Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५१
श्री १६०९ पौष वद्य ३
सदानंद
श्री सकल तीर्थस्वरूप राजश्री आनंदगिरी बावा स्वामीचे सेवेसी सेवक खेमाजी घोरपडे मोकदम मौजे सायगाऊ ता। मेढे सुभा जावली स्यापाद डोई ठेऊन नारायणी विनंती उपरी स्वामीचे श्री स्वामी याचे अणछत्र आपले वडिलाचे संकल्प आहे जे प्रती व्रसी भात बारीक १ एक देयावे ते आपणापासून राहिले होते ऐसीयासी याचे स्वामीचे आज्ञा जाहली आज्ञाप्रमाणे प्रती व्रसी भात सदरहू मठी अणून देत जाणाईन हे आपले व तुमचे इनाम सु॥ रा। १७ रबिलावल
सु॥ समान समानीन (निशाणी नांगर)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
(लेखांक १ )
पुरंधर्यांची स्मरणाची यादी
श्री
यादी स्मरणाच्या रुमालांत स्मरणाच्या तबलखा
२ सन ११४४
१ सन ११४५
१ सन ११४६
---------------
१ ही स्मरणाची याद सासवडांतील श्रीमंत नानासाहेब पुरंधरे यांच्या दफ्तरखान्यांतील आहे. हींत एकंदर २१२ बंद आहेत. प्रत्येक बंद सुमारे ४ इंच रुंद व १५ इंच लांब आहे. बहुतेक बंद जुनरी खर्ची असून गवती रंगाचे आहेत. याद प्रायः पाठपोट लिहिलेली आहे.
हें स्मरण अंबाजी त्र्यंबक व नाना पुरंधरे यांनी लिहिले आहे. स्मरणाचे एका सबंद वर्षाचे कागद एका किंवा दोन तबलखांत घालून ठेवीत. लांब कागदाच्या घड्या घालून बनविलेल्या पट्टयास तबलख ह्मणतात.
ह्या तबलखा पुरंधर्यांच्या मूळ दफ्तरांत किती होत्या त्याचा तपशील येथे दिला आहे. सन ११४४ फसलीपासून ११५२ फसलीपर्यंतच्या ९ वर्षांच्या व सन ११६० पासून ११६७ पर्यंतच्या ७ वर्षांच्या तबलखा मूळ रुमालांत होत्या. सन ११५३ पासून ११५९ पर्यंतच्या व सन ११६६ सालची तबलख ह्या मूळ रुमालांत नव्हती. ज्या अर्थी ११६७ हें या तपशीलांतील शेवटलें साल आहे त्याअर्थी हा तपशील ह्या सालाच्या शेवटीं लिहिला असें अनुमान निघतें.
१ सन ११४७
१ सन ११४९
१ सन ११४९
१ सन ११५०
१ सन ११५१
१ सन ११५२
१ सन ११६०
१ सन ११६१
१ सन ११६२
१ सन ११६३
------------------
पुरंधर्यांच्या स्मरणाच्या रुमालांत ह्या १६ तबलखांखेरीज, शके १५४० पासून शके १५९६ पर्यंतच्या ह्मणजे थोरले शिवाजी महाराज छत्रपति यांच्या ५६ वर्षांच्या तबलखी होत्या. ह्मणजे शहाजी व शिवाजी यांच्या कारकीर्दीतील प्रत्येक वर्षांच्या ठळक ठळक गोष्टींचे टिपण ह्यांत होतें.
ह्याशिवाय अवरंगजेब अवरंगाबादेस आल्याचा वाकाहि या रुमालांत होता.
तसेंच, राजश्रीच्या ह्मणजे शाहूमहाराजाच्या कारकीर्दीतील दरवर्षाचे वाके जोशी यांनी लिहिलेले या रुमालांत एका ठिकाणी जमवून ठेविले होते असें शेवटल्या कलमावरून दिसते. हे जोशी शाहूमहाराजाबरोबर अवरंगजेबाचे लष्करांत होते व ह्यांनी आपल्या वाक्यांत दरसालच्या ठळक ठळक गोष्टींचे टिपण करून ठेविले होते.
