Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ११० ] *
श्री.
शके १६४८ ज्येष्ठ.
० श्री ॅ
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ
मुख्य प्रधान.
अभयपत्र समम्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान. नानाजी देसाई, व जिवाजी टाकूर, व बाळकोजीराऊ, व गणेशजी कुलकर्णी, व अंताजीराऊ, ता। फिरंगाण सुहुर सन सबा अशरीन मया व अलफ. तुमचेविशी रा। गंगाजीनाईक यांणीं तुमचे निष्ठेचा अर्थ कितेक निवेदन केला, त्याजवरून कळों आले. तुह्मीं कार्याचे लोक, तुमचें सर्व प्रकारें चालवावें, हें अवश्यक जाणून, तुह्मांस अभयपत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं कोणेविशीं चित्तांत वसवास न धरितां, सुखरूप राहणें. तुमचे ऊर्जिताचा अर्थ रा। गंगाजीनाईक यांणीं निवेदन केला. त्यानी आज्ञा मारनिलेस केली आहे त्यावरून कळेल. तुह्मीं आपला खातरजमा असों देणें. जाणिजे. छ. सवाल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०९ ]
श्री. शके १६५८ फाल्गून शु॥ १०.
पु॥ रा॥ गंगाजी ना। अणजोरकर गोसावी यांसिः--
सु॥ सबा सलासीन मया अलफ. तुह्मी शिवजी परचितराव याजविशीं लिहिलें की, हे कामकाजांत आहेत. त्यांचे हातून कितेक कामें होतील, त्यांसही बोलाविलें पाहिजे, ह्मणून लिहिलें. त्यास, ते पूर्वापारच कामावरच आहेत. त्याजविशीं पूर्वी तुह्मीं विदित केलेंच आहे. त्यांणीं कामकाज करून आपलें सर्व प्रकारें ऊर्जित करून घ्यावें व कितेक त्याचा सरंजाम करणें तोही होईल. त्याचें समाधान तुह्मीं करणें. त्याचे मुखमाफिक सरंजाम होईल. सारांश, त्यांणीं मन घालून काम करावें. तुह्मीं सांगाल त्याप्रमाणें त्याचा सरंजाम होईल . तुह्मीं त्यास तेथेंच ठेऊन घेणें ते तेथून आणावे तरी कल्याणकर तर्क करितील. यास्तव, त्यास ठेवणें. आणि तुह्मीं येणें. समई त्याचेच हातून काम घ्यावें लागेल. जाणिजे. छ. ९ जिल्काद.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०७
श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य २
तपोनिधी भवानगिरी गोसावी मठ श्रीसदानंद यासि प्रती राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मीं पत्र पाठविले तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला मौजे इडमिडे स्वामीनी अन्नछत्रानिमित्य इनाम दिल्हे आहे त्यास उपसर्ग लागतो व गावकरीही उसुलास खलेल करिताती ह्मणून लिहिले त्यावरून ताकीदपत्रें सादर केली आहेती अतःपर कोण्ही उपद्रव देणार नाही तुह्मी गांवीची उसूल घेऊन अन्नछत्र चालऊन सुखरूप असणे छ १५ साबान सुहूरसन सीत मया अलफ जाणिजे बहुत काय लिहिणे
मर्या
देयं विरा
जते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०८ ]
श्री.
शके १६५८ पौष शु॥ १०.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६३ नलनामसंवत्सरे पौश शुध दशमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाशाहूछत्रपतिस्वामी यांणीं राजमान्य राजश्री पिलाजी जाधवराव यांसी आज्ञा केली ऐसी जेः–तुह्मांकडे तिळगुळ देऊन लिंगोजी रसाळ, व दत्ताजी चव्हाण, व रघुनाथ जिवाजी, व वणगोजी गरूड नि॥ सबनीस, व गुणाजी सिंदा, व बाबाजी मोरे, व दुजाजी मोरे, व मानाजी चव्हाण, पा। आहेत. त्यांस वेतनांत रुपये १०० शंभर देविले असेत. आदा करणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें ?
मर्यादेयं
* राजते.
बार रुजू सूत बार बार बार बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०७ ]
श्री.
शके १६५८ पौष.
