Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०२ ]
शके १६५६ फाल्गुन वद्य १४.
श्री.
राजा शाहु नरप-
ति हर्षनिधान बा-
जीराव बल्लाळ
मुख्य प्रधान.
मा। धाग राऊत गणराऊत शिंदे भंडारी पा। का। बहादरपूर यांस:-
बाजीराव बल्लाळ प्रधान. सु॥ खमस सलास सलासिन मया अलफ. तुमचेविशीं रा। अंताजी रघुनाथ सरदेशाई व सरदेशपांडे प्रा। फिरंगाण यांणीं हुजूर विदित केलें. त्याजवरून, सविस्तर कळलें. ऐशास, तुह्मीं मा।रनिलेशीं बोली केली; त्याप्रों। कार्यभागास सिध होऊन निष्ठापूर्वक करणार. बहुत उत्तम आहे. कार्यभाग जालियावर तुह्मांस मांव दिल्हा जाईल. आपला खातरजमा असों देणें. मारनिले सांगतील त्याप्रों तुमचें उर्जित केलें जाईल. जाणिजे. छ. २७ सवाल.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०५
श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य १
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३२ पार्थिवनाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री माणको गोविंद यासी आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे प्रात वाई हा गाव श्री सदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणून विदित जाले तरी गोसावीयाचे (इ) नाम गावास उपद्रव द्यावा ह्मणजे काय याउपरी त्या गावाचे वाटे नव जाणे बोभाट आलीय ताकीद होईल जाणिजे लेखनालंकार
रुजु
सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०१ ]
शके १६५६ फाल्गुन बा। १४.
० श्री ॅ
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ
मुख्य प्रधान.
मा। तुंगचोरघा पा। खोचीवडें व पापडी शिंदे भंडारी यांस :--
बाजीराव बल्लाळ प्रधान. सु॥ खंमस सलासीन मया अलफ. तुमचें वर्तमान रा। अंताजी रघुनाथ सरदेशाई यांणी कुलवृत्त विदित केलें त्याजवरून कळलें. ऐशास, तुमची बोली मारनिलेशीं जाली. धर्मरक्षणास तुह्मी सिद्ध आहां. तदनुरूपच ईश्वर मनोभीष्ट सिद्धीस पावील. चिंता न करणें. तुमचें ऊर्जित मा।रनिले सांगतील त्याप्रों। केलें जाईल. छ. २१ सवाल.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०४
श्री १६२७ श्रावण वद्य ९
सदानंद
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री अनाजी जनार्दन सुभेदार प्रा। वाई गोसावी यासी
सेवक परसराम त्र्यंबक प्रतिनिधी नमस्कार सु॥ सन सीत मया अलफ श्री मु॥ निंब बहुत जागृत स्थल आहे त्यास नैवेद्य व दीपास जमीन नेमून देविली पाहिजे ह्मणून रा। रगोजी गुड याही विनतीपत्र पाठविले त्यावरून का। मजकूर पैकी जिराईत जमीन पड पैकी अवल दूम सीम या प्रतीची बिघे चार देविली आहे तरी तुह्मी नेमून देऊन प्रतिवरुसी चालवणे ताजा सनदेचा उजूर न करणे तालिक लिहून घेऊन असल पत्र भोगवटीयास देवाचे पूजकापासी देणे जाणिजे छ २२ रबिलखर निदेश समक्ष
राजते
लेखना सुरुसुद बार
वधी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १०० ]
श्री. शके १६५६ आश्विन शुद्ध १.
तहबंद दि॥ सरदेशमुखी सुभा जावली व्याघ्रगड सुहुरसन खमस सलासैन मया अलफ.
अवल ता। अखेर साल. गल्ला ता। कुडाळ बारशेरीं पेरुले
नख्त मख्ता बेरीज रुपये दिवाण निरखाप्रों। च्यारशे साठी
१०२५ ऐन मख्ता खेरीज हु- रुपये ४६ ०. हंगामशीर उसूल
जुर खंड. द्यावा.
११० कित्ता.
५० खंडोजी साळवी. गल्ला ऐनजिनशी माहाल माहे
२५ मसाले चिटी. सुभा माऊली व्याघ्रगड ३४८३
३५ जमा तळघाट. वजा माहाल मजकूर देखील मजमु-
-------- दार ११ बा।
११०
------- हंगामशीर द्यावे. गोविंद सखु
११३५ तिळवणा.
पैकी वजा सालमजकुरी गोवळ- मुतवजा कचे धनगराकडील
कोटचे मसलतमुळें जमाती हुजरून साडे सोळा मण.