येणेंप्रमाणे सन ११६७ फसलीच्या शेवटी पुरंधर्यांच्या स्मरणाच्या रुमालांत शके १५४० ह्मणजे इ. स. १६१८ पासून सन ११६७ फसली ह्मणजे इ. स. १७५७ पर्यंतच्या वार्षिक ठळक ठळक गोष्टींची टिपणें होतीं. पैकी मी इ. स. १९०१ सालांत श्रीमंत नानासाहेब पुरंधर्यांचे दफ्तर तपासण्यास प्रथम गेलों तेव्हां तेथें सध्यां छापलीं जाणारीं स्मरणें तेवढीं मिळालीं. बाकीचीं स्मरणें पुरंधर्यांच्या दफ्तरांत सध्या असतील किंवा नसतील हें निश्चयानें कांहींच सांगतां येत नाहीं. कारण श्रीमंत नानासाहेब पुरंधरे यांच्या जुन्या दफ्तरांतील कागदांची त्यांच्या दफ्तरखान्यांत निव्वळ पखळण झालेली आहे व लाखो कागद सदींनें कुजून जात आहेत. ह्या कागदांची व्यवस्था करण्यास व त्यांतून निवड करण्यास श्रीमंतांनीं एखादा आधुनिक शिकलेला व मेहनती पदवीधर लावावा ह्मणजे कागद लावण्याचें काम बहुशः बरें होईल.
पत्रें यादी वगैरे.
१ सन ११६४
१ सन ११६५
१ सन ११६७
१ कित्ता तबलख शके १९४० ता शके १५९६
१ हकीकत बयानवाके अलमगीर दिल्हीहून अवरंगाबाजेस आले.
१ शेक सखैअर याचे.
१ जोशी यांचेथील वाका राजश्रीच्या राज्यांतील.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५०
श्री १६०९ भाद्रपद
तपोनिधी राजमान्य राजश्री आनंदगिरी गोसावी मो। मठ का। निंब प्रांत वाई प्रती राजश्री संभाजी राजे उपरी तुह्मी पत्र पाठविले पावोन अभिप्राय कळो आला अनछत्रास ऐवज पाहिलेपासून हा कालपर्यंत पावत आला परंतु सांप्रत देशाधिकारी ऐवज पाववायास हैगै करितात तरी ऐवज पावेसा केला पाहिजे ह्मणून लिहिले त्यावरून देशाधिकारी प्रात वाई यास आज्ञापत्र सादर केले असे ते पाववणे याउपरी ते तुह्मास पहिलेपासून पावत आले असेली तेण्हेप्रो। पावते करितील धर्माच्या कार्यास अतर पडणार नाही तुह्मी भुवनगिरी गोसावी याजवळी श्रीचा प्रसाद देऊन पाठविला तो स्वामीस पावोन वदिला निरंतर आपणाकडील कुशल वर्तमान लिहीत जाणे बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४९
श्री १६०९ श्रावण वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १४ प्रभवनाम संवत्सरे श्रावण बहुल दशमी सोमवासरे क्षत्रिय कुलावतस सिहासनाधीश्वर श्री राजा शभु छत्रपती स्वामी याणी राजश्री येसाजी मलार देशाधिकारी व देशलेखक प्रांत वाई यांसि आज्ञा केली ऐसी जे मठ श्री सदानंद गोसावी मो। कसबे निंब प्रा। वाई यासि मठमजकुरी अनछत्राबदल ऐवज पेशजी कैलासवासी स्वामीच्या वेळेपासून चालिला आहे स्वामीनेही तेण्हेप्रो ऐवज द्यावयाची आज्ञा केली होती परंतु सांप्रत कारकून पाववावयास हैगै करितात ह्मणून राजश्री आनंदगिरी गोसावी मो। मठमजकूर याणी लिहिले त्यावरून कळो आले तरी पहिलेपासून अनछत्र चालिले असता मधे ऐवजाबाबे कुसूर करावया काय गरज याउपरी तर्ही ऐवज पाववावया बाबे सुस्ती न करणे पहिलेपासून द्यावयाचा मोईन असेल तेण्हेप्रो पाववीत जाऊन अनछत्र चालो देणे धर्मकार्यास खलेल न करणे जाणिजे अनछत्राचा मामला पूर्वीपासून ता। सालगुदस्ता चालिला असेल ते मनास आणून त्याप्रमाणे चालवणे उजूर न करणे लेखनालंकार
सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४८
१६०८ मार्गशीर्ष शुध्द २
(शिक्का)
कौलनामा ताहा आनदगिरी गोसावी मठ सदानद मु॥ का। निंब सा। मजकूर पा। वाई सुहूरसन १०९६ बाबे कौलनामा ऐसा जे तुमचे बाबे तुळाजी पाटील मोकदम का। मजकूर मालूम केले ऐसा जे गोसावी याचे सुदामत चालत आले आहे तैसेच तुह्मी चालविले पाहिजे ह्मणौऊनु अर्ज केला बराय अर्ज खातिरेस आणउनु तुज कौल सादर केला असे तुझे सुदामत चालत आले आहे तैसे चालेल सुखे मठी राहणे कोण्हे बाबे शक न धरणे दरीबाब कौल असे
तेरीख ३० जिल्हेज
(शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४७
श्री १६०६
राजश्री आनंदगिरी महंत साहेबाचे
सेवेसी
दाा दाा दताजी पाटील मौजे देगाऊ ता सातारा सु॥ खमस समानी अलफ कताबा लिहून दी॥ ऐसे जस दाहा साल मुदल मण २ घेतो त्याची वाडीसकट मण
३ तीन देऊन कलवा पाहिजे ऐसा कतबा लेहून दि॥ के बिघे
१० खरीदीचे राहाली असे कलल पाहिजे हा कताबा सही (निशाणी नांगर)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४६
श्रीसदानंद १६०५ कार्तिक ३०
रोखा मोकदमानि मौजे कवीठे सा। हवेली पा। वाई सू॥सन आर्बा समानीत अलफु मौजे नींब याचा इनाम मोजे मजकुरी आहे ऐसीयासी सालगुदस्ता चालिले आहे तेणेप्रमाणे चालवणे एकजरा उजूर न करणे छ २७ जिलकाद (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
आतां हें विवेचन पुढें न चालवितां येथेंच थांबवावें हें बरें. ह्या निबंधाचा मुख्य हेतु, जें थोडेसें इतस्ततः विसकटलेलें साहित्य उपलब्ध आहे, त्यांतून गतकालाच्या कांहीं विशेष गोष्टी एकत्र करणें हा आहे. त्या मी एकत्र केल्या आहेत, व ह्या गोष्टींपासून जे धडे शिकावयाचे आहेत, त्यांचा विचार व त्यांविषयीं वादविवाद येथें न करितां इतरत्र करणें प्रशस्त होय. पण अखेरीस थोंडेसें आक्षेप निवारण करून हा लेख संपवितों. उपलब्ध असलेल्या कागदपत्रांतून गोष्टी काढून वर दिल्या आहेत; पण वरील गोष्टी ज्या काळीं घडल्या, त्याचवेळी लिहिलेले कागदपत्र कोणते व नंतर लिहिलेले कागद कोणते ह्मणने समकालीन कागदपत्र ; कोणते आहेत व कोणते नाहींत हें निवडण्याचा मात्र प्रयत्न केला नाहीं. हा कांहींच्या मतें आमच्यावर दोष येईल, तर त्याचें थोडेसें निराकरण केलें पाहिंजे. ह्या कागदपत्रांपैकीं बहुतेक किंबहुना पुष्कळ --वेळीं लिहिलेले नसून नंतरच लिहिलेले आहेत. समकालीन नव्हते,--वढें मात्र आह्मांस कबूल केलेंच पाहिजे; परंतु आज हातीं घेतलेल्या विषयासारख्या विषयाचें विवरण करतांना वरील गोष्टींचा विचार करणें जरूर आहे असें आह्मांस वाटलें नाहीं. कसें झालें तरी, प्रसिद्ध "इतिहासकार ग्रोट यानें प्राचीन ग्रीक लेखाविषयीं लिहितांना असें ह्मटले --हे “ The curtain is the picture " पडदा हेंच चित्र आहे.--- चित्र झांकून गेलें आहे, तें दिसण्यास मार्ग नाहीं. अशी स्थिति --- तें चित्र झांकून टाकणा-या पडद्याची किंमत या चित्रासारखीच ---- खरी स्थिति समजण्यास दुसरें साधन नाहीं. तेव्हां ज्या का----
ग्रंथमाला.
