Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७८ ]
श्री. शके १६५४ चैत्र वा। १०
मा। अनाम देशमुख मोकदम देशपांडे की सासवड यांसिः-- बाजीराऊ बल्लाळ प्रधान. सुहुरसन इसने सलासीन मया अलफ. दत्ताजी मोहिता–विठोजी मोहिते याचा लेक वस्ति का। मजकूर, हा, आपले बापापाशीं कजिया करितो ह्यणून कळलें. त्याजवरून हें पत्र सादर केलें असें. तरी तुह्मी हरदुजणास ताकीद करून, काजिया न करीत तें करणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ० २४ सवाल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहुनरपति
हर्षनिधान बाजी-
राव बल्लाळ मुख्य
प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७७ ]
श्री. शके १६१४ चैत्र वा। ९.
० श्री ॅ *
राजा शाहु नरप-
ति हर्षनिधान बा-
जीराव बल्लाळ मुख्य प्रधान
अभयपत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराउ पंडित प्रधान ता। सखवा नाई(क) सराफ का। सासवड सुहूरसन इसने सलासीन मया अलफ. दिल्हें अभयपत्र ऐसीजेः- तुमचेविशीं माहादाजी अंबाजी देशपांडे कर्यात सासवड यांणीं विनंति केली. त्याजवरून, हें अभयपत्र सादर केलें असे. तरी तुह्मी कोणेविसी शंका अंदेशा न धरितां का। मजकुरी सुखरूप राहणें. कोणेविषयीं अजार लागणार नाहीं. अभय असे. जाणिजे. छ० २३ सवाल. + आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७६ ]
श्री.
शके १६५४ चैत्र वद्य ५.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री माहादेवभट्ट स्वामी गोसावी यांसिः-
सेवक बाजीराउ बल्लाळ प्रधान नमस्कार उपरि येथील कुशळ जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लिहिलें वर्तमान कळलें. भट सोडून देवावयाविसी लिहिलें; त्यावरून त्यास सोडून देविला. उंटें बळवंतराउ टोके यांकडील राउतांनी चोरून नेलीं. मग त्याकडे लाविला असतां उंटें लांबविलीं आहेत. तरी उमाबाईस व बळवंतराउ यांस पत्रें पाठविलीं पाहिजेत, ह्मणोन लिहिलें. त्यावरून त्यांस पत्रें पाठविलीं असेतीं. ही त्यांकडे पावती करणें. तुह्मी दिवसगत न लावितां सत्वर येणें. जाणिजे. छ० २९ सवाल. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९९
श्री १६२६ आश्विन शुध्द ४
राजश्री सरदार लष्कर गोसावी यासि
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। परशराम त्र्यंबक प्रतिनिधी आशिर्वाद सु॥ खमस मया अलफ मौजे इडमिडे पा। हवेली वाई हा गाऊ श्रीसदानंद गोसावी याकडे आहे यास तुह्मी कोणी एकदर उपसर्ग न लावणे ते जागा सुखरूप राहो देणे मार्गी येता जाता आमदरफ्तीचा उपसर्ग न लावणे जाणिजे छ २ जमादिलाखर पा। हुजूर
राजते
लेखना
वधी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७५ ]
श्रीरामप्रसन्न.
शके १६५४.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री अंबाजीपंत स्वामी गोसावी यांसिः--
पो। नारो शंकर नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान कळों आलें. ऐसियास, तुमच्या भिडेच्याप्रसंगेकरून रा। गोविंद आपाजी याजपाशीं मान्य केलें कीं, जे गांवकरी सातारियास गेले होते ते अवघे येथें आणावे. त्यांणी तेथें सांगितलें त्याप्रमाणें येथें सांगावे. येथें दुसरी गोष्टी जो विचार आहे तो तुह्मी जाणतच आहां. वेदमूर्ति रघुनाथभट्ट काशीकर यांणीं तुह्मांस शिवपुरी सांगितलेंच असेल; व राजश्री कृष्णराउ यांणीही तुह्मांस लेहून पाठविलेंच होतें. हालीं गोविंद आपाजी याजपाशीं त्याजप्रों। बोली केली आहे. त्याप्रों।, बोलीचा निर्वाह व गांवकरी अवघे येथें आलियानें कार्य होईल. वरकड तुह्मीं आलेत न आलेत याचा कांहीं आग्रह नाहीं. तुमचा हरकोणी आला तरी कार्यास येईल. परंतु गांवकरी व निर्वाह बोली करून पाठवून दीजे. बहुत काय लिहिणें ? लोभ * * असो देणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७४ ]
श्री.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री निळोबा स्वामी गोसावी यासि:--
