. त्याचे तीन मुलगे कर्नाटकांत मोंगलांशी आपल्याच हिताकरितां लढाई सुरू ठेवण्याच्या खटपटींत होते. शाहू सत्ताधीश झाल्यावर धनाजी जाधव फार दिवम वाचला नाही. त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव हा फार स्वच्छंदी असल्यामुळें या स्वातंत्र्ययुद्धांत त्याच्या बापास ज्या उदात्त विचारांमुळें सर्व राष्ट्रीय सैन्याचा पुढारीपणा प्राप्त झाला होता त्या उदात्त विचारांचा ह्या त्याच्या मुलावर कांहींच अंमल झाला----पुढें प्रसिद्धीस आलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याबरोबर ----- शिकार करीत असतां कांहीं क्षुल्लक कारणांवरून दोघांचा तंटा---तेव्हां चंद्रसेन जाधव, आपल्या धन्याची नोकरी सोडून को----गेला, व नंतर तेथून हैदराबादेच्या निजामाच्या पदरी राहिला. तर---- अर्थात् च त्याच्या कर्तबगारीचा महाराष्ट्रास कांहींच फायदा मिळाला नाहीं. इतर पुढारी मंडळीपैकी खंडेराव दाभाडे गुजराथेवर स्वारी करण्याच्या हेतूनें खानदेशांत सैन्याची जमवाजमव करीत होते. राजारामाचा एक प्रमुख प्रतिनिधि नेमाजी शिंदे हा सुद्धां पुढें मोंगलास जाऊन मिळाला. दाभाड्याप्रमाणेंच परसोजी भोंसले हाही व-हाड व गोंडवण या प्रांतांत आपलें नशीब काढावें म्हणुन झटत होता. खंडेराव दाभाडे व परसोजी भोंसले या दोघांनींहीं आपलें स्वातंत्र्य संभाळून ताराबाईविरुद्ध शाहूराजाचा पक्ष उचलला. यामुळें शाहूच्या मणगटांत वराच जोर आला. गंगथडींत ठाणें देऊन राहिलेले हैबतराव निंबाळकर हे कोणाचा पक्ष स्वीकारावा या विचारांत होते. पुढें लवकरच त्यांचा अधिकार काढून घेतल्यामुळें हैबतरावानीं शाहूची चाकरी सोडली व ते निजामास मिळाले. याप्रमाणें पहिल्या प्रतीच्या सरदारांची फाटाफूट होऊन कांहीं शाहूच्या बाजूस, कांहीं ताराबाईकडे व कांहीं निजामाच्या पदरीं, अशीं त्यांची बरोबर वांटणी झालीं. दुस-या प्रतीच्या सरदारापैकीं कान्होजी आंग्रे यांनीं ताराबाईचा पक्ष स्वीकारिला व सर्व कोंकणप्रदेश त्यांनीं आपल्या ताब्यात घेतला. थोरात, चव्हाण व आठवले हे तर स्वतंत्र होऊं पहात होतेच. साता-यास शाहू राजा सिंहासनावर बसला, त्यावेळेस पहिल्या दोन घराण्यांतील सरदारांनी मोठा धुमाकूळ मांडिला होता.आसमंतात् त्यांनीं लुटालूट सुरू केली, व प्राचीन वहिवाटीस एका बाजूस सारून, मुख्य राजे ज्याप्रमाणें चौथाई व घासदाणा वसूल करीत, त्याप्रमाणें या सरदारांनींही आपल्या स्वतःकरितां वरील हक्क मिळविण्याची अस्सल वरहुकूम नक्कल वठविण्याची सुरवात केली. एका ब्राह्मण लुटारूस मोंगलाचा सुभेदार महाराज म्हणत असे. त्या लुटारूनें ---- -यापासून वीस मैलांच्या आंतच खटाव येथें स्वतंत्रपणें आपलें ठाणें ---विलें, तेव्हां आतां सातारा शहर व त्याच्या स्वतःच्या सरदारांनी--- केलेलें थोडेसें डोंगरी किल्ले, एवढाच मुलूख काय तो शाहूच्या----त राहिला.

