श्री
शके १६७२ आश्विन शुद्ध ९
राजश्री दामोदर महादेव गोसावी यासीः-
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणऊन स्वकीयें कुशल लिहित जाणें. विशेष. गंगापार होऊन पठाणास तंबी पोंहचावयाचा विचार करून पुलाची तरतुद करवीत असों. बाहिरवार ठेवणें लागेल. निगेवजीस कांहीं जमियेत राहील. रूपराव खिचर यासी श्रीमंत राऊसाहेबीं विरादरांत जाणत होते, येथें जमियेत सुद्धां पोंचल्यास त्याचे तरफेनें निगेबजीची खातरजमा असे. तरी नवाबास सांगून दोघा भावांतून एकजण जमियेत सुद्धां येऊन येथें पोहचत तें करणें. ते इकडे चाकरीस येतील. मागें त्यांच्या तालुकियासी कांहीं उपसर्ग न लागे तें करणे. विश्वासूक, कार्याचे मणृश ( मनुष्य ) असत. याजकरितां लिहिलें आहे. तरी, लिहिल्याप्रो। त्यांचे येणे होय, तें जरूर करणे. छ ७ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.