Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९५ ]
श्री. शके १६५६ आषाढ शुद्ध ११.
राजश्री माहादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। राणोजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. हाली प्रा। कार्यभाग जाहाला ह्मणवून लिहिलें, तें कळलें. ऐसियासि, येथील वर्तमानः-- उज्जन्न प्रांतें आलियावरी तिकडून रा। बाजी भिंवराव यांची फौजही आली. कट फार जमा जाहाले. खर्चाचा मोठा गवगवा जाहाला. तुह्मांकडून तो कांहीं येऊन न पोहोंचलें. पुढें आठ पंधरा दिवसा पांच लाख रुपये येणार. ते आले तरी काय होणार ? यास्तव राजश्री राउसाहेब अवघे लष्करसुद्धां देशास गेले. येथें तुह्मांसी बोली केली होती की, माळवियांत छावणी करितों. त्याकारणें आह्मी व राजश्री मल्हारबा व पंवार त्रिवर्ग याप्रमाणें फौज हजारपंधरापर्यंत राहिलों. याउपरि खर्चाची पोख्ती बेगमी करून जलदीनें पाठविणें, व पंचविसांच्या सनदा बालीप्रमाणें पाठवणें, व सुभियाची सनद घेणें. ते ह्मणतील कीं, मुख्य भेटतील तेव्हां देऊं; तरी ते व आह्मी कांहीं दुसरे नाहीं. तुह्मी ढील कराल तरी पुढें हे कटकटच राहेल. सुभा दिलियानें गोष्टी बंदोबस्त करून, त्यांची तुमची भेटी उत्तम रीतीनें करून, ह्मणून सांगोन कुलीं कार्यभाग करणें. आमचें राहाणे मनसुब्याकरितां जाहालें, तरी अवघा कार्यभाग करणें. कोणे गोष्टीची बाकी न ठेवणें. ते ठेवतील, तरी त्यासी भारी पडेल. यांत त्यांच्या चित्तास येईल तें करूत. आह्मास सुचला अर्थ लिहिला आहे. जाणिजे. छ० ९ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सूद.
* वरकड वर्तमान राजश्री पंताच्या पत्रावरून कळेल. थैल्या ४ नवाब, सवाई, यादगारखान, कृपाराम, यांसि पाठविलीं आहेत. ज्यांची त्यांसी देणें. ह विनंति.
मोर्तब मोर्तब पो। छ. २७ सफर.
सुद. सुद. पहिली जोडी.
श्री
जोतीस्वरूपचरणीं
तत्पर जनकोजीमुत
राणोजीशींदे नीरंतर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९४ ]
श्री. शके १६५६ ज्येष्ठ शु॥ १२.
राजश्री मानाजी केसरकर आ। सरदेशमुख गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। हरी मोरेश्वर राजाज्ञा आशिर्वाद. सुहुरसन खमस सलासिन मया अलफ. तुह्मांकडे सरकाराचा ऐवज येणें त्यापैकीं वजा बिता। रुपयेः-
२००० पा। इंदापूर मामला परभारा.
७०० प्रा। पनाळा नुकसान बाबत.
----------
२७००
यास हप्तेबंदीपैकीं.
हप्ता चैत्रमासपैकी ११०० वैशाखमास पैकीं ११००
११०० ११००
अखेरसालपैकी ५००; एकूण २७०० सतावीसशें रुपये.