राजश्री दावजी दिनकरराव वाळके यांसीः- आज्ञा केली ऐसी जेः--
दावजी दक्षणची फौज जाऊन नवाबास सामील होईल, ते होऊं न द्यावी. यास्तव राजश्री चिमणाजी बल्लाळ खानदेश प्रांतीं राहिले आहेत. त्यास फौजेनसी जाऊन सामील होणे. ह्मणून तुह्मांस पांच सात अज्ञापत्रें सादर जाहलींच आहेत. ऐशियास, राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांची व नवाब निजामन्मुलुक यांची गाठ पडली. नवाब भुपालगडचे आश्रयास गेला. पंडित मशारनिले चौगीर्द चौक्या देऊन बैसले आहेत. नवाबांनीं दक्षणी फौजेस लौकर येऊन पोहचणें ह्मणून पत्रांवरी पत्रे पाठविली आहेत. त्याजवरून औरंगाबादेची फौज नवाबाकडे जाऊं लागेल. याजकरितां तुह्मांस टाकोटाक फौजेनसी जाऊन, राजश्री चिमणाजी बल्लाळ यांस सामील व्हावयाची आज्ञा केली असे. तरी देखत आज्ञापत्र जेथें असाल तेथून कुच करून सिताफीनें जाऊन मशारनिलेस सामील होणें. ये गोष्टीस एक क्षणाचा उजूर कराल तरी न करणें. बहूत सिताफीनें जाणें. जाणिजे. बहूत काय लिहिनं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०६ ]
श्री. शके १६५८ भाद्रपद वद्य २.
राजश्री देवराव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो यशवंतराव पवार दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयलेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. तुह्मी राजश्री रामाजीपंत येथें प्रा। सोपार व इंद्रगड ( व )गैर येथील हिशेब व कागद घेऊन पाठविले. त्यास, रामाजीपंत येऊन भेटले. हालीं आह्मी मजल दरमजल पुढें जातों. याकरितां यास निरोप दिल्हा असे. हे तुह्मांकडे आले आहेत. हिशेब पाहाणें, अथवा करणें, तें पुणियास येऊं तेव्हां करून. कळलें पाहिजे. छ० १६ जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सूद.
श्री ०
भवानीशंकर चरणी
तप्तर आनंदरावसुत
यशवंतराव पवार
निरंतर.
शके १७९२.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०५ ]
श्री. शके १६५७ पौष वद्य १३.
राजश्री बापूजी माहादेव गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। यशवंतराउ पंवार दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लि॥ गेलें पाहिजे. विशेष. जयगोपाळ मुनशी याजकडे आह्मीं कडीं सोन्याची ठेविली होती. त्यास, तीं कडी तुह्मी त्याजपासून घेतली आहेत. ऐसियासी, त्याऐवजेपैकी बद्दलदेणें रदकर्ज उदेपुरीरु॥ ९५० साडेनवशें देविले असेत. तर सदरहू रु॥ सिवदत्तपुरी गोसावी याच्या पदरी घालणें आणि पावलियाचे कबज घेणें. साडेनवशें रुपये गोसावी मजकुरास जयनगरीं देणें. अनमान सहसा न करणें. याचा गुरु त्या प्रांतीं शिव जाला आहे. याजकरितां साडेनवशें रु॥ खामखाये देणें. बाकीचा ऐवज तुह्माकडेच राहूं देणें. रा। छ० २६ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सूध.
० श्री ॅ
भवानी शंकर चरणी
तत्पर आनंदरावसुत
यशवंतराव पवार
निरंतर. बार.
शके १७९२.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०६
श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य १
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३२ पार्थिवनाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी मोकदमानी व रयानी मौजे इडमिडे प्रांत वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे मजकूर श्रीसदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे ऐसे असता तुह्मी त्याकडे उसूल देत नाही वरकडाकडे उसूल देता ह्मणून विदित जाले तरी हे लबाढीचे ढग स्वामीस मानत नाही याउपरी गावीचा उसूल भवानगिरी गोसावी याकडे बिलकुसूर वसूल देत जाणे दुसरीयाकडे एका रुका द्याल तरी मुलाहिजा होणार नाही हे जाणून राहाटी करणे जाणिजे लेखनालंकार
रुजू
सुरू सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०४ ]
श्री शके १६५७ श्रावण शु॥ ७.
राजश्री सोनजी कोकरे व जिवाजी कोकरे गोसावी यासि :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुहुरसन सीत सलासैन मया अलफ. चिरंजीव राजश्री धोंडो मल्हार यांचा गांव मौजे सुपें मुकासा आहे. तेथें यांणी कुरण राखिलें आहे. तेथें तुह्मीं घोडीं, गुरें, घेऊन येऊन, कुरण चारिलें त्याच्या सरीकास मारिलें, ह्मणून हुजूर विदित जाहालें. तरी मानिलेचें कुरण चारावयास, सरकास मारावयास, प्रयोजन काय ? याउपरि, पत्रदर्शनीं गुरें, घोडीं, घेऊन दुसरे जागां जाणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ. ५ रबिलावल. + बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ
प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०३ ]
श्री.
शके १६५६
कैलासवासी थोरले आजोबासाहेबांचे कारकिर्दीपासून ते सेखोजी बावापावेतों इकडील तर्फेस इनाम गांव चाकर लोकास.
