[ १०९ ]
श्री. शके १६५८ फाल्गून शु॥ १०.
पु॥ रा॥ गंगाजी ना। अणजोरकर गोसावी यांसिः--
सु॥ सबा सलासीन मया अलफ. तुह्मी शिवजी परचितराव याजविशीं लिहिलें की, हे कामकाजांत आहेत. त्यांचे हातून कितेक कामें होतील, त्यांसही बोलाविलें पाहिजे, ह्मणून लिहिलें. त्यास, ते पूर्वापारच कामावरच आहेत. त्याजविशीं पूर्वी तुह्मीं विदित केलेंच आहे. त्यांणीं कामकाज करून आपलें सर्व प्रकारें ऊर्जित करून घ्यावें व कितेक त्याचा सरंजाम करणें तोही होईल. त्याचें समाधान तुह्मीं करणें. त्याचे मुखमाफिक सरंजाम होईल. सारांश, त्यांणीं मन घालून काम करावें. तुह्मीं सांगाल त्याप्रमाणें त्याचा सरंजाम होईल . तुह्मीं त्यास तेथेंच ठेऊन घेणें ते तेथून आणावे तरी कल्याणकर तर्क करितील. यास्तव, त्यास ठेवणें. आणि तुह्मीं येणें. समई त्याचेच हातून काम घ्यावें लागेल. जाणिजे. छ. ९ जिल्काद.
लेखन
सीमा.