[ १०६ ]
श्री. शके १६५८ भाद्रपद वद्य २.
राजश्री देवराव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो यशवंतराव पवार दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयलेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. तुह्मी राजश्री रामाजीपंत येथें प्रा। सोपार व इंद्रगड ( व )गैर येथील हिशेब व कागद घेऊन पाठविले. त्यास, रामाजीपंत येऊन भेटले. हालीं आह्मी मजल दरमजल पुढें जातों. याकरितां यास निरोप दिल्हा असे. हे तुह्मांकडे आले आहेत. हिशेब पाहाणें, अथवा करणें, तें पुणियास येऊं तेव्हां करून. कळलें पाहिजे. छ० १६ जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सूद.
श्री ०
भवानीशंकर चरणी
तप्तर आनंदरावसुत
यशवंतराव पवार
निरंतर.
शके १७९२.