लेखांक २०७
श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य २
तपोनिधी भवानगिरी गोसावी मठ श्रीसदानंद यासि प्रती राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मीं पत्र पाठविले तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला मौजे इडमिडे स्वामीनी अन्नछत्रानिमित्य इनाम दिल्हे आहे त्यास उपसर्ग लागतो व गावकरीही उसुलास खलेल करिताती ह्मणून लिहिले त्यावरून ताकीदपत्रें सादर केली आहेती अतःपर कोण्ही उपद्रव देणार नाही तुह्मी गांवीची उसूल घेऊन अन्नछत्र चालऊन सुखरूप असणे छ १५ साबान सुहूरसन सीत मया अलफ जाणिजे बहुत काय लिहिणे
मर्या
देयं विरा
जते