लेखांक २५१
देऊ
श्री रामजी साहाय
रामराम
तीर्थरूप राजश्री आनंदगीर महंत गोसावी यासी
.॥ सिधी महाराज स्नेहांकि(त) दुर्गादासजी व समस्त ठाकूर उपरी येथील क्षेम तो धर्म स्वामीचा स्वामीने आपले स्वानंद लेहावया आशीर्वादपत्री लेखकास आज्ञा दीजे विशेषु गोसावी यानी दया करून श्रीहरदेवगीर व ता। रामगीर याबराबरी आशीर्वाद पत्र पाठविले ते उत्तम समई आह्मापासी प्रविष्ट जाले बहुत संतोष जाला तेथे आज्ञा की ताम्र येऊन मठासबब उपद्रो केला धर्मशाळेस उपद्रो केला परंतु श्री स्वामी आपण येथे आहो मठही जाला पाहिजे व देवाचा नैवेद्य चालला पाहिजे अनछत्र चालिले पाहि(जे) त्यावरी गोदावरीचा मेळा आला आहे येथेही येणार आहेत तरी त्याचे चालले पाहिजे ह्मणून आज्ञा केली तरी मठाचे काय आहे श्रीस्वामी तुह्मी अभग आहा तुह्मी ते ठाई आहा तोवरी श्री चालवील हा भरवसा आहे परतु आह्मी तुमची लाविली झाडे आहो आह्मास आज्ञा करावी तरी आह्मी सेवेस अंतर पडो देणार नाही या समयात खरचाची तुंबडी आहे यानिमत्य पत्र लिहिले आहे देव करील तरी तुमचे कृपेने खरचाची आबादानी होईल आणि आज्ञप्रमाणे सेवेस उभे ठाकोन या समयाची गोष्टी ऐसी आहे कळले पाहिजे कृपा असो दीजे पगे लागणा