[ १०७ ]
श्री.
शके १६५८ पौष.
राजश्री दावजी दिनकरराव वाळके यांसीः- आज्ञा केली ऐसी जेः--
दावजी दक्षणची फौज जाऊन नवाबास सामील होईल, ते होऊं न द्यावी. यास्तव राजश्री चिमणाजी बल्लाळ खानदेश प्रांतीं राहिले आहेत. त्यास फौजेनसी जाऊन सामील होणे. ह्मणून तुह्मांस पांच सात अज्ञापत्रें सादर जाहलींच आहेत. ऐशियास, राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांची व नवाब निजामन्मुलुक यांची गाठ पडली. नवाब भुपालगडचे आश्रयास गेला. पंडित मशारनिले चौगीर्द चौक्या देऊन बैसले आहेत. नवाबांनीं दक्षणी फौजेस लौकर येऊन पोहचणें ह्मणून पत्रांवरी पत्रे पाठविली आहेत. त्याजवरून औरंगाबादेची फौज नवाबाकडे जाऊं लागेल. याजकरितां तुह्मांस टाकोटाक फौजेनसी जाऊन, राजश्री चिमणाजी बल्लाळ यांस सामील व्हावयाची आज्ञा केली असे. तरी देखत आज्ञापत्र जेथें असाल तेथून कुच करून सिताफीनें जाऊन मशारनिलेस सामील होणें. ये गोष्टीस एक क्षणाचा उजूर कराल तरी न करणें. बहूत सिताफीनें जाणें. जाणिजे. बहूत काय लिहिनं.