चालूं केल्या याकरितां सरदेश- .॥. हुजुर.
मुखीचे तहकुब ठेविले. पेस्तर ४ मजमुदार.
निर्वाह होणें रुपये ५० रुपये. २।। दिवणा.
बाकी -------
-------------रुपये . ॥। १॥
१०८५ कोंबडीं सुमारे १०० फर्मास
पौ। वजा वराता. राबिते माहार का।,
५० धर्मादाऊ १० अगोटीस. २० कोहळे.
४५ गु॥ प्रमाणें भट माहा- १० पोस्तास. १० फणस वोझीं
बळेश्वरकर १० दिपावळी. १० तेटवें वोझीं
५ पुजारी श्रीभवानी प्र- --- १० चवणी मारे
तापगड. ३०
----- -----
५० ५०
२० राजश्री जानोपंत मौजे दरी. दवनभारे ५०.
१० राजश्री यशवंतराऊ करदी. शाकारणी रख्तखान गडावरी
२५ चिटी मसाले पेस्तर ता। कलम १
साल उसूल द्यावे. किस्त जिनस
--------- वासे कारवी भारे
१०५ ५०० २५
बाकी रुपये नवशे ऐशी रुपये. सारलोनवरी सा
९८० १० २०
तपशील कलमी १
२०० तुर्त रसद द्यावी.
७८० हप्तेबंदी इ॥ श्रावणी पुर्णि-
मा ता। वेशाक पुर्णिमा,
दरमाही ७८.
---------
९८०
लत
येणेंप्रमाणें तह केला असे. सदईस-नख्तास व गल्यासी-हमी राजश्री अंताजी केशव व फर्मासीस हमी घेतले आहेत. उमवणी करून देतील. याखेरीज़ सन सलासामधें तहबंदी कलमें वजा आहेत, तेणेंप्रों। चालवावीं. छ. २९ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ?
लेखनावधी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९९ ]
श्री. शके १६५६ भाद्रपद शुद्ध ८.
राजश्री माहादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित राणोजी शिंदे दंडवत विनंति येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. सांप्रत तुह्मांकडू ( न ) कागदपत्र येऊन वर्तमान कळत नाही. येथू (न) काशिदाची जोडी पेसजी रवानगी केली आहे, ती पावलीच असेल. हाली श्रीमंत राजश्री राउप्रधान यांकडून पत्रें नवाब अमीरलुमराउ यांसि थैल्या आल्या त्या बजिन्नस तुह्मांकडे पाठविल्या आहेत. त्यांस प्रविष्ट करून आपले कार्यभाग उरकून शीघ्रवत् आलें पाहिजे. छ. ६ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.
मोर्तब
सुद.
पो छ० १४ जमादिलाव,
संदोसरीं आला.
श्री
जोतीस्वरूपचरणीं तत्पर
जनकोजीसुत राणोजी सीदे
नीरंतर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९८ ]
श्री. शके १६५६ श्रावण-भाद्रपद.
राजश्री सुभेदार गोसावी यांसीः-
॥ अखंडितलक्ष्मीआंलकृत राजमान्य स्नो। अंबाजी त्र्यंबक आशीर्वाद. विनंति उपरि. रा। संभाजीबावांस वाताची वेथा जाली होती. हातापायास जीव नव्हता. अंग थंड पडत होतें. त्यास, तुह्मी अवशध उपाय केला, हें वर्तमान ऐकिलें. त्यास, आह्मांसही तैसेंच जालें. डावा पाय व डावा हात बाहीस अगदीं निश्चेष्टित जाली. तर ज्या वैदांनीं र॥ संभाजीबावांस वोखद दिल्हें असेल, तो वैद्य पाठवून दिल्हा पाहिजे. अगर तुमच्याच उपायानें बरें जालें असलें तर वोखद व अनुपान पथ लिहिली पाहिजे. आणि वोखद लौकर मकाजी बा। पाठविलें पाहिजे. बहुत काय ।ला। ? लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०३
श्री १६२७ चैत्र वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३१ पार्थिवनाम संवत्सरे चैत्र बहुल दशमी मदवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी पा। वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे पा मजकूर हा गाव राजश्री सदानंद गोसावी याच्या मठास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणून हुजूर विदित जालें तरी हे दराहा वर्तणूक स्वामीस मानत नाही हे जाणून याउपरी मौजे मजकुरास एकजरा उपसर्ग न देणे मठाकडे इनाम सुरळीत चालो देणे फिरोन बोभाट आलीया स्वामीस मानणार नाही जाणिजे लेखनालंकार
रुजू सुरनिवीस
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९७ ]
श्री. शके १६५६ आषाढ वद्य १३.
