लेखांक २०६
श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य १
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३२ पार्थिवनाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी मोकदमानी व रयानी मौजे इडमिडे प्रांत वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे मजकूर श्रीसदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे ऐसे असता तुह्मी त्याकडे उसूल देत नाही वरकडाकडे उसूल देता ह्मणून विदित जाले तरी हे लबाढीचे ढग स्वामीस मानत नाही याउपरी गावीचा उसूल भवानगिरी गोसावी याकडे बिलकुसूर वसूल देत जाणे दुसरीयाकडे एका रुका द्याल तरी मुलाहिजा होणार नाही हे जाणून राहाटी करणे जाणिजे लेखनालंकार
रुजू
सुरू सुद बार