घोंटाळा मोडून व्यवस्था कशी केली ?
प्रकरण १० वें.

मागील भागांत सांगितल्याप्रमाणें, राष्ट्रीय स्वातंत्र्यार्थ वीस वर्षे चाललेल्या या युद्धाच्या शेवटीं, शाहू राजाची मोंगलांच्या छावणींतून सुटका झाली, व तो दक्षिणेंत आला. सर्व मराठे लोकांनीं त्यास आपला राजा असें कबूल केलें. ‘ महाराष्ट्रांतील सर्व लोकांची एकी करावयाची ' याबद्दल शिवाजीनें सुरू केलेला प्रयत्न सिद्धीस नेण्याचा शाहूनेंही बेत केला. मोंगल बादशहाच्या त्या प्रचंड सैन्याबरोबर लढाई जुंपण्यांत जे मुख्य हेतू होते, ते आतां सिद्धीस गेले असें जरी म्हणतां येईल, तरी या लढाईपासून मराठ्यांच्या प्रमुख सरदारांच्या डोक्यांत मयंकर वेडगळ कल्पना शिरल्या. प्रत्येकास असें वाटे कीं, आपण लढलों तें फक्त सापल्या हिताकरितांच. आपण मिळविलेलें स्वातंत्र्य घालवून आपण --णाचेंही चाकर होणार नाहीं. यायोगानें लढाई संपली, तरी मागें ---ळा व बेबंदशाई चालू राहून पुढें कांहीं वर्षेपर्यंत देशांत व्यवस्था ताब्य--- शांतता होणें अगदींच अशक्य असें दिसून आलें. एकाचें कार्य --- सर्व लोकांचें कार्य, अशा बुद्धीनें सर्व प्रमुख सरदारांनीं एक जुटीनें लढाई चालविली; परंतु बादशहाच्या सैन्याचा पराभव होऊन शेवटीं औरंगजेबही मरण पावला. तेव्हां आधींच एकमेकांशी तुटकपणानें वागंणारे हे स्वदेशभक्त पुढारी यांच्या मनावरचा दाब नाहींसा होऊन एकजुटीनें काम करण्याची त्यांची इच्छाही नाहीशी झाली. शाहूस कैदेंतून सोडून दिलें तें सर्व मराठे लोकांना बरें वाटावें म्हणून, असें वाह्यात्कारी दर्शवून, आंतून तर शाहू महाराष्ट्रांत आला ह्मणने लोकांत विरोध व कलह आपोआपच उत्पन्न होतील, असा हेतू मनांत धरूनच औरंगजेबाच्या सल्लामसलत गारांनीं शाहूची सुटका करण्याविषयीं बादशहास कानमंत्र दिला असावा असें दिसतें. शाहू परत आला तेव्हां राजारामाच्या हाताखाली नोकरी केलेल्या व नंतर ताराबाई व तिचा मुलगा यांचा पक्ष उचललेल्या पुष्कळ लोकांनीं शाहूचें नुसतें स्वागतही केलें नाही. पंत सचिव व पंत अमात्य शाहूपासून अगदीं अलग राहिले. जुन्या पुढारी मंडळापैकीं ताराबाईचा पक्ष सोडून देणारे प्रसिद्ध सरदार म्हटले म्हणजे धनाजी जाधव हे होत. धनाजी जाधवाला शाहूच्या आगमनास प्रतिबंध करण्याकरितां पाठविलें होतें; परंतु शाहूराजाचा गादीवर हक्क जात अशी खात्री झाल्यावरून त्यानें शाहूबरोबर समेट केला. धनाजी जाधवाचा कट्टा प्रतिस्पर्धी संताजी घोरपडे याच्यावर म्हसवडचे माने देशमुख यांनी क्रूरपणानें हल्ला करून त्याचा खून केला होता. त्याचे तीन मुलगे कर्नाटकांत मोंगलांशी आपल्याच हिताकरितां लढाई सुरू ठेवण्याच्या खटपटींत होते. शाहू सत्ताधीश झाल्यावर धनाजी जाधव