[ १०४ ]
श्री शके १६५७ श्रावण शु॥ ७.
राजश्री सोनजी कोकरे व जिवाजी कोकरे गोसावी यासि :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुहुरसन सीत सलासैन मया अलफ. चिरंजीव राजश्री धोंडो मल्हार यांचा गांव मौजे सुपें मुकासा आहे. तेथें यांणी कुरण राखिलें आहे. तेथें तुह्मीं घोडीं, गुरें, घेऊन येऊन, कुरण चारिलें त्याच्या सरीकास मारिलें, ह्मणून हुजूर विदित जाहालें. तरी मानिलेचें कुरण चारावयास, सरकास मारावयास, प्रयोजन काय ? याउपरि, पत्रदर्शनीं गुरें, घोडीं, घेऊन दुसरे जागां जाणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ. ५ रबिलावल. + बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ
प्रधान.