लेखांक २५३
श्री गणपती
नकल
तपोनिधी राजश्री दौलतगीर बावा मठ निंब गोसावी यासी
स्नो। विसाजी राम नमो नारायण विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावे विशेष तुह्मीं पत्र पाठविले ते पावले ता। जोरखोरे व जाबुलखोरे सुभा जावली येथील अन्नछत्राकडे सालाबाद गला आहे ह्मणोन लि॥ त्यावरून जांबुळखोरे आह्माकडे नाही जोरखोरे येथील अमलावर कारकून आहे त्यास सालाबादप्रो। वर्षासन गला आहे तो देणेविशी रुबरू ताकीद करून येथील कारकुनास पत्र देविले आहे सालाबदप्रा। वर्षासन चालवणे वरकड मजकूर विठलगीर यासि बोलण्यास आला आहे ते सांगतील त्यावरून सर्व कळेल रा। छ ५ सफर हे विनंती