फार दिवम वाचला नाही. त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव हा फार स्वच्छंदी असल्यामुळें या स्वातंत्र्ययुद्धांत त्याच्या बापास ज्या उदात्त विचारांमुळें सर्व राष्ट्रीय सैन्याचा पुढारीपणा प्राप्त झाला होता त्या उदात्त विचारांचा ह्या त्याच्या मुलावर कांहींच अंमल झाला----पुढें प्रसिद्धीस आलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याबरोबर ----- शिकार करीत असतां कांहीं क्षुल्लक कारणांवरून दोघांचा तंटा---तेव्हां चंद्रसेन जाधव, आपल्या धन्याची नोकरी सोडून को----गेला, व नंतर तेथून हैदराबादेच्या निजामाच्या पदरी राहिला. तर---- अर्थात् च त्याच्या कर्तबगारीचा महाराष्ट्रास कांहींच फायदा मिळाला नाहीं. इतर पुढारी मंडळीपैकी खंडेराव दाभाडे गुजराथेवर स्वारी करण्याच्या हेतूनें खानदेशांत सैन्याची जमवाजमव करीत होते. राजारामाचा एक प्रमुख प्रतिनिधि नेमाजी शिंदे हा सुद्धां पुढें मोंगलास जाऊन मिळाला. दाभाड्याप्रमाणेंच परसोजी भोंसले हाही व-हाड व गोंडवण या प्रांतांत आपलें नशीब काढावें म्हणुन झटत होता. खंडेराव दाभाडे व परसोजी भोंसले या दोघांनींहीं आपलें स्वातंत्र्य संभाळून ताराबाईविरुद्ध शाहूराजाचा पक्ष उचलला. यामुळें शाहूच्या मणगटांत वराच जोर आला. गंगथडींत ठाणें देऊन राहिलेले हैबतराव निंबाळकर हे कोणाचा पक्ष स्वीकारावा या विचारांत होते. पुढें लवकरच त्यांचा अधिकार काढून घेतल्यामुळें हैबतरावानीं शाहूची चाकरी सोडली व ते निजामास मिळाले. याप्रमाणें पहिल्या प्रतीच्या सरदारांची फाटाफूट होऊन कांहीं शाहूच्या बाजूस, कांहीं ताराबाईकडे व कांहीं निजामाच्या पदरीं, अशीं त्यांची बरोबर वांटणी झालीं. दुस-या प्रतीच्या सरदारापैकीं कान्होजी आंग्रे यांनीं ताराबाईचा पक्ष स्वीकारिला व सर्व कोंकणप्रदेश त्यांनीं आपल्या ताब्यात घेतला. थोरात, चव्हाण व आठवले हे तर स्वतंत्र होऊं पहात होतेच. साता-यास शाहू राजा सिंहासनावर बसला, त्यावेळेस पहिल्या दोन घराण्यांतील सरदारांनी मोठा धुमाकूळ मांडिला होता.आसमंतात् त्यांनीं लुटालूट सुरू केली, व प्राचीन वहिवाटीस एका बाजूस सारून, मुख्य राजे ज्याप्रमाणें चौथाई व घासदाणा वसूल करीत, त्याप्रमाणें या सरदारांनींही आपल्या स्वतःकरितां वरील हक्क मिळविण्याची अस्सल वरहुकूम नक्कल वठविण्याची सुरवात केली. एका ब्राह्मण लुटारूस मोंगलाचा सुभेदार महाराज म्हणत असे. त्या लुटारूनें ---- -यापासून वीस मैलांच्या आंतच खटाव येथें स्वतंत्रपणें आपलें ठाणें ---विलें, तेव्हां आतां सातारा शहर व त्याच्या स्वतःच्या सरदारांनी--- केलेलें थोडेसें डोंगरी किल्ले, एवढाच मुलूख काय तो शाहूच्या----त राहिला.