पत्रांतून --प्रत्यक्षपणें हीं स्थिति समजण्याजोगे उल्लेख आहेत, त्या कागदपत्रावरूनच आम्हांस माहिती काढिली पाहिजे.
त्याप्रमाणें वरील कागदपत्र महत्वाचें आहेत. आणि सर्वच नाहीं तरी बहुतेक कागदपत्र उघड उघड प्राचीनकाळचे आहेत. म्हणून --- ज्यां विशेंष गोष्टी लिहिल्या आहेत, त्या गोष्टीविषयीं पुरा --- म्हणून त्या कागदपत्रांचें किती महत्व आहे याचा प्रस्तुत विषय --- विचार करणें जरूर आहे असें आह्मांस वाटत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
जनरूढीस झुगारून दिल्याचीं जीं वर उदाहरणें सांगितलीं आहेत त्यापैकीं कांहीं अशीं आहेत कीं, त्यावेळची परिस्थिति ध्यानांत आणून पूर्ण विचारांतीं हे नियम बाजूस टाकिले आहेत. पण दुसरीं आहेत त्यांत अशी गोष्ट नसून परंपरेनें आलेल्या नियमांची सर्व साधारण जी ढिलाई झाली त्याबरोबरच यांचीही झाली असावी. आह्मांस असें वाटतें कीं, महाराष्ट्रछत्र पेशव्यांच्या हातांतून नाहींसें झालें नसतें तर ह्या दोन्ही बाबतींत जास्त सुधारणा कांहीं एक ठराविक मर्यादेपर्यंत झाली असती व तीही फार जलद झाली असती. एतद्देशीय राजे राज्य करीत असते---या राजांचे अधिकारनियम आह्मीं वर सांगितलेच आहेत--- तर कांहीं घासाघीस न होतां ही सुधारणा थोडी प्रत्यक्ष, थोडी अप्रत्यक्षरीतीनें झाली असती; पण इंग्लिशांसारखे परदेशीय राजे आहेत ह्मणून व त्यांनीं स्वत:करितां जे नियम घातले आहेत त्यांस अनुरूपच ते अम्मल करीत आहेत म्हणून वरील बाबतीमध्यें सुधारणा होणें कठीण होत आहे. तरीपण इंग्रजी राज्याबरोबर पाश्चिमात्य शास्त्रें व कला, इतिहास व वाड्मय यांच्या शिक्षणाचा जो जोर लागला आहे तो, एतद्देशीय राजे असते तर मात्र लागला नसता हें खरें, पण सुधारणा सुलभ रितीनें झाली असती ह्यांत कांही संशय नाहीं.