सदरहुप्रों। वजा पडोन बाकी ऐवज वसूल घेतला असे. तेणेंप्रमाणें मजुरा असत. छ० ११ मोहरम. + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
०
श्रीभवानीशंकर
प्रसन्न. श्री
राजाशाहुचर-
णि तप्तर हरि
मोरेश्वर
निरंतर. बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०२
श्री १६२७ चैत्र वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३१ पार्थिवनाम संवत्सरे चैत्र बहुल दशमी मदवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणीं माणको गोविंद यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे पा। वाई हा गाव राजश्री सदानंद गोसावी याच्या मठास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणून हुजूर विदित जाले तरी ऐसी बदराहा वर्तणूक करावया तुह्मास गरज काय याउपरी मौजे मजकुरास एक जरा उपसर्ग न देणे व तेथील एक रुका उसूल न घेणे फिरोन हुजूर बोभाट आलीया स्वामीस मानणार नाही हे जाणून गावाचे वाटेस नव जाणे जाणिजे लेखनालंकार
रुजू सुरनिवीस
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९३ ]
श्री. शके १६५६ चैत्र शु॥ ५.
सदरहू नकल यशवंतराव मैराळ यांचे हातची नकल त्याजवरून केली असें. असल नकल भिवराव रघुनाथ यांणी घेऊन ही नकल गोविंदराव सदाशीव यांस करून दिल्ही असे. वरील शेरा भिवराव रघुनाथ स्वदस्तुर असे.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६१ आनंदनाम संवत्सरे चैत्र शुक्ल ५ गुरुवासरे क्षत्रियकुलावंतस श्रीराजाशाहुछत्रपति स्वामी यांणी राजकार्यलेखनधुरंधरविश्वासनिधि राजमान्य राजश्री जिवाजी खंडेराव चिटनिवीस यांसि आज्ञा केली ऐसीजे :-
तुह्मी विनंति केली की, आपले वडील, आजे व तीर्थरूप यांणीं स्वामिसेवा केली. त्याजवरून कृपाळू होऊन चिटनिसीचा दरक वतनी वौंशपरंपरेनीं करून दिल्हा. कारखाननिसी व जमेनिसी दोन धंदे सर्व राज्यांतील परंपरेनें देऊन, शपथयुक्त पत्रें करून दिल्हीं. त्याअन्वयें स्वामींनीही अभयपत्र दिल्हें. चिटनिसी वतनास गांवजमिनी, मोकासे, लावून दिल्हे ते इनाम चालवावेसें अभय वचन दिल्हें. त्याप्रों। पत्र करून देऊन, चालविलें पाहिजे, ह्मणोन. त्याजवरून पूर्वीपासून कागदपत्र मनास आणितां, तुमचे आजे बाळाजी आवजी, थोरले कैलासवासी स्वामींनीं राज्यसाधन केलें तेसमईं, बहुतच श्रम साहास करून, उपयोगी पडले. दिल्हीचे जाण्याचे प्रसंगी संकट पडलें असतां बरोबर सेवा केली व राज्याभिषकाचे समयीं उपयोगी पडोन, स्वामीचे मनोरथसिद्धि केली. त्याजवरून संतोषी होऊन अष्टप्रधानांतील पद द्यावयाची योजना केली असतां, चिटणीसीचे वतनी परंपरेने द्यावी, विनंति केली. यावरून प्रसन्न होऊन शफतयुक्त करून दिल्हें. नंतर थोरले महाराज कैलासवासी जहालेयावर कैलासवासी तीर्थरूप स्वामी यांणी कोणी गैरवाका समजाविल्यावरून राज्यभर सरकारकुन यासि शिक्षा केल्या. त्यांत यांसहि केली असतां, तुमचे वडील खंडो