[ ११० ] *
श्री.
शके १६४८ ज्येष्ठ.
० श्री ॅ
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ
मुख्य प्रधान.
अभयपत्र समम्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान. नानाजी देसाई, व जिवाजी टाकूर, व बाळकोजीराऊ, व गणेशजी कुलकर्णी, व अंताजीराऊ, ता। फिरंगाण सुहुर सन सबा अशरीन मया व अलफ. तुमचेविशी रा। गंगाजीनाईक यांणीं तुमचे निष्ठेचा अर्थ कितेक निवेदन केला, त्याजवरून कळों आले. तुह्मीं कार्याचे लोक, तुमचें सर्व प्रकारें चालवावें, हें अवश्यक जाणून, तुह्मांस अभयपत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं कोणेविशीं चित्तांत वसवास न धरितां, सुखरूप राहणें. तुमचे ऊर्जिताचा अर्थ रा। गंगाजीनाईक यांणीं निवेदन केला. त्यानी आज्ञा मारनिलेस केली आहे त्यावरून कळेल. तुह्मीं आपला खातरजमा असों देणें. जाणिजे. छ. सवाल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.