[ १०८ ]
श्री.
शके १६५८ पौष शु॥ १०.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६३ नलनामसंवत्सरे पौश शुध दशमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाशाहूछत्रपतिस्वामी यांणीं राजमान्य राजश्री पिलाजी जाधवराव यांसी आज्ञा केली ऐसी जेः–तुह्मांकडे तिळगुळ देऊन लिंगोजी रसाळ, व दत्ताजी चव्हाण, व रघुनाथ जिवाजी, व वणगोजी गरूड नि॥ सबनीस, व गुणाजी सिंदा, व बाबाजी मोरे, व दुजाजी मोरे, व मानाजी चव्हाण, पा। आहेत. त्यांस वेतनांत रुपये १०० शंभर देविले असेत. आदा करणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें ?
मर्यादेयं
* राजते.
बार रुजू सूत बार बार बार बार.