पुष्कळ वर्षांपूर्वी सर हेन्री सम्नर मेन या विद्वान् गृहस्थानें असें ह्मटलें आहे कीं, ब्रिटिश न्यायकोर्टें स्थापल्यामुळें हिंदु कायद्याची वाढ खुंटली. त्याचप्रमाणें ब्रिटिश राज्यसत्तेच्या सामर्थ्यामुळें हिंदू लोकांच्या सामाजिक वाढीवर तसाच परिणाम झाला असेंहि म्हणतां येईल. असा परिणाम ज्या कारणांनीं घडून आला किंवा घडून येत आहे तीं कारणें कोणतीं आहेत याचें सूक्ष्म विवेचन करणें सोपें नाहीं; व तसें विवेचन करण्याचें हें योग्य स्थळ नव्हे; परंतु ठोकळ रीतीनें आपल्याला असें ह्मणतां येईल कीं, हिंदु समाजामध्यें पूर्वी ज्या शक्ति कार्य करीत होत्या, त्या ब्रिटिश राज्यसत्तेमुळें कमजोर झाल्या आहेत, आणि उलटपक्षीं व्यक्तिस्वातंत्र्य प्रचारांत येत आहे; उदाहरणार्थ नाना फडणविसांनीं प्रसंग आला तेव्हां जें करणें योग्य होतें तेंच करण्याबद्दच सल्ला दिली. मग हें करणें जनसंप्रदायाविरुद्ध होतें तरी त्यांनीं त्याकडे लक्ष दिलें नाहीं. पेशव्यांनीं नानांची सल्ला मान्य केली. ब्राह्मण लोकांनीं श्रीमंतांचें अनुकरण केलें. त्याबद्दल नुसता गवगवाहि कोणी केला नाहीं. नानांनीं सांगितलें कीं, तूर्त कृत्य उरकून घ्यावें–भोजन करावें--अशौचाबद्दल जी अडचण, त्यास कांहीं तरी शास्त्राधार नंतर काढूं. परंतु शास्त्राधार काढल्याचें मात्र कोठें आढळत नाहीं. पण जर शास्त्राधार काढणें जरूर होतें तर तो निघाला असता. कारण समाजाच्या अंगीं चेतनत्व असतें, तसें हिंदुसमाजामध्येंहि होतेंच. सर्व लोकांच्या संमतीनें-मग ती संमति गुप्त असेना–पूर्वीचे नियमबंध बरेच सैल झाले असते, व कालावधीनें प्रत्येक सुधारणेस जनरूढीनें आपली कबुली दिली असती. असला क्रम पेशव्याच्या अमदानींत व थोड्या संकुचित अर्थानें मराठी सांम्राज्यांतहि दिसून आला असता असें आह्मांस वाटतें. पण सध्याच्या आमच्या सुधारणेच्या स्थितींत हा क्रम क्वचितच दिसून येईल; किंबहुना जेथें जेथें ब्रिटिश प्राबल्य जास्त जोरांत आहे, त्या ठिकाणीं हा क्रम बराच मंद व क्षीणशक्ति असा दिसून येतो. कै० कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनीं ( या गोष्टीत ३० वर्षे झालीं. )
आपल्या युरोपियन स्नेहाच्या पंक्तीस बसून एका मेजावर फलाहार केला, म्हणून ज्या समाजांत शास्त्रीबुवा विचारश्रेष्ठ होते, त्याच समाजानें शास्त्रीबुवांच्या कृत्याविषयीं केवढें अकांडतांडव केलें व किती दपटशहा दिला हें सर्व महशूर आहेच. तदनंतर त्याचप्रमाणें दुसरी एक गोष्ट घडून येऊन त्याचाहि परिणाम असाच झाला. पहिल्या गोष्टीमुळें सुधारणा अजीबात खुंटली असें ह्मणतात. मग हें खरें असो वा खोटें असो, आणि त्यानंतर कांहीं सुधारणा झाली असो वा नसो. एवढें मात्र स्पष्ट आहे कीं, जी सुधारणा; झाली असेल ती फार मंद गतीनें होत आली आहे. उलटपक्षीं पेशवाईमध्यें जी चळवळ झाली, तिचा मुख्य उद्देश काय हें ज्यांस माहीत नाहीं किंवा संमत नाहीं, असे लोक आहेत हें ह्याच गोष्टीनें समजून आलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
त्यावेळीं प्रचलित असलेल्या नियमांचा कडकपणा मुद्दाम होऊन कमी केलेला आहे, अशीं बरीच उदाहरणें एके ठिकाणीं करून आह्मीं वर सांगितली आहेत. त्याचप्रगाणें वरच्याविरुद्ध अशीं निराळ्या प्रकारचीं एक दोन उदाहरणें सांगणें प्रशस्त होईल. आमच्यापुढें जे कागदपत्र आहेत, त्यांमध्यें पेशव्यांच्या घराण्यांत बालविवाह झाल्याचीं पुष्कळ उदाहरणें सांपडतील यांत कांहीं संशय नाहीं. बाळाजी बाजीरावाचीच गोष्ट घ्या. ते अवघे नऊ वर्षांचे असतांना त्यांचा विवाह झाला.