बल्लाळ यांणी बहुत निष्ठेनीं वागून स्वामीचें कोण्हाचे लढाईत शूरत्व करून समुद्राचे भरतीस स्वामीचा घोडा पाण्यांत पोहणीस लागला असतां, धरून, उडी टाकोन घेऊन निघाले. याजवर बहुत संतोष होऊन शफत करून वचन दिल्हें. सर्फराज केलें. तोही प्रसंग यवनांचे प्राबल्य होऊन विज्वर जाहाला. स्वामींसही यवनांचे सन्निध जाणें आलें. तेथें गेले असतां कैलासवासी आबासाहेबाचे हिकडे जाऊन राज्यरक्षणकारण करणें करावयाचे प्रेत्नास लागले. तेव्हां सर्व जातेसमयीं त्यासही संकटसमय प्राप्त जाहाला असतां, त्यास काढून देऊन, आपण क्लेश भोगिले. त्यानंतरचे दिवस जाऊन तेथें सेवा निष्ठेनें केली. तेथें संकटाचा प्रसंग प्राप्त होऊन निघणें दुर्घट पडलें असतां जुलपुकारखान व गणोजी शिर्के यास संधि करून दाभोळचें वतन दिल्हें होतें. शिर्के यास देऊन त्या मोरच्यांतून पाळण्यांत बसवून, काढून घेऊन, येऊन, देशीं सेवा केली. यानंतर आबासाहेब समाप्त जाले. तेव्हां यवनास दिल्हीचें व्यसन प्राप्त जालें. तेव्हां स्वामीस त्यांनी निरोप देऊन लावून दिल्हें. देशीं येणें घडलें असतां आबासाहेब याची स्त्री आईसाहेब यास आपला पुत्र घेऊन राज्यभार करण्याची इच्छा होऊन दुर्बुद्धि धरली. फौजा देऊन सेनापति व परशराम त्र्यंबक प्रतिनिधि रवाना केले. त्याबरोबर खंडवांस दिल्हे असतां स्वामींस गुप्तपणें भेटोन सेनापतीस सरदार यांच्या खातरजमा करून, सर्वांस स्वामींचे लक्षीं आणिलें. लढाई जाहाली. प्रतिनिधी दमोन गेले. स्वामी विजयी होऊन राज्यभारसाधनप्रसंगांत सर्व स्थलें व सरदार व प्रतिनिधि व सरकारकून यांस स्वामीलक्षीं लागण्याचे उद्योग बहुत केले. पुढेंही तुह्मी त्याअन्वयें स्वामीचे ठाई एकनिष्ठता धरून आंगरे वगैरे मातुश्रीलक्ष्यांतील सरदार जाहाले वगैरे स्वामिलक्षीं लागावयाचे उद्योग करीत आहां. त्याजवरून तुह्मांवर कृपा करणें अवश्यक जाणोन, चिटणीसी तुह्मांस पूर्वी शंफतयुक्त दिल्ही आहे, ती खातरजमेनिशी वतनी दोन धंदे राज्यांतील. त्याप्रों। करार करून देऊन चिटणिशीवतनास गांव व मोकासे व जमिनी लागल्या आहेत. हे इनाम करार करून दिल्हे.
बीतपसील.
१ मौजे बोरगांव प्रो। शिराळें देखील सरदेशमुखी दुतर्फा दरोबस्त वगैरे.
१ मौजे मांजगांव कसबे तलबीड दरोबस्त.
१ मौजे जैतापूर ता। सातारा दरोबस्त देखील पाटीलकुलकर्णीवतन.
१ मौजे नाकेली प्रो युपें दरोबस्त.
१ मौजे निमणी का। कवठें प्रो। मिरज दरोबस्त
१ मजरेभाव माल मौजे साळव तो हिरड़समावळ
१ मौजे ईजर ता। कानपखोरे दरोबस्त
२ तो। रत्नागिरी प्रो। राजापूर.
१ मौजे वणगुले तर्फ कर्ज दरोबस्त वतनीखेतीसुद्धां.
१ मौजे कलंबस्ते तर्फ संगमेश्वर मोकासी.
--------
२
१ मौजे धामणेर सा। कोरेगांव प्रो। वाई मोकासी. वरमणाखेरीज जमीन वगैरे.
१ मौजे खोजेवाड़ी तर्फ सातारा मोकासा व कुर्ण.
१ मौजे मुरूड तो। तारळें मोकासा.
१ मौजे आमदाबाज तर्फ सातारा मोकासा सारी–बाग जमीन सुद्धां.