थोरले आजोबा साहेबीः-
खंडो गोविंद मजमदार मौजे दामाजी पिलाजी मौजे ता। चोण-
मागरूल ता। पेण. नेरेलें.
१ १
बाबाजी खानविलकर वे॥ नसरा- कल्याणप्रांतील शिष्ट थोर यांसी
पुर. १ दोन इनाम.
येणेंप्रमाणे पैकीं खंडो गोविंद व दामाजी पिलाजीस निरोप दिल्हा. गेले. खंडो गोविंद माहाराजाकडेस जाऊन सुभेमामले केले. परंतु इनामगांव आजोबासाहेबी चालविले. ते अद्यापि श्रीमंतांचा अमल जाहाला तरी चालतच आहेत. सेखोजी बावांनीं माहादाजी कृष्णास मौजे भादाणें तो। सोमाले सुभा भिंवडी इनाम दिल्हा तो अद्यापि चालतच आहे.
कैलासवासी दिवाण खासे साहेबीः-
मल्हारजी हवालदारांनी कुलाबे- रामाजी सरसबनिवीस यांणी
याचें राजकारण करून दिल्हें. तुबाजीपंती देखील कुलाबा बळा-
गांवाची कबुलात होती त्याप्रो। ऊन राहिले. त्यासमयीं खाशा-
मौजे भाळ दिल्हें; परंतु मोइनींत जवळ लोक नवते. संकट पडलें.
चालविलें. १ रामाजीबावा थळचे मोर्चेयावरून
खासे रेवादंडियांतून निघोन आदना जातांच पांचशे माणसां-
जातां प्राणजी गोळे सफरज्याचे नशी आले. युक्तीनें खाशांनी
बंदरी बाखे खासे यासी आडवे आंत घेऊन तुबाजीपंतास बंद
आले. खाशांनीं गुप्त वर्तमान केलें. लोक धरिले हतेरं घेतली.
सांगतांच माघारे सरोन गेले. फेतुर मोडला. हें काम, रामा-
चाकरीची शर्त निष्ठापूर्वक पाहिली. जीबावा लोक घेऊन आले, यामुळें
बंद देखोन कंबिले लोक आणून जाहालें. चाकरीचा मजुरी सम-
चाकरीमधें लोकांदेखील गांवांत जोन गांवाचे अनकुळ न पडे,
ऐवज पुरवून दिल्हा. राहिला ह्मणोन खंडाळतपे याचें कुळकर्ण
वसूल येत गेला. मौजे वीड करून दिल्हें. याचप्रों। विसोपंत
लागलें. १ निष्ठेनें चालिले. खासे रेवादंडियांत
जिवाजी खरोड्याचे तीर्थरू- असतां मुलकांत सांगोन साहित्य
पांनी संभाजीबावा आले होते. त्या करवित आले. निष्ठा समजोन
समयीं भानगडीवरून संभाजीबा- दुतर्फांतील कुळकर्ण करून दिल्हे.
वास काढोन नेतांच राजकोट, कारभारी यासी अगोधरच
हिराकोट, थळचा कोट, माणिक- इनामः--
गड स्वाधीन आले. संभाजी- चाहिरे चिटनिवीस. बोरघर
बावानें मलजी खराडे याचा नाश १ डबीर. १
केला. जिवाजी हैबतराऊ दे- रेवदंडियापासून श्रमसाहस सं-
खील दरबिदर लागली. सातारा कटें समजोन.
माहाराजाकडेस आले. तेथून सर्व फडनविसास सन समानांत
कुटुंब व आकादेखील आणिली. खादे श्रीमंत नानाचे भेटीस जाऊ-
माइनींत रावत दिल्हे. न आले, तेव्हां भरसें इनाम.
खासे वाडिया निसबतीस गांव शिवरामजीबाबा महाराजाक-
दिल्हे. परंतु विकटगडचा प्रसंग डेस उदाजी पवाराकडील ठाणी
होतांच निमे सरकारांत होत घेतलीं. त्यासमयीं लोकसुद्धां जा-
आले. ऊन चाकरी केली. माहाराजांनी
बक्षीस सरसोने यांचेकडे सरपटि-
लकीचे ऐवजपैकीं ऐवज देविला.
त्यानंतर कांहींक वर्षी मौजे माहाल
इनाम नेमिलें. परंतु त्यास देव-
आज्ञा जाहाली. विकट ग-
डिचा प्रसंग जाहाला. देतां
अनकुल पडलें नाहीं व दिल्हेंहि
नाहीं.
बेणेंप्रमाणें गांवांचा बयाण. याखेरीज कृष्णाजी नाईकांची सावकारी प्राचीनची नसतां कैलासवासी समयीं प्राचीन सावकारा.