विश्वासराव तर लग्नाचेवेळी केवळ आठ वर्षांचे होते. थोरले माधवराव फक्त नऊ वर्षांचे. नारायणराव दहा, व सवाई माधवरावास नुकतें आठवें संपून नववें वर्ष लागलें होतें. बालविवाहाची चाल पेशव्यांचे घराण्यांतच होती असें नाहीं. नाना फडणविसांचें जें एक छोटेसें आत्मचरित्र आहे, त्यांत नाना दहा वर्षांचे असतांना त्यांचा विवाह झाला असें लिहिलें आहे. तसेंच पहिली बायको मेल्यानंतर लागलाच द्वितीय संबंध केल्याचींही पुष्कळ उदाहरणें आहेत. विधवा स्त्रियांच्यासंबंधानें पेशवाईच्या अगदीं अखेरी अखेरीस ज्या महत्वाच्या गोष्टी घडून आल्या त्यांची तारीखवार याद उपलब्ध झाली आहे. शके १७२९ श्रावण शुद्ध १२ रोजीं घडलेली हकीकत :-पुणें येथें नागझरीजवळ विधवा स्त्रियांचें केशवपन करण्याचा विधि झाला. असल्या अमंगळ कृत्याबद्दलची जास्त माहिती मिळाली असती तर बरें झालें असतें. लग्नसमारंभांत नेहमीं कलावंतिणीचा नाच होई व धर्मपत्नीच नव्हे, तर रखाऊ स्त्रियासुद्धां पतिमरणानंतर सती जात असत, अशीही हकीकत आढळते.
वर आह्मीं ज्या गोष्टी व जी किरकोळ माहिती एकत्र करून दिली आहे, तीवरून पूर्वकाळच्या राज्यांत मराठा मंडळाची सामाजिक व धार्मिक स्थिति कशी होती याचें किंचित् दिग्दर्शन होतें. सध्यां ज्या गोष्टी प्रचलित आहेत, त्यांपैकीं पुष्कळ तेव्हांही प्रचारांत होत्या हें। निर्विवाद आहे. ब्राह्मणी पद्धति आतांपेक्षां त्यावेळीं जास्त जोरांत होती, व ती असणें हें स्वाभाविकच आहे; पण पूर्वपरंपरागत नियमांचें कितीएकदां तरी उल्लंघन झालें, व वर सांगितल्याप्रमाणें कितीएक नवीन कल्पना निघाल्या; परंतु ह्या देशामध्यें ब्रिटिशराज्यसत्तेखालीं पाश्चात्य विचारांची सुरवात झाल्यानंतर वरील बाबतींत थोडी ढिलाई होऊं लागली असें जें कांहीं लोकांचें मत आहे, त्याचा व वरील गोष्टींचा मेळ बसत नाहीं. माझ्या मतें वरील ढिलाई या काळाच्या फार पूर्वीपासून सुरू झाली आहे. शिवाय वर एक दोन उदाहरणांत ह्या ढिलाइचीं जीं कारणें सांगितलीं आहेत, ती पाहिलीं ह्मणजे, असें अनुमान निघतें कीं, निराळ्या प्रकारची परिस्थिति असतांना जे नियम अमलांत आले, ते खुद्द मराठाशाहींतील परिस्थितीस योग्य असे नव्हते. प्रथमतः कांहीं विशेष गोष्टींत हा अयोग्यपणा दिसून आला असावा, व त्यावेळेस प्रचलित नियमांचे उल्लंघन झालें असावें. याप्रकारें एकदां एके ठिकाणीं वाट झाली म्हणजे दुस-या ठिकाणींही तशाच वाटा पडतात. मग परिस्थिति तितकी अनुकूल नसली तरी चिंता नाहीं.