२ प्रो। सासवड देहे मोकाशी
१ मौजे कोलोली.
१ मौजे कारखजे.
-----
२
१ मौजे वडगांव तालुके करडेरांजणगांव मोकासा वगैरे कुर्णे. सुद्धां.
१ कसबे वडनेर प्रा। चांदवड मोकासा बाबती वगैरे.
१ कसबे खेडेगांव प्रो। वण.
१ मौजे खिदरी प्रो। नासीक.
१ कसबे तिसगांव मोरगांव प्रो। सेगांव मोकासा जकात.
१ मौजे कोंदर तर्फ बीडवाडी मोकासा.
३ प्रो। जुन्नर पो। गांव.
१ मौजे कवठें.
१ मौजे वरूड.
१ मौजे निंबगांव.
----
३
१ मौजे चिखली प्रा। पाटोदें मोकासी बाबती.
१ मौजे सातगांव तर्फ चांभारगोंदें मोकासा बाबती निमेचे भाई.
१ मौजे काजंडी तर्फ मांडवगण मोकासा बाबती निमेचे भाई.
१
१. मौजे कनकडु प्रो। उजमन मोकासी बाबती.
१ प्रो। धोंड मोकासी व जकात.
३ मौजे पोटीदे प्रो। दडतुर मोकासा बाबती वगैरे, का। -प्रों।-व मौजे मगरून प्रों। धार.
१ मौजे मुंगळे प्रों। शिरपूर मोकासी बाबती जकात.
१ मौजे धैरगांव प्रो। बीड मोकासी.
१ मौजे हिरडेगांव प्रो। बीड मोकाशी.
१ मौजे वणस गांव प्रो। चांदवड.
६ इनाम वतनी.
१ मौजे निगडी तर्फ सातारा चावर २.
१ मौजे सोनगांव तर्फ सातारा चोबर -।-
१ कसबे निंब प्रो। वाई पो। जमीन बिघे.
१ मौजे ----- तर्फ उमरज प्रो। कराड पो। जमीन.
* १ मौजे चिंचनेर तर्फ वंदन प्रो। वाई पो। जमीन बिघे ५.
* १ मौजे त्रिशीर तर्फ उमरज चावर निमे -॥-
-------
६
--------
४५
यणेंप्रमाणे महाल व गांव व जमिनी तुह्मांस इनाम करून दिल्हे असे. तरी तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें सदरहूचा अनभव करून सेवा करून सुखरूप राहणें. जाणिजे. येणेप्रमाणें सेवा केली आहे. वतनी धंदे. इनाम खाणें. बहुत काय लिहिणें ?
मोर्तब आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०१
श्री १६२७ चैत्र वद्य १०
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ३१ पार्थिवनाम संवत्सरे चैत्र बहुल दशमी मदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिव छत्रपती स्वामी याणी राजश्री मुद्राधारी किले वंदनगड यासि आज्ञा केली ऐसी जे (शिक्का) (शिक्का) मौजे उडतर प्रात कर्हाड येथे श्री सदानंद गोसावी याचा इनाम चावर .।. पाव चार आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणोन हुजूर विदित जाले तरी ऐसी बदराहा वर्तणूक करावयास तुह्मास गरज काय हे रीत स्वामीस मानत नाही हे जाणून याउपरी मौजे मा।रास एकंदर उपसर्ग न देणे रोखापोखा एकदर काही न करणे फिरोन बोभाट येऊ न देणे जाणिजे लेखनअलंकार मोर्तब
रुजू सुरनिसी सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९२ ]
श्री. शके १६५५ माघ वा। ३०.
राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यांसिः--
॥ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो बाजीराव बल्लाळ प्रधान आर्शिवाद. सुहूरसन अर्बा सलासीन मिया * अलफ पा। मलाडाई येथील बाब सरदेशमुखीची कमावीस रा। त्रिंबक हरी यासी आहे. त्यास, तुह्मी जातेसमयीं प्रा। मजकुराकडे सालगुदस्ताची बाकी व सालमजकूरची खंडणी करार केली आहे, त्याप्रों। वसूल जाला असिला तरी उत्तमच आहे. नाहींतरी तुह्मीं येतेसमयीं दबाव घालून, बाकी सालगुदस्त व सालमजकूरचे वसूल मा।रनिल्हेचे पदरीं पडे ते गोष्टी करणें. जाणिजे. छ० २८ रमजान. + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
+ ० श्री ॅ
राजा शाहुनरपति
हर्षनिधान बाजी-
राव बल्लाल
प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९१ ]
श्री. शके १६५५ माघ वा। २.
० श्री ॅ
राजा शाहुनरपति
हर्षनिधान बाजी-
राव बल्लाळ मुख्य प्रधान.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मिअलंकृत राजमान्य
स्नो बाजीराउ बल्लाल प्रधान आशीर्वाद, सु॥ अर्बा सलासीन मया अलफ. तुह्मी स्वारीस जातां, पा। मकडाई येथें उपसर्ग दिल्हा, घांसदाणा घेतला, ह्मणून वर्तमान विदित जाहालें. त्याजवरून हें पत्र पाठविलें असे. तरी तुह्मी तिकडून येतेसमयीं प्रा। मजकुरांस उपसर्ग न देणें. एकवेळ घांसदाणा घेतलीयावर दुसरा उपसर्ग करावा ऐसें नाहीं. जाणिजे. छ ० १४ रमजान. + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९० ]
श्री. शके १६५५ पौष शु॥ ६.
* ० श्री ॅ
राजा शाहुनरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ मुख्य प्रधान.
मा। अनाम देशमुख व देशपांडे कर्यात सासवड यांसिः--
बाजीराउ बल्लाळ प्रधान सुहूरसन अर्बा सलासीन मया अलफ.
मौजे बेलसर कर्यात मजकूर येथें कृष्णजी गरुड व नाहावी याच्या घराची कजिया आहे, ह्मणून तुह्मीं पेसजी लिहिलें होतें. व हाली, हे उभयतां येऊन हुजूर अर्ज केला कीं, गांवचे बारा बलुते जमा करून, दशरात्र पंचरात्रीची क्रिया नेमून, त्यांचे क्रिया घेऊन, माहाराचे डोईवरी श्री देवीचा अंगारा व पांढरीचा भेंडा देऊन, नाहावियाच्या घराचा जागा पुरातन असेल तेथवरी जाऊन, उभा राहेल त्याप्रमाणें या उभयतांचा कजिया वारून देणें. येविशीं राजश्री नारा दादाजी यास तेथे जाण्याची आज्ञा केली आहे. तरी, ते व तुह्मी मौजे मजकुरास जाऊन, नाहावियाच्या घराचा कजिय वारून देणें. हुजूरून रा। श्रीनिवास केदार पाठविले आहेत. याच्या विद्यमानें उभयतांचा कजिया बहुत चौकशीनें निवाडा करून हुजूर लिहून पाठविणें. हुजुरून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें. जाणिजे. छ० ६ साबान. आज्ञाप्रमाण.
लेखन
सीमा.
.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ८९ ]
श्री. शके १६५५ कार्तिक वद्य १०.