राजश्री माहादेभटजी गोसावी यांसिः- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। राणोजी सिंदे दंडवत विनंतिं उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविले ते पावले. यादीदास्तीप्रमाणें फर्मान जाहालें. व +++ प्रों। करार जाहला. तूर्त एक लाख रुपये दिल्हे. वरकड पुढें दरमहा देणार. ऐसियासि, दोन महिने जाहाले. पुढें दुसरा समाचारच येतां दोन महिने लागतील. खर्चास काय करावें ? त्यास इतबार अझून नयेच ! धातुपोषणच करितात ! तरी या सलुखाचें काय घ्यावें ! अवघा पैका बोलीप्रमाणें घेणें. व येथील बंदोबस्ताचें काम चाली लावावें लागतें. तरी सुभ्याची सनद व कुमकेचीं पत्रें, समेत तोफखाना, सवाइजी व राणाजी व बुंदेले, कोठें, नखर, वोडसे, दतिया, भदावर, वगैरे घेणें. माळवाचा बंदोबस्त करून ++++ नवाबच येऊन कुमक करितील ++++ करूं. पुढे फौजाही जमा होतील. त्याप्रमाणें +++ करून मोठें एखादें पातशाही कामकाज अंगरे अवघे मिळोन पातशाही मुलाजमतेस नेल्यानें कळेल कीं, सर्व गोष्टी अमलांत येतील. पातशाहास संतोष कितीएक गोष्टी आहेत. याबद्दल सुबियाची सनद व कुमकेची तरतूद करून अर्धा खर्च व यादीदास्तीचे कुली फर्मान घेऊन येणें. सिरुपाड इनामत देतात ते अवघ्या सरदारांसही इज्जतलायख घेणें. कार्याचे माणूस आहेत. या +++++ होय तें करणें. जाणिजे. छ. २६ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तबसूद.
श्री
जोतीस्वरूपचरणीं
तत्पर जनकोजीसुत
राणोजी शीदे नीरंतर.
पो छ. १३ रबिलावल.
छ० ११ सफरीं पाठविलें
होते. भगवान वद्याराम म॥ सोभा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९६ ]
श्री. शके १६५६ अषाढ वद्य १०.
राजश्री. महादेवभट हिंगणे गोसावी यांसिः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य
स्नो राणोजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मांकडील कांहीं वर्तमान कळलें नाहीं. विसा दिवसांनीं ++++ स, त्यासी दोन महिनें जाहाले. अद्याप कार्य ++++ उजेनीस आलियावरि येथील खर्च पाहिला तो ++++. २५००० रुपये पोट मात्र चालावयासी पाहिजे. त्यांणी फारसें दिल्हें तरी रोज ५००० पांच हजार देणार. मग उपाशी मरायांत काय जीव ? याकारणें राजश्री पंतप्रधान आवघे फौजेनसी देशास गेले. आह्मी व राजश्री मल्हारबा, व यशवंतराउ पंवार, तुकोजी पंवार बारा हजार फौजेनसी राहिलों. राहिलियावरी तमाम गिरासी यांचा बंदोबस्त केला. पटारीस ठाणें बसविलें; लालगडवाला लुटिला; चोर देशांतरास गेले; रयतीस कौल दिल्हा. प्रस्तुत छावणी सोनदेवाडियांत केली. आगर परगाणियांत आहों. तुह्मांस सविस्तर कळावें ह्मणवून लिहिलें आहे. तुमच्या कराराप्रमाणें सनदा व खर्च, व सुभियाची सनद, सर्व गोष्टी करून देतील तरी सत्वरी करणें; नाहीं तरी, उठोन येणें. जाब ताबडतोप पाठवणें. हा कालवरी पातशाही चाकरींत आहों. दोनीं कामें चांगली केली. पातशाहीमधें खबर आहे की नाहीं ? न कळे ! असो ! जरी बनत असलें तरी सांगावें. नाहीं तरी त्यासि सांगून प्रयोजन काय आहे ? याचा जाबसाल लवकरी पाठवावा. काम न होय तरी उत्तर पाठवावें. छ. २३ सफर. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.
पो। छ० १० रबिलावल.
उजनीची जोडी याजकडील फकिरा व शामा.
श्री
जोतीस्वरूप चरणीं तत्पर,
खंडोजीसुत राणोजी सीदे
नीरंतर.