पोप्य गोविंद खंडेराव दंडवत प्रा। विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. मागील सात सालें तुह्मांकड़ील हिशेब घेऊन यावयाविसीं श्रीमंतांनीं तुह्मांस लिहिलें आहे. त्यास, सात सालांचे विशेब वगैरे मागील दाखले जे असतील, ते घेऊन, तुह्मी व राजश्री जयरामपंत मिळोन यावयाचें, अनमान न करितां, करणें. येतांना सासवडास जाऊन तेथें राजश्री नानाचे दर्शन घेऊन यावयाचें करावें. अनमान न करितां लौकर लौकर येणें. + बहुत काय लिहणें ? लोभ असो दीजे, हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७३ ]
श्री.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बापूजीपंत स्वामी गोसावि यांसि :--
पो। बाजीराउ बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. बापूजी बिन्न जावजी सातव निमे पाटील, मौजे वाघोली, ता। हवेली प्रांत पुणें याणें हुजूर येऊन विदित केलें की, आपण निमे मोकोदमीचा वडील असतां, आपला भाऊ बहिरजी सातव वडिलपणाचा कारभार व मानपान बळेंच खातो. तरी साहेबीं आपले वडिलपण असतां बहिरजी सातव रेटाई करून, बळेंच कारभार करितो. त्यास हुजूर आणून बार हक मनास आणून आपलें वडिलपण आपले दुमाला केलें पाहिजे. ह्मणून विनंति केली. त्यावरून हें पत्र तुह्मांस लिहिलें असे. तरी हरदोजणांस आणून रास्ती बार हक्क मनास आणून ज्याचें वडिलपण असेल, त्याचें दुमाला करविलें पाहिजे. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९८
श्री १६२५ पौष वद्य ३
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३० सुभानु संवत्सरे पौष बहुल त्रितीया गुरुवासर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी प्रांत वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे सा। निंब प्रात मजकूर हा गाव सदानंद गोसावी याच्या मठास इनाम सर्व आहे ऐसीयास तुह्मी हरएकविशी त्यास उपसर्ग द्याल तरी सत्पुरुषाचे मठास इनाम आहे ते चालवणे स्वामीस अगत्य आहे यानिमित्त मौजे मजकुरास येकजरा अजार न देणे सुरक्षित इनाम चालवणे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९७
श्री १६२५ पौष वद्य ३
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३० सुभानु संवत्सरे पौष बहुल त्रितीया गुरुवासर क्षत्रिय कुलावतस श्री राजा शिव छत्रपती याणी मोकदमानी मौजे इडमिडे सा। निंब प्रा। वाई यास आज्ञा केली ऐसी जे मौजे मजकूर सदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे तेथील पारपत्य मनास आणणे ते भुवनीगरी गोसावी आणितील तरी तुह्मी गोसावीचा ऐवज त्याकडे उसूल देत जाणे खलेल न करणे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७२ ]
श्री. पौ। छ० १९ सफर.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री माहादोबासः-
प्रति अंबाजी त्रिंबक आशिर्वाद उपरि. आह्मी ता। छ. ८ सफर परियंत कुशळ असो. विशेष. तुह्मी राघोजी बाजीसमगमें ऐवज परिंचियास पाठविला. त्यास चिरंजीव बाबा सरनाईक याचे पदरीं घातला, रु॥ ५,९९५ पांच हजार नबशें पंच्याण्णव घातले. ते रु॥ धोंडजी पवार यासमागमें आह्मांकडे पाठविले. ते सातारियास आले. रामाजी नाईक अनंगळ यास आणून खरे करून घेतले. बिता।. रुपये
ऐन माल खरे रूपये पाडेसार रूपये.
५,१७० ३८५ सावनूर यास बट्टा रु॥ ११॥
२०० कमवजनी यास बट्टा रु॥ १०
१८५ पेगिणीच्या शिक्क्याचे
यास बट्टा रु॥ २३
२६ गैरसाल यास बट्टा रु॥ १॥
६ पनाळी यास बट्टा -॥।-
१८ हिणाचे यासि बट्टा रु॥ ३॥=
५ तांबियाचे, यासि बट्टा -॥
------ --------
८२५ ५५।=
एकूण पांचहजारनवशेपंच्याणव रुपये आह्माजवळ पावले. त्यास रुपये वोंगळ निघावयास कारण काय ? हा ऐवज कोणे सालीचा ? कोणाकडून आला ? खरा पैका कोणें करून घेतला ? हें बर्तमान चिरंजीव धोंडोबा व नारो माहादेव व राघोजी बाजी यांस पुसोन कोणाकडील ऐवज कोण्या सालांत आला ? कोणें खरा करून दिल्हा ? हें हकिकांत मनास आणून लेहून पाठवणें. ज्यांणी ऐवज खरा करून दिल्हा असेल, त्यांस आह्मांकडे पाठवून देणें. येविशीं अनमान न करणें. हा आशिर्वाद.