पुरवणीः राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यांसिः--
सु॥ अर्बा सलासैन मया व अलफ. हुजरातच्या लोकांमध्यें कितेक लबाड असाम्या आहेत, त्या निघाल्या पाहिजेत, यास्तव चिरंजीव नाना यांस प्रस्थानीं स्वार करावे, ह्मणजे लोक त्वरेनें निघतील. हा विचार पहिला तुह्मास लिहून पाठविला आहे. व चिरजिवांस राजश्री बाबुनाईक यांचे घरी प्रस्थानी जाणें, ह्मणून लिहिलें होतें. त्यावरून ते प्रस्थानीं निघाले असतील. परंतु चिरंजिवांनीं निघावेंच ऐसा अर्थ नाही. लोकांस दटावून सांगितलियावरी कोणाच्यानें राहवत नाहीं. औघेच स्वार होऊन येतील. जो कोण्ही न जाई त्यास दटावून पाठविले जातील. ते गोष्ट राहूं द्यावी. जाणिजे. छ. २२ जमादिलाखर. नानास गंगेपावेतों न्यावें ऐसें आह्मी लिहिलें होतें. परंतु ते गोष्टीचें प्रयोजन नाहीं.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ८८ ]
श्री. शके १६५५ आश्विन.
पुरवणी राजश्री साबाजी प्रभु चिटणीस व राजश्री अंताजी बावाजी गोसावी यासी :--
उपरि. पत्र कमलोजी शेटगे याजसमागमें पाठविलें पावलें. लेखनार्थ कळला. आज्ञापत्रें सादर जालीं; शिरसा वंदिली. आज्ञेप्रों। वर्तणूक करित आहों. माहाराजांचे पुण्य समर्थ असे. सविस्तर रा। महिमाजी आंगरे व लक्षुमण आंगरे यांचे पत्रावरून कळलें ह्मणून लिहिलें. अक्षरशा श्रवणारूढ जाहालें. व चिरंजीवाचे पत्रावरून साद्यंत अवगत होऊन आले. त्यास, चिटणीसबावा खुद तुह्मीच खासा प्रतिमा गेले आहां. तेथें न्यून पडो द्याल व घेयाल हें होणेंच नाहीं हा निशाच आहे. पेलवानीस व युक्तीस एकंदर न चुकतां हारीस नेटबाजी बोलीचालीची करून नडो न देणें. बोलीचालींत काईल करावयास व. त्याचे त्याचे पदरी घालावयास, संलभ्य करायास न चुकणें. अंतर कोणाकडील हें खरें करून पदरी घालणें. पुढें काय विचार ? हाहि सोधून पाहोन लिहिणें. वरकड सविस्तर चिरंजीवाचे पत्रावरून कळेल. स्वकार्य साध्य होऊन येई याच पैरवींत लागले आहां; व निसीम लागोन लवकर उलगडा उलगडोन यावयाचें करणें. कापडाविना व खर्चाविना लोकांची मोठीसी हैराणगत जाली असे. व आरब रोजमुरदार वगैरे रोजमुरदार यांचे देणें चालते माहापासोन मागील गेला महिना देखील थारलें असे. यास्तव रात्रंदिवस चैन पडत नाही. याचा कसा काय विचार तो लिहिणें. चार जातीस तो पावलें पाहिजे. लग्नकरी यांचाहि गवगवा. याजकरितां, आपले पतीवर कर्जवामाचा, विचार तर्ही करून देणें. रा। सुंदरजी प्रभु व मोरो विनायक व पुतळाजी जिवाजी सारखे समागमें असतां वेढे काय ह्मणून लागले ? आण जमलें त्याचे बेतानें कांहीं विचार करून घेणें व कापडाचा सरंजाम, समजाविसी कापड, व वाडियांतील बेगमेची बुतडी, याप्रों। कृष्णाजी नाईक व नथावा नाईक, आदिकरून सर्वांस समाधान करून सांगोन हे प्रसंगी कांहीं तर्ही उपेगास येत ऐसें करणे. तोहि सरंजाम लवकर येऊन पावे ऐसें करणें. सालमजकुरचे चेऊल प्रांतांतील व नागोठणेकडील गल्याचा अजमास खर्चाचा व जमेचा सुमारीचा पाहून पाठविला असे. पंधराशे खंडी पावेतों तोटा येईल. वीस खंडांची खरिदी दिसते. पुढें विचार काय ? तें लिहिणें. हे विनंति.
मोर्तब
सुद.